Maharashtra News: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर देशभरातील राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. फक्त बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठ्या घोषणा केल्यामुळे त्यांना रिटर्न गिफ्ट दिल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प हा चर्चेचा विषय ठरला आहे.
Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा
नागपूर : काँग्रेससारखा नाटक (नौटंकी) करणारा पक्ष आजपर्यत बघितला नाही. जसा रंगमंचावर नाच्या असतो तशी काँग्रेस पक्षाची अवस्था झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनेमुळे सध्या महाविकास आघाडी रडकुंडीला आली आहे. त्यामुळे चांगल्या काही योजना आणल्या तर त्याला विरोध करणे हे विरोधी पक्षाचे काम झाले असल्याचे टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
दिवा येथील बेतवडे परिसरात पंतप्रधान आवास योजनेतून परवडणारी घरे उभारणीसाठी पालिका प्रशासनाने दोनदा निविदा काढूनही त्यास ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नव्हता.
पुणे : लोणावळ्यात यावर्षीचा रेकॉर्डब्रेक पाऊस कोसळला आहे. गेल्या २४ तासात २७५ मिलिमीटर पाऊस कोसळला असून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. यावर्षीचा हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला, असल्याने लोणावळ्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. आतापर्यंत लोणावळ्यात २६०१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जो गेल्यावर्षीच्या तुलनेत १०१ मिलिमीटरने जास्त आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत २५०१ मिलिमीटर पाऊस झाला होता.
मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रात लोकसंख्या वेगाने वाढत आहे. या क्षेत्रात विविध उद्योग घटकांसह नवीन माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्याही येत आहेत.
पावसाळ्यात पवई आणि मरोळहून आरेकडे जाणारे दोन्ही मार्ग मुसळधार पावसामुळे जलमय होत आहेत.
महापालिकेत २४५ जण रुजू झाले आहेत. विविध कारणांनी १३९ उमेदवारांची नेमणूक रद्द करण्यात आली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेले खडकवासला हे धरण हंगामात प्रथमच १०० टक्के भरले.
उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होऊन चार महिने उलटले नाहीत तोच पुलावर खड्डे पडले आहेत.
तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा अत्यंत जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने माझं देवेंद्र फडणवीसांशी अनेकदा बोलणं करून दिलं. त्यांनी माझ्याकडे एक लिफाफा पाठवला. त्यातल्या चार मुद्द्यांचं अॅफिडेविट करून देण्यास मला सांगण्यात आलं. ते जर मी करून दिलं असतं तर तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार हे अडचणीत आले असते. असे तीन ते चार अॅफिडेविट त्यांनी मला करून द्यायला सांगितले होते. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की अनिल देशमुख कुणावरही खोटे आरोप करणार नाही. हे सांगितल्यामुळे, प्रतित्रापत्र करून देण्यास नकार दिल्यामुळे माझ्यामागे ईडी-सीबीआय लावून मला अटक करण्यात आली – अनिल देशमुख</p>
तीन वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्र करून खोटे आरोप आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरेंवर करण्यास मला सांगण्यात आलं. मी त्याला नकार दिल्यामुळे माझ्यावर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली – अनिल देशमुख</p>
माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने होत होती. या बिघाडामुळे जलद मार्गावरील रेल्वेगाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी रेल्वे गाड्या बराच वेळ थांबल्याचं किंवा अत्यंत संथ गतीने जात असल्याचं चित्र दिसून आलं.
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह
Marathi News Live Updates: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
