Mumbai Pune Nagpur News Highlights, 07 April 2026 : बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत काल, ६ एप्रिल रोजी संपली. अजित पवारांच्या निधनानंतर या जागेवरून बिनविरोध निवडणूक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, या ठिकाणी काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरल्याने बिनविरोधची आशा मावळली आहे. दुसरीकडे पार्थ पवारांनी काँग्रेसवर टीका केल्याने त्यांना प्रत्युत्तरासाठी अनेक नेत्यांनी टीकास्त्र सुरू केलंय. तर कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये वृक्षतोड झाल्याप्रकरणीही राज्यसभरातून संताप व्यक्त केला जातोय. एकीकडे अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबियांची एसआयटी चौकशी सुरू असताना सीडीआरवरून अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे यांच्यातही शीतयुद्ध सुरू आहे. यासह राज्यातील अनेक घडामोडी जाणू घेऊयात.

Live Updates

Today’s Live News Updates in Maharashtra, 07 April 2026 : महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा

20:46 (IST) 7 Apr 2026

नोव्हेंबरमध्ये राज्य शासनाचा ‘चित्रपताका’ महोत्सव...

राज्य शासनाचा बहुप्रतिक्षित 'चित्रपताका' चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे उत्साहात साजरा होणार आहे. ...सविस्तर वाचा
20:38 (IST) 7 Apr 2026

मृत्यूशी १४ महिने झुंज देत अखेर नीलमचा अमेरिकेत मृत्यू; पण, तिने जिंकली अवयवदानातून मानवतेची लढाई…

उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या नीलम शिंदे यांचा उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला, मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची अवयवदानाची शेवटची इच्छा पूर्ण करून इतरांना जीवनदान दिले. ...वाचा सविस्तर
20:08 (IST) 7 Apr 2026

एफपीआयची मार्चमध्ये फायन्शियल्समधून विक्रमी एक्झिट; कोणत्या शेअर्सना सर्वाधिक फटका पाहा…

मार्च महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातून ६०,६५५ कोटी रुपयांची विक्रमी विक्री केल्याने शेअर बाजाराला गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठ्या घसरणीचा फटका बसला आहे. ...सविस्तर वाचा
19:59 (IST) 7 Apr 2026

"विकासाच्या वाटेवरील खलनायक दूर, आता नायकाचे काम सुरु"; एकनाथ शिंदेंचा टोला नेमका कोणाला?

आम्ही सर्व महायुती म्हणून सोबत असल्याने हा वेग कोणालाही कमी करता येणार नाही असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. ...सविस्तर बातमी
19:50 (IST) 7 Apr 2026

नागपूरातील औद्योगिक वसाहतीला २० दिवसांत पीएनजी गॅसचा पुरवठा.. तूर्तास पाईपलाईन नसल्याने वेगळा पर्याय...

आखाती देशांतील युद्धामुळे एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागपूरच्या हिंगणा एमआयडीसीमधील उद्योगांना आता आगामी २० दिवसांत पीएनजी गॅसचा पुरवठा करून मोठा दिलासा दिला जाणार आहे. ...सविस्तर वाचा
19:44 (IST) 7 Apr 2026

IRCTC New Rule : मोठी बातमी! रेल्वे पकडणं चुकणार नाही; ३० मिनिटांपूर्वी बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा…

रेल्वेचा प्रवास अधिक लवचिक करण्यासाठी १ एप्रिल २०२६ पासून नवीन बदल करण्यात आले असून कन्फर्म आणि आरएसी तिकीटधारक प्रवाशांना या सुविधेचा मोठा लाभ मिळणार आहे. ...वाचा सविस्तर
19:36 (IST) 7 Apr 2026

विधानसभेतील आमदारांची संख्या ३५० होण्याची शक्यता - मंत्री पाटील

सांगली जिल्ह्यात भविष्यात आठऐवजी नऊ आमदार आणि दोन स्वतंत्र खासदार असतील, असे वर्तवत चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. ...वाचा सविस्तर
19:24 (IST) 7 Apr 2026

मिनल करनवाल यांची बदली… जळगाव जिल्हा परिषदेच्या नवीन ‘सीईओ’ करिश्मा नायर!

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची मुंबईतील ‘पोकरा’ प्रकल्पाच्या संचालकपदी बदली झाली असून, त्यांच्या जागी नाशिकच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
19:24 (IST) 7 Apr 2026

Thane-Borivali Tunnel: पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मुंबई महानगर कोंडीमुक्त करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे-मुंबईला जोडून वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची कामे सुरु असून मुंबई महानगरे कोंडीमुक्त करणार असल्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...अधिक वाचा
19:16 (IST) 7 Apr 2026

खासदार संजय जाधव सत्तेच्या सावलीत जाण्याच्या तयारीत? 'उबाठा' शिवसेनेला सोडचिट्ठी देण्याची जोरदार चर्चा

परभणीचे शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय जाधव यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ...सविस्तर बातमी
19:05 (IST) 7 Apr 2026

कार-दुचाकीचा भीषण अपघात, बहीण-भाऊ जागीच ठार; परभणी तालुक्यातील झरी परिसरातील घटना

उच्च शिक्षणासाठी परभणीत असलेल्या बहिणीला गावी नेण्यासाठी आलेल्या भावावर काळाने झडप घातली असून स्विफ्ट कारच्या धडकेत व्यवहारे कुटुंबातील दोन तरुण चिमुरड्यांचा अंत झाला. ...सविस्तर वाचा
18:57 (IST) 7 Apr 2026

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - २०२६

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४ मार्फत प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) २०२६' परीक्षेचे दि. २१ जून २०२६ रोजी आयोजन केले आहे. ...सविस्तर वाचा
18:52 (IST) 7 Apr 2026

जळगाव जिल्हा महिलांच्या गर्भाशय कॅन्सरविरोधी लढ्यात राज्यात सर्वांच्या पुढे..!

गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेत जळगाव जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रभावी नियोजनामुळे २,२९३ मुलींचे लसीकरण पूर्ण करत जळगावने ठाणे आणि नागपूरला मागे टाकले आहे ...सविस्तर वाचा
18:47 (IST) 7 Apr 2026

साखरेपेक्षा गुळच तेजीमध्ये! गुळ उत्पादन कमी; पावडरचा वापर वाढला…

साखरेपेक्षा गुळाचा दर ४ हजार ८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वधारल्याने यावर्षी बाजारपेठेत गुळाने साखरेला मागे टाकले असून गुऱ्हाळांच्या संख्येत घट झाल्याचा परिणाम दरावर झाला आहे. ...वाचा सविस्तर
18:39 (IST) 7 Apr 2026

सोनू कल्याणकर हत्या प्रकरणातील आरोपींना १० एप्रिलपर्यंत कोठडी!

नांदेडमधील श्रीनगर भागात झालेल्या अनिकेत ऊर्फ सोनू कल्याणकर हत्या प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून एकाची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. ...वाचा सविस्तर
18:36 (IST) 7 Apr 2026

मध्य रेल्वेच्या माटुंगा कारशेडमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग; वेल्डिंगमुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज

मध्य रेल्वेच्या माटुंगा कारशेडमध्ये मंगळवारी दुपारी एका एलएचबी शयनयान रेल्वे डब्याला भीषण आग लागली. वेल्डिंगचे काम सुरू असताना लागलेल्या या आगीत डब्याचा ७० टक्के भाग जळून खाक झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ...सविस्तर वाचा
18:29 (IST) 7 Apr 2026

लाभार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या दलालांच्या तपासाकडे दुर्लक्ष; विशेष पथक नियुक्तीची मागणी

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेत ५ हजारांवर लाभार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर गुन्हे दाखल होऊनही पोलिसांनी कारवाई न केल्याने महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी संताप व्यक्त केला. ...अधिक वाचा
18:22 (IST) 7 Apr 2026

कौटुंबिक कलहातून आई आणि मुलीची पतीकडून हत्या; उमरगा तालुक्यातील बेरडवाडीतील घटना…

उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि आठ वर्षीय चिमुरडीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. ...वाचा सविस्तर
18:18 (IST) 7 Apr 2026

पंजाब अँड सिंध बँकेत भरती

पंजाब अँड सिंध बँक (PSB) - JMGS-I स्केलमधील ‘लोकल बँक ऑफिसर्स’ पदांची भरती. ...अधिक वाचा
17:15 (IST) 7 Apr 2026

LIVE : राज्यातील माहिती तंत्रज्ञान, एआय, डीजिटल गव्हर्नन्सला गती लाभणार; मंत्रिमंडळातील महत्त्वपूर्ण निर्णय वाचा

https://twitter.com/SunetraA_Pawar/status/2041445894126813552

15:59 (IST) 7 Apr 2026

मान्सून २०२६ : मोसमी पावसाची चिंता वाढली; जून ते सप्टेंबर महिन्यात ''किती'' टक्के पाऊस होणार?

