Maharashtra News Updates, 1 August 2022 : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे १५ तास चौकशी केल्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी छापेमारी करून साडेअकरा लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. यातील दहा लाखाच्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असल्याची माहितीही समोर येत आहे. संबंधित दहा लाख रुपये अयोध्या दौऱ्यातून उरलेले असून ती रक्कम पक्ष कार्यालयात जमा करण्यासाठी ठेवण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.

संजय राऊत यांची चौकशी सुरू असताना ईडी कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलं आहे. तसेच राऊतांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मैदानात उतरले आहेत. राऊत यांना अटक केल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. नाशिक, औरंगाबादनंतर ते पुण्यात देखील शक्तीप्रदर्शन करणार आहेत. तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील आणि देशातील अशा प्रमुख राजकीय घडामोडी आणि विविध अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर…

west bengal marathi news, west bengal teachers recruitment scam marathi news
शिक्षक भरती घोटाळ्याच्या छडीचा मार ममता बॅनर्जींना! न्यायालयीन निर्णयाने विरोधकांच्या हाती आयता मुद्दा
nashik water crisis marathi news, nashik water tankers marathi news
नाशिक जिल्ह्यात पाच लाख नागरिकांची टँकरवर भिस्त, लोकसभेच्या प्रचाराचा धुरळा अन प्रत्यक्षातील स्थितीत अंतर
eastern nagaland people refused to vote
वर्षांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता; ‘या’ गावाने का टाकला निवडणुकीवर बहिष्कार?
congress candidate rashmi barve caste certificate cancelled in just eight days after complaint lodge
राज्य शासनाच्या ‘गतिमान कारभारा’चे दर्शन! तक्रारीनंतर अवघ्या आठ दिवसांत रश्मी बर्वे यांची जात वैधता रद्द
Live Updates

Maharashtra News Today, 1 August 2022 : महाराष्ट्रातील सर्व प्रमुख अपडेट एका क्लिकवर…

20:13 (IST) 1 Aug 2022
मुख्यमंत्री शिंदे यांचे दिल्ली दौरे विकास कामांसाठी; चंद्रशेखर बावनकुळे यांची रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर सारवासारव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नवी दिल्लीतील सहापैकी चार दौरे हे विकास कामासाठी झाले आहेत. भाजप नेतृत्वामुळे मंत्रिमंडळ विस्तार थांबलेला नाही, अशा शब्दात भाजप नेते चंद्रकांत बावनकुळे यांनी राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची सारवासारव येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.

सविस्तर वाचा

20:09 (IST) 1 Aug 2022
एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर; दोन्ही गटांच्या समर्थकांकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उद्या, मंगळवारी एकाच वेळी पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने दोन्ही गटांच्या समर्थकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर या दोघांचा एकाच दिवशी होणारा हा पहिलाच दौरा असल्याने शहरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा

19:06 (IST) 1 Aug 2022
पाच उपनगरीय स्थानकातील प्रवास सुकर होणार; पश्चिम रेल्वेवर पाच पादचारी पूल

रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखणे आणि स्थानकातील प्रवास अधिकाधिक सुकर होण्यासाठी पश्चिम रेल्वेने पाच स्थानकात आणखी प्रत्येकी एक पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०३३ पर्यंत हे पूल बांधण्यात येतील. नुकतीच अंधेरी स्थानकात पश्चिम रेल्वेने स्कायवॉकची उभारणी केली.

सविस्तर वाचा

19:04 (IST) 1 Aug 2022
टिटवाळा, कोनमध्ये २३ वीज चोरांविरुद्ध कारवाई; १८ लाख ५० हजारांची वीजचोरी उघडकीस

महावितरणच्या टिटवाळा उप विभागातील बल्याणी आणि कोन (ता.भिवंडी) परिसरात वीजचोरी करणाऱ्या २३ जणांव कारवाई करण्यात आली. या कारवाईत १८ लाख ५० हजार रुपये किंमतीची वीजचोरी उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकाला यश आले. वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार बल्याणी येथील १७ जणांविरुद्ध मुरबाड पोलिस ठाण्यात तर कोन येथील ६ जणांविरुद्ध भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

18:55 (IST) 1 Aug 2022
यवतमाळ : संजय राऊत यांच्यावरील कारवाईविरोधात शिवसैनिक आक्रमक; रस्त्यावर उतरून केंद्र शासनाचा निषेध

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’ने कारवाई केल्यानंतर यवतमाळमधील शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, जिल्हा सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब मुनगीनवार, विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने शहरातील दत्त चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा

18:03 (IST) 1 Aug 2022
हडपसरमध्ये ‘एकनाथ शिंदे’ उद्यान !; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच उद्या उद्घाटन

महापालिकेच्या उद्यानाला नगरसेवकांच्या कुटुंबीयांची नावे देण्यात येऊ नयेत. राष्ट्रीय नेते, वनस्पती शास्त्रज्ञ आणि पर्यावरण शास्त्रज्ञांची नावेच उद्यानाला द्यावीत, असा महापालिकेच्या मुख्य सभेचा ठराव असतानाही तो डावलून हडपसरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने शिवसेनेच्या (शिंदे गट) माजी नगरसेवकाने उद्यान विकसीत केले आहे.

सविस्तर वाचा

18:00 (IST) 1 Aug 2022
सांगली : मुलीशी लग्न लावून देतो म्हणून शेतकरी तरूणाला पावणे दोन लाखास लुबाडले

लग्नाळू मुले गाठून पैशाच्या मोबदल्यात मुलीशी लग्न लावून देतो म्हणून १ लाख ७५ हजार रूपयांना खानापूर तालुक्यातील एका शेतकरी तरूणाला एका टोळींने गंडा घातला आहे. यातील नवरी मुलीला आईसह पोलीसांनी अटक केली आहे. वाचा सविस्तर बातमी...

17:45 (IST) 1 Aug 2022
अडीच वर्षांच्या संशोधनातून साकारला साडेचार हजार शब्दांचा ‘पावरी भाषाकोश’

गुणवत्ता असूनही आदिवासी विद्यार्थी केवळ भाषिक अडसरामुळे शालेय शिक्षणात मागे पडतात. आमदार डॉ. संजय कुटे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे ही अडचण आता कायमची दूर होणार आहे. गेल्या अडीच वर्षांच्या सखोल संशोधनातून ‘राइज फाऊंडेशन’ने पाच भागात ‘पावरी भाषाकोश’ साकारला असून विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर ७ ऑगस्टला जळगाव जामोद येथे याचे प्रकाशन होणार आहे. सुमारे साडेचार हजार शब्दांचा समावेश असणाऱ्या या भाषाकोशमुळे पावरा समाजातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी मातृभाषा, राज्यभाषा, देशभाषा अन् ज्ञानभाषा इंग्रजीतील शब्दसंग्रह उपलब्ध होणार आहे. वाचा सविस्तर बातमी...

17:31 (IST) 1 Aug 2022
दिवस बदलत असतात, यंत्रणांनी सुडबुद्धीने काम करू नये - अजित पवार

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांना अटक केली. मात्र, ईडीच्या या कारवाईवरून विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ही कारवाई सुडभावनेने केली जात असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. राज्याचे विरोधीत पक्ष नेते अजित पवार यांनी ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत यंत्रणांनी सुडभावनेने कोणीतीही कारवाई करू नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर वाचा

17:28 (IST) 1 Aug 2022
ठाकरे सरकारचे निर्णय रद्द करणे किंवा त्यांना स्थगिती देणे या शिंदे सरकारच्या भूमिकेला उच्च न्यायालयात आव्हान

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने घेतलेले महत्त्वाचे निर्णय रद्द करण्याच्या किंवा त्यांना स्थगिती देण्याच्या भूमिकेला वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या निर्णयांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

17:18 (IST) 1 Aug 2022
“...मग तुम्हाला ईडी कोठडी हवी कशाला”; अरविंद सावंतांची टीका

संजय राऊत यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत ईडीच्या कोठडी मागण्यावरून टीका केली आहे. जर संजय राऊत चौकशीत सहकार्य करत आहेत. तर मग तुम्हाला कोठडी हवी कशाला? अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली. राज्यापालांनी केलेलं व्यक्तव्य, जेपी नड्डा यांची प्रतिक्रिया आणि ईडीची कारवाई ही एकमेकांना पुरक असल्याचेही ते म्हणाले.

सविस्तर वाचा

16:56 (IST) 1 Aug 2022
कल्याण जवळील कांबा येथील ३७० एकर जमिनीवर राज्य शासनाचा ताबा

कल्याण जवळील कल्याण-मुरबाड रस्त्यावरील कांबा ग्रामपंचायत हद्दीमधील ३७० एकर जमीन सरकार जमा करण्याचे आदेश देऊन, या जमिनीच्या सात बारा उताऱ्यांवर महाराष्ट्र शासनाची नोंद करण्याचे आदेश कल्याणचे उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी दिले. एवढी मोठी जमीन सरकार जमा होण्याची ठाणे जिल्ह्यातील अनेक वर्षातील ही पहिलीच घटना आहे. वाचा सविस्तर बातमी...

