Mumbai Maharashtra News Updates, 08 April 2026 : बारामती पोटनिवडणुकीची सध्या राज्यात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर हीनिवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते, महायुतीकडून त्यासाठी प्रयत्न देखील केले गेले. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात तब्बल ५३ उमेदवार रिंगणात असून, निम्मे उमेदवार हे बारामतीबाहेरील आहेत. दुसरीकडे भोंदू बाबा अशोक खरात याच्या विरोधात एसआयटी चौकशी सुरू असून दररोज नवे खुलासे होताना दिसत आहेत.यासह राज्यातील अनेक घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates
19:38 (IST) 8 Apr 2026

“अनेकदा व्हरांड्यात झोपलो, पण हार मानली नाही…” महसूलमंत्री बावनकुळे आमदार निवासातील आठवणींत रमले

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकाशवाणी आमदार निवासातील आपल्या ११ वर्षांच्या संघर्षमय प्रवासाला उजाळा देत, व्हरांड्यात झोपल्याच्या आठवणींनी उपस्थितांना भावूक केले. ...अधिक वाचा
19:32 (IST) 8 Apr 2026

चौकटीपल्याड : नॅनोसायन्सच्या जगात…

नॅनो-सायन्स हा केवळ एक विषय नाही. अनेक विज्ञान शाखांचा तो संगम आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, मटेरियल सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स. त्यामुळे या क्षेत्रात परदेशी शिक्षणासाठी जाण्याचे मार्ग विविध आणि लवचीक असतात. ...सविस्तर वाचा
19:22 (IST) 8 Apr 2026

रिक्षा चालक-मालकांचा मोर्चा; परिवहन विभागाने सक्ती बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

रिक्षा चालकांसाठी स्थापन केलेल्या कल्याणकारी मंडळाच्या शुल्काची आरटीओकडून होणारी सक्ती थांबवण्यासाठी मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन युनियनने अंधेरी आणि बोरिवली आरटीओबाहेर बुधवारी तीव्र आंदोलन केले. ...अधिक वाचा
18:53 (IST) 8 Apr 2026

पुढील वर्षी चार इयत्तांना नवीन अभ्यासक्रम, नवीन पाठ्यपुस्तके… पण सहावीच्या अभ्यासक्रमाबाबत प्रश्नचिन्ह… कारण काय?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आगामी शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी आणि चौथीच्या अभ्यासक्रमासह नवी पुस्तके येणार असली, तरी सहावीच्या अभ्यासक्रमाला अद्याप अंतिम मान्यता न मिळाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...अधिक वाचा
18:46 (IST) 8 Apr 2026

व्हिएतनामच्या कंपनीची राज्यात ६.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

व्हिएतनाममधील 'विन ग्रुप' महाराष्ट्रात ६.५ अब्ज डॉलर्सची (सुमारे ५४ हजार कोटी रुपये) गुंतवणूक करणार असून, या माध्यमातून राज्यात २४,७०० थेट रोजगार निर्माण होणार आहेत. ...सविस्तर बातमी
18:44 (IST) 8 Apr 2026

PAT Exam 2026 : यंदाही पॅटच्या प्रश्नपत्रिका अपुऱ्याच… परीक्षा कशी घ्यायची? मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर प्रश्न; एससीईआरटीच्या आदेशानंतरही...

एससीईआरटीच्या आदेशानंतरही शाळांना अपुऱ्या प्रश्नपत्रिका मिळाल्याने आणि झेरॉक्स काढण्यास बंदी असल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा नक्की कशी घ्यायची, असा गंभीर पेच आता राज्यातील मुख्याध्यापकांसमोर उभा ठाकला आहे. ...वाचा सविस्तर
18:37 (IST) 8 Apr 2026

राज्यातील शाळांच्या पडपडताळणीमध्ये महत्त्वपूर्ण बदल… शिक्षण विभागाचा मोठा निर्णय…

