Maharashtra Breaking News Updates : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या उर्वरित १० जागांसाठी आज, २ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत २७ उमेदवार रिंगणात असून, जिल्ह्यातील १४ तालुके आणि नगर शहरातील ३३ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. यापूर्वी २१ पैकी ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उद्या, ३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील राजकारण, आंदोलन, दुष्काळ, निवडणुका आणि पाणीटंचाईसह विविध जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहुयात.

शरद पवारांचा बारामतीसह पुणे जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौरा स्थगित

बारामतीसह पुणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नियोजित दुष्काळ पाहणी दौरा स्थगित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेबुब शेख यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दिया मिर्झाच्या दिवाळीतील फटाके न फोडण्याच्या आवाहनावरून वाद; भाजपाच्या टीकेनंतर मुंबई महापालिकेने हटवला व्हिडीओ

मुंबई महापालिकेने दिवाळीत फटाके न फोडता ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळण्याचे आवाहन करणारा अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी या व्हिडीओवर आक्षेप घेत, “दिवाळी कशी साजरी करावी याचे धडे आम्हाला देण्याची गरज नाही,” अशी टीका केली. त्यानंतर महापालिकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडीओ हटवला. व्हिडीओ हटवण्यामागचे अधिकृत कारण मात्र महापालिकेने स्पष्ट केलेले नाही.

ठाणे, सातारा, बीड आणि सोलापूर जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलमुळे खळबळ

ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाला ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. न्यायालयातील सर्व कर्मचारी, वकील आणि नागरिकांना इमारतीबाहेर काढण्यात आले असून, संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. न्यायालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बॉम्बशोधक पथकाकडून तपास सुरू आहे. दरम्यान, सातारा, बीड आणि सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयांनाही अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल आल्याची माहिती आहे.

दिया मिर्झाच्या व्हिडीओवरून रितू तावडेंची टीका; म्हणाल्या, ‘हिंदुत्वाच्या विरोधात कोणी नारा दिला तर १०० टक्के विरोध करू’

दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झाच्या व्हिडीओवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर भाजपा नेत्या रितू तावडे यांनी प्रतिक्रिया दिली. “हिंदुत्वाच्या विरोधात कोणी जर नारा दिला, तर त्याला आम्ही १०० टक्के विरोध करू,” असे त्या म्हणाल्या. तसेच, दिया मिर्झाच्या पूर्वीच्या वक्तव्यांचा संदर्भ देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही त्यांनी वक्तव्ये केली असल्याचा आरोप तावडे यांनी केला. “त्यांची प्रत्येक भूमिका आम्हाला हिंदुत्वाच्या विरोधात असल्याचे दिसते,” असेही त्या म्हणाल्या.

अभिनेता इम्रान खानला हायकोर्टाचा दिलासा; ‘लिव्ह इंडिया’ नोटीसवरील स्थगिती ७ डिसेंबरपर्यंत कायम

एसआयआर विरोधातील आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता इम्रान खान यांना सुनावले. इम्रान खान हे अमेरिकेचे नागरिक आणि ‘ओसीआय’ कार्डधारक असल्याने त्यांना भारतीय नागरिकांप्रमाणे राजकीय आंदोलनात सहभागी होता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यापुढे अशा आंदोलनांत सहभागी होणार नसल्याचे हमीपत्र आणि बिनशर्त माफी त्यांनी न्यायालयात सादर केली. दरम्यान, त्यांना देश सोडण्याच्या नोटीसवरील स्थगिती ७ डिसेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, बारामतीसह पुणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने त्यांचा नियोजित दुष्काळ पाहणी दौरा स्थगित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेबूब शेख यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती.

Live Updates

Today’s Live News Updates, 2 November 2026

19:21 (IST) 2 Nov 2026

नाशिक, इगतपुरीसाठी पिण्याच्या पाण्याचे चुकीचे आरक्षण, मराठवाड्यातून आक्षेप; कालवा सल्लागार समितीमध्ये चूक दुरुस्तीचा ठराव

वैजापूर आणि गंगापूर या दोन तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर धरणातून जलद गती कालव्याने पाणी द्यावे म्हणून वैजापूरमधील शेतकरी उपोषणास बसले होते. ...सविस्तर बातमी
19:07 (IST) 2 Nov 2026

न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी, कामकाज चालू असतानाच आला ईमेल; अमरावतीत खळबळ!

राज्यातील बीड, रत्नागिरीसह अनेक ठिकाणी न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची माहिती आहे. ...अधिक वाचा
18:55 (IST) 2 Nov 2026

सिडको महागृहनिर्माणात पाणीटंचाईचा उद्रेक, अवघे २० मिनिटे पाणी; तळोजातील रायगड इस्टेटच्या रहिवाशांचा सिडको भवनावर मोर्चा

दिवसातून केवळ २० मिनिटे सदनिकेच्या नळातून पाणी मिळत असल्याने जगावे कसा असा प्रश्न या रहिवाशांना पडला आहे. ...सविस्तर बातमी
18:54 (IST) 2 Nov 2026

भाजपच्या आंदोलनाला शिवसेनेने दाखवला ‘आरसा’

आंदोलनांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने सोमवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात आंदोलन पुकारले. ...अधिक वाचा
18:45 (IST) 2 Nov 2026

सांगली: उद्या सकाळी कळणार जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गुलाल कुणाचा ?

