scorecardresearch

Maharashtra News : पुन्हा तारीख पे तारीख! शिवसेना पक्षनाव अन् धनुष्यबाण चिन्हासंदर्भात पुढील सुनावणी २० जानेवारीला

Marathi News Updates, 17 January 2023 : शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. आज याबाबत अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हबाबत आज निर्णय होणार का? हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Maharashtra News : पुन्हा तारीख पे तारीख! शिवसेना पक्षनाव अन् धनुष्यबाण चिन्हासंदर्भात पुढील सुनावणी २० जानेवारीला
राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी खालील लाईव्ह अपडेट्सचा आढावा…

Maharashtra Political Crisis Updates : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी रोजी होईल, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला.

दरम्यान, आज झालेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाने दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकूण घेतला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट पडलेलीच नाही. जी फूट पडल्याचं भासवलं जातं आहे कपोलकल्पित आहे असा दावा कपिल सिब्बल यांनी यावेळी केला. तसेच ही फूट ग्राह्य धरू नये आणि सर्वोच न्यायालयाचा निर्णय येईल पर्यंत कोणतही निर्णय घेऊ नये, अशी मागणी सिब्बल यांनी केली. तर आमच्याकडे आमदार आणि खासदार यांचं संख्याबळ आहे. त्यामुळे आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असं महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं. सर्वोच्च न्यायालयात अद्याप कोणाचंही निलंबन झालेलं नाही, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार जेठमलानी यांनी केली. यासंदर्भात आता शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

Live Updates

Maharashtra Political  Updates : शिवसेनेतील संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्या; ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

19:34 (IST) 17 Jan 2023
पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत; शिवाजीनगर, हडपसर भागात कोयत्यांनी वार केल्याचे प्रकार

शहरात कोयते उगारुन दहशत माजविण्याचे सत्र कायम आहे. शिवाजीनगर, हडपसर भागात टोळक्याने कोयते उगारुन दहशत माजविल्याच्या घटना उघडकीस आल्या. सतीश भीमा काळे (वय ४१, रा. जुना तोफखाना, शिवाजीनगर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तुषार काकडे, मोन्या कुचेकर, दीपू शर्मा , दाद्या बगाडे (सर्व रा. हडपसर ) यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

18:57 (IST) 17 Jan 2023
नवी मुंबई :पगारवाढ केला नाही म्हणून गोपनीय माहिती असलेल्या लॅपटॉपची चोरी

रबाळे एमआयडीसी मधील एका बेब डिझायनिंग कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांनी  लॅपटॉप चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनीही पगारवाढीवरून कंपनी मालकांशी वाद घातले होते. रबाळे एमआयडीसी मध्ये खालिद अब्दुल वाहिद यांनी चार महिन्यापूर्वी साँफ्ट वेअर डेव्हलपिंगची कंपनी सुरु केली आहे. सविस्तर वाचा…

17:46 (IST) 17 Jan 2023
सांगली : सतारीवरती मोर नाचरा हवा…मिरजेत बनवली मयुरपंखी रंगातील सतार

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा या लावणीचे शब्द मनात रूंजी घालावेत या पध्दतीने सतारीवरती मोर नाचरा हवा या शब्दांची आठवण यावी अशी मयुरपंखी रंगातील सतार मिरजेच्या युवा तंतुवाद्य कारागिरांनी बनवली आहे. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा ही गदिमांनी लिहीलेली आणि  सुलोचनादीदींच्या स्वरसाजाने मराठी मुलखात अजरामर केलेली लावणी. सविस्तर वाचा…

17:39 (IST) 17 Jan 2023
शिवसेना पक्षनाव अन् धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी

शिवसेना पक्षनाव अन् धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे.

17:26 (IST) 17 Jan 2023
शिवसेनेकडून होणारा युक्तीवाद जनतेच्या मनातला- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

शिवसेनेकडून होणारा युक्तीवाद जनतेच्या मनातून आला आहे. उद्धव ठाकरेंच्या मागे शिवसैनिक आहेत. फक्त आमदार आणि खासदार मिळून शिवसेना होतं नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

17:24 (IST) 17 Jan 2023
शिंदे गटाचे आमदार धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले – कपिल सिब्बल

शिंदे गटाच्या कागदपत्रांची सत्यता तपासण्यासाठी ओळखपरेड करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली आहे. तसेच शिंदे गटाचे आमदार धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले, असेही ते म्हणाले.