राज्यातील शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी आता ११ ते २२ एप्रिल दरम्यान होणार असून, पटसंख्येतील अनियमितता रोखण्यासाठी शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. ...अधिक वाचा
18:32 (IST) 8 Apr 2026

इराण-अमेरिका संघर्षामुळे भारतीय विमान कंपन्यांची दहा हजार उड्डाणे रद्द

इराण-अमेरिका संघर्षामुळे गेल्या ४० दिवसांत भारतीय विमान कंपन्यांची तब्बल १० हजार उड्डाणे रद्द झाली आहेत. हवाई मार्ग बदलल्यामुळे इंधन खर्च आणि प्रवासाच्या वेळेत वाढ झाली असून, कंपन्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. ...अधिक वाचा
18:28 (IST) 8 Apr 2026

अंबरनाथ पालिकेचा सांडपाणी प्रकल्प बंद, नगराध्यक्षांच्या पाहणीत उघड, बिले थांबवण्याचे आदेश

कोणत्याही पाहणी शिवाय कंत्राटदाराला नियमीत बिले दिली जात असल्याने यात अधिकाऱ्यांचे डोळेझाक करणे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ...अधिक वाचा
18:20 (IST) 8 Apr 2026

CM Fellowship Maharashtra 2026 : मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याची सुवर्ण संधी; मुख्यमंत्री फेलोशिप मिळविणाऱ्यांना मिळणार घसघशीत मानधन…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्रालयात थेट काम करण्याची आणि प्रशासकीय धोरणांचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी राज्यातील पदवीधर तरुणांना मुख्यमंत्री फेलोशिपच्या माध्यमातून आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...अधिक वाचा
18:15 (IST) 8 Apr 2026

बेकायदेशीर सेवाबंदी प्रकरणात कामगाराला दिलासा, सेवाबंदी काळातील थकीत वेतन देण्याचे कामगार न्यायालयाचे आदेश

कामावरून कमी करण्यात आलेल्या कालावधीतील थकित वेतन म्हणून ३ लाख ७४ हजार ३४८ रुपये देण्याचे आदेश संबंधित प्राधिकरणाला दिले आहेत. ...वाचा सविस्तर
17:04 (IST) 8 Apr 2026
सुनेत्रा पवार यांनी घेतली मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; नेमकी काय झाली चर्चा?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत बारामती पोटनिवडणुकीच्या रणनितीवर तसेच राज्यातील इतर राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

16:29 (IST) 8 Apr 2026

प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यांनी जाणून घेतले शास्त्रशुद्ध भातशेतीचे तंत्र…

विशेषतः भातशेतीतील मजुरीचा खर्च आणि कष्ट कमी करणारे सुधारित ड्रम सिडर तसेच मनुष्यचलित लावणी यंत्र यांविषयी माहिती घेताना सोनू निगम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विशेष उत्सुकता दाखविली. ...अधिक वाचा
16:15 (IST) 8 Apr 2026

पहिला दिवस हौशी प्रवाशांचा…काशीगाव-अंधेरी आणि डायमंड गार्डन-मंडाले मेट्रो प्रवास सुरू

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बुधवारी सकाळी ६ वाजता काशीगाव मेट्रो स्थानकावरून, तसेच डायमंड गार्डन आणि मंडाले स्थानकांवरून पहिली मेट्रो गाडी सुटली. ...वाचा सविस्तर
16:09 (IST) 8 Apr 2026

मालेगावची अर्थवाहिनी 'मामको' बँकेची गरुडझेप; ८ कोटी १७ लाखांचा विक्रमी नफा, सभासदांना १०% लाभांश मिळणार!

