Maharashtra Breaking News Updates, 25 May : मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. मंगळवारी नव्या रुग्णसंख्येने दोनशेचा टप्पा पार केला. मुंबईत मंगळवारी २१८ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या १४३० पर्यंत पोहोचली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावरही करोनासंदर्भातील आकडेवारी वाढतानाचं चित्र दिसत आहे. एकीकडे करोनाचं संकट पुन्हा डोकं वर काढतंय की काय अशी शंका असतानाच मंकीपॉक्सने युरोपीयन देशांमध्ये दहशत निर्माण केलीय.

राजकीय वर्तुळामध्ये सध्या छत्रपती संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीचे पडसाद उमटताना दिसत आहेत. संभाजीराजांचे अद्याप तळयात -मळयात सुरू असल्याने शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या उमेदवारीचा विचार सुरू केला. ‘राजांइतकेच मावळेही महत्त्वाचे असतात’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत दिले असून यावरुन आता सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता. 

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

00:34 (IST) 26 May 2022
औरंगाबादमध्ये करमाडजवळ एसटी-पीकअपचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू, तर दोन जखमी

औरंगाबाद जिल्ह्यातील करमाडजवळ एसटी बस आणि पीकअप वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झालेत.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा…

20:11 (IST) 25 May 2022
सांगलीत पाणवठ्यात पोहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणी बुडाल्या, एकीला बचावण्यात यश, मात्र दुसरीचा दुर्दैवी मृत्यू

सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे पाणवठ्यावर पोहण्यास गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी पाण्यात बुडाल्याची घटना बुधवारी घडली. यापैकी एका मुलीला वाचविण्यात यश आले असले, तरी एका मुलीचा बुडून मृत्यू झाला.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा…

19:57 (IST) 25 May 2022
“…तर ही अस्वस्थता निर्माण करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही”; RSS चा उल्लेख करत शरद पवारांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) उल्लेख करत जोरदार हल्ला चढवला. संघाचे सरकार्यवाहक भैय्याजी जोशी जातीनिहाय जनगणनेला विरोध करताना त्यामुळे देशात अस्वस्थता निर्माण होईल असं म्हणतात. मात्र, सत्य समोर आलं तर चुकीचं वातावरण निर्माण होतं का? असा सवाल शरद पवार यांनी विचारला.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा…

18:51 (IST) 25 May 2022
‘वंदे मातरम्’ला जन गण मनसारखा समान दर्जा द्या, उच्च न्यायालयात जनहित याचिका

वंदे मातरम् या गीताला भारतीय राष्ट्रगीतासारखाच दर्जा देण्यात यावा या मागणीला घेऊन दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली असून वकील आणि भाजपा नेते आहेत. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा

18:50 (IST) 25 May 2022
अफगाणिस्तानमध्ये पुरुष सहकाऱ्यांचा महिला अँकर्सना पाठिंबा

अफगाणीस्तानमध्ये दूरचित्रवाहिन्यांवरील महिला वृत्तनिवेदिकांना प्रक्षेपणादरम्यान चेहऱ्या झाकण्यास अनिवार्य केल्यानंतर जगभरात तालिबान सरकारवर टीका केली जात आहे. या आदेशाची काही वृत्तवाहिन्यांनी अंमलबजावणी सुरु केली आहे. तर काही वृत्तनिवेदिकांनी त्याला विरोध दर्शविला आहे. सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लीक करा

18:48 (IST) 25 May 2022
संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट

संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तरंच आम्ही त्यांना राज्यसभेसाठी पाठिंबा देऊ, असा पवित्रा शिवसेनेने घेतला होता. त्यानंतर आता राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे. एकीकडे या राजकीय घडामोडी घडत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचं राऊत यांनी सांगितलंय. बातमी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लीक करा

17:18 (IST) 25 May 2022
कार्ती चिदंबरम यांच्यावर ई़डीकडून गुन्हा दाखल

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. चिनी नागरिकांच्या व्हिसाप्रकरणी ईडीनेही कार्ती चिदंबरम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी याच प्रकरणी सीबीआयने कार्ती यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

16:57 (IST) 25 May 2022
ओबीसी आरक्षणासाठी राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढावा, कारण… : नाना पटोले