17:10 (IST) 17 Jan 2023
शिंदे गटाच्या कागदपत्रात त्रुटी नाही – महेश जेठमलानी

शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी युक्तीवादादरम्यान केला होता. हा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी खोडून काढला आहे. शिंदे गटाच्या कागदपत्रात कोणत्याही त्रुटी नाहीत, असं ते म्हणाले.

17:03 (IST) 17 Jan 2023
निवडणूक आयोगापुढे शिंदे गटाचा प्रतिवाद सुरू

निवडणूक आयोगापुढे ठाकरे गटाच्या युक्तीवादानंतर शिंदे गटाचा प्रतिवाद सुरू झाला आहे. ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी शिंदे गटाची बाजू मांडत आहेत. आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावाबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

16:50 (IST) 17 Jan 2023
शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे खोटी – कपिल सिब्बल

शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे. तसचे या कागदपत्रांची छाणणी करण्यासाठी ओळखपरेड करावी, अशी मागणीही सिब्बल यांनी केली आहे. दरम्यान, सिब्बल यांचा युक्तवाद पूर्ण झाला आहे.

16:45 (IST) 17 Jan 2023
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत कोणताही निर्णय देऊ नका – कपिल सिब्बल

आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून न्यायालयाचा निर्णयापर्यंत कोणताही निर्णय देऊ नका, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचेही सिब्बल म्हणाले.

16:44 (IST) 17 Jan 2023
कल्याणमध्ये रक्तदाब गोळ्यांचा बनावट साठा जप्त

सवलतीचे प्रलोभन, उंची भेटवस्तु, पर्यटनाच्या प्रलोभानापायी काही घाऊक औषध, किरकोळ औषध विक्रेते कल्याण शहरात टेल्मा एम या बनावट रक्तदाबाच्या गोळ्यांची विक्री करत असल्याचे या गोळ्यांच्या उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आले होते. या अधिकाऱ्यांनी खात्री पटल्यावर यासंबंधी पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाला ही माहिती दिली. सविस्तर वाचा…

16:35 (IST) 17 Jan 2023
शिवसेनेतील फूट म्हणजे कपोलकल्पितकल्पना – कपिल सिब्बल

उद्धव ठाकरेंची शिवसेनाही खरी शिवसेना आहे, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. तसेच शिवसेनेतील फूट म्हणजे कपोलकल्पितकल्पना आहे, त्यामुळे शिंदे गटातील फूट आयोगाने ग्राह्य धरू नये, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

16:33 (IST) 17 Jan 2023
निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाचा युक्तीवाद सुरू

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाचा युक्तीवाद सुरू झाला आहे. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेनाही खरी शिवसेना आहे, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

16:30 (IST) 17 Jan 2023
हळदी कुंकूच्या नावाने स्कूटी, सोन्याची अंगठी अन् वस्तुंची खैरात, पालिका निवडणुकांसाठी उमेदवार पुन्हा तयारीला!

गेल्या पावणे तीन वर्षांपासून रखडलेल्या कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी पुन्हा प्रचाराची तयारी सुरू केली असून मकर संक्रांत आणि हळदी कुंकू तसेच महिलांच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. बदलापुरात काही इच्छुकांनी महिलांसाठी चक्क स्कुटी, सोन्याची अंगठी आणि गृहोपयोगी वस्तू ठेवल्या आहेत. सविस्तर वाचा…

16:22 (IST) 17 Jan 2023
“पक्षावर दबाव आणण्यासाठी कट…”, नरेश मस्केंचा राजन विचारेंवर गंभीर आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्याविषयी कोकणवासीय म्हणून माझ्यासह खासदार राजन विचारे यांना त्यांच्याबद्दल आपुलकी होती. विचारे यांच्यासह मुंबईतील काही वरिष्ठ नेते मंडळींनी पक्षावर दबाब आणण्यासाठी कट रचून आमच्या खांद्यावर बंदूका ठेवल्या.

