Mumbai Maharashtra News Updates, 06 April 2026: बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी सकाळी अजित पवारांच्या आईची काटेवाडी येथे भेट घेऊन आशीर्वाद घेतले. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांनी उमेदवारी दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी भाजपा आणि मित्रपक्षांकडून करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रावादी (शरद पवार) ही निवडणूक लढणार नसेल तर काँग्रेस उमेदवार देणार, अशी भूमिका काँग्रेसने घेतली. दरम्यान, शरद पवारांबरोबर झालेल्या बैठकीनंतर निवडणूक न लढण्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केली. दुसरीकडे राज्यात अजून भोंदूबाब अशोक खरात प्रकरणात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण करणारे नवीन खुलासे समोर येत आहेत. यासह राज्यातील राजकारण, गुन्हे, अपघात, कला – क्रीडा – संस्कृती, अवकाळी पाऊस यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्यांच्या अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Today’s Live News Updates in Maharashtra, 06 April 2026: महाराष्ट्रातील ठळक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स.
शंभरहून अधिक चित्रफिती अन् प्राण्यांचे अवयव... रहस्य काय? एरंडे याच्या पोलीस कोठडीत वाढ
प्र-कुलगुरू डाॅ. वाल्मिक सरवदे यांचा राजीनामा?
"जैन धर्माने अल्पसंख्यांक दर्जा सोडण्याचे मंत्री लोढा यांचे विधान अज्ञानमूलक, प्रखरपणे विरोध करू!" ललित गांधी कडाडले...
मिरा भाईंदरकर नव्या मेट्रोने प्रवास कसा करणार? जाणून घ्या, किती गाड्या, वेळ आणि इतर माहिती..
video : शाळांची फि ठरावीक टक्केवारीपेक्षा जास्त नकोच, संजय केळकरांची शिक्षणाधिकाऱ्यांना सुचना
व्याजदर वाढीकडे आरबीआयची पावले वळणे अटळ; खनिज तेलाच्या किमती ठरतील निर्णायक…
भिवंडीतील कोणत्या भागात पाणी मिळणार नाही.. वाचा..
महापालिकेच्या सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशोत्सव सोहळा; लेझीम, चॉकलेट, गुलाबाने विद्यार्थ्यांचे स्वागत
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा महिन्याभरातच स्थगित; बोटीतील तांत्रिक बिघाडामुळे सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याची नामुष्की
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा महिन्याभरातच स्थगित; बोटीतील तांत्रिक बिघाडामुळे सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याची नामुष्की
राष्ट्रीय महामार्गावर टोल आकारण्याचा अधिकार कोणाला? केंद्र आणि राज्यांच्या अधिकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वपूर्ण निर्णय…
रोजगार हमीची कामे रडतखडत! मराठवाड्यातील प्रलंबित कामांची संख्या १५ लाखांच्या वर; ‘केवायसी’ नसल्याने पैसे…
नालासोपारा पश्चिमेकडील ऐतिहासिक वारसा स्थळांचा कायापालट होणार; महापौरांकडून पाहणी… प्रशासनाला विकासकामांचे तातडीने निर्देश…
मारहाणीमुळे आदिवासी कामगाराने संपवले जीवन; मालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
जळगाव: गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांसाठी ७११ कोटींची मान्यता… घोडे नेमके कुठे अडले?
आनंद दिघे यांच्या नावाने असलेल्या मंडळाला अत्यल्प प्रतिसाद, रिक्षा- टॅक्सी कल्याण मंडळात ९ हजार सदस्यांची नोंदणी
पर्यावरणप्रेमींकडून अफवा पसरविण्याचे काम; आयुक्त मनिषा खत्री यांचा आरोप...
प्लास्टिक उत्पादक, पुरवठादारांवर कारवाई का नाही; प्लास्टिक बंदीवर दुकानदार आणि पालिकेत कारवाईवरून जुंपली
महिन्याचे ते चार दिवसच नव्हे, तर रजोनिवृत्तीचा त्रासही आता होणार कमी, नाशिक आरोग्य विभागाचा मोठा निर्णय
नवी मुंबई विमानतळाभोवती मेट्रोचे वर्तुळ; दोन नव्या मेट्रो मार्गिकेचा सिडकोचा प्रस्ताव
एसआयटी एकनाथ शिंदे यांची चौकशी करणार आहे का? सुषमा अंधारे यांचा सवाल
"एसआयटी एकनाथ शिंदे यांची चौकशी करणार आहे का? माझ्यापर्यंत आणि अंजली दमानियांपर्यंत माहिती पोहोचते, मग एसआयटीपर्यंत का नाही? एसआयटीच्या तपासाच्या गतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करावे लागतील", असे शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या
मराठमोळ्या अंदाजात महाराष्ट्राच्या शिलेदारांची राज्यसभेत एन्ट्री! कुणी-कुणी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ?
डहाणूच्या महालक्ष्मी मंदिरातील गुजराती सूचना हटवल्या
नाशिकमध्ये काय सुरू आहे? वटवृक्ष वाचवण्यासाठी महिला झाडावर चढली, आणि मग…
१५८ वर्षांची परंपरा जोपासत जूचंद्र येथे रंगले कुस्त्यांचे आखाडे
Pimpri Chinchwad Crime : कार खरेदीच्या बहाण्याने साडेतीन लाखांची फसवणूक; पैशांचा बंडलमध्ये निघाल्या खेळण्यातील नोटा
वसईच्या ऋषिकेश मेहेरची राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी; पटकावली तीन पदके
गॅस पुरवठा बंद करण्याची धमकी देत सव्वा दोन लाखांची फसवणूक … अनोळखी व्यक्तीने पाठवलेली लिंक वा फाईल ओपन करू नये --- पोलिसांची सूचना
पुणे महापालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांची 'ACB' चौकशी होणार, उच्च न्यायालयाकडून आयुक्तांचा निर्णय रद्द

बारामती पोटनिवडणूक २०२६ (X- Rohit Pawar)