“आरक्षण संपवणे हेच भाजपा व त्यांची मातृसंस्था आरएसएसचा अजेंडा असून मंत्रालयावरील भाजपाचा मोर्चा म्हणजे केवळ ‘नौटंकी’ आहे. ओबीसींना आरक्षण मिळावे असे भाजपा नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढावा,” असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा…

16:40 (IST) 25 May 2022
मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान…

दक्षिण आफ्रिकेत या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ ब्रिटन आणि अमेरिकेत देखील काही प्रमाणात रुग्ण आढळल्यानंतर त्यासंदर्भात भारतात देखील काहीसं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. नुकतंच करोनाच्या धक्क्यातून हळूहळू सावरू पाहणाऱ्या जगाला मंकीपॉक्समुळे काहीशी चिंता सतावू लागली आहे. या पार्श्वभूमीवर त्याचा फैलाव आणि भारतातील परिस्थितीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

वाचा सविस्तर

16:38 (IST) 25 May 2022
“इथं कोणी फुकट काही मागायला येत नाही, मोदी सरकारने…”; शरद पवारांची ओबीसी प्रश्नांवर मोठी मागणी

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा…

16:10 (IST) 25 May 2022
…अन् काँग्रेस आमदाराने दलित स्वामीच्या तोंडातला घास काढून खाल्ला

कर्नाटकातील काँग्रेस आमदाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. जमीर अहमद खान असं या आमदाराचं नाव आहे. जमीर खान यांनी भेदाभेद संपवण्यासाठी आणि समाजात सुरु असलेला धर्मवाद, जातीवादाविरोधात आवाज उठवण्यासाठी केलेली कृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सविस्तर बातमी

15:49 (IST) 25 May 2022
“तुम्ही राजकारणात कशासाठी आहात, घरी जा आणि स्वयंपाक करा”; चंद्रकांत पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका

मुंबईसह १४ महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागांची सोडत काढण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने राजकीय पक्ष आणि ओबीसी समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भाजपाने आक्रमक होत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. भाजपा कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली.

15:40 (IST) 25 May 2022
लोकसत्ताच्या बातमीचा Impact: डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील पदपथ, रस्ते फेरीवाला मुक्त

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागाला फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. पादचाऱ्यांना या भागातून येजा करणे शक्य होत नाही. अशा आशयाचे वृत्त बुधवारी ‘लोकसत्ता’च्या ठाणे सहदैनिकाने प्रसिद्ध करताच, आज सकाळीच फ आणि ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगारांनी फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम राबविली. रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला दिसत नसल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

सविस्तर बातमी

15:24 (IST) 25 May 2022
घरचे जेवण बनवायला सांगतात म्हणून मुलीने सोडलं घर

आई-वडील घरी दररोज जेवण बनविण्यास सांगतात हा राग डोक्यात ठेऊन काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेली उत्तरप्रदेशातील अल्पवयीन मुलगी ठाण्यात सापडली आहे. जौनपूर जिल्ह्यात राहणारी निकिता मिश्रा ही १७ वर्षीय मुलगी ठाणे पोलिसांना तलावपाळी परिसरात आढळून आली. ठाणे पोलिसांनी जौनपूर पोलिसांच्या मदतीने निकिताच्या घरच्यांशी संपर्क साधत त्यांच्या समंतीने तिला मुंब्रा येथे राहणाऱ्या तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या भिक्षेकरी शोध मोहिमेच्या दरम्यान हा प्रकार समोर आला आहे.

सविस्तर बातमी

14:51 (IST) 25 May 2022
शरद पवारांविरोधातील पोस्ट प्रकरणानंतर पहिल्यांदाच केतकी चितळेने केलं भाष्य; हसत म्हणाली, “त्या दिवशी…”

अभिनेत्री केतकी चितळेला मंगळवारी सात जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. २०२० मध्ये बौद्ध धर्माविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केतकीवर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने पूर्वी तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. याच प्रकरणामध्ये मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या सुनावणीनंतर ठाण्यामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी केतकीला आणलं असता तिने प्रसारमाध्यमांनी मोजक्या शब्दांमध्ये संवाद साधला. येथे वाचा सविस्तर वृत्त केतकी नेमकं काय म्हणाली…