16:47 (IST) 1 Aug 2022
दोनशे रुपये दिले नाही म्हणून महिलेवर पातीने वार; कल्याण रेल्वे स्थानका जवळील घटना

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळ उभी असलेल्या एका महिले जवळ दोन जण २०० रुपयांची मागणी करू लागले. या महिलेने त्याकडे दुर्लक्ष करुन तिने या दोघांची तक्रार मोबाईल वरुन आपल्या नातेवाईकांकडे केली. त्याचा राग आल्यामुळे संतप्त झालेल्या दोन्ही तरुणांनी जवळील धारदार पातेने (ब्लेड) महिलेवर वार करुन तिला गंभीर जखमी केले.

सविस्तर वाचा

16:39 (IST) 1 Aug 2022
राज्यपालांच्या निषेधार्थ पिंपरीत शिवसेनेची घोषणाबाजी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या तोंडून भाजपचे नेतेच बोलत आहेत. भाजपने राज्यपालांना दिल्लीत परत बोलावून घ्यावे आणि भाजपच्या प्रवक्ते पदावर नेमणूक करावी, अशी मागणी शिवसेनेचे पिंपरी शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेचा अवमान करणारे वक्तव्य केला असून शिवसेनेने राज्यपालांच्या निषेधार्थ पिंपरी चौकात आंदोलन केले.

सविस्तर वाचा

16:32 (IST) 1 Aug 2022
पुणे : पेठा, कोथरूड कर्वेनगरसह पूर्व भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

महाराष्ट्र राज्य वीज वितरण आणि पारेषण कंपनीच्या कामासाठी पर्वती जलकेंद्र आणि लष्कर जलकेंद्र येथील विद्युत आणि पंपिंग, स्थापत्य विषयक तातडीचे काम गुरुवारी (४ ऑगस्ट) करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन जलकेंद्र अंतर्गत येणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. वाचा सविस्तर बातमी...

16:15 (IST) 1 Aug 2022
ईडीने कोठडी सुनावल्यानंतर सुनील राऊत यांची प्रतिक्रिया

सुनिल राऊत म्हणाले, रविवारी सकाळी साडेसात वाजता माझ्या आणि संजय राऊत यांच्या घरी आले. त्यानंतर ते साडेचार वाजेपर्यंत ते चौकशी करत होते. ते ५ वाजता आम्हाला ईडीच्या कार्यालयाकडे घेऊन आले. साडेपाच-सहा वाजता आम्ही ईडी कार्यालयात पोहचलो. रात्री १२.४० मिनिटांनी ईडीने अटक केले असं सांगितलं.

आज सकाळपासून आम्ही न्यायालयात त्यांची वाट पाहत होतो. साडेबारा-पावणे एक वाजता त्यांना जे. जे. रुग्णालयात घेऊन गेले. तेथे त्यांना सेशन कोर्टात आणण्यात आले. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. ईडीने त्यांच्याकडे आठ दिवसांची कोठडी मागितली. मात्र, न्यायालयाने केवळ तीन दिवसांची कोठडी दिली. ४ ऑगस्टला त्यांना परत न्यायालयासमोर हजर करतील

16:07 (IST) 1 Aug 2022
Sanjay Raut ED Arrest: संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केल्यानंतर संजय राऊत यांना आज ईडी कोर्टात हजर करण्यात आलं. सुनावणीदरम्यान, ईडीने संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी अशी मागणी केली होती. यानंतर कोर्टाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली.

सविस्तर बातमी

15:45 (IST) 1 Aug 2022
संजय राऊतांना आठ दिवसांची कोठडी द्या - कोर्टात ईडीची मागणी

सक्तवसुली संचालनालयाने आठ दिवसांसाठी संजय राऊत यांची कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना केलीय.

15:44 (IST) 1 Aug 2022
नागपूर : आठवडाभरात चार निवासी डॉक्टरांना भटक्या कुत्र्यांचा चावा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या आठवड्याभरात भटक्या कुत्र्यांनी तब्बल चार निवासी डॉक्टरांना चावा घेतला. रविवारी दोन डॉक्टरांना चावा घेतल्यावरही महापालिकेचे अधिकारी कुत्र्यांचा बंदोबस्त करत नसल्याने मार्ड संघटनेने नाराजी व्यक्त केली. वाचा सविस्तर बातमी...

