Maharashtra Latest News Updates, 10 February 2023 : राज्यात आधी विधान परिषद निवडणूक आणि आता कसबा-पिंपरी चिंडवड पोटनिवडणुकीने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानेच ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वीच मुंबई मेट्रो आणि इतर विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी येऊन गेलेले असताना आता पुन्हा एकदा मुंबईत येत आहेत. त्यामुळे भाजपाकडून होणारी मोर्चेबांधणीही दिसत आहे. यावर महाविकासआघाडीकडून सडकून टीकाही होतेय. एकूणच राज्यातील राजकारणाचा पारा चढताना दिसत आहे. राज्यातील अशाच सर्व घडामोडींच्या या लाईव्ह अपडेट्स…

Lok Sabha Election 2024 Maharashtra Politics
Maharashtra News : “उद्धव ठाकरे तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल तर….”, आशिष शेलारांचं खुलं आव्हान
lok sabha 2024, devendra fadnvis, vijay Wadettiwar, devendra fadnvis not criticise vijay Wadettiwar, vijay Wadettiwar not criticise devendra fadnvis , vijay Wadettiwar bjp entry, dharmrao baba aatram, vijay Wadettiwar bjp entry discussions, congress, state opposition leader
देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवारांचे प्रचारादरम्यान एकमेकांबद्दल मौन का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Similar Name Controversy Independent Candidate Withdraws from Amravati Lok Sabha Race
भाजपच्या कार्यकर्त्‍यांनी वापरला ‘नामसाधर्म्‍य फॉर्म्‍युला’, पण माघारीमुळे महाविकास आघाडीला दिलासा
bhavana gawali
Lok Sabha Elections 2024 : भावना गवळी बिघडवू शकतात महायुतीचे गणित
Live Updates

Maharashtra Breaking News Updates : राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीच्या अपडेट्स एका क्लिकवर...

18:09 (IST) 10 Feb 2023
"...असे लढवय्ये देशाला नको"; शरद पवार यांची पंतप्रधानांवर टीका

देशाची सत्ता, सेना, पोलीस दल हे पाठिशी असल्याने कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडाल तर त्यांच्याशी संघर्ष करायला तयार असल्याचे सांगणारे लढवय्ये देशाला नको आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. कष्टकऱ्यांच्या हिताची जपणूक करणारे, त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्यांची देशाला गरज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सविस्तर बातमी

17:45 (IST) 10 Feb 2023
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा नागपूर दौरा, संघ मुख्यालयात जाणार ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १८ आणि १९ फेब्रुवारी असे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांचा अद्याप अधिकृत दौरा प्राप्त झाला नाही. प्राथमिक माहितीनुसार अमित शहा यांचा १८ तारखेला नागपूरमध्ये कार्यक्रम असून १९ तारखेला कोल्हापूर येथे जाणार आहेत.

सविस्तर वाचा...

17:30 (IST) 10 Feb 2023
नागपूर: वीज दरवाढीची चिंता; ‘गो ग्रीन'चा पर्याय, वर्षाला किती पैसे वाचणार?

विद्यमान वीज देयक भरून सामान्यांचे आर्थिक गणीत बिघडले असतांनाच महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे आणखी वाढीव वीज दरवाढीची याचिका दाखल केली आहे. या दरवाढीने चिंता वाढली असतांनाच ‘गो ग्रीन’च्या माध्यमातून छापील वीज देयकाऐवजी ई- मेल व भ्रमनध्वनीवर एसएमएसचा पर्याय स्विकारून ग्राहक वर्षाला १२० रुपयांची बचत करू शकतात.