14:50 (IST) 25 May 2022
IPL: सलग दुसऱ्या वर्षी अर्जूनला मुंबईच्या संघात स्थान न मिळाल्याबद्दल सचिन स्पष्टच बोलला; म्हणाला, “मला याबद्दल…”

मुंबई इंडियन्सच्या संघाचा मुख्य मार्गदर्शक असणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर हा आयपीएलच्या मागील पर्वापासून संघासोबत आहे. यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये मुंबईने ३० लाख रुपयांना अर्जूनला विकत घेतलं. मात्र दोन्ही पर्वांमध्ये अर्जूनला प्रत्यक्षात एकाही सामन्यामध्ये संघात स्थान देण्यात आलं नाही. याचसंदर्भात आता सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त

14:46 (IST) 25 May 2022
गडचिरोलीत बारा लाखाचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण!

नक्षलवादी सामान्य आदिवासींची हत्या करून भीती व दशहत पसरवण्याचे काम करीत असतानाच आज बुधवारी १२ लाखाचे बक्षीस असलेल्या माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी (३४) व भामरागड एरीया टेक्नीकल दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम (६३) या दोन जहाल नक्षलवाद्यांनी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले. टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाची ही यशस्वी कामगिरी मानली जात आहे.

वाचा सविस्तर

14:36 (IST) 25 May 2022
ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचा मंत्रालयावर धडक मोर्चा; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

महानगरपालिकांसह नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होतील, अशी ग्वाही सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी मंगळवारी दिली. मात्र मुंबईसह १४ महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागांची सोडत काढण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केेल्याने राजकीय पक्ष आणि ओबीसी समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भाजपाने आक्रमक होत मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. ओबीसी आरक्षणाशिवाय महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार असल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी आज सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाचा सविस्तर…

13:34 (IST) 25 May 2022
शिवसेनेने संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीराजे यांचे अद्याप तळय़ात-मळय़ात सुरू असल्याने शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या उमेदवारीचा विचार सुरू केला. ‘राजांइतकेच मावळेही महत्त्वाचे असतात’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान शिवसेनेने संभाजीराजेंना डावलल्यानंतर मनसेने जाहीर पाठिंबा दिला आहे. तसंच शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

सविस्तर बातमी

13:20 (IST) 25 May 2022
मुंबईकत दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेट घालणे बंधनकारक

मुंबईमध्ये दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्या व्यक्तीसाठीही हेल्मेटसक्ती करण्यात आलेली आहे. १५ दिवसांमध्ये नियमांचे पालन न केल्यास पोलीस सक्तीची कारवाई करणार आहेत. वाहतूक नियम न पाळणाऱ्यांना आता वाहतूक पोलिसांनी इशारा दिला आहे. त्यामुळे आता दुचाकीस्वारांसह मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे सक्तीचे होणार आहे. वाचा सविस्तर…

12:51 (IST) 25 May 2022
“फडणवीसांनी महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करावेत”; अमोल मिटकरी संतापले

संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. संभाजीराजेंना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात असताना ऐनवेळी कोल्हापूरच्या संजय पवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे अपेक्षाभंग झाल्याची भावना संभाजीराजे छत्रपतींच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यातच आता विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जबाबदार धऱलं आहे. यावरुन अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना संताप व्यक्त केला असून महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करावेत असं सुनावलं आहे.

सविस्तर बातमी

12:21 (IST) 25 May 2022
मी मेल्यावर बारामतीचा हा गडी कसा आला हे ब्रम्हदेवाला विचारणार आहे – सदाभाऊ खोत

राज्यातील वाढती जातीय तेढ आणि ब्राह्मण विरोधक असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ब्राह्मण संघटनांची पुण्यात बैठक घेतली होती. त्यानंतर ब्राह्मणविरोधी वक्तव्याला पाठिंबा नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी ब्राह्मण समाजाच्या आरक्षणावारुनही शरद पवारांनी भाष्य केले होते. याबाबत बोलताना रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आटपाडी शेतकरी मेळाव्यात खोत बोलत होते. वाचा सविस्तर…

