Mumbai Pune Maharashtra News Updates in Marathi, 22 April 2026 : बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याकरता, काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यामुळे उद्या लाखो मतदारांची मते मतपेटीत बंद होणार आहेत. दुसरीकडे मंत्री गिरीश महाजनांना काल (२१ एप्रिल) वरळी येथे एका महिलेने घेरलं. महिला आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू असताना या महिलेने येथे गोंधळ घालत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मंत्र्यांनाच धारेवर धरलं. हा व्हिडिओ आज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. तसंच, विधान परिषदेवर वर्णी लागावी याकरता मातोश्रीवर अनेकांच्या भेटी-गाठी वाढल्या असल्याचंही म्हटलं जातंय. यासह राज्यातील अनेक घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates
20:19 (IST) 22 Apr 2026

वाढत्या काँक्रिटीकरणामुळे अनेक शहरांतील झाडे मृतावस्थेत

याप्रकरणी संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
20:04 (IST) 22 Apr 2026

लाज प्रकरणात सापडलेल्या कैलास गायकवाड यांच्या घरातून कडून 38 तोळे सोनं जप्त…

वाढत्या उष्णतेसोबतच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वेगाने खालावत असल्याने महापालिकेकडून १० ते १५ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ...सविस्तर बातमी
20:03 (IST) 22 Apr 2026

१५० डबलडेकर दोन वर्षांपासून रखडल्या; एका महिन्याच्या कालावधीनंतर कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णय

एका महिन्यात प्रतिसाद न मिळाल्यास कंत्राट रद्द करून नवीन प्रक्रिया राबवणार असल्याचे महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी स्पष्ट केले आहे. ...अधिक वाचा
20:03 (IST) 22 Apr 2026

कलाकृती संरक्षित करणाऱ्या कायद्याच्या स्मरणाचा दिवस

जागतिक पुस्तक आणि प्रताधिकार दिनानिमित्त, भारतीय प्रताधिकार कायद्याचा इतिहास, लेखकांचे हक्क आणि आपली कलाकृती कायदेशीररीत्या कशी सुरक्षित करावी, यावर ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ॲड. चिंतामणी देशपांडे यांनी प्रकाश टाकला आहे. ...वाचा सविस्तर
19:51 (IST) 22 Apr 2026

Ayan Ahmed: परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण; आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड!

Paratwada Ayan Ahmed crime case: अयानला सोबत घेऊन पोलिसांनी अचलपुरात त्याची ‘वरात’ काढली. यावेळी आरोपी अयानला धड चालताही येत नसल्याचे दिसून आले. ...सविस्तर वाचा
19:25 (IST) 22 Apr 2026

अखेर 'रोटा व्हायरस' लसींच्या ३,८०० मात्रा उपलब्ध ; नागरिकांना दिलासा

पालिकेला शासनाकडून ३,८०० लसींच्या मात्रा प्राप्त झाल्या असून, रखडलेले लसीकरण आता पुन्हा गतीने सुरू होणार आहे. ...सविस्तर बातमी
19:25 (IST) 22 Apr 2026

नवी मुंबईत लॉजिस्टिक्स पार्क उभारणीला वेग; सिडकोकडून प्राथमिक टप्प्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती आमंत्रित 

पहिल्या टप्प्यात ७२ हेक्टरवरील १२ भूखंडांसाठी स्वारस्य अभिव्यक्ती आमंत्रित करण्यात आली असून, या प्रकल्पामुळे नवी मुंबई आता राष्ट्रीय स्तरावरील लॉजिस्टिक्स हब बनणार आहे. ...वाचा सविस्तर
19:25 (IST) 22 Apr 2026

अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा सुरूच

सिडकोच्या दक्षता विभागाने उलवे येथील ३ मजली अनधिकृत इमारत आणि घणसोलीतील बेकायदा बांधकाम जमीनदोस्त केले. ...सविस्तर वाचा
18:59 (IST) 22 Apr 2026

नियमबाह्य वृक्षारोपण करणाऱ्या राज्यातील कोल्हापुरातील कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याची हिंदुत्ववाद्यांची मागणी

कोल्हापुरात राष्ट्रीय हरित लवादाच्या (NGT) नियमांचे उल्लंघन करून झाडांच्या बुंध्याभोवती काँक्रीटीकरण करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. ...सविस्तर वाचा
18:59 (IST) 22 Apr 2026

आरक्षणाविरोधात विजयोत्सव साजरा करणार्‍या विरोधी पक्षाला महिला धडा शिकवतील! आ.श्रीजया चव्हाण यांचा नांदेडमध्ये हल्लाबोल

