Maharashtra Assembly Election Schedule Updates, 16 August 2024: विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातल्या महिलांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकांच्या निकालांमुळे आत्मविश्वास दुणावलेल्या विरोधकांनी महायुतीला जेरीस आणण्यासाठी मोट बांधायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आजची निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
Vidhan Sabha Election 2024 Schedule Live Updates, 14 August 2024: राज्य विधानसभा निवडणुकांसंदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स!
कुलगुरू डॉ. चौधरींच्या निलंबनावर कल्पना पांडे यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार प्रवीण दटके, विष्णू चांगदे यांच्यावर गंभीर आरोप केले.
भारतीय हवामान खात्याने या आठवड्याच्या अखेर आणि पुढील आठवड्याच्या सुरुवातीचा पावसाचा कार्यक्रमच जाहीर केला आहे.
वर्धा : ज्येष्ठ नेते शरद पवार हे १७ ऑगस्ट रोजी विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. पवार यांचा दौरा राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण करणारा ठरत असतो. या दौऱ्यात मात्र त्यांचे अधिकृत राजकीय कार्यक्रम नाहीत. तरीही काही वेळ राखीव असल्याने त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
वसई : प्रेयसीच्या मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा ३ च्या पथकाने ४ वर्षांने हरिद्वार येथून अटक केली. नाव बदलून तो पोलिसांना गुंगारा देत होता.
Archana Puttewar : उपविभागीय अधिकारी राहुलकुमार मीना यांनी घोटाळ्याचा आरोप असलेल्या नगररचना विभागालाच चौकशी करुन अहवाल सादर करा, असे अजब फर्मान काढले आहे.
अखेर सत्य बाहेर आलेच, महाराष्ट्राचे खरे गद्दार उद्धव ठाकरेच… मला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता असा खोटा नरेटिव्ह उद्धव ठाकरेंनी पसरवून तमाम शिवसैनिकांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली. सत्य लपत नसते आज त्यांच्या तोंडूनच ते बाहेर आले की, ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री हा महायुतीचा फार्मुला ठरला होता. मुख्यमंत्रीपदासाठी जनमताचा अनादर करत २५ वर्षांची युती आणि हिंदुत्वाशी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. त्याची कबुली त्यांनी आज स्वतःच्या तोंडून दिली आहे – भाजपा</p>
https://x.com/BJP4Maharashtra/status/1824406986764534143
“ज्या व्यक्तीचा नरडा दुसऱ्यावर तोंडसुख घेण्यासाठी वळवळत असेल त्या माणसाच्या नरड्यातून सरडा हा शब्द आला तर त्यात काही गैर वाटत नाही”, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
नागपूरचा २३ वर्षीय तरुण पोकेमॉन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
कल्याण : रक्षाबंधन आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सर्वाधिक वर्दळीच्या शिवाजी चौकात मंडप उभारून सोमवारी कार्यक्रम करण्याचे निश्चित केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाजी चौक वाहन कोंडीने कार्यक्रम नसताना दररोज गजबजलेला असतो.
लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढले होते.
अमरावती शहरात गेल्या दोन महिन्यांपासून गाईच्या गोठ्यामध्ये चक्क पांढरी खारुताई आढळून येत आहे.
पुणे : आरक्षणासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील चौकातील उड्डाणपुलावरील सज्जावर चढून तरुणाने आंदोलन केले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून सज्जावर चढलेल्या तरुणाची सुखरुप सुटका करण्यात आली. तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पिंपरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर प्रातिनिधिक स्वरूपात जमा करण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे उद्या (शनिवारी) राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे बालेवाडी परिसरातील वाहतुकीत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चादरम्यान तणाव, पोलिसांकडून लाठीचार्ज. बांगलादेशमधील हिंदूंवरील हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी केलं होतं मोर्चाचं आयोजन
गेल्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका एकत्रच घेतल्या होत्या. तेव्हा जम्मू-काश्मीरच्या निवडणुका नव्हत्या. पण यावेळी चार इतर निवडणुकाही घ्यायच्या आहेत. जम्मू-काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड आणि दिल्ली. उपलब्ध मनुष्यबळ आणि साधनसामग्रीचा विचार करून आम्ही दोन राज्यांच्या निवडणुका एका वेळी घ्यायचा निर्णय घेतला आहे. दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात सध्या खूप पाऊस पडतो आहे आणि काही सण-उत्सवही आहेत – राजीव कुमार, केंद्रीय निवडणूक आयुक्त
https://x.com/ANI/status/1824391503755747786
विद्यापीठाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक भरतीमध्ये ३० कोटी रुपयांची वसुली करण्याचा उद्देश निश्चित करण्यात आला होता.
