Maharashtra Political Crisis Updates: राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना जशास तसं उत्तर देण्याचे आदेश दिल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपाने संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीतून वगळलं असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याउलट निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीसांना स्थान देत पक्षाने त्यांना महत्त्व दिल्याचं बोललं जात आहे. तसंच मोहित कंबोज यांनी सिंचना घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता जेलमध्ये जाणार असल्याचा दावा केल्यामुळेही राजकारण तापलं आहे.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!

10:41 (IST) 18 Aug 2022
द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्याबाबत रस्ते महामंडळाला अखेर जाग

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील (एक्स्प्रेस वे) वाढते अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॅार्पोरेशन – एमएसआरडीसी) अतिरिक्त पोलीस कर्मचारी, सहा सुमो वाहने, गस्ती पथक, डेल्टा फोर्स तैनात करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:39 (IST) 18 Aug 2022
बच्चू कडू शिंदे सरकारवर नाराज? अधिवशेनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहिल्याने चर्चा

राज्यात सत्तांतर झाल्यानंतरचं पहिलंच पावसाळी अधिवेशन पार पडत असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी पायऱ्यांवरुन गद्दार अशा घोषणा दिल्याने संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान यावेळी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली होती. मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न दिल्यानेच बच्चू कडू नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र बच्चू कडू यांनी विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.

सविस्तर बातमी

10:38 (IST) 18 Aug 2022
भाजपाने गडकरींना वगळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया

भाजपा संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या पुनर्रचनेत पक्षाने माजी अध्यक्ष, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना वगळलं आहे. त्याचवेळी निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी देत भाजपाने त्यांना पदोन्नती दिली आहे. दरम्यान नितीन गडकरी यांना वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावर प्रतिक्रिया देताना भाजपावर टीका केली असून, गडकरींची राजकीय उंची वाढत असल्याचं हे चिन्ह आहे असं म्हटलं आहे.

सविस्तर बातमी

10:37 (IST) 18 Aug 2022
कर्नाटकात शिक्षण संस्थांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यावरून वाद

कर्नाटकमधील शाळा-महाविद्यालयांमध्ये ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी करण्यात यावी, असे वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकातील राज्य सरकार दांभिक असल्याची टीका मुस्लीम समुदायाने केली. मुस्लीम विद्यार्थिनींना शाळा-महाविद्यालयाच्या आवारात हिजाब परिधान करण्यास बंदी घातली जाते, मग गणेश चतुर्थी साजरी करण्यास परवानगी का दिली जाते, असा सवाल विचारला जात आहे.

सविस्तर बातमी

10:36 (IST) 18 Aug 2022
घरांच्या किमतीत पाच टक्के वाढ; बांधकाम साहित्य दरवाढीबरोबर वाढत्या मागणीचा परिणाम

बांधकाम साहित्यात झालेल्या दरवाढीबरोबरच घरांच्या मागणीतही वाढ झाल्याने मुंबई महानगर घरांच्या किमतीही पाच टक्क्यांनी वाढल्या आहेत. नजीकच्या काळातही घरांच्या किमतींची वाढ कायम राहील, असा दावा करण्यात येत आहे. कॉन्फर्डेशन ऑफ रिएल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) यांच्या पुढाकाराने ‘कोलिएर्स-लायसेस फोरास’ने  ‘हौसिंग प्राईस ट्रॅकर’ अहवाल जारी केला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

सविस्तर बातमी

10:34 (IST) 18 Aug 2022
महामुंबई पुन्हा कोंडली; ठाणे-नवी मुंबई-डोंबिवली शहरांतील प्रवाशांचे सर्वाधिक हाल

गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गासह अंतर्गत मार्गावर पुन्हा खड्डे पडले. त्यातच चार दिवसांच्या सुट्टय़ांनंतर मार्गावर वाहनांची पुन्हा वर्दळ वाढल्याने बुधवारी ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

सविस्तर बातमी

10:33 (IST) 18 Aug 2022
देवेंद्र फडणवीस यांना पदोन्नती; भाजप केंद्रीय निवडणूक समितीत स्थान

भाजप संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या पुनर्रचनेत बुधवारी पक्षाने माजी अध्यक्ष, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना वगळले. त्याचवेळी निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देऊन भाजपने त्यांना पदोन्नती दिली.

सविस्तर बातमी

10:33 (IST) 18 Aug 2022
जशास तसे उत्तर द्या!; मुख्यमंत्र्यांचा आमदारांना आदेश

मुंबई विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक घोषणाबाजी करताना  तिखट हल्ला शिंदे गटातील आमदारांवर चढवल्याने बंडखोर गट गांगरून गेला. पण नंतर शिंदे गटाची बैठक होऊन त्यात विरोधकांना जशास तसे आक्रमक उत्तर देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारी सुरू झाले.

सविस्तर बातमी

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले. सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे त्यावेळी जाहीर करणाऱ्या फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा जाहीर आदेश पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिला होता. पण, पक्षाच्या निवडणूक समितीत फडणवीस यांना स्थान देऊन पक्षाने त्यांचे महत्त्व अधोरेखित केलं असल्याचं मानलं जात आहे. तसंच भविष्यात फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात, हा संदेश पक्षाने दिला आहे.