Latest Marathi News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रकरण त्यांच्याकडून चांगलेच लावून धरण्यात आले आहे. तर दुसरीकडे इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेतील देशांमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकून पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी कंपनीत रविवारी झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या १८ वरून वाढत १९ वर झाली आहे. पोलिसांनी एस.बी.एल. एनर्जी कंपनीचा मालक संजय चौधरी, आलोक चौधरीसह, छत्तीसगड येथील संचालक रवी कामरा, राकेश तिवारी आणि अन्य अशा एकूण २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील अपडेट्सकडेही आपले लक्ष असणार आहे.
Ajit Pawar Plane Accident: अजित पवार विमान अपघात; रोहित पवार बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेणार
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमदार रोहित पवार यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.रोहित पवार यांनी एक्सवरुन याबाबत माहिती दिली आहे.
https://twitter.com/RohitPawarOffic/status/2028825912545100282?s=20
धुळवडीला सामिष खवय्यांचा हिरमोड; चंद्र ग्रहणामुळे मटण, मासळी, चिकनच्या मागणीत घट
Pune Police: आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ
राऊळगाव स्फोट: हाडामांसाचा चिखल अन् होरपळलेले शरीर… प्रत्यक्षदर्शी अर्चना मडके यांनी पाहिले मृत्यूचे भयाण तांडव
Video: कळव्यात गौतमी पाटीलची हजेरी, ठाणे शहरात धुळवडीचा उत्साह
इराण - इस्त्रायल युद्धामुळे विमान प्रवासी बेहाल, तीन दिवसांत ३५० पेक्षा अधिक विमानांना फटका
सफाई कामगारांच्या घरांची आश्रय योजना : फोर्टमधील प्रकल्पाला अखेर बीपीटीची मंजुरी
दुबईत अडकलेल्या यवतमाळकरांसाठी विशेष विमान; ३९९ प्रवाशांसह बंगलोरकडे करणार उड्डाण
यवतमाळ : अमेरिका आणि इराणमधील युद्धस्थितीमुळे विमानसेवा ठप्प झाल्याने दुबईत अडकलेल्या यवतमाळसह अनेक राज्यातील नागरिकांसाठी सरकारच्या मदतीने दुबई एमिरेट्स एअरलाईनचे विशेष विमान बंगलोरकडे रवाना होणार आहे. दुबईहून बंगलोरला येणाऱ्या या विमानात एकूण ३९९ प्रवासी असणार असून त्यामध्ये यवतमाळ येथील राजीव निलावार, सतीश बनगिनवार, राजू लोहाना, शाम पाटील, निखील जिरापूरे, जलाल गिलानी आदींचा समावेश आहे.
हैदराबाद येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा प्रशिक्षणादरम्यान डोंबिवलीतील जवानाचा मृत्यू
एकनाथ शिंदेंनी यंदा धुळवड साजरी केलीच नाही, त्यामागचे कारण त्यांनीच केले स्पष्ट
धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्याला न्या . मिळाला म्हणून कोणीही इतरांना हिणवू नये असे म्हटले आहे. ...सविस्तर वाचा
दुर्घटनाग्रस्त विमानाचा पायलट जिवंत? अमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ, अजित पवारांच्या मृत्यूभोवतीचं गूढ वाढलं!
ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्यावर गुन्हा, महाराजांचा अवमान केल्याचा आरोप
कल्याणच्या आधारवाडी तुरूंगातील दोन पोलीस लाच घेताना ‘एसीबी’च्या सापळ्यात
डोंबिवली ते ठाणे माणकोली पूलमार्गे बस सेवा बुधवारपासून, जीवघेण्या गर्दीच्या लोकल प्रवासाला आता नवा पर्याय
बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी टिटवाळ्यात सक्षम साहाय्यक आयुक्त नियुक्त करा; ठाकरे गटाचे नगरसेवक राहुल कोट यांची आयुक्तांकडे मागणी
ठाण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, अभिनेत्री अटकेत, मॉडेल्सची सुटका
कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात मोबाईलच्या अतिवापराचे होळीत दहन
कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात मोबाईलच्या अतिवापराचे होळीत दहन
ऐन होळीत कोकण रेल्वेचे वेळापत्रक साफ कोलमडले, शिंदे सेनेचा खासदार संतापला, केली चौकशीची मागणी
अपघात मुक्त प्रवास हेच भविष्यात उद्दिष्ट ठेवा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रशासनाला सूचना
दुबईत अडकलेल्या १६४ मराठी बांधवांना मायदेशी आणण्यासाठी एकनाथ शिंदेंचे 'ऑपरेशन सुरक्षित प्रवास'
पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टेडीजचे ८४ विद्यार्थी सहलीसाठी दुबईला गेले होते. मात्र तिथे अडकून पडल्यामुळे त्यांनी मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. आता हे विद्यार्थी हॉटेलमधून विशेष बसने दुबई विमानतळाकडे रवाना झाले आहेत. त्यांनी दुबई सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
कराडमधील २१ जण दुबईत अडकले; स्फोटानंतर भीतीचं वातावरण
कराडमधील एका विमा कंपनीतील २जण दुबईमध्ये अडकून पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विमा अधिकारी पी. व्ही. जाधव यांच्यासह हे सर्व जण सहलीसाठी दुबईला गेले होते. मात्र ते ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते, त्या हॉटेलच्या शेजारी स्फोट झाल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर संबंधित हॉटेलमधून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. हॉटेल परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
आखाती देशांत संभाव्य युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. संबंधित भागात वास्तव्यास असलेल्या किंवा पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आवाहन केले आहे की, इराण किंवा इराक येथे असलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत अथवा अन्य माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
आखाती युद्धाची धग जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता नवी मुंबईपर्यंत पोहोचला असून जेएनपीए बंदरातील निर्यात व्यवहारावर मोठा परिणाम झाल्याची माहिती समोर येत आहे.
आखाती देशांकडे पाठविण्यासाठी तयार ठेवलेले कांदा, केळी, द्राक्षे तसेच इतर फळफळावळ यांचे सुमारे एक हजार मालधारक धातूचे पेटारे बंदरात अडकून पडले आहेत. कृषी मालाच्या आयात-निर्यातीवर थेट सुमारे साठ टक्के परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी वाहतुकीत मोठी अनिश्चितता निर्माण झाली असून काही जहाजवाहतूक कंपन्यांनी आखाती देशांकडे माल पाठवण्यास नकार दिल्याची माहिती आहे. काही मालवाहू जहाजांना माघारी फिरण्याचे आदेश देण्यात आल्याचेही समजते. या बंदरातून दर आठवड्याला सुमारे चोपन्न मालवाहू जहाजांची ये-जा होत असते.
राज्य सरकार आखाती देशात अडकलेल्या नागरिकांच्या संपर्कात; गरजूंसाठी जारी केला व्हॉटसॲप क्रमांक
"आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार सुद्धा सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारला करीत आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. व्हॉटसॲप क्रमांक : +97150 365 4357" अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
