Latest Marathi News Today: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पवार कुटुंबासह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी व्हिडिओ पोस्ट करत VSR कंपनीवर गंभीर आरोप केले असून, कंपनीचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले असल्याचा दावा केला आहे. त्यांनी DGCA कडे तात्काळ चौकशी, कठोर कारवाई आणि सर्व विमाने ग्राउंड करण्याची मागणी केली आहे.

Live Updates

Marathi News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी येथे जाणून घेता येतील. दिवसभरातील सर्व बातम्या वाचा...

20:30 (IST) 2 Mar 2026

नवी मुंबई महानगरपालिका शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी कागदपत्रांच्या पूर्ततेस ४ मार्चपर्यंत मुदतवाढ

संबंधित लाभार्थ्यांना अपूर्ण कागदपत्रे सादर करण्यासाठी ४ मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली. ...सविस्तर वाचा
19:42 (IST) 2 Mar 2026

Gautami Patil : गौतमी पाटील रंगांची उधळण करण्यासाठी येतेय... ठाण्यात...

ठाण्यातील हायलँड मैदानावर आयोजित होळी महोत्सवात गौतमी पाटीलच्या लाईव्ह डान्ससह 'रुद्रा' ढोलताशा पथक आणि प्रसिद्ध डीजेच्या तालावर रंगांची भव्य उधळण होणार असून जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. ...अधिक वाचा
18:59 (IST) 2 Mar 2026

Video: त्र्यंबकेश्वर मंदिरात राडा! हरियाणाच्या भाविकाला सुरक्षा रक्षकांकडून मारहाण; कपडेही फाडले

बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षारक्षकांच्या कार्यपद्धतीविषयी कायमच ओरड होत असताना हरियाणातील एक भाविक आणि सुरक्षारक्षक यांच्यात धुमश्चक्री उडाल्याची बाब समोर आली. ...अधिक वाचा
18:48 (IST) 2 Mar 2026

परभणीत साकारणार सुसज्ज कामगार भवन, पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

शहरात आज कामगार भवन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते पार पडले. ...सविस्तर वाचा
18:36 (IST) 2 Mar 2026

'हैदराबाद गॅझेट'साठी राज्यातील आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक - राधाकृष्ण विखे

'हैदराबाद गॅझेट' अधिवेशनात लागू करून तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा उपोषण करू, असा इशारा मराठा आरक्षण मागणी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ...वाचा सविस्तर
17:56 (IST) 2 Mar 2026

तब्बल अडीच वर्षांनी खुनाचा उलगडा; जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याला संपवणाऱ्या काकासह…

रक्ताचे नाते जेव्हा संपत्तीच्या लालसेपायी वैरी बनते, तेव्हा त्याचे परिणाम किती भीषण असू शकतात, याचे थरारक उदाहरण कोरची तालुक्यात समोर आले आहे. ...अधिक वाचा
17:55 (IST) 2 Mar 2026

अकोला महापालिकेमध्ये सभापती पदांवर ‘शहर सुधार’चे वर्चस्व, स्थायी समिती सभापतीपदी विजय अग्रवाल

अकोला महापालिकेच्या स्थायीसह विविध समित्यांचे सभापती निवडण्यासाठी आज विशेष सभा बोलविण्यात आली होती. सभापती पदांवरही भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचे वर्चस्व कायम राहिले आहे. ...सविस्तर बातमी
17:54 (IST) 2 Mar 2026

राऊळगाव स्फोट प्रकरणातील जखमींबाबत मोठी बातमी..! ९ रुग्ण पन्नास टक्केहून अधिक भाजले, एकाच्या मृत्यूनंतर…

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राऊळगाव येथील एस. बी. एल. एनर्जी लिमिटेड या दारुगोळा बनवणऱ्या डिटोनेटर कंपनीत रविवारी सकाळी भीषण साखळी स्फोट झाले. ...सविस्तर बातमी
17:53 (IST) 2 Mar 2026

चंद्रपूर : वाळू घाटात पैशांचा वाद; भाजपच्या महामंत्र्याची तलवारीने हत्या

वाळू घाटातील ९८ लाख रुपये परत देण्याच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी होवून भारतीय जनता पक्षाचे पुलगाव शहर महामंत्री भरत दयानंद नागपाल (४२) याची तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ...वाचा सविस्तर
17:13 (IST) 2 Mar 2026

होळीच्या मुहूर्तावर नवी मुंबई पोलिसांकडून १८ कोटी ६३ लाख रुपयांचे अमली पदार्थ नष्ट

'नशा मुक्त नवी मुंबई' अभियानांतर्गत अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कठोर कारवाईचा पुढील टप्पा म्हणून नवी मुंबई पोलिसांनी होळीच्या मुहूर्तावर तब्बल १८ कोटी ६३ लाख ३४ हजार २६६ रुपयांच्या किमतीचे अमली पदार्थ नष्ट केले. हे अमली पदार्थ ५५ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आले होते.

