Maharashtra Breaking News Updates, 02 June 2026 : आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुणे-नाशिक महामार्गावर महाविकास आघाडीचा क्रांती महामोर्चा नंदी महाराज चौक तांबडेमळा भोरवाडी येथे सुरू होणार आहे. या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे आदी उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव पोलील बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे एफडीआय मार्फत ठिकठिकाणी धाडी सत्र सुरू आहे. विधान परिषद उमेदवारीवरून महायुती व महाविकास आघाडीत विविध ठिकाणी पेचप्रसंग निर्माण झाले आहेत तर नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी हातचाली चालू आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील ८१ लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत. यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यासह राज्यातील राजकीय क्षेत्रातील ठळक घडामोडी, गुन्हे, पर्यटन, कला – क्रीडा – संस्कृती- हवामान यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Live Updates

Today's Marathi News Live Updates, 02 June 2026 : दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एका क्लिकवर…

19:22 (IST) 2 Jun 2026

राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, २ लाखांपर्यंतचं कर्ज माफ; मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब

राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही जमीन धारणेच्या अटीशिवाय राज्यातील शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. कर्जमाफी देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेत कर्जमुक्ती, ‘वन टाईम सेटलमेंट’ व प्रोत्साहनपर लाभ असे तीन घटक केल्याने, राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे.

ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत माफी मिळाल्याने असे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत. ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा अधिक आहे, त्या शेतकर्‍यांना दोन लाखांवरील थकबाकी ३१ मार्च २०२७ पूर्वी भरण्याची मुदत देण्यात येईल. त्यांच्या खात्यातही दोन लाख रुपये शासन जमा करणार आहे. तर याशिवाय प्रोत्साहनपर लाभ योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना अधिकाधिक पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. तर,

या योजनेत राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी व आयकर पात्र व्यक्ती, सहकारी संस्थांचे २५ हजार रुपयांहून अधिक वेतन असणारे अधिकारी, कर्मचारी पात्र नसतील.

ही योजना राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जास तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वत:च्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील लागू राहील. यासाठी शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण केले जाईल. तसेच, अ‍ॅग्रीस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकर्‍यांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. योजनेच्या कार्यान्वयनासाठी अद्ययावत पोर्टल विकसित करण्यात येईल.

19:12 (IST) 2 Jun 2026

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १९३ एकर जमीन प्रकरण; आमदार जितेंद्र आव्हाड जनहित याचिका करणार दाखल, वनमंत्री गणेश नाईक यांच्यावरही टीका

ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारीतील १९३ एकर जमिनीच्या बदल्यात एका खाजगी कंपनीला २८०० कोटी रुपयांचा टीडीआर (विकास हस्तांतरण हक्क) बहाल केला जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ...अधिक वाचा
18:55 (IST) 2 Jun 2026

संख्याबळ असूनही भाजपची वाट बिकट ; वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद, २०१८ चा धडा पुन्हा समोर?

उपलब्ध आकडेवारी आणि मागील निवडणुकीचा इतिहास पाहता भाजपसमोरील आव्हाने कमी झालेली नसून उलट वाढल्याचे दिसत आहे. ...सविस्तर वाचा
18:54 (IST) 2 Jun 2026

मोदी सरकारकडून महागाई मोजण्याच्या पद्धतीत मोठा बदल

अर्थव्यवस्थेतील महागाईचे अधिक वास्तववादी मूल्यमापन करण्यासाठी 'घाऊक किंमत निर्देशांक' (WPI) टप्प्याटप्प्याने बंद करून त्याऐवजी 'उत्पादक किंमत निर्देशांक' (PPI) लागू केला जाणार आहे. ...सविस्तर बातमी
18:32 (IST) 2 Jun 2026

पाऊसवार्ता: केरळमध्ये ‘या’ दिवशी धडकणार मान्सून; हवामान विभागाचा नवा अंदाज

मान्सूनचे आगमन लांबल्याने उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. ...वाचा सविस्तर
18:28 (IST) 2 Jun 2026

नव्या उपायुक्तांना नवे खातेवाटप

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केलेल्या या फेरबदलांमुळे विविध विभागांच्या कामकाजाला नवी दिशा मिळणार आहे. ...सविस्तर वाचा
18:28 (IST) 2 Jun 2026

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाला, आता प्रोत्साहन निधी वाढीसाठी लढा; बच्चू कडूंचा इशारा

राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. ...सविस्तर वाचा
18:22 (IST) 2 Jun 2026

काचीगुडा-श्री गंगानगर विशेष रेल्वे आता कायमस्वरूपी धावणार; महाराष्ट्रातील 'या' स्थानकांचे थांबे आणि नवीन नंबर जाणून घ्या

रेल्वे प्रशासनाने काचीगुडा-श्री गंगानगर विशेष रेल्वेचे नियमित सेवेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ जुलैपासून ही गाडी नवीन क्रमांकासह धावणार असून, यामुळे प्रवाशांना खात्रीशीर सेवा मिळण्यासोबतच तिकिटाचे पैसेही वाचणार आहेत. ...सविस्तर वाचा
18:19 (IST) 2 Jun 2026

ताडोबा सफारी बुकिंग संकेतस्थळ हॅक? व्यवस्थापनाकडून बदनामीकारक पोस्टविरोधात पोलिसांत तक्रार

ताडोबा व्यवस्थापनाने हॅकिंगचे दावे निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी करण्यात आलेल्या तांत्रिक तपासणीत संकेतस्थळात कोणतीही सुरक्षा त्रुटी अथवा हॅकिंग झाल्याचे आढळून आले नसल्याची माहिती व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने दिली. ...सविस्तर बातमी
18:13 (IST) 2 Jun 2026

ताडोबाच्या कोअर झोनमधील सफारी बंद होणार; का आणि कधीपासून, जाणून घ्या…

दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात जंगलातील रस्त्यांची स्थिती, वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन कोअर क्षेत्रातील पर्यटन बंद ठेवण्यात येते. ...सविस्तर वाचा
18:04 (IST) 2 Jun 2026

सोलापूर हादरलं! क्रिकेट कॅम्पमध्ये खेळपट्टी तयार करताना १५ वर्षांच्या मुलाचा रोलरखाली चिरडून मृत्यू; २ प्रशिक्षकांवर गुन्हा दाखल

प्रशिक्षकांच्या सांगण्यावरून हा मुलगा इतर मुलांसोबत मिळून तो अवजड रोलर ओढत होता. मात्र, अचानक तोल गेल्याने तो त्या जड रोलरच्या खाली आला. ...सविस्तर बातमी
17:56 (IST) 2 Jun 2026

कोट्यावधींच्या घरांतील नळ कोरडे

खारघर उपनगरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने रहिवाशांना दररोज हजारो रुपये खर्च करून टॅंकरचे पाणी खरेदी करावे लागत आहे. ...अधिक वाचा
17:56 (IST) 2 Jun 2026

भाजप उमेदवार अरुण लाखानी म्हणाले "उमेदवारी जाहीर झाल्यावर सुप्रियाताईंकडून अभिनंदन !"

अरुण लाखाणी यांचे सुपुत्र सारंग यांचा विवाह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांच्याशी येत्या २० जून रोजी होणार आहे. ...सविस्तर बातमी
17:33 (IST) 2 Jun 2026

डोंबिवली जवळच्या निळजे गावातील विद्यार्थ्याची सैन्यदलात अग्निवीर म्हणून निवड

आयटीआय वेल्डरचे शिक्षण सोडून लष्कर भरतीचे ध्येय; जळगावच्या डिफेन्स अकॅडमीत घेतले खडतर प्रशिक्षण ...सविस्तर बातमी
17:27 (IST) 2 Jun 2026

रायगडावरील सुविधांची सामूहिक पाहणी करून व्यापक आराखडा ठरविणार - ॲड. आशिष शेलार

रायगड किल्ला विकास पर्यटन आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा मंत्री ॲड.शेलार यांनी मंत्रालयात आढावा घेतला. ...वाचा सविस्तर
17:20 (IST) 2 Jun 2026

ठाणे महापालिकेची पहिली सीबीएसई शाळा ८ जून पासून सुरु

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला कामांचा आढावा; ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा आणि आधुनिक सुविधा सज्ज ...सविस्तर बातमी
17:20 (IST) 2 Jun 2026

ठाणे महापालिकेची पहिली सीबीएसई शाळा ८ जून पासून सुरु

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला कामांचा आढावा; ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा आणि आधुनिक सुविधा सज्ज ...सविस्तर बातमी
17:14 (IST) 2 Jun 2026

विरारमध्ये कोपरी गावात तब्बल १२ तास वीजपुरवठा खंडित

महावितरणच्या नियंत्रण कक्षाशी वारंवार संपर्क साधूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त नागरिकांनी महावितरणच्या भोंगळ आणि ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...सविस्तर बातमी
17:14 (IST) 2 Jun 2026

गोपाळगड किल्ल्याच्या मालकी व संवर्धनाबाबत १५ दिवसांत अहवाल सादर करा; ॲड. आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्कासंदर्भातील वाद, न्यायालयीन प्रक्रिया, पुरातत्त्वीय महत्त्व आणि संभाव्य संपादन याबाबत सविस्तर चर्चा झाली. ...अधिक वाचा
17:14 (IST) 2 Jun 2026

मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरी; शासन आदेश जारी

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी दिलेल्या आश्वासनाची ही पूर्तता असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. ...वाचा सविस्तर
17:14 (IST) 2 Jun 2026

निवघ्यात नुकसानग्रस्त केळीच्या बांधावर खा. रवींद्र चव्हाण !मध्यप्रदेशच्या धर्तीवर केळी उत्पादकांना हेक्टरी दोन लाखांची भरपाई द्या

या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनी निवघा (ता. मुदखेड) येथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. ...सविस्तर बातमी
17:05 (IST) 2 Jun 2026

'हात-पाय तोडले तरच लोकांना कायद्याचा धाक बसेल'; कर्नाटक उच्च न्यायालयाने अशी टिप्पणी का केली? वाचा सविस्तर...

न्यायमूर्ती आर. नटराज यांनी देशातील सद्यस्थितीवर बोट ठेवत म्हटले की, "आजकाल लोक अतिशय सहज आणि सवयीने गुन्हे करत आहेत, कारण गुन्हेगारांवर कायद्याचा कोणताही जरब राहिलेला नाही ...अधिक वाचा
17:02 (IST) 2 Jun 2026

विधान परिषद निवडणूक: पितापुत्र एकाच वेळी बोहल्यावर, एक निवडणुकीच्या तर दुसरा लग्नवेदीवर आणि मुहूर्त तर…

अरुण लखानी हे खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही होणार. म्हणजे लखानी यांचा मुलगा सारंग लखानी यांच्याशी सुप्रिया सुळे यांच्या मुलीचा साखरपुडा झाला असून लवकरच लग्न होणार आहे. आता विधान परिषदेचे आमदार ( MLC ) होवू इच्छिणाऱ्या लखानी यांना हे पण एक कर्तव्य आहेच. ...सविस्तर बातमी
16:54 (IST) 2 Jun 2026

पात्र फेरीवाल्यांना १० जूनपर्यंत ओळखपत्र मिळणार ; उपमहापौर संजय घाडी यांची घोषणा

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून महायुतीत कलगीतुरा; शिवसेनेची (शिंदे) भाजपवर कुरघोडी, तर संजय निरुपम यांचे गंभीर आरोप. ...सविस्तर वाचा
16:46 (IST) 2 Jun 2026

"मुंबईच्या प्रवेशद्वारांवर हरित पट्टा विकसित करणार " महापौर रितू तावडे यांचे यंत्रणांना आदेश

पूर्व द्रुतगती महामार्गाच्या खाडीकिनारी पंतनगर ते मुलुंडदरम्यान ‘पिवळ्या बहाव्याची’ विशेष लागवड करण्याचे निर्देश. ...सविस्तर बातमी
16:37 (IST) 2 Jun 2026

भाजपच्या १०० दिवसांतील कामगिरीवर काँग्रेसची टीका; दावे खोटे असल्याचा अशरफ आझमी यांचा आरोप

१ हजार कोटींच्या निविदा रद्द केल्याचा दावा फसला; प्रशासकाचा पारदर्शक कारभार समोर आणण्यासाठी फाईलवरील नोंदी सार्वजनिक करण्याची मागणी. ...सविस्तर वाचा
16:35 (IST) 2 Jun 2026

मुंबईत रंगणार ‘इंडो-कोरियन सांस्कृतिक महोत्सव

कोरिया प्रजासत्ताकाच्या वाणिज्य दूतावासाकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर सदर बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. ...सविस्तर वाचा
16:35 (IST) 2 Jun 2026

राज्यातील ५५.७२ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींची कर्जमाफी; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ देणाऱ्या पुण्यश्वोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेवर आज मंगळवारी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली आहे. ...वाचा सविस्तर
16:34 (IST) 2 Jun 2026

शेअर बाजार गुंतवणुकीतून जादा परताव्याचा मोह नडला! पुण्यात निवृत्त अभियंत्याची २ कोटींची फसवणूक; नेमकं काय घडलं?

पुण्यातील कोथरूड परिसरातील एका ६६ वर्षीय निवृत्त अभियंत्याला सायबर चोरट्यांनी तब्बल २ कोटी ३ लाख रुपयांना गंडा घातला आहे. ...सविस्तर वाचा
16:21 (IST) 2 Jun 2026

केईएममध्ये आठ वर्षांच्या मुलावर अत्याधुनिक ‘स्मार्ट कॉक्लिअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया

केईएम रुग्णालयाच्या ईएनटी विभागप्रमुख डॉ. हेतल मार्फातिया यांच्या नेतृत्वाखाली २९ मे रोजी शस्त्रक्रिया पूर्ण; आता पुन्हा शस्त्रक्रियेची गरज नाही. ...अधिक वाचा

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स