मतमोजणीसाठी सर्व तयारी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. ...सविस्तर वाचा
18:37 (IST) 2 Nov 2026

वसई: माणिकपूर पोलीस चौकीसमोरच वेश्यांचा वावर; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

पोलीस चौकी सतत बंद असल्यामुळे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला थेट पोलीस चौकीसमोरच वावरू लागल्या आहेत. ...सविस्तर बातमी
18:24 (IST) 2 Nov 2026

ऊसाला ५ हजार रुपये पहिली उचल मिळण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात शरद जोशी विचार मंचचे बेमुदत उपोषण सुरू

शरद जोशी विचार मंचच्या वतीने ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी कोल्हापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. ...सविस्तर वाचा
17:31 (IST) 2 Nov 2026

इम्रान खानला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले; माफीनाम्यासह पुन्हा चूक करणार नसल्याचे दिले हमीपत्र

भारतीय नागरिकाने अमेरिका अथवा जगातील अन्य कोणत्याही देशात अशाप्रकारे आंदोलनात सहभाग घेतला असता आणि तेथील सरकारवर टीका केली असती, तर लगेचच त्याची भारतात रवानगी झाली असती, असेही न्यायालयाने सुनावले. ...अधिक वाचा
17:12 (IST) 2 Nov 2026

नांदेड जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; परिसरात ‘हाय अलर्ट’

सोमवारी नांदेड आणि हिंगोलीसह राज्यातील अनेक न्यायालयांना ई-मेल द्वारे बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्यांचे संदेश प्राप्त झाले. ...अधिक वाचा
17:12 (IST) 2 Nov 2026

अरण्यऋषी मारुती चितमपल्लींचे संचित आता सर्वांसाठी खुले, सोलापुरात भव्य संदर्भ ग्रंथालय

ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते ५ नोव्हेंबरला सकाळी ९.३० वाजता या ग्रंथालयाचे उद्घाटन होणार आहे. ...वाचा सविस्तर
17:02 (IST) 2 Nov 2026

प्रदीप पूर्णेकर हत्याकांडावरून आगरी-कोळी समाजात अस्वस्थता, तपासावरून प्रश्नचिन्ह

गेल्या काही दिवसांपासून प्रदीप पूर्णेकर प्रकरणावरुन ठाणे शहरात रस्ता रोको, कॅण्डल मार्च, पोलिस ठाण्यांवर ठिय्या अशास्वरुपाची आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनांना आता आगरी-कोळी संघटना आणि समाजाची मोठी साथ मिळू लागल्याचे चित्र अगदी स्पष्टपणे दिसू लागले आहे. ...अधिक वाचा
17:00 (IST) 2 Nov 2026

सांगली: जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवण्याची मेलद्वारे धमकी, सुरक्षा यंत्रणांची धावपळ

सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत बॉम्ब ठेवला असून न्यायालयाची इमारत उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने सोमवारी दुपारी एकच खळबळ उडाली. ...सविस्तर बातमी
16:55 (IST) 2 Nov 2026

जनतादरबारातून वसई विरारच्या नागरिकांचे प्रश्न सोडविणार, कार्यकर्ता संवाद मेळाव्यात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा

महायुतीमधील सर्व घटक पक्ष आपापल्या परीने पक्ष वाढवण्याचे प्रयत्न करत असून यात कोणतीही दुजाभावाची भावना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...अधिक वाचा
16:44 (IST) 2 Nov 2026

वाढवण बंदराच्या कामाविरोधात भूमिपुत्रांचा एल्गार; समुद्रकिनाऱ्यावर जलसमाधी आंदोलन

​वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती आणि स्थानिकांच्या वतीने दोन दिवसांपूर्वी वरोर येथे भव्य 'जनआक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले होते. ...सविस्तर वाचा
16:38 (IST) 2 Nov 2026

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचा निश्चित ताशी ३२० किमी परिचालन वेग गाठण्यात स्वदेशी ट्रेन ७१ किमीने मागे का?

स्वदेशी बनावटीच्या बुलेट ट्रेनचा परिचालन वेग ताशी २४९ किमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रकल्पाचा घोषित वेग व प्रत्यक्ष वापरासाठी तयार होणाऱ्या ट्रेनचा वेग यात ताशी ७१ किमीची तफावत निर्माण झाली आहे. ...सविस्तर वाचा
16:14 (IST) 2 Nov 2026

रत्नागिरीपाठोपाठ राजापूर न्यायालयालाही बॉम्बची धमकी!

रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब ठेवल्याचा संदेश प्राप्त झाल्याचे समोर येताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ...वाचा सविस्तर
16:05 (IST) 2 Nov 2026

महाराजांचे गडकिल्ले नष्ट करण्याचा कुटील डाव; सयाजी शिंदे यांचा आरोप, नागपुरातून ‘सेव्ह सह्याद्री’ चळवळ सुरु

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि सह्याद्रीचा नैसर्गिक वारसा नष्ट करण्याचा कुटील डाव सुरू असल्याचा घणाघाती आरोप प्रसिद्ध अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी केला आहे. ...वाचा सविस्तर
15:22 (IST) 2 Nov 2026

उंबर्डे, बारावे येथील शास्त्रोक्त पद्धतीने कचरा विल्हेवाटीचा फज्जा; माजी नगरसेवक सुधीर बासरे यांची पालिका आयुक्तांकडे तक्रार

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे निर्देष हरित लवादाने दिले आहेत. लवादाच्या अटी-शर्तींवर कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील बारावे, उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्प सुरू आहेत. ...वाचा सविस्तर
15:13 (IST) 2 Nov 2026

भीमाशंकर वृक्षतोडीविरुद्ध शंभुदुर्ग संघटनेचे सह्याद्री बचाव आंदोलन

भीमाशंकर डोंगर परिसरातील प्रस्तावित टोरेंटो पॉवर कंपनीच्या प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल शासनाकडून करण्यात येत आहे. ...सविस्तर वाचा
14:26 (IST) 2 Nov 2026

मिरा भाईंदरकर पाणी टंचाईने त्रस्त, मात्र राजकीय पक्ष आंदोलनात व्यस्त

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...वाचा सविस्तर
14:17 (IST) 2 Nov 2026

वृद्ध दाम्पत्यास सांभाळ करण्यास मुलांचा नकार, १२ एकर शेती असूनही उदरनिर्वाहासाठी वणवण

एकीकडे मुलांकडून दुर्लक्ष होत असताना दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे या वृद्ध दाम्पत्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. ...अधिक वाचा
13:56 (IST) 2 Nov 2026

Thane Court Bomb Threat: ठाणे सत्र न्यायालय बाॅम्बने उडविण्याच्या धमकीचा मेल

ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाला बाॅम्बने उडविण्याची देण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला आहे. ...वाचा सविस्तर
13:56 (IST) 2 Nov 2026

Thane Court Bomb Threat: ठाणे सत्र न्यायालय बाॅम्बने उडविण्याच्या धमकीचा मेल

ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाला बाॅम्बने उडविण्याची देण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला आहे. ...वाचा सविस्तर
13:26 (IST) 2 Nov 2026

भाजपतर्फे कल्याणमध्ये दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दिवाळी पहाट; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत संकलन

राज्यातील दुष्काळाच दाह वाढत जाऊन शेतकऱ्यांची विविध माध्यमातून अधिक प्रमाणात होरपळ सुरू झाली आहे. ...सविस्तर बातमी
13:26 (IST) 2 Nov 2026

कापूरबावडी पोलीस ठाण्याला विरोधी पक्षांकडून घेराव; कापूरबावडी पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर घोडबंदरसह ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. ...सविस्तर वाचा
13:08 (IST) 2 Nov 2026

पुणे महापालिकेच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कामगारांना 'एवढा' मिळणार दिवाळी बोनस!

पुणे महापालिकेतील सुमारे १८ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) आणि ११ हजार कंत्राटी कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपये दिवाळी बक्षीस देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. ...अधिक वाचा
13:08 (IST) 2 Nov 2026

सातारा जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलने खळबळ, न्यायालय परिसर रिकामा

सातारा जिल्हा व सत्र न्यायालय बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल मिळाल्याने सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी परिसरात मोठी खळबळ उडाली. ...वाचा सविस्तर
13:08 (IST) 2 Nov 2026

श्यामराव कदम यांच्या नावासाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर! वाडीच्या उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन

शहरालगतच्या वाडी (बु.) येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख लोकप्रतिनिधींना बोलण्याची संधी मिळाली नाही. ...सविस्तर वाचा
13:06 (IST) 2 Nov 2026

सारसबाग ते पर्वती रोप वे नकोच ! शिवसेना (शिंदे) पक्षाच्या युवासेना पुणे महानगर अध्यक्षांनी मांडली भूमिका

युवा सेनेचे पुणे महानगर अध्यक्ष अमित बागुल यांनी सारसबाग ते पर्वती असा रोपवे करण्याचा प्रस्ताव व्यवहार्य नसल्याची भूमिका घेतली आहे. याचा पुनर्विचार करावा असे पत्र बागुल यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना पाठविले आहे. ...अधिक वाचा
13:02 (IST) 2 Nov 2026

स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या नियमात मोठे बदल, आता 'इतक्या' वर्षांची लागणार लीज

महाराष्ट्रातील स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या स्थापनेसाठी लागू असलेल्या नियमावलीत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ...अधिक वाचा

Maharashtra News Live Updates

महाराष्ट्र लाइव्ह न्यूज