Maharashtra Politics News Updates, 14 April 2026 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दादर येथे चैत्यभूमीवरही जनसागर लोटला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तर दुसरीकडे अशोक खरात प्रकरणी अद्यापही चौकशी सुरू आहे. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचीही चौकशी झाली. तसंच, आज अशोक खरातची सासू पार्वती शिंदे यांचीही प्रतिक्रिया चर्चेत आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्याही पाहुयात.

Live Updates

Maharashtra Mumbai Pune News Live Updates, 14 April 2026 : महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा

20:50 (IST) 14 Apr 2026

टीडीआरच्या खरेदी - विक्रीसाठी ऑनलाईन व्यासपीठ; १५ एप्रिलपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार

मुंबई महापालिकेने राज्य सरकारच्या सहकार्याने हस्तांतरणीय विकास हक्क (ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स अर्थात टीडीआर) व्यवहारांसंदर्भातील भारतातील पहिले एकात्मिक डिजिटल व्यासपीठ म्हणजेच ई टीडीआर प्रणाली सुरू केली आहे. ...सविस्तर वाचा
20:22 (IST) 14 Apr 2026

​'मी देवाचा अवतार…' महिलांचे शोषण करणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा खरातला १८ एप्रिलपर्यंत कोठडी

महिला लैंगिक शोषण प्रकरणी चौथ्या गुन्ह्यात भोंदूबाबा अशोक खरातची न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. ...सविस्तर वाचा
20:16 (IST) 14 Apr 2026

मालेगाव पोलिसांची मोठी कामगिरी; दुहेरी हत्याकांडातील परप्रांतीय आरोपींना ठोकल्या बेड्या!

​गेल्या ८ एप्रिल रोजी मालेगावच्या सोयगाव भागातील आयोध्यानगरात ही थरारक घटना घडली होती. मूळचे गोरखपूरचे असलेले निखिल भोला सहाणी (१८) आणि अनिश उर्फ गालू भोला सहाणी (३४) या दोन भावांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. ...वाचा सविस्तर
20:05 (IST) 14 Apr 2026

"दुर्गराज रायगड व त्यावरील सर्व वास्तू ही प्रेरणास्थळे आहेत, पर्यटनस्थळे नव्हेत!" प्री-वेडिंग फोटोशूट प्रकरणावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

"दुर्गराज रायगडच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीला नियमच लावले पाहिजेत का? आपली नैतिक जबाबदारी आणि सामाजिक भान काही आहे की नाहीच? लग्नापूर्वी व लग्न झाल्यानंतर कित्येक जोडपी गडावर येत असतात, यामध्ये काही वावगे नाही. परंतु या व अशा इतर काही गोष्टींचे रूपांतर आता इव्हेंट मध्ये होत असल्याचे प्रखरतेने दिसून येत आहे. प्री व पोस्ट-वेडिंग शूट आणि तत्सम गोष्टी राजसदर व समाधीस्थळी होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. दुर्गराज रायगड व त्यावरील सर्व वास्तू ही प्रेरणास्थळे आहेत, पर्यटनस्थळे नव्हेत ! सोशल मीडियावर प्रदर्शन करण्यासाठी राजसदर व महाराजांच्या पवित्र समाधीस्थळी नाटकी व अनावश्यक गोष्टी करणे खरेच गरजेचे आहे का ? रायगडावर खाजगी इव्हेंट सदृश फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी रोखण्यासाठी पुरातत्व विभागाचे नियम अस्तित्त्वात आहेत, त्याची सक्त अंमलबजावणी करण्यात यावी, याबाबत पुरातत्व विभागास सूचना दिलेल्या आहेत. पण प्रत्येक गोष्टीला नियम लावण्यापेक्षा शिवभक्त म्हणून आपणही सामाजिक भान जपणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे," अशी संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर केली आहे.