12:11 (IST) 25 May 2022
भूसंपादन अपहाराची रक्कम एक कोटींवर, मोबदला अपहाराचा तिसरा गुन्हा दाखल

अंबरनाथ तालुक्यात कुशिवली धरण उभारणीच्या प्रक्रियेत बनावट दस्तऐवज सादर करून भूसंपादन मोबदला लाटण्याचे प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी मंगळवारी तिसऱ्या गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणात तब्बल ६० लाख रूपयांचा मोबदला लाटण्यात आला आहे. याप्रकरणानंतर भूसंपादन मोबदला अपहाराची रक्कम एक कोटी २३ लाख रूपयांवर पोहोचली आहे. उपविभागीय कार्यालयाने केलेल्या तपासणीत आतापर्यंत तीन प्रकरणे उघडकीस आले असून यात आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

सविस्तर बातमी

12:09 (IST) 25 May 2022
“ठाकरेंचीही चौकशी…”; यशवंत जाधवांच्या ED चौकशीवरुन करकरेंसंदर्भातील बुलेटप्रुफ जॅकेट घोटाळ्याचा उल्लेख करत सोमय्यांचं वक्तव्य

सक्तवसुली संचालनालयाने आज शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. परदेशी चलन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणाच्या आरोपामध्ये जाधव यांना समन्स पाठवण्यात आल्याचं ईडीने स्पष्ट केलं आहे. याचा पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. येथे वाचा सविस्तर बातमी

11:59 (IST) 25 May 2022
संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवरून राजकारण पेटलं!

राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा विषय आधी सुरू केला होता, असं फडणवीस म्हणाले. “आधी शरद पवारांनी हा सगळा विषय सुरू केला. त्यानंतर ज्या दिशेने तो विषय गेला, ते सगळं वेगळंच काहीतरी झालं आहे. कदाचित त्यांची (संभाजीराजे छत्रपती) कोंडी करण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. पण तो त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर मी बोलण्याचं कारण नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

11:51 (IST) 25 May 2022
अंबरनाथमध्ये रासायनिक कंपनीला आग

अंबरनाथच्या आनंदनगर येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत एका रासायनिक कंपनीला बुधवारी सकाळच्या सुमारास आग लागली. रितीक केम असे या कंपनीचे नाव आहे. याची माहिती मिळतात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरूवात केली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या रासायनिक कंपनीत सॉल्व्हंटवर प्रक्रिया केली जात होती.

सविस्तर बातमी

11:28 (IST) 25 May 2022
“…त्यामुळेच शरद पवारांना कायम भावी पंतप्रधान म्हणून हिणवलं जातं”; राज ठाकरेंच्या रद्द झालेल्या दौऱ्यावरुन मनसेचा हल्लाबोल

राज ठाकरेंचे सचिव सचिन मोरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो मंगळवारी सोशल नेटवर्किंगवर शेअर केले. या फोटोंच्या माध्यमातून मनसेने शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत रसद पुरवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप केला होता. आता याच प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच मनसेनं पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधलाय. येथे वाचा सविस्तर वृत्त

11:26 (IST) 25 May 2022
सांगली महिला वनपरिक्षेत्र अधिकारी विनयभंग प्रकरणातील उपवनसंरक्षक विजय माने यांची अखेर बदली

सांगली महिला वनपरिक्षेत्र अधिकारी विनयभंग प्रकरणातील उपवनसंरक्षक विनय माने यांची उपवनसंरक्षक (कार्यआयोजना) या पदावर बदली करण्यात आली आहे. मात्र, या बदलीमागे राज्य शासनाने प्रशासकीय कारण दिले आहे. माने यांची बदली नको तर निलंबन हवे, अशी मागणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या वर्तुळातून केली जात आहे.

सविस्तर बातमी

11:24 (IST) 25 May 2022
चंद्रपुरात २० वर्षीय तरुणाची हत्या, धारदार शस्त्राने वार करत हल्लेखोर फरार

चंद्रपूरमध्ये एका २० वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. बायपास मार्गावरील अस्टभुजा प्रभागात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धर्मवीर अशोक यादव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे, हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलीस शोध घेत आहेत.