सविस्तर वाचा

16:13 (IST) 17 Jan 2023
शिवसेना पक्षनाव आणि धनु्ष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगापुढे सुनावणी

शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगापुढील सुनावणीला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक निर्णय देण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीच्या दृष्टीने ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे. या सुनावणी दरम्यान दोन्ही गटाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

15:41 (IST) 17 Jan 2023
अमरावती : आमदार नितीन देशमुख यांची एसीबी कार्यालयात चौकशी; शिवसेनेच्‍या ठाकरे गटाची घोषणाबाजी

बेहिशेबी मालमत्ता बाळगल्‍याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख हे आज अमरावतीच्या लाचलुचप प्रतिबंधक विभागाच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहे. यावेळी अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील आलेल्या ठाकरे गटातील शिवसेना कार्यकर्त्‍यांनी सरकारच्‍या तसेच बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. सविस्तर वाचा…

15:38 (IST) 17 Jan 2023
नागपूर : शिक्षक उमेदवार अडबाले यांनी मानले महाविकास आघाडीचे आभार, म्हणाले…

काँग्रेसने अनेक दिवसांच्या मंथनानंतर अखेर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा देत असल्याचे माजी मंत्री सुनील केदार यांनी आज जाहीर केले. त्यानंतर सुधाकर अडबाले यांनी महाविकास आघाडीचे आभार मानले.

सविस्तर वाचा

15:37 (IST) 17 Jan 2023
नागपूर : सुनील केदार यांची उमेदवारीबाबत मोठी घोषणा..; काँग्रेसचा शिक्षक मतदारसंघात यांना पाठिंबा

बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार महाविकास आघाडीच्या जागावाटपात नागपूर शिक्षक मतदासंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. येथे काँग्रेसतर्फे कोणीही उमेदवारी अर्ज केलेला नाही. त्यामुळे कोणत्यातरी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्याशिवाय काँग्रेसकडे पर्याय नाही.

सविस्तर वाचा

15:24 (IST) 17 Jan 2023
पुणे :शिवाजीनगर भागातील कोयता गँगवर कारवाई करा ! भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

शिवाजीनगर भागात भरदिवसा कोयते उगारुन दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दहशत माजविणाऱ्या सराइतांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे. आमदार शिरोळे यांनी पोलीस आयुक्तांची‌ भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सविस्तर वाचा…

15:10 (IST) 17 Jan 2023
भाईंदर: लंपी आजाराचा मीरा भाईंदर मध्ये शिरकाव, ८ गाईना आजराची लागण, तर इतर गाईना बंद करण्याचे पालिकेचे आदेश

मीरा भाईंदर मधील ८ गाईना लंपी आजाराची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शहरातील इतर सर्व जनावरांना गोठ्यात बंद ठेवण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहे. भाईंदर पश्चिम येथील केशवसूष्टीमध्ये मोठ्या संख्येने जनावरे पाळण्यात आली आहेत. यातील आठ गाईना लंपी आजाराची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. सविस्तर वाचा…

14:57 (IST) 17 Jan 2023
नागपूर : महाराष्ट्रात कॉंग्रेसची स्थिती चिंताजनक, माजी आमदाराच्या लेटर बॉम्बमुळे कॉंग्रेसमध्ये भूकंप

माजी आमदार आशीष  देशमुख यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे काँग्रेसचे अध्यक्ष  मल्लिकार्जुनजी खरगे यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील काँग्रेसची चिंताजनक परिस्थिती असल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली. सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने कॉंग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून  नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची दाणादाण उडत आहे. सविस्तर वाचा…

14:42 (IST) 17 Jan 2023
डोंबिवली : शालेय जीवनापासून वाहतूक नियमांचा स्वीकार करा, परिवहन अधिकारी रमेश कल्लुलकर यांचे आवाहन

डोंबिवलीतील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित मार्गदर्शन करताना परिवहन अधिकारी कल्लुलरकर यांनी सांगितले, शाळेत गेल्यानंतर क्रमिक अभ्यासक्रमा बरोबर विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम काय असतात याचा अभ्यास केला पाहिजे. रस्त्यावर लावलेली चिन्हे काय सुचवितात याची माहिती घेतली पाहिजे.