20:03 (IST) 14 Apr 2026

१३ दिवसांत १३ लाखांचा गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू जप्त; मुंबईमध्ये एफडीएची धडक कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) १ एप्रिलपासून राज्यातील गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधी सुपारी, खर्रा, मावा अशा प्रतिबंधित उत्पादनांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. ...सविस्तर वाचा
19:55 (IST) 14 Apr 2026

अकरावीची प्रवेश नोंदणी ९० हजारांवर; ३० एप्रिलपर्यंत करता येणार नोंदणी

इयत्ता अकरावीच्या २०२६-२७ च्या शैक्षणिक सत्रातील केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून चार दिवसांत राज्यभरातून प्रवेश अर्जाच्या पहिल्या भागासाठी ९० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली. ...सविस्तर वाचा
19:40 (IST) 14 Apr 2026

कॉर्पोरेटमधील खरा आणि क्रूर चेहरा दाखवणारा वित्तपट

कॉर्पोरेट जगताचा क्रूर चेहरा; मधुर भांडारकरांच्या 'कॉर्पोरेट' चित्रपटातून उलगडतं उद्योगांमधील गळेकापू राजकारण. ...सविस्तर बातमी
19:22 (IST) 14 Apr 2026

तुमच्या सिबिल रिपोर्टमध्ये काय असते?

CIBIL Report: तुमच्या सिबिल रिपोर्टमध्ये नक्की काय असतं? कर्ज घेण्यापूर्वी 'या' ५ गोष्टी समजून घ्या ...वाचा सविस्तर
19:01 (IST) 14 Apr 2026

ठाण्यात तृतीयपंथीयांसाठी विभागीय कार्यशाळा; हक्क संरक्षण व समस्यांवर होणार मार्गदर्शन

राज्यातील तृतीयपंथीय समुदायाला भेडसावणाऱ्या विविध सामाजिक, कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ...सविस्तर बातमी
18:53 (IST) 14 Apr 2026

ठाणे स्थानकात बेवारस बॅगेत अमली पदार्थांचा साठा

स्थानकातील फलाट क्रमांक सात आणि आठवर सोमवारी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी पथकाला दोन बॅगा आढळून आल्या. ...अधिक वाचा
18:39 (IST) 14 Apr 2026

खळबळजनक! थेट अपर जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर गुन्हा दाखल; खाणी सुरू ठेवण्यासाठी लाचेची मागणी

Akola Additional Collector Bribery Case Update: खाणी सुरू ठेवण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अकोल्यात गुन्हा दाखल. ...वाचा सविस्तर
18:38 (IST) 14 Apr 2026

एकीकडे पाणी कपात… दुसरीकडे पाणी चोरी; बदलापूर-काटई मार्गावर अनधिकृत कार वॉशिंग सेंटरचे पेव

काही वर्षांपूर्वी अंबरनाथ ते काटई दरम्यान अवघे दोन ते तीन वॉशींग सेंटर नजरेस पडत असे. मात्र गेल्या एक ते दोन वर्षांच्या कालावधीत याची संख्या तब्बल तीसच्या वर गेली आहे. ...सविस्तर वाचा
18:34 (IST) 14 Apr 2026

अर्थव्यवस्था ८० बिंदूंपर्यंत मंदावू शकते; तेल धक्क्याबाबत अमेरिकी संस्थेचे धक्कादायक कयास

सध्याच्या तणावपूर्ण स्थितीचा परिणाम कंपन्यांच्या मिळकत कामगिरीवरही दिसू शकतो. विद्यमान २०२६-२७ आर्थिक वर्षात व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कंपन्यांची मिळकत ही १५ ते २५ टक्क्यांनी घसरू शकते, तर कर्जभार अर्धा ते एक पटीने वाढू शकतो. ...अधिक वाचा
17:26 (IST) 14 Apr 2026

कोकणचा प्रवास महागणार! एसटी महामंडळाकडून उन्हाळी सुट्टीत १० टक्के भाडेवाढ

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. एसटी महामंडळाने १५ एप्रिलपासून १० टक्के 'परिवर्तनशील भाडे' वाढ लागू केली असून, साध्या बसच्या प्रवासासाठी आता ४० ते ६५ रुपयांपर्यंत अधिक मोजावे लागणार आहेत. ...वाचा सविस्तर
17:22 (IST) 14 Apr 2026