तळोजा येथील शासनमान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या अमली पदार्थांचा नाश करण्यात आला. मागील तीन वर्षांत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करून ड्रग्ज विक्री करणाऱ्या आफ्रिकन नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत १५२२ जणांना हद्दपार करण्यात आले असून १११ जणांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. तसेच अमली पदार्थ विक्रीत सक्रिय सहभाग आढळलेल्या आरोपींविरुद्ध Maharashtra Control of Organised Crime Act (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, पंजाब राज्यातून नवी मुंबईत येऊन हॉटेल, लॉज व पीजीमध्ये राहून ट्रक आणि रेल्वेमार्गे अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या टोळीचाही पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणात १६ गुन्हे दाखल करून ३३ आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून ४ कोटी २० लाख ७० हजार रुपयांच्या किमतीचे हेरॉईन, अफू, मेफेड्रोन आणि कोडीनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून मुख्य सूत्रधाराला पंजाब राज्यातून अटक करण्यात आली आहे.

16:47 (IST) 2 Mar 2026

सौर ऊर्जा ग्राहकांसाठी मोठी बातमी..! छतावर सौर वीजनिर्मिती, ग्रीडमध्ये वीज सोडण्याबाबत हे बदल

सुधीर बुध्ये यांनी राज्य वीज नियामक आयोगाकडे महावितरणविरोधात याचिका दाखल केली आहे. ...सविस्तर वाचा
16:36 (IST) 2 Mar 2026

Nagpur Katol Blast : काटोल स्फोट दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ८२ लाखांची आर्थिक मदत जाहीर, कंपनी ७५ लाख रुपये देणार!

काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एस. बी. एल. इंडस्ट्रियल एक्सप्लोसिव्ह मॅन्युफॅक्चरर कंपनीत रविवारला मोठा स्फोट झाला. या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला. तर २३ जण जखमी आहेत. ...सविस्तर बातमी
16:30 (IST) 2 Mar 2026

पुण्यात घरांचा आकार कमी तर दिल्लीत सर्वाधिक! देशातील महानगरांतील स्थिती जाणून घ्या…

‘अनारॉक ग्रुप’ने देशातील महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, महानगरांमध्ये २०२३ ते २०२५ या दोन वर्षांच्या कालावधीत घरांच्या आकारमानात सरासरी १७ टक्के वाढ झाली आहे. ...अधिक वाचा
16:27 (IST) 2 Mar 2026

SBL factory blast : …तर पेसो, कामगार, डिशच्या अधिकाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल; बावनकुळेंचा इशारा, प्राथमिक चौकशी अहवाल आला

काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एस. बी. एल. इंडस्ट्रियल एक्सप्लोसिव्ह मॅन्युफॅक्चरर कंपनीत रविवारला मोठा स्पोट झाला. या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला. तर २३ जण जखमी आहेत. ...वाचा सविस्तर
16:26 (IST) 2 Mar 2026

MPSC : एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेची तारीख बदलणार? तीन दिवसांनी उच्चस्तरीय बैठक, ३० दिवसांचा कालावधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ चा निकाल तब्बल ९० दिवसांनी जाहीर झाला. ...सविस्तर वाचा
16:26 (IST) 2 Mar 2026

राज्यातील वीजदरवाढीवरील दबाव कमी होणार? राज्य वीज नियामक आयोगाकडून…

राज्यातील वीजदरवाढीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय म्हणून महाराष्ट्र वीज नियामक आयोग (एमईआरसी) यांनी वीज वितरण कंपन्यांकडून आकारण्यात येणाऱ्या वार्षिक परवाना शुल्कात कपात करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ...वाचा सविस्तर
15:44 (IST) 2 Mar 2026

चिपळूणमध्ये राजकीय भूकंप; भाजपाचे परिमल भोसले यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये राजकीय भूकंप झाला असून भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. ...सविस्तर वाचा
15:06 (IST) 2 Mar 2026

येरवड्यात वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराइताची धिंड- सराइताला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश

पुण्यातील येरवड्यात वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगार सुलतान शेखची पोलिसांनी धिंड काढली. ...अधिक वाचा
14:43 (IST) 2 Mar 2026

इराण–इस्रायल संघर्षाता फटका! नाशिकचे हज यात्रेकरू मक्का–मदिना येथे अडकले

इराण व इस्रायल अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे दोन दिवसापासून भारतामधून आंतरराष्ट्रीय विमानसेवा ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. यामुळे हज यात्रेसाठी गेलेले नाशिकचे दीडशे ते दोनशे यात्री करू हे मक्का मदीनामध्ये अडकले आहेत. परंतु दोन-तीन दिवसात परिस्थिती सुधारल्यानंतर विमानसेवा चालू करण्यात येईल असे देखील यात्रेकरूंना आंतरराष्ट्रीय विमानसेवा प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाल्यामुळे नाशिक मधील जवळपास 100 लोकांना आपली परदेशवारी रद्द करावी लागली आहे.

13:46 (IST) 2 Mar 2026

खासदार कल्याण काळेंसह मराठवाड्यातील ३३ जण आखाती देशात अडकले; युद्धामुळे विमान रद्द झाल्याने अडचणीत वाढ

डॉ. कल्याण काळे त्यांच्या वर्गमित्रासह दुबई आणि आबुदाभी येथे सहलीस गेले होते. ते परतण्याच्या तयारीत असताना सर्व विमाने बंद करण्याची घोषणा झाल्याने ते आबुदाबी येथे अकडले आहेत. ...सविस्तर वाचा
13:38 (IST) 2 Mar 2026

Pune Flyover Closure: पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी राहणार बंद !

बाणेर, बालेवाडी यासह हिंजवडी आयटी पार्क कडे जाण्यासाठी गणेशखिंड रस्त्याचा वापर नागरिकांकडून केला जातो. ...सविस्तर वाचा
12:36 (IST) 2 Mar 2026

अजित पवारांच्या विमान अपघातातील पायलट जिवंत? खळबळजनक दावा; शंकेला वाव…

अजितदादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील पायलट सुमित कपूर जिवंत असल्याची माहिती समोर येत असल्याचा खळबळजनक दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत २८ जानेवारीला निधन झाले. या घटनेवर अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अनेक मुद्दे उपस्थित केले. या विमान अपघात प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या चौकशीवर देखील अमोल मिटकरी यांनी असमाधान व्यक्त केले. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांच्यासोबत देखील अमोल मिटकरी दिसून आले. या प्रकरणी मिटकरी यांनी आणखी काही दावे केले आहेत.

वाचा सविस्तर

12:22 (IST) 2 Mar 2026

Shrimant Dagdusheth Halwai Ganpati : तब्बल दोन हजार किलो द्राक्षांची श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला आरास; मंदिरात द्राक्ष महोत्सवाचे आयोजन…

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात नाशिकच्या सह्याद्री फार्म्सतर्फे दोन हजार किलो द्राक्षांची मनमोहक आरास करण्यात आली असून हा महाप्रसाद पुढे अनाथाश्रम आणि रुग्णालयांमध्ये वितरित केला जाणार आहे. ...सविस्तर बातमी
12:10 (IST) 2 Mar 2026

ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ जे. एम वाघमारे यांचे निधन

मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण बदल करण्यात जे. एम वाघमारे यांचा मोलाचा वाटा होता. शाहू महाविद्यालयाच्या स्थापनेपासून लातूरच्या शिक्षण प्रारुपास आकार देणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख. ...वाचा सविस्तर
11:15 (IST) 2 Mar 2026

फर्ग्युसन, जंगली महाराज रस्त्यावर पोलिसांची मोठी कारवाई; ४० खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे; धोकादायक पद्धतीने गॅस शेगडी मांडून...

डेक्कन जिमखाना भाग वर्दळीचा ‌भाग आहे. रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने शेगडी पेटवून खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याने गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती. ...सविस्तर वाचा
11:15 (IST) 2 Mar 2026

मध्यरात्री पुणेकरांची पेट्रोल पंपांवर धाव ! इराण-इस्रायल युद्धामुळे पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार ?

इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढून पेट्रोल-डिझेल महाग होणार असल्याच्या अफवेने पुण्यात खळबळ उडाली आहे. ...अधिक वाचा
10:49 (IST) 2 Mar 2026

जय पवार यांनी व्हिडीओ पोस्ट करत काय म्हटलं आहे?

माझ्या वडिलांना आपण गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी DGCA ला ठामपणे मागणी करतो — या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.ही एका मुलाची आर्त हाक आहे… माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी. अशी पोस्ट जय पवार यांनी केली आहे.

10:46 (IST) 2 Mar 2026
माझ्या वडिलांना आपण गमावलं ही वेदना आयुष्यभर असणार आहे- जय पवार

“माझ्या वडिलांना आपण गमावलं ही वेदना आयुष्यभर असणार आहे”; VSR च्या मालकाचा व्हिडीओ शेअर करत जय पवार यांची पोस्ट

सविस्तर वाचा

ajit pawar accident baramati

अजित पवार अपघात प्रकरण चौकशी (फोटो- लोकसत्ता)