सविस्तर वाचा

14:03 (IST) 17 Jan 2023
जूनपर्यंत कल्याण-डोंबिवली शहरे कचरामुक्त?, कचरा निर्मुलनाचा आराखडा तयार

येत्या सहा महिन्याच्या कालावधीत कल्याण डोंबिवली शहरे कचरामुक्त करण्यासाठीचे नियोजन कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागाने तयार केले आहे. मागील तीन वर्षापासून शहरे कचरामुक्त करण्यासाठी विविध उपाय प्रशासनाकडून केले जात आहेत. त्याच उपक्रमाचा हा एक भाग असल्याचे घनकचरा विभागाच्या एका वरिष्ठाने सांगितले.

सविस्तर वाचा

13:36 (IST) 17 Jan 2023
राज्यात हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा; राज्यघटनेनुसार हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, तर राज्यकारभाराची भाषा – भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी

देशामध्ये सर्वाधिक लोकांची बोली असलेल्या हिंदीला महाराष्ट्र सरकारकडून राष्ट्रभाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्यात आली असून त्यासंदर्भात काढण्यात आलेल्या शासकीय अध्यादेशामध्ये हिंदी राष्ट्रभाषा असल्याचे ठळकपणे नमूद करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

13:07 (IST) 17 Jan 2023
पुणे : सायबर चोरट्याची नवी शक्कल, बनावट स्क्रीन शॉट पाठवून महिलेला साडेसात लाखांचा गंडा

संकेतस्थळावर घरातील जुने कपाट विक्रीची जाहिरात देणाऱ्या महिलेला सायबर चोरट्यांनी साडेसात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कपाट खरेदी करण्याचा बहाणा करणाऱ्या चोरट्याने महिलेला चुकून आठ लाख रुपये पाठविल्याचा बनावट स्क्रीन शाॅट पाठवून तिची फसवणूक केली.

सविस्तर वाचा

13:01 (IST) 17 Jan 2023
नाशिक पदवीधर निवडणूक: “विजयाची रॅली ‘मातोश्री’वर घेऊन जाणारच”; शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला विश्वास; म्हणाल्या, “सामान्य मुलीला…”

महाराष्ट्रात पदवीधर निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. त्यात नाशिक मतदारसंघ हा सर्वात चर्चेत आला आहे. कारण, नाशिकचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण, ऐनवेळी पक्षाचा आदेश झुगारून तांबे यांनी पुत्र सत्यजीत तांबेंचा अपक्ष अर्ज दाखल केला. तर, दुसरीकडे तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील, अशी थेट लढत होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत आपलाच विजय होईल, असा विश्वास शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला आहे. टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

12:56 (IST) 17 Jan 2023
वांद्रे समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन

वांद्रे कार्टर रोड येथील माउंट मेरी चर्चसमोरील समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी डॉल्फिनचा मृतदेह आढळला. समुद्रीप्रेमींनी या घटनेची माहिती वन विभाग आणि कांदळवन विभागाला दिली. त्यानंतर घटनास्थळी वन विभागाच्या पथकाने मृत डॉल्फिनचा शोध घेण्यास सुरुवात केली.

सविस्तर वाचा

12:49 (IST) 17 Jan 2023
नाशिक पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा कोणाला? अजित पवार म्हणाले, “आम्ही…”

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कारण, नाशिकचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण, ऐनवेळी पक्षाचा आदेश झुगारून तांबे यांनी पुत्र सत्यजीत तांबेंचा अपक्ष अर्ज दाखल केला. तर, दुसरीकडे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील, अशी थेट लढत होणार आहे. तसेच या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणाला असेल? याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. दरम्यान, यासंदर्भात अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सविस्तर वाचा