15:30 (IST) 1 Aug 2022
"शिवसेना संपत आलेला पक्ष", भाजपा अध्यक्ष नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसेना संपत आलेला पक्ष असल्याचं म्हणत देशात केवळ भाजपा पक्ष राहणार असल्याचं वक्तव्य केलं. यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. "महाराष्ट्रात शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असं नड्डा म्हणतात. मात्र, त्यांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करूनच पाहावा," असं थेट आव्हान ठाकरेंनी दिलं. ते सोमवारी (१ ऑगस्ट) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर बातमी...

15:26 (IST) 1 Aug 2022
संजय राऊत कोर्टात हजर

संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात आलं असून युक्तिवाद सुरु आहे.

15:13 (IST) 1 Aug 2022
पावसाची दडी कायमच; ऑगस्टमध्ये राज्यात ऊन- पावसाचा खेळ

मुंबईसह राज्यभरात बहुतांशी भागात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमान वाढले असून संपूर्ण ऑगस्ट महिना राज्यात ऊन – पावसाचा लपंडाव चालणार आहे. राज्यातील काही भागात कमी कालावधीत जास्त पाऊस पडेल. मात्र, पावसाचे प्रमाण जुलैपेक्षा कमी असेल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

सविस्तर वाचा

14:30 (IST) 1 Aug 2022
पिंपरी-चिंचवड : गणेश मूर्तीचे दर ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून पिंपरी-चिंचवडमधील गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. दोन वर्षे करोनामुळे म्हणावा तसा प्रतिसाद गणेश मूर्तिला मिळाला नाही. यावर्षी निर्बंध नसल्याने मूर्तिकार बापांची मूर्ती बनविण्यात मग्न झाले आहेत. परंतु, पेट्रोल, डिझेल दर कडाडल्याने याचा थेट फटका गणेश भक्तांना बसला आहे. कारण, गणेश मूर्तीच्या दरात तब्बल ३० ते ३५ टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. यामुळं गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.  वाचा सविस्तर बातमी...

14:28 (IST) 1 Aug 2022
स्वारगेट भागात मोटारीची काच फोडून लॅपटॅाप चोरीला

मोटारीची काच फोडून लॅपटॅाप, कागदपत्रे लांबविण्यात आल्याची घटना स्वारगेट भागातील प्राप्तीकर भवन कार्यालयासमोर घडली. याबाबत व्यावसायिक अच्युत कोठारी (वय ४२, रा. भूमकर चौक, ताथवडे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोठारी व्यावसायिक आहेत. कामानिमित्त ते स्वारगेट परिसरात आले होते. प्राप्तीकर कार्यालयासमोर कोठारी यांनी मोटार लावली होती.

सविस्तर वाचा

14:22 (IST) 1 Aug 2022
डोंबिवलीतील उल्हास खाडी किनारी खारफुटीची लागवड

जागतिक कांदळवन संवर्धन दिनाचे औचित्य साधून पर्यावरण दक्षता मंडळ डोंबिवली शाखेच्या वतीने डोंबिवली जवळील देवीचापाडा येथील खाडीत विविध जातीच्या खारफुटीच्या रोपांची लागवड करण्यात आली. दोन वर्षापूर्वी याच भागात लावण्यात आलेली खारफुटीची रोपे आता तरारून वर आली आहेत.

सविस्तर वाचा

13:49 (IST) 1 Aug 2022
अंबरनाथच्या बाह्यवळण रस्त्यावर पुन्हा अपघात; वाहनचालकांचा बेदरकारपणा वाढला

अंबरनाथ शहराच्या पूर्व भागातील नागरी वस्त्यांमधील अंतर्गत रस्त्यांवरची वाहतूक कोंडी कमी करणारा आणि शहराला नवी ओळख देणाऱ्या पहिल्या बाह्यवणळ रस्ता वाहनचालकांच्या बेजबाबदारपणामुळे अपघाताचे केंद्र बनला आहे. रविवारी मध्यरात्री पुन्हा एक अपघात या बाह्यवळण रस्त्यावर झाला. यात एक महिला प्रवासी जखमी झाली असून चारचाकी आणि रिक्षा यांच्यात धडक झाली. त्यामुळे वाहनचालकांचा बेदरकारपणा जीवावर बेतत असल्याचे दिसते आहे.

सविस्तर वाचा

13:48 (IST) 1 Aug 2022
डोंबिवली : श्रावणात विशेष मागणी असलेली रानकेळीची पाने महागली

श्रावण महिन्यात केळीच्या पानांना विशेष मागणी असते. या मागणीचा विचार करुन रानकेळीच्या पानांच्या किमती वाढल्या आहेत. रानकेळीची यापुर्वी पाच ते १० रुपयांमध्ये मिळणारी पाने आता २० रुपयांना तीन पाने मिळू लागली आहेत. पाने खरेदी करताना आता नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. वाचा सविस्तर बातमी...

13:40 (IST) 1 Aug 2022
लोअर परळ उड्डाणपुलाचे काम लांबणीवर; दुसरा गर्डर ऑगस्टऐवजी सप्टेंबरमध्ये बसविणार

लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेरील डिलायल रोड उड्डाणपुलावर दुसरा गर्डर बसवण्याचे काम लांबणीवर पडले आहे. ऑगस्टऐवजी सप्टेंबरमध्ये गर्डर बसविण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. पावसाळा आणि काही तांत्रिक अडचणींमुळे गर्डरचे काम पुढे ढकलण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

13:31 (IST) 1 Aug 2022
"आठ वाजताचा भोंगा बंद झाला," मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंगा बंद झाला अशा शब्दांत टोला लगावला आहे. औरंगाबादमध्ये जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी ‘भोंगा नीट करा रे’ असं सांगताना अप्रत्यक्षपणे संजय राऊतांवर टीका केली. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी आम्हालाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप त्यांनी केला.

सविस्तर बातमी

13:30 (IST) 1 Aug 2022
सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपाच राहणार - जे पी नड्डा

देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपाच राहणार असं विधान भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं आहे. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिलो, तर देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील असं ते म्हणाले आहेत. जे पी नड्डा बिहारमध्ये भाजपाच्या १४ जिल्हा कार्यालयांचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांनी शिवसेना संपत आलेला पक्ष असल्याचाही उल्लेख केला.

सविस्तर बातमी

13:29 (IST) 1 Aug 2022
बालकांमध्ये हात-पाय-तोंडाच्या संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ; मंकीपॉक्स सारखी लक्षणे असल्याने पालकांमध्ये चिंता

लहान मुलांच्या हात-पाय-तोंडाला (हॅण्ड-फूट-माऊथ) होणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण मुंबई, ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाढले असून याचे स्वरूपही दरवर्षी बदलत असल्याचे दिसून येत आहे. याची लक्षणे मंकीपॉक्ससारखी असल्यामुळे पालक चिंताग्रस्त असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

सविस्तर वाचा

12:57 (IST) 1 Aug 2022
पीएनबी आणि बँक ऑफ बडोदाचे नाव बदलण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि बँक ऑफ बडोदा (बीओबी) या बँकाच्या नावांतून प्रादेशिक नावे काढून टाकण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली. बँकांच्या या नावांमुळे त्या प्रादेशिक, राष्ट्रीय की आंतरराष्ट्रीय आहेत याबाबत नागरिकांमध्ये विशेषत: दुर्गम भागातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. वाचा सविस्तर बातमी...

12:47 (IST) 1 Aug 2022
पुणे : दरमहा हप्ता आणि फुकट दारू देण्यास नकार दिल्याने मद्यालयाची तोडफोड

दरमहा पाच हजार रुपयांचा हप्ता तसेच फुकट दारू देण्यास नकार दिल्याने टोळक्याने मद्यालयाची तोडफोड केल्याची घटना एनडीए रस्त्यावर घडली. या प्रकरणी एका सराईतासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी...

12:25 (IST) 1 Aug 2022
औरंगाबादनंतर उस्मानाबादच्या नामकरणालाही उच्च न्यायालयात आव्हान

औरंगाबादनंतर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयालाही उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. मात्र दोन्ही याचिकांवर न्यायालयाने सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच प्रकरणाची सुनावणी २३ ऑगस्ट रोजी ठेवली. वाचा सविस्तर बातमी...

12:10 (IST) 1 Aug 2022
राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन; जितेंद्र आव्हाड, परांजपेंना घेतलं ताब्यात!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज(सोमवार) सकाळी ठाण्यातील तीन हात नाक्याजवळ मुख्य महामार्गावर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरू झालं. वाचा सविस्तर बातमी...