सावधान! तुम्ही खाताय ते पनीर-चीज खरं आहे का? हॉटेलच्या मेन्यू कार्डबाबत सरकारचा मोठा निर्णय

Cheese Analog: पिझ्झा, बर्गरमधील बनावट चीज ओळखणे आता सोपे! हॉटेलच्या मेन्यू कार्डवर ३० एप्रिलपर्यंत बदल करणे बंधनकारक. नियम पाळला नाही तर परवाना रद्द होणार. ...सविस्तर बातमी
17:19 (IST) 14 Apr 2026

शिवसेनेच्या आढावा बैठकीत जोरदार खडाजंगी; आ.बांगरांचा मंत्र्यांवर तर शिवसैनिकांचा आ.कल्याणकरांवर निशाणा!

नांदेडमध्ये आयोजित शिवसेनेच्या विभागीय बैठकीत आमदार संतोष बांगर यांनी स्वपक्षीय मंत्र्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला, तर स्थानिक कार्यकर्त्यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्यावर पराभवाचे खापर फोडले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या जोरदार राड्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली. ...सविस्तर वाचा
17:15 (IST) 14 Apr 2026

डोंबिवलीत पुस्तक आदान प्रदानमध्ये ‘केसरी ते सिंदूर’ राष्ट्रभक्तीचे जागरण

डोंबिवलीत आयोजित पुस्तक आदान प्रदान सोहळ्यात 'अनादी मी अनंत मी' कार्यक्रमाद्वारे सावरकरांच्या विचारांचे आणि राष्ट्रभक्तीचे जागरण करण्यात आले. यावेळी राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम येणाऱ्या 'दगडी भिंत' नाटकाच्या टीमने आपला प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडला. ...सविस्तर बातमी
16:46 (IST) 14 Apr 2026

१ मेपासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य

ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणे जितके आवश्यक आहे, तितकेच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणेही महत्त्वाचे आहे. ...अधिक वाचा
16:37 (IST) 14 Apr 2026

Marathi Language Mandatory: मराठीत न बोलणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा… १ मेपासून कोणावर कारवाई होणार? वाचा…

Rickshaw Taxi Marathi Mandatory: परवानाधारक रिक्षा - टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे येत्या महाराष्ट्र दिनापासून (१ मे) अनिवार्य करण्यात येणार आहे. ...वाचा सविस्तर
16:36 (IST) 14 Apr 2026

महिलांना जुन्या चारचाकीची भुरळ; खरेदीदारांच्या संख्येत दुपटीने वाढ, ऑनलाईन पर्यायांना पसंती

राज्यात जुन्या चारचाकी वाहनांच्या खरेदीत महिलांचा सहभाग लक्षणीय वाढला असून गेल्या दोन वर्षांत ही संख्या दुपटीने वाढली आहे. ३० ते ४० वयोगटातील महिला प्रामुख्याने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून ऑटोमॅटिक हॅचबॅक गाड्यांना पसंती देत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. ...सविस्तर वाचा
16:17 (IST) 14 Apr 2026

लोकसभेला अवकाश तरी कोल्हापूरचे राजकारण आताच तापले !

मंडलिक यांच्या कागल तालुक्यातूनच हसन मुश्रीफ, समरजित घाटगे, संजय घाटगे अशा तिन्ही प्रमुख नेत्यांकडून विरोध होण्याची चिन्हे असल्याने मंडलिक यांची वाट किती बिकट आहे याचेही आराखडे बांधले जात आहेत. ...अधिक वाचा
16:02 (IST) 14 Apr 2026

Amravati Minor Girls Sexual Exploitation Case: अमरावतीतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी; १०० व्हिडिओ व्हायरल

Amravati Minor Girls Sexual Exploitation: अमरावतीत अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अयान अहमदला अटक. २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, सायबर सेल कडून तपास सुरू. ...वाचा सविस्तर
15:57 (IST) 14 Apr 2026

