Marathi News Today : महाविकास आघाडीने अखेर राज्यसभेच्या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे पवारांच्या नावाला समर्थन दिल्यानंतर, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले. यामुळे महाविकास आघाडीतील सस्पेन्स संपुष्टात आला आहे. महायुतीमधील भाजपनेही राज्यसभेसाठी आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते आणि धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते यांचा समावेश आहे. रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. ज्या गोष्टीला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय घडामोडी घडणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. ६ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज विधानसभा आणि विधान परिषदेत काय घडतं त्यासह इतर महत्त्वाच्या बातम्यांवर आपली लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर असेल.
Maharashtra Live News Today अधिवेशनात काय होणार याकडे लक्ष, रोहित पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी
तुकोबांच्या नामगजराने दुमदुमली देहूनगरी; इंद्रायणीकाठी लोटला भाविकांचा जनसागर
Dr. Jyoti Waghmare: राहुल शेवाळेंना बाजूला सारत डॉ. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देऊन एकनाथ शिंदेनी काय साध्य केले ?
वर्षोनुवर्षे दररोजचा दिवस दुर्गंधीसोबत
इंग्लंड विरुद्ध भारत सामन्याचं तिकीट मिळेना? विधानपरिषदेत आमदाराचा संताप; मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कारभारावर व्यक्त केली नाराजी
टी-२० विश्वचषकातील भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत आहे. मात्र, हा सामना सुरू होण्याआधीच तिकीटाच्या मुद्यावरून आज विधानपरिषदेत आमदारांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कारभारावर संताप व्यक्त केला. याबाबत आमदार सचिन अहिर यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करत आमदारांना पास मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.
Ajit Pawar Death: व्हीएसआर कंपनीचे संचालक व्ही. के. सिंग यांची सीआयडीकडून चौकशी
विमानाच्या प्रसाधनगृहातून पाऊण कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त
कोळीवाडे-गावठाणे : मूळ भूमीपुत्र दुर्लक्षित!
Sunil Tatkare : अजित पवारांच्या विमान अपघाताच्या AAIB च्या प्राथमिक अहवालावर तटकरेंचं मोठं वक्तव्य; "अहवालात त्रुटी…"
परभणी जिल्ह्यात जलजीवनची २६१ कामे रखडली, १४७ कंत्राटदारांना दंड
Indian Railway:धुळे : मनमाड–धुळे–इंदूर रेल्वे मार्ग; तक्रारींच्या पार्श्वभूमीवर संयुक्त बैठकीची गरज – खा. शोभा बच्छाव
Video: शिळफाटा रस्ता दुचाकीस्वारांसाठी ठरत आहे धोकादायक; रस्त्यावरील चिरा, चऱ्यांमुळे दररोज होतात अपघात
वारंवार समजावूनही पत्नीला देत होता त्रास, पतीने दगडानं ठेचून केली तरुणाची हत्या; मेहकर हत्याकांडाचा उलगडा झाला!
शहरातत घरफोडी करणारे उत्तर प्रदेशातील चोरटे गजाआड- ६२ लाखांचा ऐवज जप्त
डॉक्टर की एजंट? बदलापुर स्त्री बीज विक्री प्रकरणात नाशिकचा डॉ. अमोल पाटील अटकेतते सेंटरही सील
Pimpri Chinchwad Crime : नात्यातील मुलीबरोबर प्रेमसंबंध, पती-पत्नीत वाद, पत्नीवर दगडाने हल्ला
'...म्हणून राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला', उपमुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य
राज्यसभेच्या निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "आम्ही मॅच खेळतो ती जिंकण्यासाठी, ही मॅच आम्ही खेळलो असतो तर नक्कीच जिंकलो असतो. पण शरद पवार यांच्याकडून आलेली विनंती आणि त्यांनी देशासाठी केलेलं काम याचा सर्वांनी विचार केला. त्यामुळे सर्वांचीच भावना होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. आम्ही रोहित टिळक यांच्या नावाचाही विचार केला होता. पण शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही आमचा विचार बदलला आणि ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला", असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
खाजगीत पाच हजारांना मिळणारी एचपीव्ही लस आता नाशिक मध्ये माेफत
VIDEO: नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात.. चार ते पाच वाहनांना धडक
गडकरींच्या सूचनेनंतर सुधारणा, पण उड्डाणपुलाच्या डिझाईनमध्ये पुन्हा दोष
Dr. Jyoti Waghmare: आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्या ते राज्यसभा खासदार, शिवसेनेच्या डॉ. ज्योती वाघमारे नेमक्या कोण..?
दीड वर्षांत नाशिककरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता; नाशिक वर्तुळाकार रस्त्याच्या कामाला मार्चअखेरीस सुरुवात
बँक घोटाळा करणाऱ्यांना कारागृहात जावे लागले, असे का म्हणाले गडकरी?
जलसंपदा विभागातील भरतीसंदर्भात मोठी अपडेट; १४ हजार पदांसाठी TCS प्रक्रिया राबवणार, 'या' महिन्यात निघणार जाहिरात!
दिवसाढवळ्या हत्येचा थरार! पती-पत्नी आणि 'तो'; चाकूने सपासप वार…
MPSC : एमपीएससीची चूक; एकाच उमेदवाराला दोन ठिकाणी नियुक्त होण्याची वेळ
कोलंबिया निवडणूक : आंतरराष्ट्रीय निरीक्षक पथकात महाराष्ट्रातील 'या' पाच जणांचा समावेश
विमानतळाची सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची ! नमाज पठणाच्या परवानगीवरून उच्च न्यायालयाने सुनावले
इराण-इस्रायल युद्धाचा नाशिकला चटका; खासदार वाजेंचे पीएमओला साकडे!
बारामती- पारवडी रस्त्यावर अपघातात मायलेकीचा मृत्यू; दोन जण जखमी

रोहित पवार काय म्हणाले? (फोटो - रोहित पवार/X)
'रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. ज्या गोष्टीला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय घडामोडी घडणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. ६ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज विधानसभा आणि विधान परिषदेत काय घडतं त्यासह इतर महत्त्वाच्या बातम्यांवर आपली लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर असेल.