सविस्तर वाचा

17:27 (IST) 10 Feb 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बोहरा समाजाच्या अलजेमा-तूस-सैफी संकुलाचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बोहरा समाजाच्या अलजेमा-तूस-सैफी संकुलाचं उद्घाटन , मोदींकडून संकुलाची पाहणी

17:08 (IST) 10 Feb 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी मरोळमध्ये दाखल, अलजेमा-तूस-सैफी संकुलाचं उद्घाटन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी मरोळमध्ये दाखल, बोहरा मुस्लीम समुदायाचं अलजेमा-तूस-सैफी या संकुलाचं उद्घाटन करणार, मद्रास बँडकडून मोदींचं स्वागत

16:54 (IST) 10 Feb 2023
तरुंगातून सुटका झाल्यावर अनिल देशमुख प्रथमच उद्या नागपुरातील घरी परतणार , सर्वप्रथम 'येथे' जाणार

राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल २१ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शनिवारी त्यांच्या नागपूर येथील स्वगृही परत येणार असून त्यानिमित्ताने त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

सविस्तर वाचा

16:31 (IST) 10 Feb 2023
यूपीए सरकार ज्या उत्पन्नावर २० टक्के कर घ्यायची ते भाजपा सरकारने करमुक्त केलं - नरेंद्र मोदी

२०१४ च्या आधी काय परिस्थिती होती तुम्ही पाहा. जे लोक २ लाखापेक्षा जास्त कमावत होते त्यांनाही कर भरावा लागत होता. भाजपा सरकारने आधी ५ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं. आता या अर्थसंकल्पात ७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं. आज मध्यमवर्गीयांच्या ज्या उत्पन्नावर शून्य कर आहे, त्यावर युपीए सरकार २० टक्के कर आकारत होतं - नरेंद्र मोदी

16:28 (IST) 10 Feb 2023
"मला मुंबईच्या लोकांना विशेष माहिती द्यायची आहे की...", पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुंबईकरांना साद

अर्थसंकल्पात मध्यवर्गीयांना मजबूत करण्यात आलं आहे. याबाबत मला मुंबईच्या लोकांना विशेष माहिती द्यायची आहे. पगारी लोकं असो की व्यापारी, दोघांनाही या अर्थसंकल्पाने खूश केलं आहे - नरेंद्र मोदी

16:22 (IST) 10 Feb 2023
भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारतातील पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपये - नरेंद्र मोदी

https://twitter.com/BJP4India/status/1623997577724334080

आज देशात आधुनिक रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. मेट्रोचा विस्तार होत आहे. नवे विमानतळ आणि बंदरं तयार केली जात आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा १० लाख कोटी रुपये भारतातील पायाभूत सुविधांच्या (इंफ्रास्ट्रक्चर) विकासासाठी देण्यात आले आहेत - नरेंद्र मोदी

16:18 (IST) 10 Feb 2023
एकूण १७ राज्यातील १०८ जिल्हे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडले - नरेंद्र मोदी

https://twitter.com/BJP4India/status/1623996001588756481

वंदे भारत ट्रेन आजच्या आधुनिक भारताचं खूपच अभिमानास्पद चित्र आहे. ही ट्रेन भारताचा वेग आणि 'स्केल' अशा दोन्ही गोष्टींचं प्रतिक आहे. आतापर्यंत अशा १० रेल्वे देशभरात सुरू झाल्या आहेत. एकूण १७ राज्यातील १०८ जिल्हे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडले गेले आहेत - नरेंद्र मोदी

16:09 (IST) 10 Feb 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात, म्हणाले, "रेल्वेच्या क्षेत्रात..."

https://twitter.com/BJP4India/status/1623995236795154433

रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे - नरेंद्र मोदी (मराठीत भाषणाला सुरुवात)

15:55 (IST) 10 Feb 2023
आतापर्यंत रेल्वेकडे दुर्लक्ष, मात्र मोदी सरकारमध्ये परिस्थिती बदलली - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले, "रेल्वे विभागाकडे दुर्लक्ष झालं होतं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील ८-९ वर्षांच्या कार्यकाळात यात बदल झाला. गरिबातील गरिब लोक रेल्वेचा वापर करतात. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठी तरदूत करण्यात आली."