सविस्तर बातमी

10:34 (IST) 25 May 2022
राज ठाकरे माफी मागा; बृजभूषण सिंह यांच्यानंतर भाजपाच्या आणखी एका खासदाराचा विरोध

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला असला तरी त्यावरुन सुरु असलेला वाद आणि वक्तव्यं अद्यापही सुरुच आहेत. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह अद्यापही माफी मागितल्याशिवाय प्रवेश देणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. बृजभूषण सिंह यांच्या विरोधावरुन महाराष्ट्रात मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला असताना आता भाजपाचे उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनीदेखील राज ठाकरेंना विरोध केला आहे. राज ठाकरेंनी अयोध्यावासियांची माफी मागावी असं ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

सविस्तर बातमी

10:32 (IST) 25 May 2022
जिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं

आंध्र प्रदेशातील अमलापूरम शहरात संतप्त आंदोलकांना मंत्र्यांचं घर पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या कोनसीमा जिल्ह्याचं नाव बदलून बाबासाहेब आंबेडकर कोनसीमा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यानंतर संतप्त जमावाने राज्याचे वाहतूक मंत्री पी विश्वरुप यांच्या घरावर हल्ला करत ते पेटवून दिलं. यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर बातमी

10:30 (IST) 25 May 2022
अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

अमेरिकेतील टेक्सासमध्ये प्राथमिक शाळेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. १८ वर्षीय हल्लेखोराने शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २१ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये तीन शिक्षक १८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चिंता व्यक्त केली असून नव्याने बंदुकींवर बंदी आणण्यासंबंधी भाष्य केलं आहे. तसंच आपण केव्हा या गन लॉबीविरोधात उभं राहणार आहोत? अशी विचारणा केली आहे.

सविस्तर बातमी

10:30 (IST) 25 May 2022
तारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत

तारकर्ली येथे पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. याच दुर्घटनेवरुन आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर आणि खास करुन राज्याच्या पर्यटनमंत्र्यांवर म्हणजेच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधताना या दोन पर्यटकांचा जीव वाचू शकला असता असं म्हटलंय. येथे वाचा सविस्तर वृत्त

10:27 (IST) 25 May 2022
“संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील….”; संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा शिवसेनेला इशारा

शिवसेनेकडून छत्रपती संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीला विरोध केला जात असल्याचा दावा करत मराठा क्रांती मोर्चाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केलीय. संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवेल, असा इशारा मराठी क्रांती मोर्चाने दिलाय. येथे वाचा सविस्तर वृत्त

10:26 (IST) 25 May 2022
ज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”

वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केरळमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना महत्वाचं विधान केलं आहे. सध्या देशभरामध्ये ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत आहे. वाराणसीमधील न्यायालयाकडून पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार असल्याचं मंगळवारी स्पष्ट झालं. याच दिवशी केरळमधील एका जाहीर सभेत बोलताना शरद पवारांनी या मशिदीसंदर्भात वक्तव्य केलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

10:26 (IST) 25 May 2022
IPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…

डेव्हिड मिलर (३८ चेंडूंत नाबाद ६८ धावा) आणि कर्णधार हार्दिक पंडय़ा (२७ चेंडूंत नाबाद ४०) यांच्या दिमाखदार खेळींमुळे गुजरात टायटन्सनी मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील ‘क्वॉलिफायर-१’च्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आपल्या पहिल्याच पर्वात गुजरातच्या संघाने थेट अंतिम फेरी गाठण्यामध्ये डेव्हिड मिलरने मोलाचा वाटा उचलला. मात्र या सामन्यानंतर मिलरने केलेलं ट्विट सध्या चर्चेत आहे. वाचा सविस्तर वृत्त

10:14 (IST) 25 May 2022
राज्यसभा निवडणूक: राजांएवढेच मावळेही महत्त्वाचे, राऊत यांचे सूचक विधान

छत्रपती संभाजीराजे यांचे अद्याप तळय़ात-मळय़ात सुरू असल्याने शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या उमेदवारीचा विचार सुरू केला. ‘राजांइतकेच मावळेही महत्त्वाचे असतात’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत दिले.  येथे वाचा सविस्तर वृत्त

अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता.