Maharashtra Mumbai Pune Nashik News Today, 26 March 2026: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी कोणतीही माहिती असल्यास पोलिसांना देण्याचे आवाहान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केले. तसेच, राज्यात भोंदूगिरी नव्हे तर महाराष्ट्र धर्म वाढला पाहिजे, असे मत नोंदवले. तसेच, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवरुन झालेल्या राड्यानंतर माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेले सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे. राज्यात अशोक खरातचे काळे कारनामे गाजत असताना राष्ट्रवादी (अजित पवार) चे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. यावरुन झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तर, आत्ताच हा व्हिडीओ बाहेर कसा आला म्हणून राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी सवाल उपस्थित केला आहे. याशिवाय राज्यातील राजकारण, कला, क्रीडा, पर्यटन, गुन्हे यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Live Updates

Pune Mumbai Nagpur News Live Today, 26 March 2026: महाराष्ट्रातील ठळक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स.

20:14 (IST) 26 Mar 2026

मलजलावर प्रक्रिया केलेले ३ दशलक्ष लिटर पाणी महिला बचत गटाला

मुंबई महानगरपालिकेच्या कुलाबा मलजल केंद्रातून प्रक्रिया केलेले ३ दशलक्ष लिटर पाणी आता एका महिला बचत गटाला विकले जाणार आहे. १५ रुपये प्रति हजार लिटर दराने होणाऱ्या या विक्रीमुळे पालिकेच्या महसुलात भर पडणार असून पिण्याच्या पाण्याची मोठी बचत होणार आहे. ...सविस्तर बातमी
20:07 (IST) 26 Mar 2026

जुनी प्रतिजैविके पुन्हा प्रभावी ठरणार ? आयआयटी मुंबईच्या संशोधनातून नवी आशा

आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी जुन्या प्रतिजैविकांना पुन्हा प्रभावी करण्याचा नवा मार्ग शोधला आहे. 'डीएनए ॲप्टामर' आणि 'लिपोसोम' तंत्रज्ञानाचा वापर करून औषधांना दाद न देणाऱ्या घातक जीवाणूंना आता पुन्हा नष्ट करणे शक्य होणार आहे. ...वाचा सविस्तर
19:55 (IST) 26 Mar 2026

ऐन उन्हाळ्यात मुंबई, दिल्ली, अमृतसरकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या रद्द

गोंदिया स्थानकावरील लाईन क्र. ५ (प्लॅटफॉर्म क्र. ३) वर वॉशेबल एप्रन काढून बॅलेस्टेड ट्रॅकमध्ये रूपांतर करण्यासाठी ५ एप्रिल २०२६ पासून ट्रॅफिक ब्लॉक लागू होणार आहे. ...सविस्तर वाचा
19:54 (IST) 26 Mar 2026

स्वायत्त महाविद्यालयातील अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाची नियमावली; अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना एमएससी नॅनो सायन्सच्या दुसऱ्या वर्षाला मिळेल प्रवेश

मुंबई विद्यापीठाने स्वायत्त महाविद्यालयांसाठी नवी नियमावली जाहीर केली असून, आता अभियांत्रिकी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना 'एमएससी नॅनो सायन्स'च्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळणार आहे. तसेच ४ वर्षीय पदवीसाठी ऑनर्स व रिसर्चची मार्गदर्शक तत्वेही निश्चित केली आहेत. ...वाचा सविस्तर
19:53 (IST) 26 Mar 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कार्यवाह कुलगुरूपदी प्रा. राजनिश कामत

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजनिश कामत यांची लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (DBATU) कार्यवाह कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार त्यांनी बुधवारी आपला पदभार स्वीकारला. ...सविस्तर बातमी
19:36 (IST) 26 Mar 2026

मुंबईतील नियोजित चारही प्रवेशद्वारांच्या सुशोभीकरणाबाबतची संकल्पना १५ दिवसात सादर करावी - महापौर रितू तावडे यांची सूचना

मुंबईच्या दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड या चारही प्रवेशद्वारांच्या सुशोभीकरणाचा आणि पर्यटन केंद्राच्या विकासाचा आराखडा १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत. या प्रकल्पामुळे पालिकेच्या महसुलात मोठी भर पडणार आहे. ...वाचा सविस्तर
19:33 (IST) 26 Mar 2026

महापालिका शाळांमध्ये अक्षरओळख, भाषाज्ञानावर भर; १ लाख २० हजार विद्यार्थ्यांना गिरवले धडे

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील १ लाख २० हजार विद्यार्थ्यांसाठी 'पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान' उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. या मोहिमेमुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची अक्षरओळख आणि भाषाज्ञान सुधारल्याचे आढावा बैठकीत स्पष्ट झाले. ...अधिक वाचा
19:23 (IST) 26 Mar 2026