15:52 (IST) 10 Feb 2023
पंतप्रधान मोदींकडून वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा

https://twitter.com/ANI/status/1623991074942521346

पंतप्रधान मोदींकडून वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा, मुंबईहून शिर्डी सोलापूरचा प्रवास करता येणार, वंदे भारत ट्रेन साडे सहा तासात सोलापूरला पोचणार अशी रेल्वे विभागाची माहिती

15:49 (IST) 10 Feb 2023
आतापर्यंत रेल्वेकडे दुर्लक्ष, मात्र मोदी सरकारमध्ये परिस्थिती बदलली - एकनाथ शिंदे

https://twitter.com/ANI/status/1623990154401820673

एकनाथ शिंदे म्हणाले, "रेल्वे विभागाकडे दुर्लक्ष झालं होतं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील ८-९ वर्षांच्या कार्यकाळात यात बदल झाला. गरिबातील गरिब लोक रेल्वेचा वापर करतात. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठी तरदूत करण्यात आली."

15:46 (IST) 10 Feb 2023
ठाण्यात पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेशाची मालिका; मनसे तसेच भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सत्तेत असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये प्रवेश करण्याची मालिका सुरु झाली असून शुक्रवारी मनसेचे  ठाण्यातील माजी विभाग अध्यक्ष महेश कदम आणि भीम आर्मीचे ठाणे जिल्हाप्रमुख नितीन मधुकर वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. सविस्तर वाचा…

15:24 (IST) 10 Feb 2023
पुण्यात १३ वर्षीय मुलीचा वडिलांनी केला खून; हत्येनंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुण्यातील सारसबागेजवळील कॅनॉलमध्ये जन्मदात्यानेच १३ वर्षीय मुलींला ढकलून देऊन मारल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. संदीप विष्णु शिंदे (वय ४० रा.दत्तवाडी) आरोपी वडिलांचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी वडिलांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

सविस्तर बातमी

15:11 (IST) 10 Feb 2023
"उद्धव ठाकरेंसह अनेकांचे फोन आले, पण मी चिंचवड पोटनिवडणुकीतून माघार घेणार नाही, कारण...", राहुल कलाटे उमेदवारीवर ठाम

राहुल कलाटे म्हणाले, "मला उद्धव ठाकरेंसह अनेकांचे फोन आले, पण मी चिंचवड पोटनिवडणुकीतून माघार घेणार नाही, कारण या जनतेने राहुल कोणत्याही परिस्थितीत तू निवडणुकीत उभं राहा असं सांगितलं आहे."

15:06 (IST) 10 Feb 2023
वंदे भारत एक्सप्रेसला आसनगाव, कसारा येथे थांबा देण्याची मागणी

कल्याण- मुंबई ते शिर्डी (साईनगर) रेल्वे मार्गावरील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आसनगाव, कसारा रेल्वे स्थानकांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा, अशी जोरदार मागणी या भागातील प्रवाशांकडून रेल्वे अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शहापूर, कसारा परिसरातील नागरिकांची मागणी विचारात घेऊन ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे शहापूर उपतालुका प्रमुख भरत उबाळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे वंदे भारत एक्सप्रेसला आसनगाव, कसारा रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा…

15:05 (IST) 10 Feb 2023
ठाकुर्लीतील कचोरे गावातील गावदेवी मंदिरात चोरी

ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील कचोरे गावातील गावदेवी मंदिरात जाऊन चोरट्याने बुधवारी दुपारी मंदिरातील पितळी वस्तू चोरुन नेल्या आहेत. ग्रामस्थांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. दुपारच्या वेळेत मंदिरात चोरी झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा…

15:04 (IST) 10 Feb 2023
पोटनिवडणूक न लढवण्याचा आम आदमी पक्षाचा निर्णय; कसबा पोटनिवडणूकीतून माघार

कसबा विधानसभा पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. या निर्णयानुसार आपचे उमेदवार किरण कद्रे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला.  दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ‘आप’च्या उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरला होता. सविस्तर वाचा…

15:03 (IST) 10 Feb 2023
पुण्यात प्रचाराचा ताफा थेट शाळेत! पालक वर्गाकडून संताप; भाजप-काँग्रेसकडून आरोप-प्रत्यारोप

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार करताना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हेमंत रासने यांनी शाळेत प्रचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यावरून विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडण्यास सुरूवात केल्यानंतर भाजपकडूनही महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा शाळा परिसरातील प्रचाराची चल चित्रफीत प्रसारित आली आहे.

