Mumbai Maharashtra News Updates, 15 September 2026 : दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात एफआयआरमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव आल्याचा दावा सतिश सालियन यांनी केला आहे. काल (१४ सप्टेंबर) १६ पानांच्या एफआयआरमधील एक पान माध्यमांमध्ये व्हायरल झालं. त्यामुळे आदित्य ठाकरे अडचणीत आले आहेत. दरम्यान, या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा कोणताही संबंध नाही, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे. तर, दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मुंबईतील आंदोलनाबाबत ठाम असून त्यांनी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. तसंच, अमित शाहांनी केलेल्या एका वक्तव्याचे पडसादही आता उमटू लागले आहेत. महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे, असं त्यांनी विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates
18:11 (IST) 15 Sep 2026

शिवसेना कोणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा सुनावणी होणार

सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह कोणाचं? यावर सुनावणी पार पडली. आज शिंदे यांच्या शिवसेनेच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. त्यानंतर आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली असून आता १६ सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.

18:07 (IST) 15 Sep 2026

मुंबई शेअर बाजारात हाहाकार! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले; तुमचे किती नुकसान झाले?

Share Market Crash Today Wiped Out 9 Lakh Crores: जागतिक सरकारी रोख्यांवरील परताव्यात झालेली वाढ, तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक अनिश्चिततेच्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. यामुळे सकाळी नफ्यात असलेला भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. दिवसभरातील ७५,४३६ या उच्चांकी पातळीवरून सेन्सेक्समध्ये जवळपास १,४३० अंशांची घसरण झाली, तर निफ्टी ५० निर्देशांक २३,१५० च्या पातळीच्या खाली घसरला.

सविस्तर वाचा

17:09 (IST) 15 Sep 2026

मनोज जरांगेंबाबत प्रश्न विचारताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर, “१४ पैकी १२ मागण्या मान्य केल्या आहेत, तरीही…”

मरण आलं तरी चालेल पण मी शरण जाणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. मनोज जरांगे आज एकटेच मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आज ते मुंबई पोलिसांकडून आंदोलनाच्या संमतीसाठी तिसरा अर्ज करणार आहेत. दरम्यान, त्यांनी मराठा बांधवांना मुंबईत न येण्याचं आवाहन केलं आहे. परंतु, तरीही अनेक मराठा बांधव मुंबईच्या दिशेने येत आहेत. मला मारण्यासाठी सरकारचं षडयंत्र सुरू आहे, असंही जरांगे म्हणाले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर वाचा

16:18 (IST) 15 Sep 2026

शिवसेना कोणाची? आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली

सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह कोणाचं? यावर सुनावणी पार पडली. आज शिंदे यांच्या शिवसेनेच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. वकील नीरज कौल यांनी वेगवेगळ्या घटनांचा दाखला देत संपूर्ण राजकीय पक्षाचा विचार केला पाहिजे. विधिमंडळ पक्षात पडलेल्या फुटीच्या पलीकडे जाऊन विचार करण गरजेचं आहे असल्याचं सांगत आणखी महत्वाचा युक्तिवाद केला आहे. दरम्यान, आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली असून आता उद्या (१६ सप्टेंबर) पुन्हा सुनावणी होणार आहे.

16:11 (IST) 15 Sep 2026

शिवसेना कोणाची? शिंदे सेनेच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?

शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह कोणाचं? यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आज सर्वोच्च न्यायालयात शिंदे यांच्या शिवसेनेच्या वकिलांनी युक्तिवाद केला. वकील नीरज कौल यांनी आज वेगवेगळ्या घटनांचा दाखला दिला. यावेळी कौल यांनी म्हटलं की, संपूर्ण राजकीय पक्षाचा विचार केला पाहिजे. विधिमंडळ पक्षात पडलेल्या फुटीच्या पलीकडे जाऊन विचार करण गरजेचं आहे.

https://twitter.com/LiveLawIndia/status/2099799526169334011

16:06 (IST) 15 Sep 2026

शिंदेंच्या वकिलांनी अर्जुन सिंग यांच्या केसचा दाखला दिला

शिवसेना कोणाची? शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह कोणाचं? या मुद्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वकिलांनी युक्तिवाद केला आहे. वकील नीरज कौल यांनी या सुनावणी दरम्यान अर्जुन सिंग यांच्या केसचा दाखला दिला आहे.

