घोडबंदर येथील मानपाडा भागात मंगळवारी रात्री शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची त्यांच्याच कार्यालयात हत्या करण्यात आली. प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने करण्यासाठी एसआयटी स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीकडून या प्रकरणातील आरोपी, हत्येमागील कारण आणि कटाचा तपास केला जाणार आहे.

विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रियेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मनमानी कारभार केल्याच्या वृत्तानंतर देशभरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. यामुळे याविरोधात ठिकठिकाणी निषेध नोंदवला जात आहे. कॉक्रोच जनता पार्टीने उद्या मुंबईतील शिवाजी पार्क येथे जेलभरो आंदोलन पुकारले आहे. याबाबत आज सीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्याच्या कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.

तर, ४ ऑक्टोबर रोजी ठाकरे बंधूंनी आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही आंदोलनाला इतर राजकीय पक्षांकडून कसा पाठिंबा मिळतोय, हे पाहावं लागणार आहे. तसंच, ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या हत्याप्रकरणातील एफआयआरमध्ये कोणाकोणाची नावे नोंदवली जातात, याकडे सर्वांचं लक्ष आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात.

Live Updates

Mumbai Maharashtra Live News Today, 01 October 2026 : राज्यातील ताजे अपडेट्स जाणून घ्या

19:05 (IST) 1 Oct 2026

‘देशाच्या मध्यभागी सरकारच अस्तित्वात नाही’; राहुल गांधींची टीका, आदिवासींच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार…

बालाघाट जिल्ह्यातील जगला गावात विविध आजारांमुळे मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन राहुल गांधी यांनी त्यांचे सांत्वन केले. ...सविस्तर वाचा
18:58 (IST) 1 Oct 2026

बैगा आदिवासी बालमृत्यू प्रकरणाने राहुल गांधी व्यथित; पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन; बालमृत्यूचा मुद्दा संसदेत मांडणार

विविध आजारांमुळे मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे सांत्वन केले. ...सविस्तर बातमी
17:50 (IST) 1 Oct 2026

परभणी जिल्ह्यात कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत २६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर २६४ कोटी रुपये जमा

परभणी जिल्हयातील एकूण २६ हजार ६३५ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये २६४ कोटी ८५ लाख रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. ...अधिक वाचा
17:40 (IST) 1 Oct 2026

रेल्वे स्थानकांवर वर्षानुवर्षे कार्यरत एकाही पात्र कामगाराला वंचित ठेवणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांची ग्वाही

नवी मुंबई आणि रायगड परिसरातील १७ रेल्वे स्थानकांच्या देखभालीसाठी सिडकोच्या कंत्राटदारांमार्फत सुमारे ३२३ कामगार कार्यरत आहेत. ...अधिक वाचा
17:29 (IST) 1 Oct 2026

परभणी: काढणीचा खर्च परवडत नसल्याने सोयाबीनच्या उभ्या पिकावर रोटावेटर फिरवण्याची पाळी, डोळ्यादेखत शेकडो हेक्टरवरील पीक भुईसपाट

यंदा सोयाबीन काढणीलाही परवडणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी हताशपणे आपल्या उभ्या पिकावर अनेक ठिकाणी रोटावेटर फिरवल्याच्या घटना घडल्या आहेत. ...अधिक वाचा
15:59 (IST) 1 Oct 2026
"सूर्याबरोबर कोलॅबरेट करायचंय, सनस्क्रीन लावून या", उद्याच्या आंदोलनासाठी CJP ने सांगितली रुपरेषा

आता ज्ञानेश कुमारांविरोधात राजीनामा याकरता मागतोय कारण लोकांचा निवडणूक प्रक्रियेतील विश्वास उडालेला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त पदासाठी काही प्रक्रिया असली पाहिजे. अमित शाह आणि नरेंद्र मोदींनी मिळून हा आयुक्त नेमू नये. जर राजीनामा झाला नाही तर देशातील १३ कोटी लोक रस्त्यावर उतरली. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावेळी लोकांनी त्यांच्या प्रधानांचाही मागितला होता. यावेळीही तेच होईल - अभिजीत दिपके

उद्या, २ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथील गेट क्रमांक ६ येथे पहिलं आंदोलन होत आहे. त्यानंतर गोवा, बंगळुरू, कलकत्ता, पटणा, उत्तर प्रदेश आणि रांची येथे आंदोलन होईल. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी जंतर मंतर येथे आंदोलन होईल - अजिंक्य शिंदे