पीडित महिलांच्या चित्रफिती समाज माध्यमावर प्रसारित करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा, दोघांना अटक; भोंदूबाबा अशोक खरात अत्याचार प्रकरण

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांच्या अश्लील चित्रफिती सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवर पीडितांची ओळख उघड केल्याप्रकरणी आयटी ॲक्टनुसार ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
19:17 (IST) 26 Mar 2026

रस्ते अपघातातील मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘पीएम राहत’ योजनेवर भर द्या; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची सूचना

रस्ते अपघातातील मृत्यूदर कमी करण्यासाठी 'पीएम राहत' योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना ७ दिवसांपर्यंत १.५ लाख रुपयांचे उपचार मोफत मिळणार आहेत. ...वाचा सविस्तर
19:11 (IST) 26 Mar 2026

राज्यातील अवैध वाहतूक ऐरणीवर; एसटीला कोट्यवधींचा फटका एसटीचे ३५ टक्के मार्ग अवैध वाहतुकीमुळे प्रभावित

राज्यातील ३५ टक्के एसटी मार्गांवर अवैध प्रवासी वाहतुकीचा विळखा असून, यामुळे महामंडळाला वार्षिक कोट्यवधींचा फटका बसत आहे. परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतरही आरटीओ आणि एसटी प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने कर्मचारी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. ...वाचा सविस्तर
18:40 (IST) 26 Mar 2026

जळगाव : गिरीश महाजनांच्या डावपेचांमुळे भाजपच्या ‘पाँचों उँगलियाँ घी में…’ कशा काय?

मंत्री गिरीश महाजन यांच्या राजकीय डावपेचांमुळे भाजपच्या पाच उमेदवारांची स्वीकृत नगरसेवकपदावर वर्णी लागणे जवळपास निश्चित मानले जात आहे. ...सविस्तर वाचा
18:36 (IST) 26 Mar 2026

मुक्त विद्यापीठाचा नारळ पॅटर्न ! आता विद्यापीठातच तयार होणार शुध्द खोबरेल तेल

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मुख्यालय आवारात नारळ वृक्ष उत्पादन संबंधित 'यश कल्पतरू प्रक्रिया आणि प्रशिक्षण केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. ...वाचा सविस्तर
18:28 (IST) 26 Mar 2026

​नाशिकमध्ये मुबलक इंधन साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

​काही दिवसांपासून जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये धास्ती आहे. मालेगाव, पिंपळगाव आणि नाशिक शहराच्या विविध भागांतील पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. ...अधिक वाचा
17:57 (IST) 26 Mar 2026

पेट्रोल टंचाईवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, पुरवठा आणि मागणीचा ताळमेळ बिघडल्यामुळे…

राज्यातील पेट्रोल टंचाईच्या अफवांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. इंधनाचा मुबलक साठा असून केवळ भीतीपोटी मागणी वाढल्याने ताळमेळ बिघडल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. ...अधिक वाचा
17:43 (IST) 26 Mar 2026

शिक्षिकेकडे केली शरीरसुखाची मागणी, डोंबिवली सागावमधील इंग्रजी शाळेतील संतापजनक प्रकार, मनसेचा गदारोळ, आरोपी अटकेत

डोंबिवली हादरली! सागावमधील शाळेच्या विश्वस्ताच्या मुलाकडून शिक्षिकेचा विनयभंग; अश्लील मेसेज पाठवून शरीरसुखाची मागणी ...सविस्तर वाचा
17:35 (IST) 26 Mar 2026

नागपूरच्या गुन्हेविश्वात काय घडलं? मित्राला मारण्यासाठी निघालेल्या आरोपींचा बापावर हल्ला, तर डिझेलच्या साठेबाजांच्या मुसक्या आवळल्या

नागपुरात इंधन टंचाईचा फायदा घेत डिझेलची साठेबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, मुलाच्या वादातून वडिलांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यासह विविध अपघातांत तिघांचा मृत्यू झाल्याने शहर हादरले आहे. ...सविस्तर वाचा
17:00 (IST) 26 Mar 2026

हिंगोलीत भूकंप ! ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. भूगर्भातून येणाऱ्या गूढ आवाजांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...सविस्तर बातमी
16:53 (IST) 26 Mar 2026

एअर इंडिया एक्स्प्रेसचे देशातील पहिले ‘द फ्लाइंग कॅनव्हास’

कोची-मुझिरिस द्वैवार्षिक प्रदर्शनातील कलाकार ओशीन शिवा यांच्या अद्वितीय कलाकृतीने या विमानाची शेपटी सजवण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
16:36 (IST) 26 Mar 2026

Ghodbunder Road Accident: घोडबंदर रोड आता पादचाऱ्यांसाठीही जीवघेणा; दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