16:00 (IST) 15 Sep 2026

शिवसेना कोणाची? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू,

शिवसेना कोणाची? शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह कोणाचं? राज्यात झालेलं सत्तांतर योग्य की अयोग्य? बंडखोरी करणारे आमदार पात्र की अपात्र? राज्यपालांनी घेतलेला निर्णय कायदेशीर की बेकायदेशीर अशा अनेक मुद्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वकील युक्तिवाद करत आहेत.

15:50 (IST) 15 Sep 2026

"टीका करताना कुणीही राजकीय भूमिका घेऊ नये", उपमुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य; जरांगेंच्या मुंबई मोर्चाबाबत म्हणाले…

मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ...सविस्तर वाचा
15:22 (IST) 15 Sep 2026

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा, एनसीएमसी कार्ड सक्तीला ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

अनेक तांत्रिक अडचणी, अनेकांची रखडलेली नोंदणी यामुळे एनसीएमसी अनिवार्य करण्याच्या निर्णयास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...अधिक वाचा
15:10 (IST) 15 Sep 2026

ठाण्यात विसर्जनानंतर गणेशमूर्तींचे छायाचित्रण केल्यास कारवाई; ठाणे पोलिसांचे आदेश

गणेश विसर्जनाच्या काळात धार्मिक भावना आणि सार्वजनिक शांतता अबाधित राहावी, तसेच विसर्जनानंतरच्या दृश्यांचा गैरवापर होऊ नये, या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. ...वाचा सविस्तर
14:55 (IST) 15 Sep 2026

वाहतूक कोंडी समस्येवर गर्दी शुल्काची मात्रा, खासगी पॉडकास्टमधून महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा मानस

मुंबईतील वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी, विशेषतः गर्दीच्या वेळी, खासगी वाहनांवर गर्दी शुल्क लागू करावे की नाही, यावर राजकारणी, वाहतूक तज्ज्ञ आणि प्रवासी यांच्या विविध गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. ...वाचा सविस्तर
14:12 (IST) 15 Sep 2026

मोदकापासून मसाले भातापर्यंत... गणेश चतुर्थीनिमित्त मुंबई, दिल्ली एअर इंडिया लाउंजमध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांनी मेजवानी

पारंपरिक चवीसह गुलकंद, केशर, ऑरेंज चॉकलेट बटरस्कॉच, शुगर-फ्री खजूर व ड्रायफ्रूट, नाचणी व बेरी चीजकेक फ्लेव्हर्सचे आधुनिक मोदकही ठेवण्यात आले आहेत. मुंबई लाउंजमध्ये कोल्हापुरी चिकन बिर्याणी, मालवणी फिश करी व मिसळ पाव यांसारख्या पदार्थांसह महाराष्ट्रीयन बफे उपलब्ध आहे. ...सविस्तर बातमी
13:34 (IST) 15 Sep 2026

टिळकांच्या आधी 'या' संतांनी रोवली सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ ! इतिहास लेखक, अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे यांच्या संशोधनातून नवा उलगडा

हा उत्सव नेमका कधी सुरू झाला, याचा निश्चित काळ ठरवणे थोडे अवघड असले तरी, तत्कालीन पत्रांच्या आधारे कौस्तुभ कस्तुरे यांनी याचा एक कालखंड निश्चित केला आहे. ...अधिक वाचा
13:21 (IST) 15 Sep 2026

विविध मागण्यांसाठी तलाठी संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नाशिक जिल्हा तलाठी संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर प्रांत अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आणि दडपशाही थांबवावी, अन्यायकारक निलंबन आणि फेरफार कारवाई मागे घ्यावी, तसेच निलंबित ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांवरील बेकायदेशीर निलंबन व शास्तीची कारवाई रद्द करावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

