Maharashtra Mumbai Pune Updates: पुण्यात २३ वर्षीय आयटी इंजिनिअर वैष्णवी गिसरे हिने हुंड्याच्या छळाला कंटाळून लग्नाच्या अवघ्या चार महिन्यातच आत्महत्या केली. या प्रकरणाचे आता पडसाद उमटू लागले आहेत. तर, राज्यात पावसाने ओढ दिल्याने नदी नाले सुकले आहेत. परिणामी शेती करपूर गेली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे राज्यसरकारने राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून त्याकरता उपाययोजना आणि सवलती आखल्या आहेत. त्याची अंमलबजावणी काही दिवसांत सुरू होणार आहे. यावरून विरोधकांनी टीका करायला आणि सूचना द्यायला सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीत दुष्काळकाळात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यभर दौरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना नवा प्रस्ताव पाठवला असून त्यानुसार सरकार आता नवीन निर्णय घेईल, अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली. यासह राज्यातील इतर घडामोडी पाहुयात.

Live Updates

Maharashtra Ganpati Visarjan Live Today, 26 September 2026 : महाराष्ट्रातील ताजे अपडेट्स वाचा

19:10 (IST) 28 Sep 2026

ठाण्यात ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन, शरद पवार गटाकडून गाढवावरून धिंड; काँग्रेसच्या प्रतिकात्मक उठाबशा

गाढवाच्या गळ्यात ‘एक तडीपार चंद्रावर... ज्ञानेशकुमार गाढवावर’ असा फलक लावण्यात आला होता. तर सुखबीरसिंग संधू व विवेक जोशी यांची वेशभूषा केलेल्या व्यक्तींना घोड्यावर बसवण्यात आले होते. ...वाचा सविस्तर
19:01 (IST) 28 Sep 2026

शिंदे गटाचा पदाधिकारी सिद्धू अभंगेवर पोलीस ठाण्यात हल्ला

प्राथमिक माहितीनुसार सिद्धू अभंगे आणि काही कापड व्यवसायिक महिलांचे वाद झाले होते. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. या वादानंतर महिला आणि तिच्या ओळखीच्या व्यक्तीने सिद्धू अभंगे याला पोलीस ठाण्यात मारहाण केली. ...अधिक वाचा
18:39 (IST) 28 Sep 2026

कल्याण डोंबिवलीत सेवा संकल्प अभियानांतर्गत महावितरणचे जनजागृती स्टॉल

या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’चे नोंदणीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
18:28 (IST) 28 Sep 2026

भाजप-शिंदे गटाच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक, विषयाचे गांभीर्य नसल्याचा सुनील गणाचार्य यांचा तृष्णा विश्वासराव यांच्यावर आक्षेप

अर्थसंकल्पाचा प्रस्ताव व विषय तुम्ही समजून घेत नाही, याचा अर्थ तुम्हाला त्याबद्दल गांभीर्य नाही, अशा शब्दांत गणाचार्य यांनी विश्वासराव यांच्यावर टीकेचा प्रहार केला. ...वाचा सविस्तर
18:07 (IST) 28 Sep 2026

मला एकटे पाडले जात असल्याचा जरांगे यांचा आरोप; पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

माझ्या विरोधात षडयंत्र रचून मला एकटे पाडले जात असून ही वादळापूर्वीची शांतता आहे, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ...अधिक वाचा
18:03 (IST) 28 Sep 2026

ठाण्यात मृत श्वानांच्या नोंदींचा घोळ, महापालिकेचा पशुवैद्यकीय विभागाच्या कार्यपद्धधतीवर प्रश्नचिन्ह; मनसेची कारवाईची मागणी

एका रेबीजबाधित श्वानाचा मृतदेह ज्या डॉग व्हॅनमधून नेण्यात आला, त्याच वाहनातून अन्य निरोगी श्वानांची नसबंदी शस्त्रक्रियेसाठी वाहतूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
17:51 (IST) 28 Sep 2026

धारावी पुर्नविकासाला अदानीची वीज? बेस्टचा विरोध, उपनगरातील वीजपुरवठ्यासाठी उपक्रमाची चाचपणी सुरू

सध्या धारावीत बेस्ट व टाटा पॉवर वीजपुरवठा करतात. हा अर्ज मंजूर झाल्यास ग्राहकांना नवा पर्याय मिळू शकतो. परंतु दुसरीकडे बेस्टचे वीज ग्राहक कमी होऊ शकतात. ...सविस्तर वाचा
17:23 (IST) 28 Sep 2026

प्रसूतीदरम्यान गंभीर दोष निर्माण झालेल्या महिलेला जीवदान, एम्स रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

प्लासेंटा पर्क्रिटा (वार) या गंभीर गुंतागुंतीचा सामना करणाऱ्या ३१ वर्षीय महिलेची एम्स रुग्णालयात सुरक्षित प्रसूती करण्यात आली. नियोजित शस्त्रक्रिया, ऑब्स्टेट्रिक हिस्टरेक्टॉमी व मूत्राशय दुरुस्तीच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. ...अधिक वाचा
17:15 (IST) 28 Sep 2026

सुजात आंबेडकर यांची यशस्वी शिष्टाई; हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मागण्या अखेर मान्य

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात गेल्या २५ दिवसांपासून प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर ठामपणे उभे राहिले. ...अधिक वाचा
17:07 (IST) 28 Sep 2026

गाढवावरून पुतळ्याची धिंड! अमरावतीत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात अमरावतीत काँग्रेस आक्रमक झाली आहे. ...सविस्तर वाचा
16:54 (IST) 28 Sep 2026

रमेश म्हात्रेचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, तीन दिवसात शरण येण्याचे आदेश

कल्याण डोंबिवली पालिकेतील शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. ...सविस्तर वाचा
16:29 (IST) 28 Sep 2026

"पवार साहेबांचं टायमिंग…", राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत शरद पवारांच्या विधानावर सुनील तटकरेंचं सूचक विधान!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एनडीएतील विलीनीकरणाच्या चर्चा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फेटाळून लावल्या आहेत. "आम्ही कुठेही जाणार नाही, ज्यांना यायचंय त्यांनी आमच्यासोबत यावं," असा थेट इशारा त्यांनी दिला. ...सविस्तर वाचा
16:25 (IST) 28 Sep 2026

भाजपाला काही झोपट्या बिल्डरांच्या घशात घालायच्या आहेत, आदित्य ठाकरेंचा आरोप

भाजपा नियुक्त मुंबई पालिकेच्या महापौर रितू तावडे म्हणतात की, महापालिकेने १४ फुटांपेक्षा जास्त उंचीची सर्व अनधिकृत घरे/ झोपड्या पाडण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर आता त्या स्वतः या प्रस्तावाला विरोध करत आहेत. हे किती विचित्र असू शकतं? ज्या महापालिकेच्या त्या प्रमुख आहेत, तिनेच मांडलेल्या प्रस्तावांना महापौर स्वतः विरोध करतात आणि त्यांना बहुधा याबद्दल काहीच माहिती नसते?

महापौर असूनही महापालिका काय प्रस्ताव मांडत आहे हे त्यांना कसे माहीत नसू शकते? जसे की करदात्यांच्या पैशातून त्यांच्या महापौरांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी केलेला ५ कोटींचा खर्च.

मी हे आधीही बोललो आहे आणि पुन्हा सांगतो की, भाजपला कोणत्याही स्तरावर सरकार चालवता येत नाही. भाजपा सत्ता चालवत असलेले असे एक तरी शहर मला दाखवा, ज्याची गेल्या १५ वर्षांत दुर्दशा झाली नाही! भाजपा आता विरोध दर्शवून आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण वस्तुस्थिती ही आहे, भाजपाला काही विशिष्ट झोपड्या त्यांच्या ठराविक बिल्डर मित्रांच्या घशात घालायच्या होत्या, म्हणूनच त्या बिल्डरांसोबत करार न करणाऱ्या झोपड्यांना पाडण्याची नोटीस देऊन घाबरवण्याचा प्रयत्न केला जात होता.

किंवा/ आणि!!

हे मान्य करा की तुम्हाला सरकार चालवता येत नाही. आपण सर्वजण आधीच भारताचे 'हरवलेले दशक' आणि त्याचे देशातील नागरिकांवर होणारे सामाजिक-आर्थिक दुष्परिणाम अनुभवत आहोत

आदित्य ठाकरेंची टीका

https://twitter.com/AUThackeray/status/2104518103401161193

16:20 (IST) 28 Sep 2026

"मला माणसं चांगली भेटली नाहीत", पुण्यात हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीने पालकांना काय सांगितलं होतं?