घोडबंदर भागात मोठ्याप्रमाणात अपघात होऊ लागले आहेत. हा मार्ग आता पादचाऱ्यांसाठी देखील धोक्याचा झाला आहे. देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या महिलेचा अपघातात मृत्यू झाला. ...अधिक वाचा
16:30 (IST) 26 Mar 2026

रोहित पवार यांच्या निशाण्यावर तटकरे, पटेल; केला मोठा आरोप; प्रत्यूत्तर देण्यासाठी घ्यावी लागली पत्रकार परिषद

आमदार रोहित पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावरून नवा वाद उफाळला आहे. ...सविस्तर वाचा
16:30 (IST) 26 Mar 2026

रोहित पवार यांच्या निशाण्यावर तटकरे, पटेल; केला मोठा आरोप; प्रत्यूत्तर देण्यासाठी घ्यावी लागली पत्रकार परिषद

आमदार रोहित पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावरून नवा वाद उफाळला आहे. ...सविस्तर वाचा
16:13 (IST) 26 Mar 2026

MPSC चा परीक्षार्थींना मोठा दिलासा; गट-क साठी तब्बल ८०३ जागांची वाढ, १७४१ पदांचा सुधारित तपशील जाहीर!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' ची घोषणा केली आहे. या परीक्षेद्वारे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमधील एकूण ९३८ रिक्त पदे भरली जाणार होती. ...सविस्तर बातमी
16:13 (IST) 26 Mar 2026

दत्ता मेघेंना पुत्र सागरने भेट दिला होता बंगला, पण तिथे गृहप्रवेश राहूनच गेला; २२ अंकाचा असाही खेळ…

विदर्भाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या निधनाने पसरलेल्या शोककळेचे सावट कायम आहे. जीव लावणारा माणूस निघून गेल्याचे दुःख हळहळ व्यक्त करीत दिसतच आहे. ...वाचा सविस्तर
16:13 (IST) 26 Mar 2026

बदनामीकारक वृत्तप्रकरणी पत्रकारांवर हक्कभंग; सभागृहाकडून सक्त ताकीद

विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी बदनामीकारक वृत्त प्रसारित केल्याच्या आरोपाखाली अकोल्यातील पत्रकारांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. ...वाचा सविस्तर
16:13 (IST) 26 Mar 2026

आता पदोन्नतीने शिक्षक होता येणार नाही, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; नेमकं घडलं काय?

शालेय पातळीवर पात्र गुणवत्ता असेल तर पदोन्नती देण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे चपराशी म्हणून कोणी कर्मचारी नियुक्त झाला असेल आणि पात्र असल्यास ठराविक वर्षानंतर त्याच शाळेत जागा रिक्त असेल तर लिपिक म्हणून त्यास नियुक्ती दिल्या जावू शकते. ...वाचा सविस्तर
16:13 (IST) 26 Mar 2026

नियमावलीत अडकलं पेट्रोल; तिढा व्यवस्थेचा, भुर्दंड जनतेला, दुपारी ३ नंतर ऑर्डर बंद!

पेट्रोलियम कंपन्यांनी अग्रीम रक्कम भरल्याशिवाय इंधन न देण्याच्या धोरणानंतर आता दुपारी ३ नंतर इंधनाच्या ऑर्डर स्वीकारणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...वाचा सविस्तर
16:13 (IST) 26 Mar 2026

महामार्गाच्या ‘लीफ’वर उभे राहणार पक्षी उद्यान; जामठ्यात १० हेक्टरमध्ये साकारतोय मोठा प्रकल्प

उपराजधानीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर आता पक्षी उद्यान विकसित केले जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने सामंजस्य करार केला आहे. ...सविस्तर वाचा
16:13 (IST) 26 Mar 2026

पोलीस आयुक्तालयातच जवानाने झाडून घेतली गोळी, आत्महत्येचं कारण अस्पष्ट; कार्यालयात खळबळ!

सर्वत्र रामनवमी उत्साहात साजरी केली जात असताना गुरूवारची सकाळ अमरावती पोलीस आयुक्त कार्यालय हादरवणारी ठरली. ...सविस्तर बातमी
16:13 (IST) 26 Mar 2026

राज्यात काहीच दिवसांचा मद्य साठा शिल्लक?, तळीरामांची अडचण होणार, सिलिंडर, पेट्रोलनंतर मंद्य कंपन्या…

इराण आणि अमेरिकेमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम विविध उद्योगांवर होत आहे. सुरुवातीला सिलिंडरचा साठा मर्यादित झाल्याने अनेक खानावली आणि हॉटेल व्यवसायिक अडचणीत आले. ...सविस्तर वाचा
16:11 (IST) 26 Mar 2026

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत

बोलण्यास नकार दिल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणाने महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ...वाचा सविस्तर

Dr. Jaysingrao Pawar Passes Away

इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं निधन (फोटो - X / @Jayant_R_Patil)