12:50 (IST) 15 Sep 2026

आज गणपती विसर्जन! ठाण्यात १३२ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था; कुठे आहे सुविधा? जाणून घ्या

गणेशोत्सवादरम्यान गणेशमूर्तींचे विसर्जन सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, यासाठी ठाणे महानगरपालिकेने शहरातील विविध प्रभाग समित्यांमध्ये व्यापक पूर्वतयारी केली आहे. ...वाचा सविस्तर
12:36 (IST) 15 Sep 2026

इथे गणराया चालवतोय सायकल ! बदलापुरात देखाव्यातून शाश्वत आणि स्वावलंबी जीवनाचा संदेश

परावलंबित्वावर मात करण्यासाठी स्वतःच्या ताकदीवर चालणारी सायकल हाच खरा स्वावलंबी आणि आरोग्यदायी पर्याय असल्याचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. या देखाव्यामध्ये केवळ बाप्पाच नव्हे, तर त्यांचे वाहन असलेले मूषकराजही विविध प्रकारची कामे करत स्वावलंबनाचा आदर्श घालून देत आहेत. ...अधिक वाचा
12:29 (IST) 15 Sep 2026

ठाण्याच्या जांभळी नाक्याचा ४० वर्षांचा प्रश्न सुटणार; पूर रोखण्यासाठी पर्जन्यवाहिनीच्या कामाला लवकरच सुरुवात

एकेकाळी तब्बल १० फूट खोल असलेली जांभळी नाका ते पेढ्या मारुती मंदिर ते क्रिक रोडपर्यंतची पर्जन्यवाहिनी जांभळी नाक्याजवळ अवघी दीड फूटांवर आली आहे. - नगरसेविका नम्रता कोळी ...वाचा सविस्तर
12:20 (IST) 15 Sep 2026

‘लाल परी’च्या डेपोला स्वच्छतेची हाक; डोंबिवलीतील एकदंता टीम कडून गणेशोत्सवातून सामाजिक संदेश

सामाजिक विषय मांडण्याची परंपरा ‘एकदंता टीम’कडून दरवर्षी गणेशोत्सवाच्या सजावटीतून एखादा सामाजिक विषय प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला जातो. यापूर्वी टोकियो ऑलिम्पिक्सच्या माध्यमातून क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांना आणि भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला होता. ...सविस्तर बातमी
12:11 (IST) 15 Sep 2026

अमित शाह यांच्या महाराष्ट्र बहुभाषिक राज्य वक्त्याव्यावरून मराठी एकीकरण समितीचा संताप

अमित शाह यांनी इतके मोठे वक्तव्य केले तरी महाराष्ट्र मूग गिळून गप्प आहे - मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख ...सविस्तर बातमी
12:08 (IST) 15 Sep 2026

LIVE : "मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही", मनोज जरांगे एकटेच मुंबईच्या दिशेने रवाना

मरण आलं तरी चालेल पण मी शरण जाणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. ते आज एकटेच मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आज ते मुंबई पोलिसांकडून परवानगीसाठी तिसरा अर्ज करणार आहेत. दरम्यान, त्यांनी मराठा बांधवांना मुंबईत न येण्याचं आवाहन केलं आहे. परंतु, तरीही अनेक मराठा बांधव मुंबईच्या दिशेने येत आहेत. मला मारण्यासाठी सरकारचं षडयंत्र सुरू आहे, असंही जरांगे म्हणाले.

12:05 (IST) 15 Sep 2026

'एकदंताय, वक्रतुंडाय...', राधिका अंबानींकडून गणपती बाप्पासाठी खास नृत्याविष्कार; अँटिलियातील VIDEO तुफान व्हायरल

Radhika Ambani Ganpati dance video : अंबानी घराण्याची धाकटी सून राधिका मर्चंट हिचा अँटिलियामधील गणेशोत्सवातील एक खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...सविस्तर वाचा
11:45 (IST) 15 Sep 2026

Vidarbha Saline Belt Crisis: सविस्तर: खारपाणपट्ट्यावर संशोधनाची मात्रा निष्फळ!