‘आयबीपीएस’च्या तारखांची घोषणा जानेवारी २०२४ मध्ये झाली असतानाही ‘एमपीएससी’ने तारखांचा घोळ केल्याची ओरड होत आहे.
पुणे : मेफेड्रोनची विक्री करणाऱ्य सराइताला अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवार पेठेत पकडले. त्याच्याकडून साडेसहा लाख रुपयांचे ३२ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. सागर जयसिंग चव्हाण (वय ३४, रा. गायत्री भवनशेजारी, रविवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पुणे : महाविद्यालयीन तरुणांना धमकावून त्यांच्याकडील तीन मोबाइल संच चोरट्यांनी चोरून नेण्यात आल्याची घटना कर्वे रस्त्यावरील गरवारे मेट्रो स्थानक परिसरात घडली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज मावळमध्ये पोहोचली आहे. तळेगाव येथील जाहीर सभेत मावळचे आमदार सुनील शेळके भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. २०१९ विधानसभेच्या आठवणी सांगत असताना शेळके यांच्या डोळ्यात अश्रू तरळे.
शिवस्वराज्य यात्रेच्या जाहीर सभेत शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केला होता. भोसरीमधील कर्तृत्ववान व्यक्तीचे लंडनमध्ये २०० कोटींचे हॉटेल असल्याचे विधान केल्याने एकच चर्चा रंगली होती. यावरून आमदार महेश लांडगे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
नवी मुंबई : शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून त्यावरील कारवाईत टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच फेरीवाल्यांना कारवाईचा आधीच सुगावा लागत असल्याने अडचणी येतात.
उरण : मुंबईतील ब्रिटिशकालीन ससून व भाऊचा धक्का बंदरात उतरविण्यात येणारी मासळी आता करंजा येथे उरणच्या करंजा बंदरात खरेदी-विक्री सुरू करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनी उरणचे आ. महेश बालदी यांच्या हस्ते काट्याचे पूजन करून ही सुरुवात करण्यात आली. या वेळी स्थानिक मच्छीमारांनी आनंद व्यक्त केला.
नागपुरात विविध आजारांची साथ असतांनाच मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर आहे.
पिंपरी : मुले होताना देवाची, अल्लाहाची काही कृपा नसते. नवऱ्याची कृपा असती म्हणून मुले होतात. लहान कुटुंब ठेवले तर योजनांचा फायदा होईल. मुलांना चांगले शिक्षण देऊ शकाल. स्वत:चे जीवन चांगल्या पद्धतीने जगता येईल. त्यामुळे सर्वांनी दोन मुलांवर थांबावे, असे आवाहन उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी केले.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावाच्या सांडव्यावर उभे राहून स्टंटबाजी करणे काही तरुणांना चांगलच भोवले आहे.
मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळीतील दोन पुनर्वसित इमारतींचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून या घरांचा ताबा देण्याचे म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केले होते. मात्र काही कारणाने कामास विलंब झाल्याने बीडीडीवासीयांची घराची प्रतीक्षा लांबली आहे. आता या ५५० घरांच्या ताब्यासाठी मार्च २०२५ चा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.
पटले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रथमच वर्ध्यात मुक्कामी येत आहेत.
दोन वर्षाचा असतानाच साहसला लहान मोठ्या वस्तूंचे निरीक्षण करण्याची आवड निर्माण झाली होती.