सविस्तर वाचा…

14:56 (IST) 10 Feb 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, स्वागतासाठी राज्यपाल कोश्यारी हजर

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, स्वागतासाठी राज्यपाल कोश्यारी हजर, २२ दिवसात मोदी दुसऱ्यांदा मुंबईत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हजर

14:49 (IST) 10 Feb 2023
मुंबई: काळा घोडा कला महोत्सवात नाकारलेल्या वस्तूंतून सृजनाविष्कार!

केवळ मुंबईकरच नव्हे तर आसपासच्या उपनगरवासियांचे आकर्षण बनलेल्या काळा घोडा महोत्सवातील टाकाऊ वस्तूंपासून साकारलेली ‘द रायझिंग ऑफ फिनिक्स’ कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सविस्तर वाचा

14:48 (IST) 10 Feb 2023
बदलापुरात आढळला दुर्मिळ तपकिरी हरणटोळ; सर्पमित्रांच्या मदतीने केली सापाची जंगलात मुक्तता

शरीरावर राखाडी तपकिरी गडद ठिपणे असलेला आणि पाठीवर पटकोनी खुणा असलेल्या दुर्मिळ तपकिरी रंगाचा हरणटोळ बदलापुरात आढळला आहे. सर्पमित्रांच्या सहाय्याने वन विभागाने या सापाची निसर्गमुक्तता केली.

सविस्तर वाचा

14:20 (IST) 10 Feb 2023
भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खसडेंना मोठा दिलासा

भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खसडेंना मोठा दिलासा, पुरवणी आरोपपत्र दाखल न करण्याचे उच्च न्यायालयाचे ईडीला आदेश, २० मार्चपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही, या प्रकरणात खडसेंसह पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावयावर गुन्हा दाखल आहे

13:40 (IST) 10 Feb 2023
डोंबिवली: मानपाडा पोलिसांचे डोंबिवली एमआयडीसीमध्ये रविवारी हॅप्पी स्ट्रीट

डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्यातर्फे रविवारी एमआयडीसीतील जीएनपी गॅलरी ते आर. आर. रुग्णालय रस्त्यावर हॅप्पी स्ट्रीटचे आयोजि करण्यात आले आहे. आठवड्यातून एक दिवस नोकरी, व्यवसायात व्यक्त असलेल्या रहिवाशांना रस्त्यावर आनंदी दिवस साजरा करता यावा.

सविस्तर वाचा

13:24 (IST) 10 Feb 2023
काँग्रेसच्या पक्षांतर्गत वादावर प्रभारी एच. के. पाटलांशी बोलणार का? नाना पटोले म्हणाले...

नाना पटोले म्हणाले, "माझी एच. के. पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. १५ फेब्रुवारीला कार्यकारणीची बैठक आहे. त्यानुसार मी माझा पुण्याचा दौरा तयार केला आहे. तो प्रचाराचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की, त्या बैठकीला आमचे सर्व कार्याध्यक्ष राहतील."

12:55 (IST) 10 Feb 2023
ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार; चार माजी नगरसेवक करणार बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश

ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह चार माजी नगरसेवक तसेच दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण यांचा बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश अखेर निश्चित झाला आहे.

सविस्तर वाचा

12:27 (IST) 10 Feb 2023
उमेदवारी अर्ज मागे घेणार का? बंडखोर राहुल कलाटे म्हणाले, "२०१४, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत..."