ज्यांनी हे कृत्य केलंय, त्यांना फाशी व्हायला पाहिजे. परत असे नराधम तयार व्हायला नाही पाहिजेत. याची खबरदारी शासनाने घेतली पाहिजे. नव्या मुलींनी याचं अनुकरण न करता आई-वडिलांचं ऐकायला पाहिजे. आमचा सर्वांचा विरोध असताना तिच्या प्रेमाखातर हे लग्न लावून दिलं होतं. थोडं आई-बापाच्या विचाराने वागत राहा - वैष्णवीचे वडील

त्यांनी गाडीची मागणी केली होती. पाच लाख रुपये द्या, आम्ही गाडी देतो. दिवाळीत गाडी घ्यायची आहे, असं त्यांनी सांगितलं होतं.

तिने रात्री फोन केला होता तेव्हा म्हणाली होती की मला माणसं चांगली भेटली नाहीत, आपण उद्या बोलू. पण त्यानंतर दोन तासांत हे घडलं. आम्ही लागलीच तिथे गेलो. आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला प्रेत दिसलं - वैष्णवीचे वडील

16:11 (IST) 28 Sep 2026

आंतरवली सराटीत ग्रामसभा पडली पार, ग्रामसभेत पाणी स्वच्छतेसह इतर मुद्द्यांवर नागरिक आक्रमक

- मनोज जरांगे पाटील यांचे ज्या ठिकाणी उपोषणस्थळ होते त्या ठिकाणी ग्रामसभा पार पडली

- या ग्रामसभेत एकूण 11 मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती ग्रामसभेच्या सचिवांनी दिली

- ग्रामसभेत ज्या नागरिकांनी समस्या मांडल्या त्या अधिकृतपणे लिहून घेऊन ग्रामपंचायतकडे सादर करणार

16:07 (IST) 28 Sep 2026

मुंबईतील भिंतींवर ‘Radio Uncle’ लिहिलं; पोलिसांनी शोधून काढला ७३ वर्षांचा ‘तो’ वृद्ध; कारण ऐकून पोलीसही चक्रावले!

Radio Uncle Mumbai graffiti mystery solved : मुंबईतील विविध भागांमध्ये भिंतींवर रहस्यमयरीत्या लिहिलेल्या ‘रेडिओ अंकल’ (Radio Uncle) या शब्दांचा शोध अखेर मुंबई पोलिसांनी लावला आहे. ...सविस्तर वाचा
15:21 (IST) 28 Sep 2026

आत्महत्येपूर्वी साहिलचा मित्राबरोबर संवाद, कॉपी केल्याचा उल्लेख; पोलिसांच्या तपासातून महत्त्वाची माहिती समोर

IIT Bombay Sahil Wakode news update : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. ...सविस्तर बातमी
14:52 (IST) 28 Sep 2026

नाशिकमध्ये मराठा समाजाचे ‘जागरण-गोंधळ’ आंदोलन; विखे-पाटील, जरांगे यांच्यावर गंभीर आरोप

नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर 'जागरण-गोंधळ' आंदोलन करण्यात आले. ...अधिक वाचा
14:49 (IST) 28 Sep 2026

"३ ऑक्टोबर रोजी…", महाराष्ट्रातील भीषण दुष्काळावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची महत्त्वाची घोषणा!

महाराष्ट्रातील दोन-तृतीयांश भागात अपुऱ्या पावसामुळे भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील 'राष्ट्रीय रब्बी मोहीम २०२६' परिषदेत महत्त्वाची घोषणा केली. ...अधिक वाचा
14:34 (IST) 28 Sep 2026

"आम्ही कोणाबरोबर जाणार नाही, कोणाला आमच्याबरोबर यायचं तर या", शरद पवारांचं विधान चर्चेत

"आम्ही कोणाबरोबर जाणार नाही, कोणाला आमच्याबरोबर यायचं तर या, असं शरद पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून विलिनीकरणाच्या चर्चे सुरू होत्या. या चर्चेवर त्यांनी पूर्णविराम दिला आहे.

13:58 (IST) 28 Sep 2026

निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या तालावर काम करतो? पुण्यात काँग्रेसचे जोरदार आंदोलन

निवडणूक आयोग निष्पक्ष नसून सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन केले. ...सविस्तर वाचा
13:44 (IST) 28 Sep 2026

Live : सरकारची मदत पुरेशी नाही, राष्ट्रवादीचे नेते करणार मदत; शरद पवारांची माहिती

राष्ट्रवादीचे नेते राज्यभर दौरे करणार, आमदार-खासदार एक महिन्याचा पगार देणार

तालुकास्तरावरही राष्ट्रवादीचे नेते मदत करणार, आदी महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसंच, राज्य सरकारने जाहीर केलेली मदत पुरेशी नसून आम्ही नवा प्रस्ताव पाठवला आहे, त्यानुसार सरकार नवे निर्णय घेईल, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

