Latest Marathi News Updates : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन तीव्र केले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यातील नागठाणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोलनाका परिसरात महामार्ग रोको आंदोलन सुरू आहे. त्यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या ४५ तासांहून अधिक काळ विस्कळीत झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रातील राजकारण, आंदोलन, दुष्काळ आणि पाणीटंचाईसह विविध जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहुयात.
गोकुळ दूध संघ वादात राहुल गांधींची एन्ट्री; शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल सतेज पाटलांकडून आभार
गोकुळमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी निवडणुकीत पराभव केल्यानंतर सत्तेत टिकून राहण्यासाठी नियमांमध्ये फेरफार करून बहुमत चोरण्याचा संतापजनक प्रकार भाजपाने केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे केला आहे. भाजपाच्या या कारभारावर कडाडून टीका करत त्यांनी दूध उत्पादकांच्या मतांची ही सरळ सरळ चोरी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राहुल गांधींनी कोल्हापूरच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांची बाजू घेतल्याबद्दल काँग्रेस नेते व आमदार सतेज पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
दिग्गज अभिनेत्यांचा उल्लेख करत किरीट सोमय्यांचे महापालिकेला पत्र; उघड्यावरील कुर्बानीवर बंदीची मागणी
बकरी ईदच्या सणादरम्यान उघड्यावर आणि रहिवासी भागात होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानीमुळे निर्माण होणारी अस्वच्छता, प्रदूषण आणि क्रौूरता रोखण्यासाठी कठोर नियमावली व कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगरपालिकेला पत्र लिहून केली आहे. या संदर्भातील एक पत्र त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. आपल्या पत्रात आणि ट्विटमध्ये किरीट सोमय्या यांनी दिया मिर्झा, नसीरुद्दीन शाह, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान आणि शबाना आझमी यांसारख्या नामवंत सेलिब्रिटींचा उल्लेख करत, महापालिकेने या विषयावर जाहीर आवाहन जारी करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल; स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे एसटीच्या तब्बल १६६ फेऱ्या रद्द
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरू असलेल्या आक्रमक आंदोलनामुळे ऐन दिवाळीच्या सणात परिवहन विभागाचे वाहतूक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. कोल्हापूरहून पुणे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तब्बल १६६ एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या आंदोलनामुळे एसटी महामंडळाला आतापर्यंत सुमारे ५ कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला असून, दिवाळीच्या तोंडावर प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांचा बोनस जाहीर; प्रताप सरनाईक यांची घोषणा
एसटी कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर राज्य परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळ) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून १० हजार रुपये दिले जाणार असल्याची घोषणा आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तसेच, याशिवाय कर्मचाऱ्यांना २२ हजार रुपयांपर्यंतची उचल घेण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली असून, या निर्णयामुळे राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दणका; सणासुदीच्या काळात ९५४ परवाने निलंबित
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर धाडी व धडक कारवाई सत्र राबवण्यात येत आहे. १ सप्टेंबरपासून प्रशासनाने तब्बल ९,६६७ आस्थापनांची कसून तपासणी केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४,६०३ आस्थापनांना सुधारणांच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या कठोर कारवाईदरम्यान ९५४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर २५ परवाने रद्द करण्यात आले आहेत.
नागपुरात महायुतीची पदयात्रा; ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’चा नारा
भाजप महायुतीच्या वतीने नागपुरात ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ पदयात्रेचे करण्यात आले आहे. या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले आहेत. यशवंत स्टेडियम येथून संविधान चौकापर्यंत ही पदयात्रा काढण्यात येणार असून, त्यापूर्वी यशवंत स्टेडियमवर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
Today’s News Updates, 5 November 2026
चर्चेअभावी ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक; आज कोल्हापूर, सांगली, सातारा बंदची हाक, रस्त्यावरच वसुबारस साजरी
मालेगाव तालुक्यात पाणीटंचाईवर उतारा ! दादा भुसे यांच्याकडून १०१ टँकर्सचे लोकार्पण; दुष्काळी गावांना मिळणार दिलासा
छोटा शकीलच्या मेव्हण्याच्या पत्नीच्या नावावरील डोंगरीतील इमारत ईडीकडून तात्पुरती जप्त; चार कोटींची मालमत्ता
ऊसदर प्रश्नी आयोजित संयुक्त बैठक निष्फळ
नागपूर: भाजपच्या पदयात्रेमुळे शहरभर वाहतूक कोंडी, नागरिक संतप्त
गडचिरोली : सक्तीने भूसंपादन करणार नाही; शेतकऱ्यांच्या संमतीनेच पुढील प्रक्रिया, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी भेट; पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये उचल, महागाई भत्ता ६० टक्क्यांवर
सचिन वाझेबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; जामीन नाहीच, कारागृहातच मुक्काम
अमरावती जिल्हा वार्तापत्र : राष्ट्रसंतांच्या मौन श्रद्धांजली कार्यक्रमातील निवेदनावरून वाद पेटला; तरूणाईच्या आंदोलनाला ‘अराजकता’ म्हणण्यावर आक्षेप
दिवाळीसाठी मिठाई खरेदी करताय? तुकाराम मुंढेंचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन!
शरद पवार आमच्यासोबत आले असते, तर ते राष्ट्रपती झाले असते; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुप्रिया सुळे यांना संधी मिळू शकते - रामदास आठवले
चॉकलेटच्या वेष्टनातून गांजाची तस्करी; मुंबई विमानतळावर भूतानमधील दोन नागरिकांना अटक, बँकॉकहून आलेल्या प्रवाशांकडून तीन किलो गांजा जप्त
अंबोली येथील २०११ सालचे कीनन-रुबेन हत्या प्रकरण; उच्च न्यायालयाकडून तिघांचे दोषत्व कायम, दोघांची हत्येच्या आरोपातून मुक्तता
"सतेज पाटील तरबेज, आम्ही भोळीभाबडी माणसं", हसन मुश्रीफ यांचं खोचक प्रत्युत्तर; 'गोकुळ' निकालाचा वाद पेटला!
राहुल गांधींची 'गोकुळ' निकालावर पोस्ट; म्हणाले, "४ संचालक घुसवा, १२ चे १६ करा आणि…"
"'गोकुळ'च्या सदस्यांनी अजब कौल दिला", प्रशासक नियुक्तीचा नियम सांगत हसन मुश्रीफांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
एमपीएससी भरती परीक्षाबाबत व्ही. राधा समितीचा अहवाल सादर; वयोमर्यादेत सवलत अन् परीक्षा प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण शिफारशी
आता ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
मेयोत डॉक्टरांवर हात उचलण्याचे धाडस कुणाचे? गंभीर रुग्णाला आधी तपासल्याने निवासी डॉक्टरला मारहाण
अपघात मृत्यू दर कमी करण्यात नागपूर राज्यात दुसरे; गडचिरोली जिल्हा अव्वल स्थानावर!
लाडक्या बहिणी फडणवीस सरकारवर नाराज; ८१ रुपयांचा उल्लेख करत मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यानेच दिला धोक्याचा इशारा
मुंबई पालिकेचा पहिला टेरेस स्विमिंग पूल घाटकोपरमध्ये; ओडियन क्रीडा संकुलात अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना
काँग्रेसमधली एक नियुक्ती अन् जिल्हाभर चर्चा; '…मग काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय?', पक्षातूनच सवाल!
Gokhale Institute Of Politics And Economics !दुष्काळाचे अर्थकारण उलगडणार; शेतकऱ्यांच्या आर्थिक-सामाजिक स्थितीचा गोखले संस्थेकडून संशोधनात्मक अभ्यास

महाराष्ट्र लाइव्ह न्यूज