11:48 (IST) 1 Aug 2022
राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदें’चं नाव, शिंदे गटाने दिली प्रतिक्रिया, म्हणाले “आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा…”

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रात्री उशिरा त्यांना अटक केली. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, ईडीने कारवाई करताना संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी छापा टाकून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. यातील १० लाखांच्या रकमेवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख केल्याची माहिती समोर येत आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर बातमी

11:46 (IST) 1 Aug 2022
कल्याण : पोस्टात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून दिवा येथील दोन जणांची फसवणूक

तुम्हा दोन जणांना भारतीय टपाल खात्यात नोकरीला लावतो. आमची टपाल विभागात ओळख आहे, असे खोटे सांगून दिवा येथील मुंब्रा देवी भागात राहत असलेल्या दीर, वहिनीकडून मुरबाड येथील दोन जणांनी नऊ लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. तर, दीड वर्ष झाले तरी नोकरी नाही आणि दिलेले पैसे परत मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या दोन जणांनी कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. वाचा सविस्तर बातमी...

11:04 (IST) 1 Aug 2022
नागपूर : विद्यापीठात नव्या सत्रापासून नवीन शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रम

केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी, धोरणाविषयी अद्यापही स्पष्टता नसल्याने अंमलबजावणी मागे पडली. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शतकोत्तर महोत्सव साजरा करताना नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी कंबर कसली आहे. या धोरणानुसार या सत्रापासून विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत बीबीएम, बीसीसीए व बी. कॉम.मध्ये नवीन धोरणानुसार अभ्यासक्रम लागू होईल. वाचा सविस्तर बातमी...

10:22 (IST) 1 Aug 2022
बदलापूर, अंबरनाथमध्ये पसरली राख; नागरिकांमध्ये चर्चांना उधाण

बदलापूर आणि अंबरनाथ शहराच्या बहुतांश भागात आज (सोमवार) सकाळी पसरलेल्या राखेमुळे एकच खळबळ उडाली. घराबाहेर मोकळ्या जागेत, रस्त्यांवर, पार्कींगमधील वाहनावर, झाडांवर सगळीकडे राखच राख दिसत होती. त्यामुळे हा काय प्रकार आहे, अशा चर्चा रंगू लागल्या. वाचा सविस्तर बातमी...

10:19 (IST) 1 Aug 2022
नागपूर : विद्यापीठात नव्या सत्रापासून नवीन शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रम

केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी, धोरणाविषयी अद्यापही स्पष्टता नसल्याने अंमलबजावणी मागे पडली. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शतकोत्तर महोत्सव साजरा करताना नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी कंबर कसली आहे. या धोरणानुसार या सत्रापासून विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत बीबीएम, बीसीसीए व बी. कॉम.मध्ये नवीन धोरणानुसार अभ्यासक्रम लागू होईल. वाचा सविस्तर बातमी...

10:03 (IST) 1 Aug 2022
पूर्व विदर्भात हिवताप, डेंग्यू रुग्णसंख्या चिंताजनक; गडचिरोलीत सर्वाधिक बाधित

नागपूर : पूर्व विदर्भात डेंग्यू व हिवतापाने डोके वर काढले आहे. येथे १ जानेवारी ते १४ जुलैदरम्यान डेंग्यूचे ७५ नवीन रुग्ण आढळले. तर हिवतापाचेही १ जानेवारी २०२२ ते २१ जुलै २०२२ पर्यंत २ हजार १४ रुग्ण नोंदवले गेले. डेंग्यूच्या एकूण रुग्णांपैकी ४१ रुग्ण गेल्या १४ दिवसांतील आहेत. सविस्तर बातमी

10:01 (IST) 1 Aug 2022
कोकणात सरासरीच्या तुलनेत ५७ टक्के पाऊस; दक्षिण कोकणाच्या तुलनेत यंदा उत्तर कोकणात सरासरी पावसाचे प्रमाण जास्त

अलिबाग-  कोकणाचे वार्षिक पर्जन्यमान २७५७ मिमी आहे. त्यातुलनेत पावसाळय़ाच्या पहिल्या दोन महिन्यात १५७६ मिमी पाऊस पडला आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा ५७ टक्के पावसाची नोंद झाली आहे.  दक्षिण कोकणाच्या तुलनेत यंदा उत्तर कोकणात पावसाची सरासरी अधिक आहे. कोकण विभागात सर्वाधिक पाऊस पालघर जिल्ह्यात पडला आहे. तर रत्नागिरीत कमी पावसाची नोंद झाली आहे. सविस्तर बातमी

 

mv sanjay raut

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे १५ तास चौकशी केल्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक केली आहे.