Latest Marathi News Updates, 11 June 2026 : कॉक्रोच जनता पार्टीचे पुणे विद्यापीठात अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आंदोलन सरु आहे. या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी आहे. तसेच आंदोलनात सोनम वांगचुक यांची उपस्थिती राहणार असल्याचे आंदोलनाचे महत्त्व अधिक वाढले आहे. तर नाशिक विधान परिषदेचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांच्या अटकेसाठी गुलाबो गँग च्या महिलांनी आज दुपारी 12 वाजता पुण्यात आंदोलन केलं आहे. तसेच राज्यातील 15 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यासह राज्यातील राजकीय क्षेत्रातील ठळक घडामोडी, गुन्हे, पर्यटन, कला – क्रीडा – संस्कृती- हवामान यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Live Updates

Mumbai Maharashtra Latest News Updates, 11 June 2026 : दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एका क्लिकवर…

19:43 (IST) 11 Jun 2026

धावत्या लोकलमध्ये मंगळसूत्र हिसकावले; सराईत चोरटा अखेर अटकेत, १.९५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

धावत्या मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशाच्या गळ्यातील १.९५ लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या सराईत आरोपीला रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने (STF) अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. ...सविस्तर वाचा
19:20 (IST) 11 Jun 2026

MLC Election: जळगावमधून शिंदे गट माघार घेणार नाहीच..? भाजपच्या नाकात दम आणण्याची खेळी यशस्वी?

जळगाव विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. ...वाचा सविस्तर
19:12 (IST) 11 Jun 2026

"वैभव सूर्यवंशीला टीममध्ये संधी मिळाली; मला कधी?" मंत्रिपदावरुन धनंजय मुंडेंची सुनेत्रा पवारांसमोर जोरदार बॅटिंग!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या जाहीर कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बोलताना मुंडे यांनी आपल्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी केली. ...वाचा सविस्तर
18:56 (IST) 11 Jun 2026

स्पेसएक्सच्या आयपीओमुळे ४,४०० कर्मचारी एका रात्रीतून कोट्यधीश!

एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’चा ऐतिहासिक आयपीओ बाजारात येण्यासाठी सज्ज झाला असून, यामुळे कंपनीचे ४,४०० हून अधिक विद्यमान आणि माजी कर्मचारी कोट्यधीश होणार आहेत. ...वाचा सविस्तर
18:13 (IST) 11 Jun 2026

नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण २०२६-२७साठी सीईटी जाहीर, उच्च शिक्षण विभाग व एसआयएसीमार्फत राज्यभरातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाची संधी

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा पूर्वपरीक्षेसाठी पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागाने घेतला आहे. ...अधिक वाचा
18:12 (IST) 11 Jun 2026

मिरा-भाईंदरचा पाणीपुरवठा शुक्रवारी १२ तास बंद; सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी ‘शटडाऊन’

या काळात स्टेम प्राधिकरणाचा पुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याने शहरात पाण्याचा तुटवडा भासणार असून नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मिरा-भाईंदर महानगरपालिकेने केले आहे. ...अधिक वाचा
18:08 (IST) 11 Jun 2026

'अधिक' मासासह एकादशीचा दुहेरी योग, संतनगरीत १ लाख भाविकांची गर्दी; दर्शनबारीत लागल्या लांबच लांब रांगा

आज गुरुवारी तर शेगावात भाविकांची ‘अधिक’च मांदियाळी जमल्याचे पाहावयास मिळाले. आज संत गजानन महाराजांचा वार म्हणजे गुरुवार आणि कमला एकादशी असा दुहेरी योग जुळून आला. ...वाचा सविस्तर
18:04 (IST) 11 Jun 2026

वसई तालुक्यातील अनधिकृत शाळांवर चाप; शिक्षण विभागाचे नागरिकांना माहिती देण्याचे जाहीर आवाहन

पालकांची आर्थिक फसवणूक आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना अशा शाळांची माहिती देण्याचे आवाहन केले असून, तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. ...अधिक वाचा
18:04 (IST) 11 Jun 2026

कोल्हापूरात आढळला दुर्मिळ डूरक्या घोणस साप; वनविभागाकडून अधिवासात मुक्तता

सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे वनविभागाच्या वन्यजीव बचाव पथकाने या बिनविषारी सापाला कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त केले आहे. ...वाचा सविस्तर
18:00 (IST) 11 Jun 2026

बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम व बीएचएमसीटी सीईटीचा निकाल जाहीर; ५ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण

यंदा परीक्षेला ८७.६६ टक्के विद्यार्थी उपस्थित होते, तर एकूण ५ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवत बाजी मारली आहे. ...सविस्तर वाचा
17:58 (IST) 11 Jun 2026

Video: कर्जमाफीच्या जीआरची होळी, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा एल्गार!

शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तीशिवाय सरसकट कर्जमाफी, प्रलंबित पीकविमा, सर्व पिकांना उत्पादन खर्चावर आधारित भाव, यां मागण्यांसाठी लवकरच राज्यात आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी सरकारला देण्यात आला. ...सविस्तर वाचा
17:42 (IST) 11 Jun 2026

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी… ‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या तिकीट दरात २५ टक्क्यांची सवलत

मुंबईतील ‘आरे - कफ परेड भुयारी मेट्रो ३’ मधून प्रवास करणाऱ्या पदवीच्या (महाविद्यालयीन) विद्यार्थ्यांना एमएमआरसीने तिकीट दरात २५ टक्क्यांची सवलत जाहीर केली आहे. ...सविस्तर वाचा
17:42 (IST) 11 Jun 2026

उत्तनमध्ये आढळला जिवंत तोफगोळा; पोलिसांच्या सतर्कते मुळे मोठी दुर्घटना टळली

मिरा-भाईंदर पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या (NSG) सतर्कतेमुळे आणि संयुक्त कारवाईमुळे हा तोफगोळा सुरक्षितपणे निकामी करण्यात आला असून, संभाव्य मोठी जीवित किंवा वित्तहानी टळली आहे. ...सविस्तर वाचा
17:26 (IST) 11 Jun 2026

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र नोंदीमधील अनियमितता प्रकरण; पोलीस तक्रारीबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल ४८ तासात सादर करावा - महापौरांचे आदेश

मुंबईतील बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पाच फौजदारी गुन्ह्यांचा (FIR) तपास कुठपर्यंत आला, याचा अहवाल पुढील ४८ तासांत सादर करण्याचे निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत. ...सविस्तर वाचा
17:18 (IST) 11 Jun 2026

नाशिक: कुंभमेळ्याच्या पहिल्याच मोठ्या सोहळ्याकडे भुजबळ, भुसेंनी फिरवली पाठ; महाजनांच्या उपस्थितीत रंगली चर्चा!

श्री गंगा गोदावरी पंचकोठी (तीर्थ) पुरोहित संघाच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामाच्या जयघोषात आणि वेद मंत्रोच्चारात हा सोहळा झाला. ...सविस्तर बातमी
17:16 (IST) 11 Jun 2026

'अजितदादा इतिहास घडवत होते…' पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत छगन भुजबळांचे मोठे विधान!

यासोबतच १९९९ मधील मुख्यमंत्रीपदाची ऑफर आणि पक्षस्थापनेच्या वेळचा अंतर्गत संघर्ष यावरही भुजबळांनी स्पष्ट भाष्य केले ...अधिक वाचा
17:16 (IST) 11 Jun 2026

श्रमजीवी संघटनेचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच ; प्रशासनाकडून मागण्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न

यामुळे डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी रात्रभर कार्यालयातच अडकून पडले होते. आंदोलनाच्या तीव्रतेची दखल घेत प्रशासनाने अखेर २१९८ जन्मदाखल्यांचे प्रत्यक्ष वाटप सुरू केले ...वाचा सविस्तर
17:02 (IST) 11 Jun 2026

ठाणे पालिका पदाधिकारी शिपाई गणवेश बदलणार, कार्यालयीन शिपाई दिसणार सफारीत

शिंदे सेनेचे गटनेते पवन कदम यांच्या सूचनेनंतर प्रशासनाकडून गणवेशाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ...वाचा सविस्तर
16:59 (IST) 11 Jun 2026

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी ‘शाळा प्रवेशोत्सव’ अभिनव उपक्रम! नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची संकल्पना

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी विविध ग्रामीण शाळांना भेटी देऊन तेथील पायाभूत सुविधांचा आढावा घेतील आणि गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन करणार आहेत. ...वाचा सविस्तर
16:58 (IST) 11 Jun 2026

दिव्यांग विभागात 'विचित्र' वेतन विसंगती; २१६० कर्मचाऱ्यांच्या नशिबी 'सरकारी वेठबिगारी'!