12:21 (IST) 17 Jan 2023
सह्याद्री डोंगर रांगांमधून ठाणे-शहापूर-नगर महामार्गासाठी जोरदार हालचाली, मुंबई-नाशिक-माळशेज घाट मार्गाचे अंतर होणार कमी

ठाणे आणि अहमदनगर जिल्हे जोडणारा महत्वाच्या महामार्ग बांधणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मागील अनेक वर्षाचा हा रखडलेला रस्ता पूर्ण झाला तर मुंबईतून नाशिकमार्गे किंवा माळशेज घाटातून अहमदनगरला जाण्याऐवजी प्रवाशांना मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावरील शहापूर येथून धसई, शेणवे, डोळखांब ते अकोले मार्गे थेट अहमदनगर जिल्ह्यात जाता येणार आहे.

सविस्तर वाचा

12:10 (IST) 17 Jan 2023
Maharashtra News Live : लातूरच्या मुरुडमध्ये बस अपघात; ४० जण जखमी, १४ गंभीर

लातूरच्या मुरुडमध्ये भीषण बस अपघात झाला आहे. या अपघातात ४० जण जखमी झाले असून त्यापैकी १४ गंभीर आहेत. जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

11:42 (IST) 17 Jan 2023
ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा गौप्यस्फोट, म्हणाले “नरेश म्हस्केंचा काँग्रेस पक्ष प्रवेश…”

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे काँग्रेस पक्षात होते, त्यावेळेस त्यांच्या उपस्थितीत नरेश म्हस्के हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे दिली होती.

सविस्तर वाचा

11:28 (IST) 17 Jan 2023
मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड मोर्चा

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे कर्ज वसुलीसाठी जमिनी लिलाव करण्याच्या सुरु झालेल्या प्रक्रियेविरोधात येथे काढलेला शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा शासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर स्थगित करण्यात आला आहे. या संदर्भातील मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनास एक महिन्याची मुदत दिली आहे.

सविस्तर वाचा

11:20 (IST) 17 Jan 2023
“माझा विजय निश्चित होता” माघार घेणारे शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांचे विधान; म्हणाले “पक्षाच्या आदेशापुढे…”

विधान परिषद निवडणुकीवरून सध्या राज्यातले राजकारण तापले आहे. नाशिकमध्ये काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडून शुभांगी पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

सविस्तर वाचा

10:54 (IST) 17 Jan 2023
“अडीच लाख कोटींची गुंतवणूक डोळ्यासमोरून निघून गेली, तेव्हा…”; डाव्होस दौऱ्यावरून संजय राऊतांचं शिंदे सरकारवर टीकास्त्र

स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये सुरू असलेल्या गुंतवणूकदारांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक होणार आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान, यावरून संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत होणाऱ्या सुनावणीसंदर्भातही प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

10:45 (IST) 17 Jan 2023
“शिवसेना कोणाची हा तांत्रिक मुद्दा आयोगासमोर उपस्थित होऊ शकतो. मात्र, महाराष्ट्रात..”; निवडणूक आयोगातील सुनावणी पूर्वी संजय राऊतांची प्रतिक्रिया

शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात आज निवडणूक आयोगसमोर सुनावणी होणार आहे. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शिवसेना कोणाची हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगासमोर उपस्थित होऊ शकतो. मात्र, शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित होऊ शकत नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी आहे. शिवसेना एकच आहे”, असे ते म्हणाले. सविस्तर वाचा

10:44 (IST) 17 Jan 2023
लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की जागतिक दहशतावादी म्हणून घोषित

जगभरातील दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राने मोठा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्राने लष्कर ए तोयब या दहशतवादी संघटनेचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. या निर्यासोबतच अब्दुल मक्कीची संपत्ती जप्त करण्यात येणार असून प्रवासबंदी तसेच शस्त्र बाळगण्यावर बंदी असे निर्बंद अब्दुल मक्कीवर लादण्यात आले आहेत. वाचा सविस्तर

10:38 (IST) 17 Jan 2023
‘समृद्धी’ महामार्ग उठला नागपूरकरांच्या जीवावर!, अठरा दिवसांत आणखी दोघांचा मृत्यू

२८ डिसेंबरला वाशीमजवळ झालेल्या अपघातात नागपूरकर माय-लेकींचा मृत्यू झाला. सोमवारी बुलढाणा जिल्ह्यानजीक झालेल्या अपघातात नागपूरच्या दोघांचा मृत्यू झाला. ते अवधूत नगरचे रहिवासी असून त्यांची नावे गौरव खरसान, अंकित खैरकर अशी आहेत.

