Maharashtra Mahanagar Palika Election 2026 Live Updates : मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. १३ तारखेला म्हणजेच आज (मंगळवारी) प्रचाराच्या तोफा थंडावतील. १५ जानेवारीला निवडणूक पार पडणार आहे, तर १६ जानेवारीला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालामध्ये नेमकं काय होतं याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा रविवारी पार पडली. तर काल (सोमवार) शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची सभा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधुंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. दरम्यान, राज्य निवडणूक आयुक्तांची आज चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. जिल्हा परिषद निवडणूकांबाबत महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या घडामोडी व इतर बातम्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Marathi News Live Today

20:08 (IST) 13 Jan 2026

Election Commission : प्रचार संपला, तरीही उमेदवारांना प्रचार करता येणार? निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणाले, "माईकवर नको, पण घरोघरी…"

यावेळी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी २०१२ च्या एका आदेशाचा दाखला देत तो आदेशच वाचून दाखवला. ...सविस्तर वाचा
19:03 (IST) 13 Jan 2026

कोकण रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांची धरपकड; एका वर्षात ३.६८ लाख विनातिकीट प्रवाशांना पकडून २०.२७ कोटींची दंडवसुली

कोकण रेल्वेने डिसेंबर २०२५ दरम्यान ९९८ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. ज्यामध्ये ४३,८९६ अनधिकृत आणि अनियमित प्रवासी आढळले. या प्रवाशांकडून रेल्वेचे देय भाडे आणि दंडापोटी २.४५ कोटी रुपये वसूल करण्यात आले. ...सविस्तर बातमी
18:33 (IST) 13 Jan 2026

Malegaon Election : महापालिका निवडणुकीसाठी पोलिसांची सज्जता ! ८३ गुन्हेगार मालेगावातून तडीपार

८ वर्षांनी होणारी ही निवडणूक विविध पक्ष व नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे. संवेदनशील मालेगावात निवडणूक शांततेत पार पाडणे,ही पोलिसांच्या दृष्टीने नेहमीच आव्हानात्मक बाब असते. ...सविस्तर बातमी
18:00 (IST) 13 Jan 2026

रायगडमध्ये जिल्हा परिषद निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाशी युती नाही, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे स्पष्ट संकेत

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युती असा सामना पहायला मिळण्याची शक्यता आहे. ...सविस्तर वाचा
17:48 (IST) 13 Jan 2026

Girish Mahajan : "जळगाव महापालिकेत ‘इतक्या’ जागांवर महायुतीला फटका…", मंत्री गिरीश महाजन यांची कबुली

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत विशेषतः सत्ताधारी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना प्रतिस्पर्धी पक्षांपेक्षा आपल्याच पक्षातील नाराज आणि बंडखोर उमेदवारांचा अधिक धसका घ्यावा लागत आहे. ...अधिक वाचा
17:19 (IST) 13 Jan 2026

लक्षवेधी लढत : प्रभादेवीत प्रभाग १९४ मध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हाय-व्होल्टेज सामना

प्रभादेवीचा परिसर हा एकेकाळच्या एकसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर होणारी मुंबई महापालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. ...सविस्तर वाचा
17:19 (IST) 13 Jan 2026

मेट्रो ३ : तीन महिन्यात १ कोटी २९ लाख प्रवाशांचा प्रवास, पूर्ण क्षमेतने मेट्रो धावू लागल्यानंतर प्रवासी संख्या दुप्पट

मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गिकेचे बांधकाम मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) करण्यात आले आहे. या मार्गिकेचे संचलन-देखभालीची जबाबदारीही एमएमआरसीवर आहे. ...सविस्तर वाचा
16:48 (IST) 13 Jan 2026

कोणत्या जिल्हा परिषदांची निवडणूक होणार?

कोकण विभाग : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे विभाग : सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
मराठवाडा विभाग : छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर

16:43 (IST) 13 Jan 2026

‘मतदाराला दोन मतं देणं बंधनकारक’

जिल्हा परिषदांच्या या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मत देणे बंधनकारक आहे. त्यातील एक मत जिल्हा परिषदेसाठी आणि एक मत पंचायत समिती गणासाठी द्यावं लागेल. तसेच या निवडणुकीसाठी नामनिर्देश प्रतिक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

16:39 (IST) 13 Jan 2026

पंचायत समिती निवडणूक

१२५ पंचायत समितींमध्ये निवडणूक होणार आहे. त्यातून एकूण १४६२ सदस्य निवडून येतील. त्यापैकी ७३१ जागा महिलांसाठी, १६६ जागा अनुसूचित जाती, ३८ जागा अनुसूचित जमाती व ३४२ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत.

