Top Marathi News Updates, 31 August 2026 : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात सध्या तुरुंगात असून आज त्याच्या जामिन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्याच्यावर १७ गुन्हे दाखल असून १२ गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्यात आलाय. तर, दुसरीकडे मुंबईत रात्री मोठी दुर्घटना घडली होती. बार्बाडोसचा ध्वज असलेले ‘व्हिएन्ना’ हे जहाज माल उतरवण्याचे काम करत असताना अपघात झाला. बरकत कंपनीच्या दोन क्रेनद्वारे माल उचलत असताना क्रेन असंतुलित होऊन जहाजावर आदळली आणि तिला आग लागली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज देवगिरी येथे बैठक होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तसंच, मुंबईत भरधाव इनोव्हा कारने ८ वर्षाच्या मुलाला चिरडल्याची घटना घडली. या घटनेत हा मुलगा गंभीर जखमी झाला, ज्यानंतर त्याला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा त्या मुलाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यासह राज्यातील इतर घडामोडी पाहुयात.
Latest Marathi News Live Updates, 31 August 2026 : महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा
CJP वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; म्हणे, "हा तर 'काँग्रेस जिताओ प्रोग्रॅम", शाळांच्या मुद्द्यावरही भाष्य!
नांदेड जिल्हा परिषदेचा २३ कोटी रूपयांचा निधी शासनाकडे परतला!
Video: "…तेव्हा प्रियांका गांधींना संधी का दिली नाही?" देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल; सोनिया गांधींचाही उल्लेख!
मुंबईऐवजी जरांगेंच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू दिल्लीकडे; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा
"नियुक्त्यांची घाई का?"; पुणे मनपा इंजिनिअर भरतीतील गैरप्रकारावरून रोहित पवार आक्रमक
"पुणे मनपा कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं सिद्ध झालं आणि याप्रकरणी सखोल चौकशीची गरज असल्याचं चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद केलं, तरीही सखोल चौकशी करण्यापूर्वीच महापालिका प्रशासन या परीक्षेतून निवड झालेल्यांना नियुक्त्या देण्याची घाई का करतंय? त्यासाठी कुणाचा दबाव आहे का? प्रामाणिकपणे अभ्यास करुन विद्यार्थी परीक्षा देतात आणि परीक्षेत गैरकृत्य करणाऱ्या रॅकेटच्या माध्यमातून भलत्यांचीच निवड केली जाते, हे अजून किती दिवस खपवून घ्यायचं? ही परीक्षा रद्द करुन नव्याने परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी आजही अनेक विद्यार्थी हे महापालिकेसमोर आंदोलन करत आहेत. प्रशासनाने त्यांच्या मागणीची दखल घेऊन ही परीक्षा आणि दिलेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अन्यथा विद्यार्थ्यांचा हा लढा अधिक तीव्र होईल आणि आमचाही त्यांच्या या लढ्याला पाठींबा असेल. उद्या (मंगळवार) नवी मुंबईत MPSC कार्यालयाला भेट दिल्यानंतर या विद्यार्थ्यांनाही भेटण्याचा माझा प्रयत्न राहील", असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
सहायक प्राध्यापकांच्या ५०१२ रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा, अनुदानित महाविद्यालयांसाठी ‘या’ सूचना…
Video: "हे फक्त पुणेकरच करू शकतात", देवेंद्र फडणवीसांची डीजेबाबत भूमिका; केलं 'हे' आवाहन!
ऑगस्टच्या पावसाने विदर्भाची तूट वाढवली, तीन महिन्यांत सरासरीपेक्षा २२ टक्के कमी पाऊस; पश्चिम विदर्भात स्थिती अधिक चिंताजनक
गौतमी पाटीलवर आक्षेप नोंदवत काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी?
दहीहंडीच्या वेळी, नवरात्राच्या वेळी जो काही धांगडधिंगा चालतो, आता इथे गौतमी पाटीलला बोलवलं आहे. यात कुठली धार्मिकता आहे. अर्धनग्न अवस्थेत महिला अंगविक्षेप करणार असतील तर हे श्रीकृष्णाला, गणपतीला आवडणार आहे का? याला मी धार्मिकता म्हणणार नाही. कारण हे विकृत स्वरुप झालं आहे. मी स्वतः देव, धर्म मानणारी व्यक्ती आहे. वेळोवेळी मी धर्माच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहे. मी आस्तिक आहे तरीही मी सांगते आहे की हे सगळं धर्माला धरुन नाही. गौतमी पाटीलला बोलवून धिंगाणा घातला जाणार असेल तर त्यात श्रीकृष्णाची नीतीच ओळखली नाही. नवरात्रात देवीची आराधना करणं सोडून दांडियात घाणेरडी गाणी मोठ्या आवाजात वाजवली जातात. ज्या देवी घराघरांमध्ये आजारी आहेत, थकून आलेले नागरिक आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या स्वतःच्या घरात राहू देणार नाही? हा कुठला प्रकार आहे. तुम्हाला निर्बंध नकोत, पण त्यांना बंधनं पाळावी लागत आहेत त्याचं काय? असा प्रश्न मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा आक्षेप नोंदवला आहे.