मालेगाव शहराची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि मालेगाव मर्चन्टस् को. ऑप बँक लि. (मामको बँक) या बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. ...सविस्तर बातमी
16:01 (IST) 8 Apr 2026

Pimpri Chinchwad Crime : हॉटेल चालवण्यासाठी महिलेकडे एक लाखाच्या खंडणीची मागणी

पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीचा विळखा; हॉटेल चालकाकडे खंडणीची मागणी, ७५ लाखांची सायबर फसवणूक अन् मारहाणीच्या घटना. ...सविस्तर बातमी
15:57 (IST) 8 Apr 2026

१२ वर्षांच्या मुलीच्या पोटातून काढला मोठा केसांचा गोळा!

नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील बालरोग गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजीचे डॉ. आदित्य कुलकर्णी यांना तपासणी दरम्यान पोटाच्या डाव्या वरच्या भागात एक गाठ जाणवली. ...सविस्तर बातमी
15:47 (IST) 8 Apr 2026

मुंबईमधील रिक्षा-टॅक्सी थांब्याची संख्या अपुरी; चालक, प्रवाशांची गैरसोय

मुंबई शहर आणि उपनगरातील काळ्या-पिवळया टॅक्सी, रिक्षा उभ्या करण्यासाठी थांब्याची संख्या खूपच अपुरी असल्याने चालकांची गैरसोय होत आहे. ...सविस्तर बातमी
15:43 (IST) 8 Apr 2026

डायबेटीस आणि वजन कमी करणाऱ्या काही औषधांमुळे दृष्टीवर होतो परिणाम - डॉ तात्याराव लहाने

विख्यात नेत्रशल्यचिकित्सत डॉ तात्याराव लहाने यांच्या म्हणण्यानुसार यातील काही औषधांचा वापर केल्यानंतर काही लोकांमध्ये अचानक दृष्टी कमी होणे, धूसर दिसणे किंवा डोळ्यांशी संबंधित इतर समस्या निर्माण होऊ शकतात. ...सविस्तर वाचा
15:38 (IST) 8 Apr 2026

कल्याण - सीएसएमटी लोकलमध्ये फेरीवाल्यांचा अधिकृत 'बाजार'; मध्य रेल्वेचा १.३२ कोटींचा ठेका; ​रेल्वेचा 'कमाई'चा फंडा, प्रवाशांचा जीव टांगणीला!

मध्य रेल्वेने सन २०२३ मध्ये लोकलमध्ये फेरीवाल्यांना अधिकृतपणे व्यवसाय करण्यासाठी मुभा देण्याच्या हालचाली केल्या होत्या. रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी लता अरगडे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. ...वाचा सविस्तर
15:16 (IST) 8 Apr 2026

मद्यधुंद मोटार चालकाची वाहनांना धडक; कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांचा अपहरणाचा प्रयत्न

या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वारजे वाहतूक विभागातील पोलीस शिपाई अमोल पिसाळ यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...सविस्तर वाचा
14:55 (IST) 8 Apr 2026

​नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातची कोठडी ते जेलवारी… पापाचा घडा भरला!

​महिला अत्याचार प्रकरणी भोंदूबाबा खरातविरुद्ध एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. एसआयटी प्रत्येक गुन्ह्याचा तपास स्वतंत्रपणे करीत आहे. ...अधिक वाचा
14:50 (IST) 8 Apr 2026

माझ्याही व्यक्तिमत्त्व हक्कांचे संरक्षण करा; अभिनेता कार्तिक आर्यनचीही उच्च न्यायालयात धाव

कार्तिकच्या याचिकेनुसार, त्याचे नाव, प्रतिमा आणि चेहरा यांचा वापर विविध वस्तू, जाहिराती आणि इतर डिजिटल मजकुरावर परवानगीशिवाय केला जात आहे; त्यामुळे त्याच्या प्रसिद्धी आणि खासगी जीवन जगण्याच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे, असा दावा कार्तिकने केला आहे. ...वाचा सविस्तर
14:38 (IST) 8 Apr 2026

पश्चिम रेल्वेने हाती घेतली पूर्वपावसाळी कामे; यावर्षी रेल्वे मार्गावर पाणी साचू नये म्हणून पश्चिम रेल्वेने घेतली खबरदारी