महाराष्ट्रातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या दिव्यांग शाळांमध्ये तब्बल २,१६० पदे अशा अल्पवेतन कर्मचाऱ्यांची आहेत. यातील बहुतांश कर्मचारी २० ते २५ वर्षांपासून या शाळांमध्ये कार्यरत आहेत. ...वाचा सविस्तर
16:53 (IST) 11 Jun 2026

सुरक्षेच्या अभावी कामगाराचा मृत्यू; केळवे रोड येथे टाकीवरून पडून ३० वर्षीय कामगाराचा दुर्दैवी अंत

कंत्राटदाराने सुरक्षा साधनं न पुरविल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ...सविस्तर वाचा
16:46 (IST) 11 Jun 2026

तुकाराम मुंढे विदर्भ-मराठवाड्याच्या दौऱ्यावर! भेसळखोर आणि तस्करांचे धाबे दणाणले; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा विदर्भ आणि मराठवाडा दौरा प्रशासनाची काटेकोर पद्धत आणि लोकांच्या आरोग्यावरील कारवाईचा आणखी कठोर संदेश देण्याचे संकेत आहे. ...अधिक वाचा
16:43 (IST) 11 Jun 2026

महिला बाल कल्याण सभापतीच्या राजीनाम्याची मागणी; सख्या दोन्ही भावाकडून अल्प वयीन मुलीवर लैगिक अत्याचार, शहरात संताप

या घटनेच्या निषेधार्थ आणि सभापतींच्या राजीनाम्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि विविध महिला संघटनांनी पालिका मुख्यालयावर तीव्र मोर्चा काढला. ...सविस्तर वाचा
16:43 (IST) 11 Jun 2026

ठाणे जिल्ह्यात २८ जूनला पल्स पोलिओ मोहिम; सुमारे दोन लाख बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट १,८७८ बूथ, १,३४७ घरभेट पथके सज्ज

लसीकरणासाठी जिल्ह्यात १,८७८ बूथ आणि १,३४७ घरभेट पथके, मोबाईल टीम्स सज्ज ...वाचा सविस्तर
16:25 (IST) 11 Jun 2026

किरीट सोमय्या वापस जाओच्या घोषणांनी दणाणली महापालिका;एमआयएम-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा…

किरीट सोमय्या हे अमरावती महापालिकेत बैठकीसाठी येत असताना एमआयएमच्या नगरसेवकांनी त्यांना जोरदार विरोध केला आणि घोषणाबाजी केली. ...सविस्तर वाचा
16:21 (IST) 11 Jun 2026

तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याचे पिल्लू आईच्या कुशीत सुरक्षित! मुरबाडमध्ये रॉ आणि वनविभागाची ७२ तासांची थरारक मोहीम यशस्वी

ड्रोन, थर्मल कॅमेरे आणि ट्रॅप कॅमेऱ्यांच्या मदतीने ही थरारक मोहीम फत्ते करण्यात आली. ...वाचा सविस्तर
16:17 (IST) 11 Jun 2026

अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणाचं उपवर्गीकरण कधी? सूचना-आक्षेपांवर सुनावणीच होईना, निर्णय लांबणीवर!

सूचना ‌व आपेक्ष सादर करण्याची मुदत संपून आता सव्वा महिन्याचा काळ लोटला आहे. परंतु अद्याप सुनावणीबाबतची तारीख स्पष्ट करण्यात आली नाही. त्यामुळे सुनावणी केव्हा घेणार, होणार की नाही, असाच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ...सविस्तर वाचा
15:56 (IST) 11 Jun 2026

तुर्भे एमआयडीसीत गांजा विक्रीच्या अड्ड्यावर छापा; तडीपार आरोपीची पत्नीसह पाच जण जेरबंद

या छाप्यात तडीपार आरोपी राहुल दांडगे याच्या पत्नीसह पाच जणांना १ किलो १४० ग्रॅम गांजासह अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी राहुल दांडगे फरार आहे. ...वाचा सविस्तर
15:55 (IST) 11 Jun 2026

अपहार प्रकरणात चौकशी करुनही गुन्हा नोंदविण्यासाठी जिल्हा परिषदेची टाळाटाळ

रस्ते व शाळा खोल्यांचे बांधकाम न करताच देयके अदा केल्याचा ठपका असून, सत्ताधारी आमदार प्रशांत बंब यांनी १३ पत्रे लिहूनही प्रशासकीय यंत्रणा सुस्त असल्याचा आरोप होत आहे. ...सविस्तर बातमी
15:55 (IST) 11 Jun 2026

किरकोळ वादातून प्लंबरचा खून; दोन्ही आरोपी जेरबंद ! नांदेडच्या सोनखेड येथील पेट्रोलपंपावरील घटना

घटनेचे गांभीर्य ओळखून नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत वेगाने चक्रे फिरवून दोन्ही फरार आरोपींना अवघ्या काही तासांत नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून अटक केली आहे. ...सविस्तर वाचा

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi | Today’s Marathi News Live Updates

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स