Mumbai Maharashtra News Updates, 05 September 2024: लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असताना चाकरमान्यांची गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची स्थिती पाहायला मिळत आहे. दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील सर्व राजकीय पक्ष उमेदवारांप्रमाणेच मतदारांचीही विविध प्रकारचे कार्यक्रम, भेटीगाठींमधून चाचपणी करताना दिसत आहेत.