Saline Soil and Water Crisis in Purna river : खारपाणपट्ट्याच्या प्रश्नावर उपाययोजनेसाठी असंख्य संशोधने झाली. मात्र, त्यांचा मूळ उद्देशच भरकटला. खारपाणपट्ट्यात ठोस व कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी संशोधन केवळ कागदावरच न राहता ते जमिनीवर उतरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. ...सविस्तर बातमी
11:23 (IST) 15 Sep 2026

महाराष्ट्रापेक्षा मोठे बहुभाषिक राज्य संपूर्ण भारतात दुसरे नाही - अमित शाह

Amit Shah Speech Navi Mumbai: हिंदी दिवस आणि सहावे अखिल राजभाषा संमेलन नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. ...वाचा सविस्तर
11:14 (IST) 15 Sep 2026

रेल्वे फलाटावर आलेल्या ‘त्या’ पाहुण्याने सगळ्यांची धावपळ उडवली; दोन क्रॉसिंग ओलांडून थेट गायब

बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावरील नागभीड रेल्वे स्थानकावर सकाळी अचानक एका अस्वलाने दर्शन दिले. ...वाचा सविस्तर
10:58 (IST) 15 Sep 2026

पुणे: अग्निशामक दल सज्ज, अधिकाऱ्यांकडून विसर्जन घाटांची पाहणी

नदीपात्रालगत १५ मुख्य विसर्जन घाट आहेत. तेथे अग्निशामक दलाचे २० अधिकारी, २० जवान आणि १२० जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेेत. जवानांकडे लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, दोरी असे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ...वाचा सविस्तर
10:51 (IST) 15 Sep 2026

त्वमेव केवलं कर्तासी… समूह स्वरांत ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण, गणरायासमोर पहाटे पारंपरिक पेहरावात स्त्रीशक्तीचा जागर

पावसाचे वातावरण असले तरी पारंपरिक वेशात मध्यरात्री दोन वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाला हजेरी लावण्यास सुरुवात केली. उपक्रमाचे यंदा ४१ वे वर्ष होते. ...सविस्तर बातमी
10:45 (IST) 15 Sep 2026

भाग्यश्री पटवर्धन आणि त्यांच्या वडिलांमधला वाद चव्हाट्यावर

सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थान मध्ये ऐन गणपती उत्सवात उत्तराधिकारी पदावरून वाद उफाळून आला आहे. अभिनेत्री आणि राजकन्या भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी उत्तराधिकारी म्हणून नेमलेल्या दत्तक पुत्र राजकुमार आदित्य राजे यांना डावलत गणपती मंदिरात आरती केली. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. दुसरीकडे आदित्यराजे हेच उत्तराधिकारी सांगत भाग्यश्री यांना आरती करण्याचा अधिकार नसल्याचं विजयसिंह राजे पटवर्धन यांनी म्हटलं आहे.

10:37 (IST) 15 Sep 2026

LIVE : पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही मनोज जरांगे ठाम; आज एकटेच मुंबईला रवाना होणार

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमक झाले असून ते आज एकटेच मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मुंबई पोलिसांनी मराठा आंदोनासाठी परवानगी नाकारली असून मनोज जरांगेंनी परवानगीसाठी पुन्हा एकदा तिसरा अर्ज केला आहे. तसंच, अनेक मराठा बांधवांनीही मुंबईत येण्याची तयारी दर्शवली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरता मुंबई पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.

10:35 (IST) 15 Sep 2026
“…तुर्तास एवढेच”, राज ठाकरेंच्या सूचक पोस्टची चर्चा; दोन ओळींत कोणावर ठेवला रोख?

राज्यात विविध घडामोडी घडत असून त्यावर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन ओळींची एक सूचक पोस्ट केली आहे. मात्र, त्यांनी संबंधित पोस्ट कोणत्या घटनेवरील प्रतिक्रिया म्हणून केली आहे, याबाबत खुलासा आलेला नाही.

सविस्तर वृत्त वाचा