पश्चिम रेल्वे मार्गालगत असलेल्या नाल्यांची साफसफाई, गटारांमधील गाळ काढणे, तसेच पाणी निचरा होण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्थेची दुरुस्ती केली जात आहे. याशिवाय, पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत. ...वाचा सविस्तर
14:24 (IST) 8 Apr 2026

बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवारी मागे घेण्यासाठी भाजपाकडून संपर्क नाही; काँग्रेसकडून स्पष्टीकरण

"बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने काँग्रेस पक्षाशी अद्याप संपर्क साधलेला नाही. या संदर्भात प्रसारित होत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि निराधार आहेत. अशा अफवा मुद्दाम पसरवून भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक करत आहे," अशी पोस्ट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

14:16 (IST) 8 Apr 2026

डोंबिवली पश्चिमेत लवकरच नवीन सह दुय्यम निबंधक कार्यालय, गांधीनगरच्या फेऱ्यांपासून सुटका; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती

डोंबिवली पश्चिमेत लवकरच नवीन सह दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होणार; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती. ...सविस्तर बातमी
14:07 (IST) 8 Apr 2026

समरजित घाटगे यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, राजवर्धन नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. ...सविस्तर वाचा
14:04 (IST) 8 Apr 2026

नागपूरमधील ३७ गृहनिर्माण प्रकल्पांना मुदतवाढ; महारेराच्या विशेष खुल्या सत्रात मुदतवाढीची प्रकरणे मार्गी

नागपूर येथील गृहनिर्माण प्रकल्पांच्या मुदतवाढीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी महारेराने नुकतीच नागपूरमधील महारेरा मुख्यालयात एक विशेष खुले सत्र आयोजित केले होते. ...सविस्तर वाचा
13:59 (IST) 8 Apr 2026

विमान कंपन्यांच्या स्पर्धेत आणखी एक कंपनी

'फ्लाय ९१' विमान कंपनीचे गोव्यात मुख्यालय आहे. देशातील विविध लहान शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा १० ते १७ एप्रिल दरम्यान टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. ...सविस्तर बातमी
13:41 (IST) 8 Apr 2026

"तुम्ही बॅनर वर नसलात म्हणून काय झालं?" अजित पवारांसाठी मिटकरींची भावनिक पोस्ट

“आदरणीय अजितदादा तुम्ही कुण्या बॅनरवर नसला काय असला काय ? प्रसिद्धीचा तुम्हाला हव्यास होताच कुठे? तुम्ही मात्र गरिबांच्या घराघरात कायम आहात ...कोकण ते विदर्भापर्यंत तुमचा चाहता वर्ग विखुरलाय ..कदाचित तो तुम्हाला भेटलाही नसेल आयुष्यात कधी ….किंवा त्याला तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नसेल मात्र तो फाटका असला तरी देवासमान पुजतो तुम्हाला …कारण तो जाणत होता की तुम्ही महाराष्ट्राची गरज होता….तो फाटका ,गरीब, पिचलेला, रडतोय आजही तुमच्यासाठी धाय मोकलून …कदाचित तुम्ही त्याला दिसणार नाही , आणी तोही आता परत हसणार नाही …तुम्ही व तुमचे फोटो कायमचे कोरून गेलेत त्याच्या काळजात …तुम्ही बॅनर वर नसलात म्हणून काय झालं?? एकदिवस अबाल वृद्ध इथला डोंगर हलवतील ,आणी स्वाभिमानाने म्हणतील “आमच्याकडे बॅनर छापायला पैसे नसतील पण दादा तुमच्या बॅनर पेक्षा आमच्या काळजात कायम दिसतील ..तुमच बॅनर उद्या खतावर ,छतावर राहील ,पण आमच्या काळजातलं दादा आम्ही सरणावर जाईस्तो आमच्या फाटक्या हृदयात कायम राहील”