सज्जन हिंदू शक्ती हिंदू संमेलनाच्या माध्यमातून जागरूक करण्याची गरज - संघाचे प्रांत संयोजक राजेश कुंटे यांचे प्रतिपादन

२०४७ पर्यंत हिंदू अल्पसंख्यांक झाल्यास देश पुन्हा तुटण्याची भीती असून, गरज भासल्यास लव्ह जिहादसारख्या विषयांवर प्रत्यक्ष संघर्ष करून संघटित शक्ती दाखवून द्या," असे आवाहन RSS चे प्रांत संयोजक राजेश कुंटे यांनी यावेळी केले. ...सविस्तर बातमी
15:51 (IST) 14 Apr 2026

केळी पीकविमा मंजुरीचे खरे श्रेय नांदेड जिल्हाधिकार्‍यांनाच!आ.श्रीजया चव्हाण यांच्या दाव्यावर शेतकरी प्रतिनिधींचा प्रतिदावा

आमदार श्रीजया चव्हाण यांच्या प्रसिद्धी यंत्रणेने हा विमा त्यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाल्याचा दावा केला असतानाच, बारड येथील शेतकरी प्रतिनिधींनी हा दावा खोडून काढला आहे. ...सविस्तर वाचा
14:57 (IST) 14 Apr 2026

डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकालगतच्या ऑनलाईन जुगार, लाॅटरी अड्ड्यावर छापा - १८० च्या पटीने मिळतात जुगार अड्ड्यावर पैसे

१५ मिनिटांत पैसे १८० पट करून देण्याचे आमिष दाखवून हा खेळ चालवला जात होता. या कारवाईत पोलिसांनी ४० हजारांचे साहित्य जप्त केले असून, अड्डा चालकासह दोन ग्राहकांवर गुन्हा दाखल केला आहे. ...सविस्तर वाचा
14:42 (IST) 14 Apr 2026

भिवंडीकरांपुढे जलसंकट, आठ दिवसांतच पुन्हा पाणी कपात

मुख्य जलवाहिनीच्या जोडणी कामामुळे शांतीनगर, बिलालनगर यांसह अनेक भागांत पाणी कपात लागू होणार असल्याने नागरिकांचे हाल होणार आहेत. ...सविस्तर वाचा
14:42 (IST) 14 Apr 2026

यादी पुनर्निरिक्षणात असहकाराचे अडथळे; असहकार दर्शवणाऱ्या बीएलओंवर कारवाई, नागरिकांनाही आवाहन

निवडणूक कर्तव्यात हलगर्जीपणा आणि टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत ६ शिक्षकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...वाचा सविस्तर
14:23 (IST) 14 Apr 2026

महिलांच्या सुरक्षेसाठी ‘सखी केंद्र’ ठरले आधार!

कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार आणि छळवणुकीला सामोरे जाणाऱ्या तब्बल १४११ महिलांना आतापर्यंत या केंद्राच्या माध्यमातून वैद्यकीय मदत, पोलीस साहाय्य आणि कायदेशीर सल्ला देण्यात आला आहे. ...सविस्तर बातमी
14:23 (IST) 14 Apr 2026

​साहित्यिकांनी व्यवस्थेला शरण न जाता सामाजिक समतेची भूमिका घ्यावी: कवी अजय कांडर​ सावंतवाडी येथील पहिल्या ‘आंबेडकर चौक साहित्य संमेलनात’ मान्यवरांचा सूर

सावंतवाडी येथे संपन्न झालेल्या पहिल्या 'आंबेडकर चौक साहित्य संमेलनात' ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ...सविस्तर बातमी
14:22 (IST) 14 Apr 2026

डोंबिवली पेंढरकर काॅलजेमधील विद्यार्थ्याला देवीचापा़ड्यात सराईत गुंडांची जीवघेणी मारहाण- तिन्ही गुंड अटकेत

रस्त्यात आडवे वाहन लावणाऱ्या गुंडांना हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला. ...सविस्तर बातमी

Rohit Pawar Press Conference Live: रोहित पवारांची पत्रकार परिषद Live

Maharashtra Mumbai Pune News Live Updates, 14 April 2026