'एल निनो'च्या वाढत्या प्रभावामुळे यंदा दुष्काळाची ३० टक्के शक्यता असून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटण्याची भीती आहे. ...वाचा सविस्तर
15:57 (IST) 7 Apr 2026

"गॅस नाही, रोजगारही गेला!" ठाण्यातील ५०० कुटुंबांची चूल विझली; आशेळे पाड्यात महिलांचा टाहो

मागील एक महिन्यापासून नागरिकांनी गॅस सिलेंडर बुक करूनही त्यांना अद्याप पुरवठा मिळालेला नाही. गॅस एजन्सीकडे वारंवार संपर्क साधूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. ...सविस्तर वाचा
15:57 (IST) 7 Apr 2026

LIVE : "आपण काँग्रेसमुळे मोकळा श्वास घेतोय", सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य चर्चेत

आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्ष फार जवळून पाहिला आहे. अनेकवेळा आणि यावेळीही काँग्रेस पक्षाच्या बरोबरीने लढले आहे. काँग्रेस विचारधारेच्या तालमीत मोठे झाले आहोत. या देशावर इंग्रज राज्य करत होते, तेव्हा याच काँग्रेस पक्षाने हे स्वातंत्र्य दिलं. काँग्रेस पक्षाचं योगदान मोठं राहिलं आहे. महिला आरक्षण, युद्ध, इकॉनॉमिक पॉलिसी, चले जावचा नारा काँग्रेसनेच दिला. कोणताही पक्ष सशक्त लोकशाहीत लहान मोठा असू शकतो – सुप्रिया सुळे

15:51 (IST) 7 Apr 2026

सदा सरवणकर यांना उच्च न्यायालयाचा दणका कारण काय ?

शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी सावंत यांच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती, जी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...सविस्तर वाचा
15:40 (IST) 7 Apr 2026

धक्कादायक विवाहविषयक संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून महिलेवर बलात्कार

याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
15:13 (IST) 7 Apr 2026

कल्याण - सीएसएमटी लोकलमध्ये फेरीवाल्यांचा अधिकृत 'बाजार'; मध्य रेल्वेचा १.३२ कोटींचा ठेका; ​रेल्वेचा 'कमाई'चा फंडा, प्रवाशांचा जीव टांगणीला!

मध्य रेल्वेने सन २०२३ मध्ये लोकलमध्ये फेरीवाल्यांना अधिकृतपणे व्यवसाय करण्यासाठी मुभा देण्याच्या हालचाली केल्या होत्या. रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी लता अरगडे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. ...सविस्तर बातमी
15:11 (IST) 7 Apr 2026

ठाण्यात नाल्यावर उभारले जाणार चार्जिंग स्थानक; हिरानंदानी मेडोजवासियांची नाला दुर्गंधीतून सुटका

हिरानंदानी मेडोजमधील इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांचे आरोग्य उघड्या नाल्यामुळे धोक्यात आले आहे. सुमारे ३०० फूट उघड्या नाल्यामध्ये मलनिस्सारण प्रकल्पाचे (एसटीपी) पाणी सोडण्यात येत असून यामुळे नाल्यातून मोठ्या प्रमाणात परिसरात दुर्गंधी पसरत आहे. ...सविस्तर बातमी
14:53 (IST) 7 Apr 2026

नाशिक महापालिकेची वृक्षतोडीची 'मोडस ऑपरेंडी' उघड; हरित लवादाने रोखली कुऱ्हाड!

कुंभमेळ्याच्या नावाखाली शहरात चाललेल्या वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने चाप लावत नाशिक महापालिकेला दणका दिला आहे. ...सविस्तर वाचा
14:53 (IST) 7 Apr 2026

११ हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केलाय, देवेंद्र फडणवीसांची माहिती

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये संपूर्ण बोगदा जमिनीखालून जात असल्याने जैवविविधतेवर परिणाम होणार नाही. तरीही असा निर्णय करण्यात आला आहे की हे बोगदे ग्रीन बोगदे करणार असल्याने ११ हजार वृक्ष लावणार असल्याचा संकल्प करण्या आला आहे. - देवेंद्र फडणवीस</p>

Sharad Pawar Press Conference Live: मुंबईत शरद पवारांची पत्रकार परिषद Live

Today’s Live News Updates in Maharashtra, 07 April 2026 : महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा