Maharashtra Live News Updates, 22 October 2025: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिल्यानंतर राज्यातील राजकीय चक्र फिरू लागली आहेत. आघाडी व युतीसंदर्भातल्या चर्चा झडू लागल्या असून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतही भाकितं केली जाऊ लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकांआधीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झाल्याचं राज्यात पाहायला मिळत आहे.
Maharashtra Marathi News Live Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर…
राज्यात पर्यटकांना आरक्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम होतात. ते आपण अधिक लोकांना माहिती व्हावेत म्हणून ते लोकांपर्यंत पोहचवत असतो. पण एखाद्या राजकीय पक्षाने असा उत्सव घेतला असेल आणि ते आमच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ऑफिशियल ट्वीटरवर असेल तर त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. त्यांचा दीपोत्सव ढापायाचा काही प्रश्न नाही. यापेक्षा चांगले दीपोउत्सव पर्यटन विभागाने महाराष्ट्रात केले आहेत. त्यामुळे असे कुणाचं काही ढापण्याची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला आवश्यकता नाही, असे शंभूराज देसाई म्हणाले.
त्यांच्या मतदारसंघांतील पुरावे घेऊन जनतेसमोर येऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
फडणवीसांची सत्ताधारी आमदारांवर कोट्यावधींची मेहेरनजर…
फडणवीसांची सत्ताधारी आमदारांवर कोट्यावधींची मेहेरनजर…
“निवडणूक आयोग खरेच हा घोळ तपासणार आहे की नाही?” बाळासाहेब थोरातांचा सवाल
मतदार यादीतील हरकतींबाबत आम्हाला मिळालेले उत्तर असे आहे… संगमनेर तालुक्यातील नगरपालिका क्षेत्राबाहेरील सुमारे ९,४६० मतदारांबाबत हरकती नोंदवल्या गेल्या. त्या हरकतींवर तहसीलदारांनी सांगितले की, मूळ विधानसभा मतदार यादीतील नावे वगळणे किंवा दुरुस्ती करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला किंवा त्याने नेमलेल्या अधिकाऱ्यांना नाही. शेकडो हरकतींना हेच उत्तर देण्यात आले. नगरपालिका क्षेत्रातील मयत, दुबार, फेक मतदारांबाबतही अशाच हरकती घेतल्या, पण “आम्हाला अधिकार नाही” म्हणून सांगण्यात आले. एकीकडे निवडणूक आयोग म्हणतो, “आम्ही तपासून निर्णय घेऊ”, दुसरीकडे “आम्हाला अधिकारच नाही” असे सांगतो. मग मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा हा सारा कार्यक्रमच कशासाठी? जर अधिकारच नसेल, तर थेट यादी जाहीर करा… हरकती मागवून लोकशाही मार्गाने काम करतो आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न तरी कशाला करता? मतदार यादीत हजारो नावांबाबत संभ्रम असेल, तेव्हा “विहित नमुन्यात अर्ज करा” असे सांगून निवडणूक आयोग नेमके काय साध्य करू पाहत आहे… निवडणूक आयोग खरेच हा घोळ तपासणार आहे की नाही?
मतदार यादीतील हरकतींबाबत आम्हाला मिळालेले उत्तर असे आहे…
— Balasaheb Thorat (@bb_thorat) October 22, 2025
संगमनेर तालुक्यातील नगरपालिका क्षेत्राबाहेरील सुमारे ९,४६० मतदारांबाबत हरकती नोंदवल्या गेल्या. त्या हरकतींवर तहसीलदारांनी सांगितले की, मूळ विधानसभा मतदार यादीतील नावे वगळणे किंवा दुरुस्ती करण्याचा अधिकार राज्य निवडणूक… pic.twitter.com/drENTUTr05
धक्कादायक! मोटार बिघडल्याने महामार्गावर उभ्या चौघांना अज्ञात वाहनाने चिरडले; ‘हिट ॲन्ड रन’चा थरार, ऐन दिवाळीच्या दिवशीच…
Gold-Silver Price : दिवाळीनंतर सोने-चांदी गडगडले… जळगावमध्ये आता ‘इतका’ दर
श्वानाला अन्नही गिळता येईना…पहिल्यांदाच पेरोरल एंडोस्कोपिक मायोटॉमी प्रक्रियेचा पुण्यातील डॉक्टरांनी शोधला मार्ग
विज्ञान शिक्षण ‘प्रयोग’शील; वाचा काय आहे उपक्रम?