वेगवेगळ्या भागातून लोकांचे मला फोन येत आहेत. ते म्हणत आहेत की, राहुल तू कुठल्याही परिस्थितीत लढ, आम्ही तुझ्याबरोबर आहोत. त्यामुळे ही लोकभावना रोखण्याचं काम मी करणार नाही. कारण या लोकांनी वेळोवेळी माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. २०१४, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. त्यांना अपेक्षित काम मी मागील चार ते पाच वर्षात केलं आहे. त्यामुळे ही जनभावना मी दुखावणार नाही - राहुल कलाटे (टीव्ही ९ मराठीशी बोलताना)

12:14 (IST) 10 Feb 2023
मुंबई: अपेक्षेपेक्षा अधिक खर्च झालेल्या  १२ गृहप्रकल्पांची `महारेराʼकडून तपासणी

अपेक्षेपेक्षा अधिक खर्च झालेल्या गृहप्रकल्पांची तपासणी करण्यास महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाकडून (महारेरा) सुरुवात करण्यात झाली आहे. पहिल्या टप्प्यात १२ प्रकल्पांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा

12:09 (IST) 10 Feb 2023
Maharashtra Breaking News Live : बंड शमवण्यासाठी ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर पुण्यात, अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंची घेतली भेट

ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी महाविकास आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची भेट घेतली. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासंदर्भात कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी थेट ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर पुण्यात दाखल झाले. त्यांची आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर राहुल कलाटे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

11:55 (IST) 10 Feb 2023
मुंबई: आवक घटल्याने गुलाब फुलावर महागाईचा रंग; व्हॅलेंटाईन डे निमित्त किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता

करोनाविषयक नियम हटविल्यानंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे. अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’ची तरूण मंडळी आतुरतेने वाट पाहात आहे.

सविस्तर वाचा

11:54 (IST) 10 Feb 2023
भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकसाठी शाही तयारी

जवळपास सात वर्षांनी येथे होणाऱ्या भाजप प्रदेश कार्यकारिणीत सहभागी होणारे मंत्री, नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या सरबराईसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. वातानुकुलीत सभागृह, हिरवळीचे मैदान आणि डुबकी मारण्यासाठी जलतरण तलाव, अशा सुविधांनी सुसज्ज बैठक स्थळाने सत्तेचा मानमरातब राखला जाणार आहे.

सविस्तर वाचा

11:53 (IST) 10 Feb 2023
जळगाव: रेल्वेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाला १७ लाखांचा गंडा

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवीत भडगाव शहरातील बाळद रोड भागातील रहिवासी तरुणाची सुमारे १७ लाखांना फसवणूक करण्यात आली. संशयितांनी बनावट नियुक्तीपत्र दिल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी भडगाव येथील पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

11:52 (IST) 10 Feb 2023
“वैद्यकीय शिक्षणही मराठीतून”; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही

येत्या काळात वैद्यकीय शिक्षण, सनदी लेखापाल (सीए) यासारखे उच्च शिक्षणही मराठीत घेता येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

सविस्तर बातमी

11:31 (IST) 10 Feb 2023
मविआचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरला? आमदार निलेश लंकेंचं विधान चर्चेत; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातच केलं आवाहन!

ज्या मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या वादामुळे शिवसेना-भाजपा ही २५ वर्षांची युती तुटली, त्याच मुख्यमंत्रीपदाची आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

वाचा सविस्तर

11:29 (IST) 10 Feb 2023
Odysse E-Scooter: ओडिसीची नवीन ई-स्कूटर वाहणार २५० किलोचे वजन, एकदा चार्ज झाली की धावणार ‘इतके’ अंतर, जाणून घ्या

Odysse हा मुंबई स्थापन झालेला इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप असून व्होरा कंपनी समुहाचा एक भाग आहे. हा पूर्णपणे-इलेक्ट्रिक वाहतूक प्लॅटफॉर्म असून यामध्ये जगभरातील आघाडीच्या ई. व्ही. कंपोनंट उत्पादकांची आणि तंत्रज्ञांची सांगड घालण्यात आली आहे. Odysse कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केली आहे. तर या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स आणि किती किंमतीत ती भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात आली आहे हे जाणून घेऊयात. बातमी वाचा सविस्तर

11:28 (IST) 10 Feb 2023
Tech Layoffs: गुगल मायक्रोसॉफ्टनंतर आता ‘ही’ टेक कंपनी १,६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार!