13:35 (IST) 28 Sep 2026

LIVE : ठाकरे बंधूंची उद्या पत्रकार परिषद, शिवतीर्थवरून साधणार संवाद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या सकाळी साडेअकरा वाजता शिवतीर्थ येथे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. संजय राऊत यांनी यासंदर्भातील माहिती दिली. या पत्रकार परिषदेत ते कोणत्या मुद्द्यावर चर्चा करणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी एसआयआर आणि ज्ञानेश कुमारांविरोधात त्यांनी मोर्चाचं आयोजन केलं आहे. आयोजनाच्या रुपरेषेविषयी ते माहिती देण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/2104475462110216513

12:40 (IST) 28 Sep 2026

ज्ञानेश कुमार यांना प्रतिकात्मक बेड्या, पुतळ्याचे दहन; नागपुरात मुख्य निवडणूक आयुक्तांविरूध्द आंदोलन पेटले

विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) नावाखाली पात्र मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत नागपूर शहर काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार निषेध मोर्चा काढला. ...सविस्तर वाचा
12:28 (IST) 28 Sep 2026

सणासुदीत दागिने खरेदीचा विचार आहे? नऊ दिवसांत सोने किती स्वस्त झाले, चांदीच्या दरात किती घसरण?

सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. ...सविस्तर बातमी
12:25 (IST) 28 Sep 2026

"आमच्या गावचा वापर करून घेतला", ललिता तारख यांच्या आरोपांवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, म्हणाले, "आंतरवलीने समाजासाठी..."

Manoj Jarange Patil response to Lalita Tarkh allegations : ललिता तारख यांनी केलेल्या "गावाचा वापर करून घेतला" या गंभीर आरोपांवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ...अधिक वाचा
11:55 (IST) 28 Sep 2026

शरद पवारांच्या पत्रामुळे राज्यात दुष्काळ जाहीर? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, "दोन हजारावर पत्र…"

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनपेक्षितपणे शेताच्या बांधावर जाऊन करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. ...सविस्तर वाचा
11:42 (IST) 28 Sep 2026

पुणे : शहरातील ९.१८ लाख किलो कचरा उचलला, मग पेठांमध्ये हे ढीग कशाचे?

गणेशोत्सवात पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी ४,१७९ सफाई कामगार आणि १,६७० वाहने तैनात करून ९.१८ लाख किलो कचरा गोळा केल्याचा दावा पुणे महापालिकेने केला आहे. ...सविस्तर बातमी
11:31 (IST) 28 Sep 2026

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारी खर्चाला कात्री लावा; शासकीय कंत्राटदारांचा सल्ला

महाराष्ट्रावर ओढावलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्वतःच्या महसुली आणि प्रशासकीय खर्चावर तातडीने कात्री लावावी, अशी आक्रमक मागणी शासकीय कंत्राटदार संघटनांनी केली आहे. ...वाचा सविस्तर
11:26 (IST) 28 Sep 2026

निवडणूक आयुक्तांची वकिली देवेंद्र फडणवीस का करत आहेत? संजय राऊत यांचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेला आहे. मेंदू कुणाचा चोरला, कुणी चोरला? यापेक्षा मुद्द्यावर बोला ना. तुमचा मुख्य निवडणूक आयुक्त भ्रष्टाचारी आहे, अमित शाह याचा एजंट आहे. तुम्ही त्याची बाजू का घेत आहात? निवडणूक आयोगाने तुम्हाला वकील म्हणून नेमलंय का? तुम्ही त्यांची वकिली करत आहात म्हणजे तुम्ही काहीतरी घोटाळे करत आहात. बरं निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात फक्त राहुल गांधींनी आवाज उठवला आहे का? इंडियन एक्स्प्रेसने ही बातमी आणली. संघाचे आणि इंडियन एक्स्प्रेसचे खूप चांगले संबंध आहे हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल. संघ आणि इंडियन एक्स्प्रेसचे संबंध त्यांना ठाऊक नाहीत. इंडियन एक्स्प्रेसच्या संपादकांना मेंदू नाही असं त्यांना म्हणायचं असेल अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut Live: ४ ऑक्टोबरला ठाकरेंचा मोर्चा; संजय राऊत काय म्हणाले? Live

Maharashtra Ganpati Visarjan Live Today, 26 September 2026 : महाराष्ट्रातील ताजे अपडेट्स वाचा