Maharashtra Political Crisis Updates : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी रोजी होईल, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला.

दरम्यान, आज झालेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाने दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकूण घेतला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट पडलेलीच नाही. जी फूट पडल्याचं भासवलं जातं आहे कपोलकल्पित आहे असा दावा कपिल सिब्बल यांनी यावेळी केला. तसेच ही फूट ग्राह्य धरू नये आणि सर्वोच न्यायालयाचा निर्णय येईल पर्यंत कोणतही निर्णय घेऊ नये, अशी मागणी सिब्बल यांनी केली. तर आमच्याकडे आमदार आणि खासदार यांचं संख्याबळ आहे. त्यामुळे आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असं महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं. सर्वोच्च न्यायालयात अद्याप कोणाचंही निलंबन झालेलं नाही, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार जेठमलानी यांनी केली. यासंदर्भात आता शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

Live Updates

Maharashtra Political  Updates : शिवसेनेतील संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्या; ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

09:43 (IST) 17 Jan 2023
शिवसेना पक्षनाव आणि धनु्ष्यबाण चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगापुढे सुनावणी

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीच्या दृष्टीने ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे.

उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.