सध्या अनेक दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीमुळे आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. सगळीकडे कर्मचारी कपातीचे लोणं आले आहे. आर्थिक मंदीचे कारण देत अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. आता आणखी एका कंपनीचा समावेश झाला आहे. बातमी वाचा सविस्तर

11:27 (IST) 10 Feb 2023
Realme SmartPhones: रीअलमी ने लॉन्च केला ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन, १० मिनिटांच्या आतच होणार….

Realme ही एक चिनी कंपनी आहे. ही कंपनी मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. आता सुद्धा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन कंपनीने लॉन्च केला आहे. तर हा स्मार्टफोन कोणता आहे आणि याचे फीचर्स व किंमत किती आहे याबद्दल जाणून घेऊयात. बातमी वाचा सविस्तर

11:26 (IST) 10 Feb 2023
येत्या १५ दिवसांत राज्यात खरंच आमदारांचं पक्षांतर होणार?

गुरुवारी बच्चू कडूंनी केलेल्या विधानावर आज माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा सविस्तर

11:17 (IST) 10 Feb 2023
धक्कादायक..! दहा टक्के किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्य तर मुलींना वेळेआधीच मासिक पाळी; ‘एडोलसेंट हेल्थ’ अकादमीचे निरीक्षण

उपराजधानीतील विविध बालरोग तज्ज्ञांकडे उपचाराला जाणाऱ्या १० ते १९ वर्षीय किशोरवयीन मुलांपैकी दहा टक्के मुलांमध्ये नैराश्य दिसून येते. तर खानपानातील वाईट सवयींसह इतर कारणांमुळे बऱ्याच मुलींमध्ये पूर्वीच्या तुलनेत दोन वर्षांपूर्वीच मासिक पाळी येत असल्याचेही धक्कादायक निरीक्षण ‘एडोलसेंट हेल्थ’ अकादमीने नोंदवले आहे.

सविस्तर वाचा

11:15 (IST) 10 Feb 2023
“…मग देशात गोमांस खाण्यावरून लोकांच्या हत्या का घडवल्या?”; दत्तात्रेय होसबळेंच्या ‘त्या’ विधानावरून शिवसेनेचा भाजपाला सवाल

कोणी मजबुरीने गोमांस खाल्ले असले तरी त्यांच्यासाठी संघाचे दार बंद नाही. आजही त्यांची घरवापसी होऊ शकते, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रेय होसबळे यांनी जयपूरमधील एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या विधानावरून शिवसेनेनं भाजपावर टीकास्र सोडलं आहे. जर गोमास खाणाऱ्यांसाठी संघाचे दरवाजे उघडे असतील तर मग देशात गोमांसावरून देशात हत्या का घडवून आणल्या? असा प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून विचारण्यात आला आहे. सविस्तर वाचा

11:14 (IST) 10 Feb 2023
मुंबई: सोन्याच्या दातांमुळे फरार आरोपीला पकडण्यात यश; विम्याचे आमीष दाखवून रचला सापळा

दोन दात सोन्याचे असल्याच्या माहितीच्या आधारावर १५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात रफी किडवाई मार्ग पोलिसांना यश आले. आरोपी स्वतःची ओळख व नाव बदलून राहत होता. त्यामुळे पोलिसांनी विम्याच्या रकमेचे आमीष दाखवून त्याला मुंबईत बोलावून मोठ्या शिराफीने अटक केली.

सविस्तर वाचा

11:14 (IST) 10 Feb 2023
“अदाणी शेअर बाजारातील ‘बिग बुल’, तर मोदी त्यांच्यासाठी…”; ‘काऊ हग डे’वरून शिवसेनेचं टीकास्र!

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने प्रेमवीरांना सल्ला देत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणजेच गाईला मिठी मारून साजरा करावा, असे आवाहन केले आहे. यावरून शिवसेनेनं मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. सरकार एकीकडे जनतेला ‘गाईला मिठी मारा’ असे फर्मान सोडते आणि दुसरीकडे स्वतः ‘बिग बुल’ अदाणी यांना मिठी मारून बसले आहे, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे. सविस्तर वाचा

11:13 (IST) 10 Feb 2023
गडचिरोली: काँग्रेस नेते मालू बोगामी यांच्या हत्येच्या जखमा आजही ताज्या; नक्षलवाद्यांनी २१ वर्षांपूर्वी केली होती निर्घृण हत्या

आदिवासी समाजाबद्दल त्यांच्या समस्यांबाबत कळवळा असलेला नेता अशी ओळख असलेल्या मालू कोपा बोगामी यांच्या हत्येला आज २१ वर्ष पूर्ण होत आहेत. १० फेब्रुवारी २००२ ला नक्षलवाद्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भामरागड तालुक्यातील लाहेरीच्या जंगलात निर्घृण हत्या केली होती.

सविस्तर वाचा

11:11 (IST) 10 Feb 2023
मुंबई: आवक घटल्याने गुलाब फुलावर महागाईचा रंग; व्हॅलेंटाईन डे निमित्त किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता

करोनाविषयक नियम हटविल्यानंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे. अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’ची तरूण मंडळी आतुरतेने वाट पाहात आहे. दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त फुलबाजारांमध्ये गुलाबाच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक होते.

सविस्तर वाचा

11:08 (IST) 10 Feb 2023
गुरू माँ कांचनगिरी राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर दाखल

अयोध्येतील जुना आखाड्याच्या गुरू माँ कांचनगिरी राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर दाखल, काय चर्चा होणार याकडे सर्वांचंच लक्ष

11:02 (IST) 10 Feb 2023
राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत बदलांचे वारे

आगामी निवडणुकांचा हंगाम लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत बदल केले जाणार आहेत. पक्षाच्या विविध आघाड्यांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत पक्षात विचारविनिमय सुरू झाला आहे.

सविस्तर वाचा

10:55 (IST) 10 Feb 2023
आमदार शहाजीबापूंच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात; एकाचा जागेवरच मृत्यू

आमदार शहाजीबापू पाटील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त नाजरा येथे आयोजित शिबिरासाठी गेले. शिबिराचा कार्यक्रम संपल्यानंतर ते सांगोला शहराकडे येत असताना त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलीस संरक्षक गाडीचा ताफा माळीवाडी नाजरा येथे आला. त्याच दरम्यान एक दुचाकी स्वार आमदारांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलीस गाडीवर येऊन धडकला. या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

10:43 (IST) 10 Feb 2023
चंद्रपूर: हंसराज अहीर यांच्या आरोपाने खळबळ; भावाच्या मृत्यूला डॉक्टर विश्वास झाडे जबाबदार, गुन्हा दाखल करण्याची मागणी

माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी आपल्या भावाच्या मृत्यूस डॉ.विश्वास झाडे जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. अहिर यांचे लहान भाऊ हितेंद्र अहिर यांना १२ जानेवारी रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना अतिशय गंभीर अवस्थेत उपचारासाठी डॉ.झाडे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी महिना उलटल्यानंतर अहिर यांनी ही मागणी केली आहे.

सविस्तर वाचा...

Maharashtra Live Blog Congress BJP Shivsena

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेटMaharashtra Live Blog Congress BJP Shivsena