Mumbai Maharashtra News Updates in Marathi, 20 April 2026 : राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार आहेत. बारामतीसाठी राष्ट्रवादीची सांगता सभा बारामतीतील शारदा प्रांगणात पार पडणार आहेत. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेला उपस्थित राहणार आहेत. तर, दुसरीकडे नाशिकमधून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. अशोक खरातप्रकरणी कसून चौकशी सुरू असून त्याच्या मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर, दुसरीकडे नाशिकच्याच टीसीएसमधील धर्मांतर प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक खुलासाही समोर आला आहे. तसंच, महिला आयोग विधेयकावरून राज्यात कलगीतुरा रंगला असून आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात.
दरम्यान, नारी शक्ती वंदन योजनेसह दोन विधेयके लोकसभेत नामंजूर करण्यात आली. यावरून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधला.
फडणवीसांचं आव्हान सुळेंनी स्वीकारलं
या पत्रकार परिषदेत राज्यातील अनेक महिला नेत्याही उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विरोधकांना ओपन चॅलेंज दिलं. महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करण्याकरता त्यांच्या स्तरावरील कोणत्याही नेत्याने चर्चा करावी, मी ओपन डिबेट करायला तयार आहे, असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळेंनीही हे आव्हान स्वीकारलं असून मुख्यमंत्री माझ्यापेक्षा जास्त व्यस्त असतात, त्यामुळे ते सांगतील त्या जागेवर आणि वेळेवर येऊन चर्चा करायला तयार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात फूट; राज्य कर्मचारी संघटना व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघात मतभेद
Hinjwadi Traffic : हिंजवडी आयटीपार्कमध्ये एकाच मार्गिकेवर वाहतूक सुरू; सात दिवस वाहतूक कोंडी...
"महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ८५ अंतर्गत सहधारकांमध्ये किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये होणाऱ्या शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आता कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. यासोबतच, वडिलोपार्जित शेतजमिनीबाबत वारसाहक्काने हक्क प्राप्त झालेल्या सहधारकांनी कलम ८५ अंतर्गत प्रक्रिया न करता थेट नोंदणीस सादर केलेल्या वाटणीपत्रांनाही नोंदणी शुल्क माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे जमिनीच्या वाटणी प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता आणि वेग वाढणार असून नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे," अशी पोस्ट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
JEE Main 2026 Final Answer Key : जेईई मुख्य परीक्षेची उत्तरतालिका जाहीर; ११ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला...
नेवासा बंदला मोठा प्रतिसाद; ॲड. संजय सुखधान यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी मोर्चा
संजीव जयस्वाल यांच्याविरोधात मोतीलाल नगरमध्ये निदर्शन; बदलीच्या मागणीवर रहिवासी ठाम...
हळदीच्या दरावरून नांदेडमध्ये शेतकरी आक्रमक! २४ तासांत तोडगा न निघाल्यास दिला बाजारपेठ बंद करण्याचा इशारा
Mumbai Water Cut : दक्षिण मुंबईतील अनेक भागात २२, २३ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद; बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम...
महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्यच, मंत्री प्रताप सरनाईक भूमिकेवर ठाम
डोंबिवली रेल्वे अपघातानंतर मेगाब्लॉकच्या कामावर प्रश्नचिन्ह; प्रवासी संघटना आक्रमक, सखोल चौकशीची मागणी
"फडणवीसांचा खरेपणा संपत चालला आहे, पूर्वी ते तसे नव्हते", अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
"फडणवीसांचा खरेपणा संपत चालला आहे. पूर्वी ते तसे नव्हते, पण आता ते फक्त राजकारण करतात. महिला आरक्षण विधेयकाचा आणि डिलिमिटेशन काहीच संबंध नाही हे पूर्ण माहीत असतांना फक्त खोटं बोलण्याचा भाजप चा अजेंडा आगदी रेटून नेण्याचे काम फडणवीस करत आहेत," अशी पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
Pune Cyber Crime : विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात; तरुणाची साडेपाच लाखांची फसवणूक
VIDEO : सभागृह नेत्याकडून सरकारच्याच विरोधात घोषणाबाजी; महापौरांसह आमदार म्हणाले, 'खाली डाेकं, वर पाय'...
ठाणे : औद्योगिक कंपन्यांकडे युरिया वळू नये म्हणून करडी नजर, जिल्ह्यात कृषी विभागाची मोहीम
Pimpri Chinchwad Crime : महिलेचे मॉर्फ केलेले न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी... पाच लाखांची मागणी...
'शिवसेना हा शिस्तीचा पक्ष, आमदारांना निमंत्रण द्यायची पद्धत नाही'; शंभूराज देसाई...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिवसेना आमदारानेच फिरवली दौऱ्याकडे पाठ
"मुख्यमंत्री सांगतील त्या जागेवर अन् वेळेवर...!", सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं फडणवीसांचं आव्हान; महिला आरक्षणावर ओपन डिबेट होणार का?
या पक्षांकडे कोणताही प्रतिवाद नाही. मी आज ओपन चॅलेंज देतो. माझ्या स्तरातील त्यांच्या कोणत्याही नेत्याने महिला विधेयकासंदर्भात ओपन डिबेट करावं - देवेंद्र फडणवीस</p>
माझी तयारी आहे. मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, ते म्हणतील ती वेळ; विनम्रपणे आमच्यापैकी कोणीही चर्चेला येऊ - सुप्रिया सुळे</p>
ऑनलाईन रमी मुळे कर्जबाजारी झाला; कर्ज फेडण्यासाठी चोऱ्यामाऱ्या करू लागला… जाणून घ्या रायगड जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगाराची गोष्ट
TCS Nashik Case: "तुमच्याविरुद्ध गंभीर तक्रार आहे", निदा खानच्या निलंबन पत्रातून धक्कादायक माहिती समोर; टीसीएसची मोठी कारवाई
वर्दीशी इमान राखणाऱ्या रेवथी संथोषकुमार
'मानव विकास मिशन'नंतर आता आकांक्षीत जिल्हा, तालुक्यांसाठी नवा कार्यक्रम जाहीर; 'लेबल' बदलले तरी निधीचा प्रश्न कायम
Dombivli Local Derailment: रेल्वेचे चाक पुन्हा रुळावर कसे आले?
LIVE : "राज्यात महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ", सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्यात महिला सुरक्षेची स्थिती अतिशय गंभीर आहे. तसेच महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही अतिशय गंभीर बाब असून राज्यातील सर्वांना सुरक्षित वातावरण देणे ही शासनाची जबाबदारी आहे. याबाबत मी राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात चिंता व्यक्त करुन त्याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याबाबत लिहिले आहे. - सुप्रिया सुळे<br/>