पिंपरीत चॉइसच्या वाहन क्रमांकाचे आकर्षण; आरटीओच्या तिजोरीत कोटींचा महसूल
अखेर तीन वर्षांनी मुहूर्त; पिंपरीत ‘या’ ठिकाणी चार्जिंग स्थानके
महागठबंधन की महा मतभेद प्रदर्शन? बिहारमध्ये मित्रपक्षच अनेक ठिकाणी परस्परविरोधात!
मोठी बातमी… लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात आपटी… मुहर्तावर खरेदी करणाऱ्यांमध्ये…
मोठी बातमी… लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात आपटी… मुहर्तावर खरेदी करणाऱ्यांमध्ये…
Kishori Pednekar-Mahesh Kothare: किशोरी पेडणेकर यांनी महेश कोठारेंना लगावला टोला!
महेश कोठारे यांची सून अपघात प्रकरणात अडकली असल्यामुळेच ते अशी मुक्ताफळं उधळत आहेत, असा टोला शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. आपला भाजपाला पाठिंबा असल्याचं विधान महेश कोठारेंनी एका कार्यक्रमात केलं होतं. त्यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आरएसएसचे भैय्याजी जोशी यांचे धर्मांतरावर मोठे विधान, म्हणाले…
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकास कामांसाठी घाई; ई-निविदा प्रसिद्ध करण्याचा कालावधी कमी
आव्हाणे-ममुराबाद दरम्यान काँक्रीट रस्ता… जळगावच्या विकासाला चालना !
Bachchu Kadu Mocks Ravi Rana Navneet Rana – “एवढं नौटंकी जोडपं आख्ख्या देशात सापडणार नाही”
ते दाम्पत्य त्यांच्यावर बोलण्याच्या लायकीचे नाही आहेत. नवनीत राणांना माहिती नाही की आम्ही विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर कसे बोललो. त्यांना कॅसेट वगैरे पाठवतो. त्यांना कार्यक्रम दिलाय, त्यामुळे बोलावं लागतं. त्यांची मजबुरी आहे. ती लाचारी त्यांना करावी लागणारच आहे. बायको भाजपात, नवरा स्वाभिमानमध्ये. तुमची काय अवस्था आहे. तुम्ही गटारगंगेत उभं राहून राज ठाकरे-उद्धव ठाकरेंबद्दल बोलताय. एवढं नौटंकी जोडपं देशात सापडणार नाही. याची बायको याच्या संघटनेत राहू शकत नाही – बच्चू कडू, प्रहार संघटनेचे अध्यक्ष
Bachchu Kadu Mocks Ravi Rana Navneet Rana – “देवाभाऊंना कार्यक्रम दिलाय की बच्चू कडूला अडवा”
भाजपात अमरावतीत खऱ्या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट भोगले. आता हे नवीन बोलाचे धनी आणलेत. देवाभाऊंनी कार्यक्रम दिलाय की बच्चू कडूला अडवा, तो शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहतोय. राणा दाम्पत्य शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत. त्यांना फक्त देवाभाऊंच्या बाजूने थोडं बोललं तर आपला फायदा होईल एवढाच त्यांचा कार्यक्रम आहे. हे शेतकरीविरोधी लोक आहेत. ते बोलणारच आहेत – बच्चू कडू, प्रहार संघटनेचे अध्यक्ष
जळगाव-मुंबई विमानसेवा आता दररोज… प्रवासाची वेळ दीड तासांवर !
Farmers Compensation : हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार नाही का ?…कुणी केली सरकारवर ही टीका
नाशिकहून विमान प्रवासासाठी निघताहेत ?…वाढीव तिकीट दर बघा, मग बॅग भरा…
Green Crackers सविस्तर : हरित फटाके म्हणजे काय रे भाऊ? या फटाक्यांमुळे प्रदूषणात किती घट?
द्राक्ष उत्पादनात यंदा मोठी घट होण्याची भीती; अतिवृष्टीमुळे फळधारणेवर परिणाम
शरद पवार यांच्याकडे ते नाईलाजास्तव….माणिक कोकाटे यांचा कोणाकडे अंगुलीनिर्देश ?
रायगड जिल्हा परिषदेतील अपहार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या…
मूळ घटनेत उल्लेख नसलेल्या सल्लागारपदी कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये चार जण कार्यरत
कुंभमेळा मंत्री समितीच्या बैठकीला मुहूर्त सापडेना… गिरीश महाजन यांच्या कार्यपद्धतीने मित्रपक्षात अस्वस्थता ?
Maharashtra Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील राजकारणाची बित्तंबातमी!
