Latest Marathi News Updates: गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थ दादर येथे मनसेच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरुन भाषणाला सुरुवात झाली आहे. “एक दिवस सत्ता हातात घेणार म्हणजे घेणारच”, अशी गर्जना राज ठाकरेंनी शिवतीर्थावरुन केली. राज्यात आज सर्वत्र गुढीपाडव्याचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह विविध ठिकाणी शोभायात्रा काढल्या जात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री यांच्यासह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासह राज्यातील राजकारण, अवकाळी पाऊस, गुन्हे, पर्यटन, कला, क्रीडा, संस्कृती यासह विविध क्षेत्रात दिवसभर घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Mumbai Maharashtra Breaking News Live Today, 19 March 2026: महाराष्ट्रातील ठळक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स.
Raj Thackeray Speech: मनसेची नवी योजना, 'महाराष्ट्र पुढचा' संकेतस्थळ लॉन्च; नागरिकांना सुचवता येणार नव्या कल्पना
मनसेने नव्या योजनेची घोषणा केली असून, नागरिकांना नव्या कल्पना सुचविण्यासाठी महाराष्ट्र नेक्स्ट (महाराष्ट्र पुढचा) हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. यात २७ विविध विषयांवर नागरिकांना कल्पना सुचवता येणार आहेत, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
Raj Thackeray Speech: सरकारवर अवलंबून गोष्टी होणार नाहीत; राज ठाकरे
सरकारवर अवलंबून गोष्टी होणार नाहीत, त्या गोष्टी तुम्हालाच कराव्या लागतील, असे राज ठाकरे म्हणाले. सरकार येत आहेत, जात आहेत तुमच्यावर गोष्टी लादल्या जात आहेत, असे ठाकरे म्हणाले.
गिरगावात नववर्ष स्वागताचा जल्लोष; ढोल ताशा वादन, लेझीम, पारंपरिक खेळ यांसह शोभा यात्रांची रंगत
Raj Thackeray Speech: 'आपण इराणला साथ द्यायला हवी होती', मध्य पूर्वेतील युद्धावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; पंतप्रधान मोदींबाबत म्हणाले…
Raj Thackeray Speech LIVE: "महापुरुषांकडे जातीने पाहू नका"; राज ठाकरेंचे आवाहन
राज ठाकरे यांनी भाषणात महाराष्ट्रात होऊन गेलेल्या महापुरुषांची नावे आणि त्यांचा थोडक्यात परिचय करुन दिला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र घडवलेल्या महापुरुषांकडे जातीने पाहू नका, असे आवाहन केले.
Raj Thackeray Speech LIVE: “एक दिवस सत्ता हातात घेणार म्हणजे घेणारच”; शिवतीर्थावरुन राज ठाकरेंची गर्जना
“एक दिवस सत्ता हातात घेणार म्हणजे घेणारच, हा माझा आत्मविश्वास आहे, अशी गर्जना मनसे प्रमुख राज ठाकरेंची शिवतीर्थावरुन केली.
Raj Thackeray Speech LIVE: “एक दिवस सत्ता हातात घेणार म्हणजे घेणारच”; शिवतीर्थावरुन राज ठाकरेंची गर्जना
एक दिवस महाराष्ट्राची सत्ता घेणार म्हणजे घेणारच, अशी गर्जना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरुन केली. हा माझा आत्मविश्वास असल्याचे देखील ठाकरे म्हणाले.
अपघातांत तिघांचा मृत्यू
पश्चिम आशियात आता सर्रास तेलविहिरी, गॅस साठ्यांवर हल्ले… ऊर्जासंकटाचा भडका अधिक उग्र? भारतही हवालदिल?
लोकसभा व विधानसभेच्या धर्तीवर महापालिका सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करा; शिवसेना ठाकरे गटाची मागणी
केरळमध्ये भाजपचे कमळ फुलण्यासाठी पनवेलच्या कार्यकर्त्यांचा प्रचारदौरा
Ritu Tawde: महापौरांच्या प्रभागातील घाटकोपर, विद्याविहारमध्ये नालेसफाईला सुरुवात
"बघतोस काय?" विचारलं म्हणून दोन गटांत हाणामारी, तरुणाचा चाकूने भोसकून खून; नेमकं घडलं काय?
रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा…सुषमा अंधारे यांच्यानंतर रुपाली ठोंबरे यांची मागणी
Top 5 Nagpur Crime Stories: भाजपा वॉर्ड अध्यक्षाच्या हत्येचा सूत्रधार सीटू सिंहची धिंड, धावत्या कारचा क्षणात कोळसा आणि चोरीचे लॅपटॉप… आज नागपुरात काय घडलं?
रुपाली चाकणकरांचं पद जाणार? थेट राजीनाम्याची मागणी, दिवसभरात काय घडलं? वाचा ५ महत्त्वाची वक्तव्यं
Maharashtra Politics : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाची राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. या अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलं आहे. मात्र, याच अशोक खरातची पाद्यपूजा करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे काही फोटो समोर आल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. तसेच रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी रुपाली ठोंबरे यांच्यासह विरोधकांनी केली आहे. दरम्यान, याच अशोक खरात प्रकरणावर बोलताना खासदार संजय राऊतांनीही एक मोठं वक्तव्य केलं. ‘अशोक खरात प्रकरण एपस्टिन फाईल्सपेक्षा भयंकर’ असल्याचं राऊतांनी म्हटलं. दरम्यान, यासह आज दिवसभरातील राजकीय नेत्यांची पाच महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.
प्रवाशांच्या खिशाला कात्री, बेस्ट बसची घटती संख्या रिक्षा-टॅक्सीच्या पथ्यावर; संख्येत ४० टक्के वाढ
गुढीपाडव्याच्या मंगलदिनी गणपतीपुळे मंदिरात आम्रफळांची अप्रतिम आरास; भाविकांची मोठी गर्दी
"कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा काही दोष नाही"; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाठराखण
"कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा काही दोष नाही. त्या स्वत: तिथं गेल्या नाहीत. कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटल्या असतील, त्यात त्यांची चूक नाही", असे म्हणत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून त्यांची पाठराखण करण्यात आली.
असाही शर्विलक! महिलांना लुटण्याची विशिष्ट पद्धत; पकडण्यासाठी आख्खी यंत्रणा लागली कामाला, शेवटी…
Indian Railway:धुळे: मनमाड - इंदूर रेल्वे मार्ग; ‘भूसंपादन, मोबदला आणि पुनर्वसन' यांकडेच आजी-माजी खासदारांचे दुर्लक्ष?
साताऱ्यात सर्वच पक्ष सावध; जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या ‘या’ महत्वाच्या घोषणा..!
५ ते २४ एप्रिलदरम्यान १९ रेल्वेगाड्या रद्द, रेल्वेनं जारी केली यादी; स्थानकावरील दुरुस्ती कामामुळे निर्णय!
अनधिकृत शुभेच्छा फलकांनी शहर सौंदर्यात भर टाकणारे शिल्पही झाकले गेले, शहर विद्रुपीकरणाचा कळस
सोन्याचे दर वाढले तरी जनतेच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणणार; गुढीपाडव्यानिमित्त एकनाथ शिंदेंचा संकल्प
अभ्युदयनगर पुनर्विकास : नव्या विकासकालाही रहिवाशांची ५१ टक्के संमतीपत्रे बंधनकारक, अन्यथा फेरनिविदेचा मार्ग मोकळा
द्रूतगती महामार्गावरील अपघातामध्ये आयआयटीच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
भोंदू ज्योतिषी अशोक खरातच्या फार्म हाऊसमध्ये पोलिसांना काय सापडले ? राजकीय विरोधकांकडून महिला पदाधिकारी लक्ष्य
भिवंडी गोदामांना भीषण आग; सात ते आठ गोदामे जळून खाक, तीन तासानंतरही आग आटोक्यात येईना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! (फोटो - X/ Narendra Modi)