सविस्तर वाचा

10:33 (IST) 17 Jan 2023
VIDEO : “ए, गई बोला ना…काय पो छो..” म्हणत येवल्यातील पतंगबाजीचा आतषबाजीने समारोप

पारंपरिक हलगी वाद्यावर ताल धरत गच्चीवर उत्साह पसरलेला असतो. सोबतीला फाफडा, जिलेबी, वडापाव, मिठाई अशा वेगवेगळ्या खाद्य पदार्थांवर ताव मारला जातो. मुख्य म्हणजे हा पतंगोत्सव तीन दिवस चालतो. मकरसंक्रांतीच्या आधी आणि नंतर हा उत्सव सुरू राहतो. पतंगबाजी करणाऱ्यांचे गाव ही येवल्याची ओळख. यंदाही या उत्सवाची धुम कायम राहिली.

सविस्तर वाचा

10:24 (IST) 17 Jan 2023
धावत्या पीएमपी बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कोथरुड पोलिसांकडून एकाला अटक

धावत्या पीएमपी बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एकाला कोथरुड पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रेम चंदू पवार (वय २९, रा. घोटावडे फाटा, पिरगुंट ता. मुळशी, जि. पुणे) याला अटक करण्यात आली. तक्रारदार मुलगी पीएमपी बसने प्रवास करत होती.

सविस्तर वाचा

10:07 (IST) 17 Jan 2023
नागपूर : नायलॉन मांजाने छाटले एकाच दिवशी दहा पक्ष्यांचे पंख

नायलॉन मांजावर अंकुश लावण्यात प्रशासनाला आलेले अपयश माणसांचाच नाही तर पक्ष्यांचा देखील बळी घेत आहे. मकरसंक्रांतीच्या सुरुवातीलाच उपराजधानीत दोन बळी गेले आणि काही जखमी देखील झाले. तीच पुनरावृत्ती पक्ष्यांबाबतही झाली असून मकरसंक्रांतीच्या पहिल्याच दिवशी सेमिनरी हिल्सवरील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात कबूतर, होरी, घुबड, वटवाघूळ, बगळा, रात ढोकरी, वेडा राघूसह सुमारे दहा जखमी पक्ष्यांना उपचारासाठी आणण्यात आले.

सविस्तर बातमी

10:01 (IST) 17 Jan 2023
Video : ती कुत्र्यांना खायला देत होती अन्..; चंदीगढमधील अपघाताचं थरकाप उडवणारं CCTV फूटेज आलं समोर

चंदिगढमध्ये भटक्या कुत्र्यांना खायला देणाऱ्या तरुणीला कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना १६ जानेवारी रोजी समोर आली . या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अपघातग्रस्त तरुणीचे नाव तेजस्विता असून सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेसंदर्भात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. मात्र तेजस्विताच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. वाचा सविस्तर

09:59 (IST) 17 Jan 2023
ललित मोदींनी मागितली मुकुल रोहतगींची जाहीर माफी, म्हणाले; “रागाच्या भरात…”

आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेले ललित मोदी यांनी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून धमकी दिली. मला फरार म्हणू नका. तुमच्यासारख्या लोकांना लाखोवेळा खरेदी करून विकू शकतो. तुम्ही माझ्यासाठी मुंगीसारखे आहात, अशी धमकीच ललित मोदी यांनी दिली होती. मोदी यांच्या या पोस्टमुळे चांगलाच वाद निर्माण झाला. असे असतानाच आता मोदी यांनी इन्स्टाग्रामार्फतच मुकुल रोहतगी यांची माफी मागितली आहे. वाचा सविस्तर

09:55 (IST) 17 Jan 2023
नागपूर : गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात मादी बिबटं मृतावस्थेत

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्रशासनाचा हलगर्जीपणा तेथील वन्यप्राण्यांच्या जीवावर उठला आहे. सोमवारी सायंकाळी पिंजऱ्यातच ‘चांदणी’ नावाच्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे पुन्हा एकदा प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर टीकेची झोड उठली आहे.