16:37 (IST) 13 Jan 2026

जिल्हा परिषद निवडणूक

१२ जिल्हा परिषद निवडणुकीतून एकूण ७३१ जिल्हा परिषद सदस्य निवडून येतील. त्यापैकी ३६९ जागा महिलांसाठी, ८३ जागा अनुसूचित जाती, २५ जागा अनुसूचित जमाती व १९१ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत.

16:32 (IST) 13 Jan 2026
निवडणूक खर्च मर्यादा

७१ ते ७५ निवडणूक विभाग असलेल्या -

जिल्हा परिषद खर्च मर्यादा - ९ लाख

पंचायत समिती खर्च मर्यादा - ६ लाख

६१ ते ७० निवडणूक विभाग असलेल्या -

जिल्हा परिषद खर्च मर्यादा - ७.५० लाख

पंचायत समिती खर्च मर्यादा -५.२५ लाख

५० ते ६० निवडणूक विभाग असलेल्या -

जिल्हा परिषद खर्च मर्यादा - ६ लाख

पंचायत समिती खर्च मर्यादा - ४.५ लाख

16:26 (IST) 13 Jan 2026
जिल्हा परिषद निवडणूक, २०२६ कार्यक्रम जाहीर

नोटिफिकेशन - १६ जानेवारी

अर्ज - १६ जानेवारी ते २१ जानेवारी

अर्जाची छाननी - २२ जानेवारी

अर्ज माघारी - २७ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत

अंतिम यादी व चिन्ह वाटप - २७ जानेवारी दुपारी ३.३० नंतर

मतदान - ५ फेब्रुवारी

मतमोजणी - ७ फेब्रुवारी - सकाळी १० वाजेपासून

16:25 (IST) 13 Jan 2026

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी वापरली जाणार

16:25 (IST) 13 Jan 2026

कुलगुरूंकडून प्रसिद्ध हिंदी साहित्यिकाचा अपमान; चक्क व्यासपीठावरूनच खाली उतरवले…

साहित्य अकादमी, नवी दिल्ली आणि गुरू घासीदास केंद्रीय विद्यापीठातील हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘समकालीन हिंदी कथाकथन : बदलत्या जीवनाचे संदर्भ’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ...सविस्तर वाचा
16:24 (IST) 13 Jan 2026

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी एकूण मतदान केंद्र - २५४८२

16:21 (IST) 13 Jan 2026
राज्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीमध्ये निवडणुका होणार

कोकण विभाग

रायगड

रत्नागिरी

सिंधुदुर्ग

पुणे विभाग

पुणे

सातारा

सांगली

कोल्हापूर

सोलापूर

छत्रपती संभाजीनगर विभाग

छत्रपती संभाजीनगर

परभणी

धाराशिव

लातूर

16:11 (IST) 13 Jan 2026

धोकादायक इ-बाइक टॅक्सी सेवेचा निषेध! मुंबईतील बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात 'इंडियन गिग वर्कर्स फ्रंट'ने रणशिंग फुंकले

मुंबईसारख्या अतिगर्दीच्या, अपघातप्रवण आणि अरुंद रस्त्यांच्या शहरात बाइक टॅक्सी चालविणे ही केवळ धोरणात्मक चूक नसून थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे ...वाचा सविस्तर
15:53 (IST) 13 Jan 2026

Devendra Fadnavis Nagpur Rally : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री झाले दुचाकीस्वार

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपुरात रॅली, रोड शोची स्पर्धा लागली असुून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुचाकीवर स्वार होऊन नागपूरकरांसोबत संवाद साधला. ...सविस्तर वाचा
15:44 (IST) 13 Jan 2026

Panvel development plan : ‘व्हिजन २०३०’द्वारे स्मार्ट पनवेलचा रोडमॅप

“स्मार्ट पनवेल” हा नारा देत त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी विकासाचा सविस्तर आराखडा नागरिकांसमोर मांडला.पनवेलचे पर्यावरण, उद्योग आणि कनेक्टिव्हिटीचा संगम जपत आधुनिक स्मार्ट सिटी उभारण्याचा निर्धार ठाकूर यांनी व्यक्त केला. ...सविस्तर वाचा
15:31 (IST) 13 Jan 2026

​Nashik BJP-SHIVSENA Clash : ​नाशिक महापालिकेत भाजप-शिवसेनेत ठिणगी! 'एमडी' ड्रग्ज आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप; महाजनांचा तिदमेंवर थेट हल्ला