आरक्षणाला विलंब करून विरोधकांनी नारी शक्तीचा अपमान केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. ...वाचा सविस्तर
18:49 (IST) 22 Apr 2026

परिवहन मंत्र्यांच्या पत्नीचाच सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर! ठाण्यातील उपवन तलावात बेकायदा टपऱ्या, दारु-गांजाचे सेवन; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या बेकायदा टपऱ्यांवर कारवाई होणार कधी अशी विचारणाही त्यांनी करताच, प्रशासनाने कारवाईचे आदेश दिले. ...अधिक वाचा
18:14 (IST) 22 Apr 2026

बस चालकाचा हत्येचा प्रयत्न करणारा टकल्या शिंदे अखेर अटकेत

तब्बल ११ दिवसानंतर पोलिसांनी यातील मुख्य आरोपी नितेश शिंदे उर्फ टकल्या शिंदे (२७) याला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. नितेश याच्याविरोधात यापूर्वी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. ...वाचा सविस्तर
17:53 (IST) 22 Apr 2026

Badlapur News: बदलापूर परिषदेत नगरसेवक भिडले, शिक्षक आमदारांच्या पत्रावरून राष्ट्रवादी आणि सेनेच्या नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी

Kulgaon Badlapur Nagar Parishad general body meeting ruckus: पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत असताना नियंत्रणात आणली. त्यानंतर पालिकेची सर्वसाधारण सभा पुन्हा सुरू झाली. मात्र या राड्याची शहरात चर्चा रंगली होती. ...अधिक वाचा
17:37 (IST) 22 Apr 2026

"साहेबांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी", सुनेत्रा पवारांची शरद पवारांसाठी पोस्ट

"प्रकृती अस्वास्थ्यामुळे आदरणीय पवार साहेब बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानास उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि बारामतीकरांसाठी लाखमोलाचे आहेत. बारामतीसह महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासात आदरणीय साहेबांचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय दादांनीही विकासात्मक राजकारणाची समृद्ध परंपरा जपली. आदरणीय साहेबांनी केलेल्या आवाहनाला बारामतीकर नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद देतील. बारामतीची जनता विकासाच्या विचारांशी जोडलेली आहे आणि तीच दिशा पुढेही कायम राहील. आदरणीय साहेबांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, हीच मनःपूर्वक प्रार्थना!" अशी पोस्ट सुनेत्रा पवार यांनी एक्सवर केली आहे.

17:37 (IST) 22 Apr 2026

शिवसेना शिंदे पक्षाची संघटना बांधणीची ब्लू प्रिंट, मित्रपक्ष भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी दोन हात करणार

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदांच्या निवडणुकीत दगाफटका झाल्याने शिवसेना शिंदे पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने आता पासून थेट रणशिंग फुंकलेआहे. ...वाचा सविस्तर
17:33 (IST) 22 Apr 2026

Dombivli Crime News: डोंबिवलीत शेलार नाका भागातील स्वीट ड्रिम बारवर पोलिसांचा छापा, १६ जणांवर गुन्हा

Dombivli Police Raid: पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी काही तोकडे कपडे घातलेल्या महिला वाद्यवृंदाच्या तालावर अश्लिल हावभाव नृत्य करत असल्याच्या आढळून आल्या. ...वाचा सविस्तर
17:09 (IST) 22 Apr 2026

Thane Water Crisis: ठाण्यातील आदिवासी पाड्यात भीषण पाणी टंचाई

Ghodbunder Road Water Scarcity: ठाणे शहरात असूनही अशी परिस्थिती असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या भागात अनेकदा तीन ते चार दिवसांतून २० मिनीटे किंवा कधी-कधी आठवड्यातून २० मिनीटे पाणी मिळते. ...अधिक वाचा
16:23 (IST) 22 Apr 2026

National Patent : डोंबिवलीतील पेंढरकर काॅलेजमधील संशोधक प्राध्यापकांच्या प्रकल्पांना राष्ट्रीय पेटंट

Pendharkar College Dombivli Research Patents: प्राणीशास्त्र विभागातील प्रा. अनिकेत मराठे यांनी गोगलगायींच्या प्रजातींचे आकलन सुलभ करणारे उपकरण विकसित केले असून, त्यांच्या या संशोधनाला राष्ट्रीय पेटंट मिळाले आहे. ...सविस्तर वाचा
16:10 (IST) 22 Apr 2026

Mumbai BEST Open Deck Bus : ओपन डेक डबलडेकर बस पुन्हा चर्चेत; महसूलवाढीसाठी १० बस बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट करण्याची समिती अध्यक्षांची सूचना...