सविस्तर वाचा

09:53 (IST) 17 Jan 2023
पुण्यात ‘पडद्या’विना नाटकाचा प्रयोग करण्याची रंगकर्मींवर वेळ, नेहरू सांस्कृतिक भवनमधील यंत्रणा निकामी

सारे प्रेक्षकांसमोर सादर व्हावे, अशीच मानसिकता असलेल्या पुणे महापालिकेच्या पारदर्शी कारभाराचे वास्तव समोर आले आहे. नाटक सुरू होण्याचे आणि संपण्याचे सूचन करण्यासाठी वापरला जाणारा पडदा नादुरुस्त झाल्यामुळे घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनमध्ये ‘पडद्या’विना नाटकाचा प्रयोग करण्याची वेळ रंगकर्मींवर आली आहे.

सविस्तर वाचा

09:50 (IST) 17 Jan 2023
पुणे : यंदा घरांच्या किमतींमध्ये वाढ?, सर्वेक्षणातील निष्कर्ष

यंदाच्या वर्षभरात घरांसाठीची मागणी आणि कच्च्या मालाच्या खर्चातील वाढीमुळे देशभरातील घरांच्या किमतींमध्ये वाढ होण्याची अपेक्षा बांधकाम क्षेत्रातील ५८ टक्के विकासकांना आहे. तसेच संभाव्य मंदीचा परिणाम व्यवसायावर होण्याची शक्यता ५० टक्के विकासकांना वाटत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले.

सविस्तर वाचा

09:49 (IST) 17 Jan 2023
नागपूर शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत; २२ उमेदवार रिंगणात, पाच उमेदवारांचे अर्ज मागे

विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. २७ पैकी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने २२ उमेदवार रिंगणात असून बहूरंगी लढत होणार आहे. यात भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले, आम आदमी पक्षाचे डॉ. देवेंद्र वानखेडे, बहुजन समाज पक्षाच्या निमा रंगारी आदी प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. ३० जानेवारीला मतदान होणार आहे.

सविस्तर बातमी

09:49 (IST) 17 Jan 2023
पुणे : रिअल इस्टेट मध्यस्थ कायद्याच्या चौकटीत, रेराकडून प्रमाणपत्र अनिवार्य

मालमत्ता खरेदी-विक्री मध्यस्थ (रिअल इस्टेट एजंट) आता कायद्याच्या चौकटीत येणार आहेत. या मध्यस्थांना महारेराकडे नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करणाऱ्या मध्यस्थांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक टाळता येणार असून या मध्यस्थांविरोधात रेराकडे दादही मागता येणार आहे.

सविस्तर वाचा

09:48 (IST) 17 Jan 2023
पुणे : नवजात बालकांसाठी मानवी दुग्धपेढी, मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांना आईचे दूध मिळणे होणार सोपे

शहरातील स्तनपान करू न शकणाऱ्या माता आणि मुदतपूर्व जन्माला आलेली बालके किंवा ज्यांना आई नाही अशी बालके यांना आईचे दूध मिळणे आता सहज शक्य होणार आहे. वाकड येथील सूर्या हॉस्पिटलने नुकतीच मानवी दुग्धपेढी (ह्यूमन मिल्कबँक) सुरू केली असून शहरातील ही सातवी मानवी दुग्धपेढी ठरली आहे.

सविस्तर वाचा

09:45 (IST) 17 Jan 2023
दुपारी ४ वाजता होणार सुनावणी

शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगापुढे दुपारीच ४ वाजता सुनावणी होणार आहे. यासाठी दोन्ही गटाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

uddhav-thackeray-speech-dussehra-melava-2022-shivsena

उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

First published on: 17-01-2023 at 09:35 IST

संबंधित बातम्या