सर्वांनी भारतीय तिरंगा घेऊन येणे. जमलंच तर गांधींजींचे टीशर्ट लावून या. चेहऱ्याला सनस्क्रीन लावून या, कारण आपल्याला सनबरोबर (सूर्याबरोबर) कोलॅबरेट करायचं आहे. तसंच, पोटभर जेवून या, जेणेकरून आपल्याला मोठ्या ऊर्जेने आंदोलन करता येईल - मुंबई समन्वयक

https://twitter.com/Cockroachisback/status/2105600257472311313

15:51 (IST) 1 Oct 2026

"सूर्याबरोबर कोलॅबरेट करायचंय, सनस्क्रीन लावून या", उद्याच्या आंदोलनासाठी CJP ने सांगितली रुपरेषा

https://twitter.com/Cockroachisback/status/2105600257472311313

15:47 (IST) 1 Oct 2026

नवी मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई; २३ गुन्ह्यांची उकल, पाच आरोपी अटकेत

नवी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल २३ गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, सोन्याचे दागिने, रोकड, वाहने, शस्त्रे आणि अमली पदार्थ असा एकूण १८ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. साखळी चोरी, घरफोडी, दरोडा आणि अमली पदार्थांच्या गुन्ह्यांचा तपास करत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

15:06 (IST) 1 Oct 2026

वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेसमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त

वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेसमोरील रस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान, मोर्चासाठी कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही सुरू करण्यात आली आहे.

14:42 (IST) 1 Oct 2026

"गुन्हेगारांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही - उद्धव ठाकरे

आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. गुन्हेगारांना फासावर लटकवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी पुर्णेकर कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर दिली.

14:09 (IST) 1 Oct 2026

LIVE : उद्धव ठाकरेंनी घेतली प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट

ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या हत्याप्रकरणी ठाण्यातीलकाही स्थानिक राजकीय नेत्यांची नावे समोर येत आहेत. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने केली आहे. दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

13:50 (IST) 1 Oct 2026

४ तारखेच्या मोर्चात पक्षाचा झेंडा न घेता पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार - शशिकांत शिंदे

महाविकास आघाडीची बैठक झाली. त्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बोलणे झाले आहे. शरद पवारांनी आम्हाला मोर्चात सहभागी होण्याची सूचना दिली आहे. आज त्याच अनुषंगाने मी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. जे जे मोर्चे निघतील, त्या सर्व मोर्चांमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. ४ तारखेच्या मोर्चात पक्षाचा झेंडा न घेता पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होतील - शशिकांत शिंदे

- ५ तारखेला राज्यभर दुष्काळाच्या अनुषंगाने आम्ही निवेदने देणार आहोत.

- मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने जी आश्वासने देण्यात आली होती, ती पूर्ण होत नाहीत. मनोज जरांगे यांनीदेखील सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.

13:14 (IST) 1 Oct 2026

"मीरा भाईंदर जैनांची नगरी, मिनी राजस्थान", भाजपा आमदार नरेंद्र मेहतांचं विधान चर्चेत; मनसेचंही प्रत्युत्तर

Narendra Mehta Mira Bhayander statement : मीरा भाईंदर शहर ही जैनांची नगरी आणि मिनी राजस्थान आहे, असे वादग्रस्त विधान भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केले आहे. ...सविस्तर बातमी
13:10 (IST) 1 Oct 2026

मुंबईच्या सुपुत्राचं एकनाथ शिंदेंकडून कौतुक, पोस्ट करत म्हणाले...

मुंबईचा सुपुत्र कॅप्टन स्मित मच्छार यांनी अत्यंत कठीण आणि जीवघेण्या प्रसंगात दाखवलेल्या अदम्य साहस, धैर्याला आणि विलक्षण प्रसंगावधानाला सलाम. दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानप्रवासादरम्यान घडलेल्या या गंभीर प्रसंगात स्मित स्वतः गंभीर जखमी झाले होते. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी न डगमगता दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान आणि समयसूचकता निश्चितच असामान्य आहे. त्यांच्या धाडसी कृतीमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविण्यात मोलाची मदत झाली. संकटाच्या त्या क्षणी सर्व प्रवाशांनीही एकजुटीने आणि तत्परतेने परिस्थिती हाताळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मनापासून सलाम. कठीण प्रसंगात एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची ही भावना खरोखरच प्रेरणादायी आहे. कॅप्टन स्मित, आपल्या शौर्याला मनापासून सलाम. आपण लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावे आणि उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आपले धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि प्रसंगावधान लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला आपला अभिमान आहे - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

https://twitter.com/mieknathshinde/status/2105550123472142738

13:03 (IST) 1 Oct 2026

Video: बायकोशी भांडण झालं अन् राग काढला दुरांतो एक्स्प्रेसवर, 'त्या' दगडफेकीमागचं खरं कारण आलं समोर!

नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसवर बोरखेडी रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दगडफेकीमागचे कारण समोर आले आहे. ...वाचा सविस्तर
12:40 (IST) 1 Oct 2026

रीलस्टार दिव्या शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे कटक मंडळातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या वानवडीतील घरात शिरुन दिव्या शिंदे आणि साथीदारांनी मारहाण केली होती. ...सविस्तर बातमी
12:33 (IST) 1 Oct 2026

इथेनॉल निर्मिती क्षमतेत देशात कोण अव्वल? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश की कर्नाटक; आकडे काय सांगतात?

पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या निर्मिती क्षमतेत देशात कोणत्या राज्याने आघाडी घेतली आहे? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधील आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. ...सविस्तर वाचा
12:32 (IST) 1 Oct 2026

पोटगीची थकबाकी भरल्यानंतर पतीची घटस्फोट याचिका पुनर्स्थापित; कौटुंबिक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

पाेटगीची संपूर्ण थकबाकी भरल्यानंतर पतीची फेटाळलेली घटस्फोटाची याचिका पुनर्स्थापित करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. एन. रुकमे यांनी दिला. ...सविस्तर वाचा
12:25 (IST) 1 Oct 2026

World University Ranking 2027: 'टाइम्स हायर एज्युकेशन'ची २०२७ची जागतिक क्रमवारी जाहीर, देशातील तीन विद्यापीठे जगातील पहिल्या ५०० विद्यापीठांमध्ये

जागतिक स्तरावर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या टाइम्स हायर एज्युकेशनतर्फे २०२७साठीची जागतिक विद्यापीठ क्रमवारी जाहीर करण्यात आली. ...सविस्तर वाचा
12:19 (IST) 1 Oct 2026

महापौरांच्या गाडीमुळे वाहतूक कोंडीचा त्रास; भाजप कार्यालयाबाहेर रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे नागरिक त्रस्त

मिरा रोड येथील भाजपच्या नव्या पक्ष कार्यालयाबाहेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ...सविस्तर बातमी
12:19 (IST) 1 Oct 2026

पाणीपुरवठ्यासाठी टँकर खरेदी, पनवेल महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव

महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाईवर तात्पुरता उपाय म्हणून महापालिका टँकर खरेदी करण्याच्या तयारीत आहे. ...सविस्तर वाचा
12:19 (IST) 1 Oct 2026

विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यांना उद्घाटनाची प्रतीक्षा; शहरांतून येणाऱ्या वाहतुकीला नवा पर्याय

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी आणि मालवाहतूक व्यवस्थेला जोडणाऱ्या प्रमुख पुलांचे आणि रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून सिग्नल यंत्रणाही सज्ज आहे. ...अधिक वाचा
11:37 (IST) 1 Oct 2026

National Cadet Corps : राज्य सरकारच्या उदासिनतेचा ‘एनसीसी’ला फटका! नेमके झाले काय?

राज्यात 'विकसित भारत २०४७' चा नारा दिला जात असतानाच राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) सुमारे दीड लाख छात्रांच्या लष्करी व तंत्रज्ञान प्रशिक्षणाला राज्य सरकारच्या उदासीनतेचा फटका बसत आहे. ...सविस्तर वाचा
11:24 (IST) 1 Oct 2026

"मुंबईचा सुपुत्र कॅप्टन स्मित मच्छरचा प्रचंड अभिमान", देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

सॅल्यूट! आपल्या मुंबईचा सुपुत्र कॅप्टन स्मित मच्छर याचा मला प्रचंड अभिमान आहे, जो एक खराखुरा हिरो आहे. त्याने अत्यंत विलक्षण आणि असाधारण कामगिरी करत शेकडो लोकांचे प्राण वाचवले! दुबई ते तेल अवीव या विमानातील प्रवासादरम्यान स्वतः गंभीर जखमी झालेला असतानाही, स्मितने दाखवलेले समयसुचकता आणि धाडस हे अत्यंत अनुकरणीय आहे. मी त्या सर्व प्रवाशांनाही सलाम करतो ज्यांनी या कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी आणि सुरक्षितपणे पार पडण्यासाठी तातडीने एक संघ म्हणून एकत्र काम केले. स्मितला लवकरात लवकर बरे वाटू दे आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच सदिच्छा! तू एक प्रेरणास्थान आहेस. महाराष्ट्राला आणि भारताला तुझा अभिमान आहे! - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/2105522530383745200

11:11 (IST) 1 Oct 2026

"मीरा भाईंदर जैनांची नगरी, मिनी राजस्थान", भाजपा आमदार नरेंद्र मेहतांचं विधान चर्चेत

मी अशा नगरीतून येतो जिथं मिनी राजस्थान, जैनांची नगरीही म्हटलं जातं. आपल्याकडे ३३ पेक्षाही जास्त जैनालय आहेत. माझं भाग्य आहे की माझा जन्म जैन कुळात झाला. मीरा भाईंदरमध्ये जेव्हा जेव्हा जैनांचा विषय येतो तेव्हा आम्ही ताकदीने उभे राहतो - नरेंद्र मेहता

Maharashtra Breaking News Live

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स

Mumbai Maharashtra Live News Today, 01 October 2026 : राज्यातील ताजे अपडेट्स जाणून घ्या