तिदमे हे बांधकाम व्यावसायिकांना ब्लॅकमेल करतात, असे आरोप करताना महाजन यांनी जाहीर सभेत चित्रफीत, छायाचित्र सादर करीत शिवसेना शिंदे गटाला हादरा दिला. ...सविस्तर वाचा
15:28 (IST) 13 Jan 2026

Manmad Railway Station : मनमाड, नांदगाव रेल्वे स्थानकात प्रवाशांना मिळणार अधिक सुविधा

नाशिक, मनमाड विभागात ट्रेन क्रमांक ११११३ च्या फुटप्लेटची निरीक्षणाद्वारे पाहणी केली. या दरम्यान लोको पायलट आणि सहायक लोको पायलट यांची वाहन चालन पद्धती, सिग्नल पालन तसेच कर्मचाऱ्यांची सतर्कता यांचा आढावा घेण्यात आला. ...सविस्तर बातमी
15:23 (IST) 13 Jan 2026

'नॅशनल क्रश' गिरीजा ओक ''नागपूर माझे माहेर' असे का म्हणाली, तिचा आणि नागपूरचा संबंध माहिती आहे का ?

‘चना पोहा विथ नितीनजी’ या कार्यक्रमात अभिनेत्री गिरिजा ओक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी स्वतःच्याही नागपूरसोबतच्या नात्याचा आणि आठवणींचा उलगडा केला. ...अधिक वाचा
15:20 (IST) 13 Jan 2026

मुबंईत हवा प्रदूषणात वाढ; ‘या’ भागातील हवा सर्वाधिक प्रदूषित; वाढते प्रदूषण आरोग्यास हानिकारक का ?

शहरातील हवा प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने प्रशासन पातळीवर विविध प्रयत्न केले जात असले तरीही दिवसेंदिवस हवा प्रदूषणात वाढ होताना दिसत आहे. ‘ ...अधिक वाचा
15:09 (IST) 13 Jan 2026

मिरा भाईंदरमध्ये निवडणूक कामकाजाला दांडी; ११३ शिक्षकांवर गुन्हा दाखल

मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, शहरातील ९५८ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. ...वाचा सविस्तर
15:05 (IST) 13 Jan 2026

सिकलसेल तपासणीसाठी 'अरुणोदय' विशेष मोहीम

सिकलसेल आजार हा अनुवंशिक असून आई-वडिलांपासून अपत्यांना होतो. सिकलसेल रक्तपेशीशी संबंधित आजार आहे. सामान्य रक्तपेशी या वर्तुळाकार व लवचिक असतात; तर सिकलसेल रक्तपेशी या विळ्याच्या आकाराच्या व ताठर असतात. ...अधिक वाचा
14:56 (IST) 13 Jan 2026

दक्षिण नागपूरमध्ये प्रभागागणिक चुरस, बंडखोरीमुळे समीकरणे बदलणार

दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे एकूण आठ प्रभाग असून क्रमांक १७, २८, २९, ३०, ३१, ३२, ३३ आणि ३४ या प्रभागांतून २५ नगरसेवक निवडले जातात. यापैकी प्रभाग क्रमांक ३०, ३१ आणि ३२ हे पूर्णतः दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात येतात. ...सविस्तर वाचा
14:43 (IST) 13 Jan 2026

Nagpur election campaign: महापालिका निवडणूक… दुचाकीच्या रॅलीतून हेल्मेट गायब… मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या शहरातच…

नागपूर महापालिका निवडणूक जिंगण्यासाठी भाजप व काँग्रेस पक्षासह अपक्ष उमेदवारांनी पूर्ण ताकद पनाला लावली आहे. सदर निवडणूकीत मंगळवारी (१३ जानेवारी) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. ...वाचा सविस्तर
14:34 (IST) 13 Jan 2026

बिबट्याच्या भीतीने बालपण घरात कैद; मुलांना शाळेत पाठवण्यास पालकांचा नकार, अंगणवाड्या, शिकवणी वर्ग ओस

तिरोडा तालुक्यातील खडकी, डोंगरगाव, निमगाव, बुचाटोला, रुस्तमपूर ही सर्व गावे घनदाट जंगलाच्या सान्निध्यात वसलेली असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर नेहमीच असतो. ...सविस्तर बातमी
14:29 (IST) 13 Jan 2026

महापालिकेचे बनावट शिक्के तयार करून प्रभागात पट्टे वाटप, भाजप उमेदवार कासनगोट्टूवार यांचा प्रताप

काँग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पोलीस अधीक्षक तथा महापालिका आयुक्तांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. ...अधिक वाचा

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स