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक इमारती आणि मरीन ड्राईव्हचा आनंद देणारी ही लोकप्रिय सेवा ५ ऑक्टोबर २०२३ रोजी अधिकृतपणे बंद झाली होती, जी आता नवीन स्वरूपात सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. ...सविस्तर वाचा
15:39 (IST) 22 Apr 2026

LIVE : आयटी पार्कसाठी जागा निश्चित, मंत्रिमंडळ बैठकीत 'या' चार महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब

https://twitter.com/CMOMaharashtra/status/2046873079255879721?s=20

15:33 (IST) 22 Apr 2026

Government Employees Strike : राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद

राज्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या मंत्रालयातील ७ हजार ६७८ कर्मचाऱ्यांपैकी अर्धेअधिक ३ हजार ६१९ कर्मचारी उपस्थित होते. ...सविस्तर वाचा
15:29 (IST) 22 Apr 2026

‘मेट्रो २ ब’ मार्गिकेवर आता व्यावसायिक चित्रीकरण; महसूल मिळवण्यासाठी एमएमआरडीएचा निर्णय

केवळ ५.६ किमी लांबीच्या या टप्प्यावर दिवसाला अवघे ३ हजार प्रवासी प्रवास करत असल्याने तिकिटाव्यतिरिक्त इतर मार्गांनी उत्पन्न मिळवण्यासाठी स्थानके आणि मेट्रो गाड्या चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ...अधिक वाचा
15:26 (IST) 22 Apr 2026

Indian Railway : धुळे : बोरविहीर–नरडाणा रेल्वे मार्ग भूसंपादनाचा प्रश्न पेटला; शेतकऱ्यांच्या संतप्त भूमिकेमुळे प्रक्रिया तूर्त स्थगित…

बोरविहीर–नरडाणा रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला कापडणे (ता. धुळे) शिवारातील शेतकऱ्यांनी आज (दि. २२) सकाळी जोरदार विरोध दर्शविला. ...सविस्तर वाचा
15:17 (IST) 22 Apr 2026

एकनाथ शिंदेच्या ठाण्याची धुरा योगेश कदमांकडे; जिल्हा परिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे 'ॲक्टिव्ह' मोडवर…

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे योगेश कदम आता ठाणे जिल्ह्यातील बूथ व्यवस्थापन, उमेदवारांची चाचपणी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...सविस्तर वाचा
14:57 (IST) 22 Apr 2026

Pune Crime : तडीपार केल्यानंतर बिबवेवाडीत दहशत माजविणारा गुंड गजाआड...

पुणे शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार असूनही बिबवेवाडी परिसरात कोयता उगारून दहशत माजविणाऱ्या अविनाश उर्फ ताऊ जोगन या सराईत गुंडाला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. ...वाचा सविस्तर
14:50 (IST) 22 Apr 2026

Pimpri Chinchwad Crime : मोमो सेंटर चालकाकडे चार लाखांच्या खंडणीची मागणी, दुकानाची तोडफोड...

पिंपळे सौदागर येथे मोमो सेंटर चालकाकडे चार लाखांची खंडणी मागून दुकानाची तोडफोड करणाऱ्या तिघांना सांगवी पोलिसांनी अटक केली असून, शहरातील विविध भागांतून बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
14:16 (IST) 22 Apr 2026

Mumbai University Result : मुंबई विद्यापीठाच्या ‘दूरस्थ’ शिक्षणाचे निकाल दूरच; परीक्षा संपून ६५ दिवस उलटले तरी निकालाची प्रतीक्षा…

नियमानुसार ४५ दिवसांत निकाल लागणे अपेक्षित असताना दोन महिने उलटूनही निकाल न लागल्याने नोकरी सांभाळून शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य मुंबई विद्यापीठाच्या अनास्थेमुळे धोक्यात आले आहे. ...अधिक वाचा
14:15 (IST) 22 Apr 2026

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम

राज्यातील सरकारी कर्मचारी संघटनांनी मंगळवारपासून पुकारलेल्या बेमुदत आंदोलनचा काहीसा परिणाम मुंबईमधील रुग्णालयांतील रुग्णसेवेवर झाला. ...अधिक वाचा
14:03 (IST) 22 Apr 2026

जनगणनेच्या कामासाठी चतुर्थ श्रेणीतील कामगारांची नेमणूक; माहिती संकलनात चुका झाल्यास जबाबदार कोण?

स्वच्छता कर्मचारी, शिपाई आणि हमाल अशा कर्मचाऱ्यांना ऑनलाईन माहिती संकलनाचे काम देण्यात आल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त होत असून याचा शालेय कामकाजावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ...सविस्तर वाचा