मुंबई-बडोदे महामार्गाच्या भूसंपादनात टिटवाळ्यातील रहिवाशाच्या नावे मध्यस्थांचा २ कोटींवर डल्ला
LIVE : पुण्यातील महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारील मोदींचा फोटो हटवला, अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
प्राध्यापकांशी बोलताना एका विद्यार्थ्यांने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो लावला होता. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी होऊ शकत नाही. नियमानुसार फोटो असायला हवेत, पण महाराजांच्या बाजूला नाही - अमित ठाकरे
त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांचा जनसागर; गर्दी आणि गैरसोयींमुळे प्रशासनाची कसरत
VIDEO: बिबट्याची दयाळू बाजू ! कुत्र्याच्या लहान पिल्लाला न मारता सुखरूप सोडलं, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मध्यस्थितीनंतर ‘एमपीएससी’ने घेतला मोठा निर्णय, परीक्षा केंद्रांमध्ये केला मोठा बदल; आता 'या' शहरांमध्येही…
समृध्दी महामार्गावरील लुटमारीनंतर नाशिक जिल्हा पोलीस सतर्क, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना
पुण्याच्या तंत्रनिकेतन शासकीय महाविद्यालयातील मोदींचा फोटो अमित ठाकरेंनी हटवला
पुण्यातील तंत्रनिकेतन शासकिय महाविद्यालयीतल गैरसुविधांबाबत जाब विचारायला अमित ठाकरे गेले होते. त्यावेळी त्यांनी अधिक्षकांना विविध प्रश्नांची सरबत्ती करत झापलं. दरम्यान, त्यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही त्यांनी काढायला लावला.
पिंपरी-चिंचवडमधील ४१४ खासगी रुग्णालयांचा जीवघेणा हलगर्जीपणा! 'फायर एनओसी'कडे पाठ; मनपा उचलणार कठोर पाऊल
टीआरपीची लढाई जिंकण्यासाठी विरोधकांचा जन्म; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची टीका
नीट परीक्षेत ६८० गुणांचा दावा, पण ओएमआर तपासणीत १६०च; विद्यार्थिनीला उच्च न्यायालयाकडून २५ हजारांचा दंड!
मडगाव-नागपूर साप्ताहिक विशेष रेल्वे रद्द; 'या' दिवशीच्या फेऱ्यांवर परिणाम
एसआयआरच्या माध्यमातून मुंब्रा-कळव्यात दोन लाख मतदारांची नावे गायब; प्रबळ विरोधक संपवण्याचा डाव, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शं. क. कापडणीस यांचे निधन
कळवा रुग्णालयातील जेवणात सापडले झुरळ; रुग्णांचा संताप तर मनसेही आक्रमक
"दहिहंडीला गौतमी पाटीलला बोलावणं म्हणजे देवाची विटंबना", भाजपा खासदाराचं विधान चर्चेत
माझा डीजेला विरोध आहे. अनेकवर्षे मुद्दा मांडत आहे की हिंदुत्वाला आणि धार्मिकतेला गालबोट लागेल असे सण साजरे केले जाऊ नयेत. गौतमी पाटीलला बोलावून दहिहंडीचे सण साजरे केले जात आहेत, ही धर्माची आणि देवाची विटंबना आहे. अशा पद्धतीने डीजे लावून, धांगडधिंगाणा करून, अश्लील नृत्य करून, अश्लील गाणी लावून, दारू पिऊन दंगा करणं म्हणजे उत्सव साजरा करणं होत नाही. अनेक मंडळंही समाजप्रबोधनाचं काम करत आहेत, त्याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे - मेधा कुलकर्णी, भाजपा खासदार
चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणात गुन्हा; समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित
भूसंपादनाच्या मोबदल्यात सुसूत्रता येणार, 'हे' काम करणार महसूल विभाग
कोण आहेत विद्यानंद बापट? ज्यांच्या एका तक्रारीने पुण्यातील डीजे आणि ध्वनी प्रदूषणाविरोधात जनआंदोलन पेटलं!
मुंबई ते अलिबाग दरम्यानची जलवाहतुक सेवेबाबत मेरीटाईम बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय…सेवा या दिवसापासून पुन्हा सुरू होणार
Live : "मुंबईत जायला सुरुवात करा", मनोज जरांगेंचं मराठ्यांना आवाहन
महाराष्ट्रातील मराठा समाजाला सांगतो की, १२ तारखेपर्यंत मुंबईत हळूहळू पुढे जा. आपण आपल्या सोयीनुसार पाहुण्यांकडे, मित्रांकडे जाऊन राहा. आजपासून १२ तारखेच्या आत पुढे जात येत असेल जा. फक्त आझाद मैदानावर जाऊ नका. त्यांना संशय येईल की मराठे मुंबईत जाऊन राहिले. मराठे मुंबईत आलेत हे कोणाला कळालं नाही पाहिजे. जर पोलिसांना कळालं की अमक्या तमक्याकडे मराठे येऊन राहिले आणि पोलिसांनी उचलून नेलं तर बिंधास्त पोलीस ठाण्यात जा. तिथंही चांगली सोय होईल. घाबरू नका - मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक

Latest Marathi News Live Updates, 31 August 2026 : महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा
