Marathi News Updates, 25 June 2026 : शिवसेना (ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना एक खळबळजनक पत्र लिहिले आहे. ईशान्य मुंबईतील ‘फुटीर’ खासदार संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना बॉम्बने उडवून जीवे मारण्याची जाहीर धमकी दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. तर कुणाचंही घर आम्ही बॉम्बने उडवू देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले. तर ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत फडणवीस यांनी मोठी मध्यस्थी केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर पुणे, लातूर, धाराशिव यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. महाविकास आघाडी च्या बैठकीला 23 आमदार गैरहजर होते त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे. लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. यासह राज्यातील राजकीय क्षेत्रातील ठळक घडामोडी, गुन्हे, पर्यटन, कला – क्रीडा – संस्कृती- हवामान यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Live Updates

Mumbai Maharashtra Live News Updates, 25 June 2026 : लाईव्ह अपडेट्स येथे पहा.

19:04 (IST) 25 Jun 2026

तांत्रिक बिघाडाने साखळी ओढली, डोंबिवली रेल्वे स्थानकात धावती लोकल अचानक फलाटावर खोळंबली

आतापर्यंत सिग्नल बिघाड, महापूर, आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी पडल्यावर लोकल तात्काळ थांबत होती. अनेक वर्षांनी प्रवाशांनी आपत्कालीन साखळी अचानक खाली पडल्यावर लोकलचा खोळंबा अनुभवला. ...वाचा सविस्तर
18:29 (IST) 25 Jun 2026

तुकाराम मुंढेच्या विभागाची भिवंडीत पुन्हा कारवाई, कालबाह्य अन्नपदार्थप्रकरणी ॲमेझॉनच्या व्यवस्थापकासह दोघांविरोधात गुन्हा

भिवंडीतील सरलगाव परिसरातील ॲमेझॉन रिटेल इंडिया प्राव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. कालबाह्य आणि मानवी आरोग्यास घातक अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते बाजारात विक्रीसाठी पाठविल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
18:25 (IST) 25 Jun 2026

देसाईगंजमध्ये प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू माफियांच्या धुमाकूळ, बेकायदा उपशाने घेतला आणखी एक जीव..

बुधवारी (२५ जून) सकाळी सिंड्राई वाळूघाटावर मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने वाळूचा उपसा करून ती ट्रॅक्टरमध्ये भरली जात होती. विलास देवढगले हा चालक तसेच मजूर म्हणून तेथे काम करत असताना अचानक वाळू उपसणाऱ्या यंत्राखाली दबला गेला. ...सविस्तर वाचा
18:21 (IST) 25 Jun 2026

आधारवाडी कचराभूमीच्या वेढ्यात राहून तरूणाने मिळवली वकिलीची पदवी

रवी घुलेचा हा प्रवास साठेनगरमधील असंख्य मुलांसाठी आशेचा किरण ठरला आहे. “आपलं भविष्यही बदलू शकतं” हा विश्वास त्याने आपल्या यशातून निर्माण केला आहे. ...सविस्तर वाचा
18:19 (IST) 25 Jun 2026

सूरजागडमध्ये नव्या खाणीच्या परवानगीसाठी दबावतंत्र? ओम साईराम कंपनीविरोधात ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट..

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ओम साई राम प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाखाली काही दलाल ग्राम कोस समितीतील मोजक्या सदस्यांना हाताशी धरून ठराव मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...अधिक वाचा
18:19 (IST) 25 Jun 2026

जाहिरात फलक कोसळण्‍याच्‍या घटना रोखण्‍यासाठी आता सुरक्षेचे हमीपत्र! घाटकोपरची ती दुर्घटना…

सुमारे दोन वर्षांपुर्वी मुंबईतील घाटकोपर परिसरातील एक अवाढव्य जाहिरात फलक कोसळून १७ जण ठार, तर ७९ लोक जखमी झाले होते. ...सविस्तर बातमी
18:04 (IST) 25 Jun 2026

कल्याण-बदलापूर, आसनगाव चौथी रेल्वे मार्गिका लवकरच; प्रवाशांना दिलासा मिळण्याची चिन्हे

ही मार्गिका कार्यान्वित झाल्यास अधिक लोकल फेऱ्या सुरू करणे शक्य होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.. रेल्वेच्या प्रश्नांबाबत मुंबई विभागातील खासदारांच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक गुरूवारी चिंतन हॉल येथे पार झाली. ...वाचा सविस्तर
18:03 (IST) 25 Jun 2026

"सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ", शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीवरून रोहित पवारांचा इशारा

"शेतकऱ्यांच्या विनाअट सरसकट कर्जमाफीच्याबाबतीत सरकारने विश्वासघात केल्याने आम्ही रस्त्यावरची लढाई सुरु केली असून सोमवारी (२९ जून) संभाजीनगरमध्ये एल्गार शेतकऱ्यांचा या माध्यमातून सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ. याच अनुषंगाने आज धाराशिवमध्ये शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी रस्त्यावरच्या या संघर्षासाठी पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या", असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/2070110722257043502

17:53 (IST) 25 Jun 2026

इंदूर शहराच्या धर्तीवर डोंबिवली स्वच्छ, सुंदर, हरित करण्याचा ५० संस्थांचा निर्धार

डोंबिवलीतील सुमारे ५० संस्थानी एकत्र येऊन निर्माण केलेल्या नागरी अभिवादन न्यास या शिखर संस्थेतर्फे पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती. ...सविस्तर वाचा
17:53 (IST) 25 Jun 2026

ठाणे पालिकेच्या मराठी शाळेत गुजराती शिक्षक कायम; अपात्र गुजराती शिक्षकांच्या भरवशावर विद्यार्थ्यांचे भविष्य

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पुर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक अशा शाळा चालविण्यात येतात. या शाळांमध्ये बालवाडी ते इयत्ता दहावीपर्यंत सुमारे २६ हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण घेत आहेत. ...सविस्तर बातमी
17:37 (IST) 25 Jun 2026

स्मार्ट मीटरविरोधात नागपुरात जनआक्रोश; महावितरणसमोर ग्राहकांचे शक्तीप्रदर्शन

आंदोलनकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी नागरिकांच्या घरी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविले जाणार नाहीत, असे आश्वासन मुख्य अभियंत्यांनी दिल्याचा दावा समितीने केला. ...वाचा सविस्तर
17:20 (IST) 25 Jun 2026

अनधिकृत होर्डिंग्ज ४८ तासांत हटवा अन्यथा मालमत्तेवर बोजा चढवून होणार फौजदारी कारवाई

अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी एक नोटीस प्रसिद्ध करत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज, घोषणा फलक, कि-ऑक्स आणि फ्रेम्स ४८ तासांच्या आत स्वतःहून काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. ...वाचा सविस्तर
17:10 (IST) 25 Jun 2026

डोंबिवली कुंभारखाणपाड्यातील ३३ गुन्हे दाखल; ३८ लाखाच्या चोऱ्या करणारा अट्टल घरफोड्या अटकेत

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील वाढत्या घरफोड्यांच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी परिमंडळ उपायुक्तांना विशेष पथके स्थापन करून घरफोड्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. ...सविस्तर वाचा
17:07 (IST) 25 Jun 2026

टिटवाळा बेकायदा चाळींचा विषय विधीमंडळात; अ प्रभाग अधिकाऱ्याच्या बडतर्फीची मागणी

पालिकेच्या कोणत्याही बांधकाम परवानग्या न घेता एक हजाराहून अधिक संख्येने उभारण्यात आलेल्या या चाळी बल्याणी, बनेली, वडवली, मोहने, उंभार्णी, मांडा, वासुंद्री रस्ता परिसरात उभारण्यात आल्या आहेत. ...सविस्तर वाचा
17:02 (IST) 25 Jun 2026

"पंतप्रधान मोदींनी मोहन भागवतांना गुलाम केलंय", प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; नेमकं काय घडलं?

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला लक्ष्य केले आहे. ...वाचा सविस्तर
16:32 (IST) 25 Jun 2026

तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर पुस्तक, सगळा संघर्ष 'तुकाराम'मधून जगासमोर येणार; कोणते खुलासे होणार?

तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत अनेक धाडसी निर्णय, वादग्रस्त घडामोडी आणि जनहिताच्या भूमिका पाहायला मिळाल्या. ...सविस्तर वाचा
16:16 (IST) 25 Jun 2026

खासगी जमिनीवरील सागवान तोडणी आता 'परवानगी'मुक्त; शेतकऱ्यांना वन विभागाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही

सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील आणि विशेषतः ग्रामीण भागातील हजारो शेतकरी आणि जमीन मालकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. ...वाचा सविस्तर
15:57 (IST) 25 Jun 2026

बांधावरील वाद, तक्रारीत अडकलेल्या शेतरस्त्यांची क्रांती; अनेक वर्षांनी शेतकऱ्यांची वाट मोकळी; नेमका उपक्रम काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतील शेतरस्ते अडथळामुक्त करण्याच्या उपक्रमाला वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात प्रभावी स्वरूप प्राप्त झाले आहे. ...वाचा सविस्तर
15:52 (IST) 25 Jun 2026

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग पहिला आणि दुसरा टप्पा जुलैमध्ये सेवेत दाखल होणार ; एमएमआरडीएचे नियोजन, दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण

महापे, शिळफाटा आणि कल्याण फाटा येथील वाहतूक कोंडी फुटणार; प्रवासाचा वेळ वाचणार ...अधिक वाचा
15:48 (IST) 25 Jun 2026

पावसाळ्यात दुर्गम पाड्यातील गरोदर मातांची फरफट थांबणार, ठाणे जिल्ह्यातील १२६ गरोदर महिलांसाठी विशेष आरोग्य आराखडा

पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी भागांतील गरोदर मातांना प्रसूती काळात वेळेत उपचार मिळावेत म्हणून आरोग्य विभागाने विशेष कृती आराखडा तयार केला आहे. ...सविस्तर वाचा
15:42 (IST) 25 Jun 2026

स्मार्ट मीटरबाबत गैरसमज दूर करण्यासाठी आता ग्राहक मेळावे; तक्रारींचे तत्काळ निराकरण होणार!

स्मार्ट (टीओडी) मीटर हे पूर्णतः अचूक असून सामान्य वीज ग्राहकांसाठी फायदेशीर असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळविण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर उपयुक्त ठरत आहेत. ...अधिक वाचा
15:33 (IST) 25 Jun 2026

ठाणे-पालघरमध्ये अवैध प्रवासी वाहतुकीला चाप बसणार; ग्रामीण भागात दर अर्ध्या तासाला धावणार एसटी बस, परिवहनमंत्र्यांची घोषणा

Thane News, Palghar News, Pratap Sarnaik, Maharashtra ST Bus, MSRTC Rural Connectivity, RTO Action Thane, Illegal Passenger Transport, Maharashtra Budget Session, Neelam Gorhe, Niranjan Davkhare, Sunil Shinde, Rayte Bridge Accident, Rural Transport Maharashtra, Maharashtra Government Decision, Maharashtra Transport Ministry, लोकसत्ता ताज्या बातम्या, लोकसत्ता बातम्या, लोकसत्ता न्युज, लोकसत्ता मराठी न्युज, मराठी न्युज, ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण, प्रताप सरनाईक, एसटी बस सेवा, अवैध प्रवासी वाहतूक, आरटीओ कारवाई, विधानपरिषद चर्चा, नीलम गोऱ्हे, निरंजन डावखरे, सुनील शिंदे, रायते पूल अपघात, अपघातप्रवण क्षेत्र, कृती आराखडा, मालवाहतूक वाहन कारवाई, परवाना रद्द, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, महाराष्ट्र शासन निर्णय, बस फेऱ्यांमध्ये वाढ, प्रवासी सुरक्षा, रस्ते सुरक्षा मोहीम ...अधिक वाचा
15:04 (IST) 25 Jun 2026

रिंग रेल्वे, मेट्रो, अमृत योजनेवर ठाणेकरांचा सवाल; ‘वेक अप ठाणेकर’ची हाक, ठाण्याच्या भवितव्यासाठी प्रतिष्ठित नागरिक मैदानात

ठाणे शहरातील अनियोजित विकास प्रकल्प, वाढती वृक्षतोड आणि प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात प्रतिष्ठित नागरिकांनी 'वेक अप ठाणेकर' अभियान सुरू केले आहे. ...अधिक वाचा
14:44 (IST) 25 Jun 2026

Video : विश्वास नांगरे पाटलांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात! व्हिडिओ व्हायरल; बक्षीस म्हणून नियुक्ती मिळाल्याचा आरोप…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने विश्वास नांगरे पाटील हिंदू संमेलन २०२६ कार्यक्रमात बोलत असतानाचा व्हिडीओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन शेअर केला आहे. व्हिडीओत नांगरे पाटील भाषणात आरएसएस आणि हेगडेवार यांचा उल्लेख करताना दिसत आहेत. ...सविस्तर वाचा
14:42 (IST) 25 Jun 2026

पोलीस दलातील कथित गैरव्यवहाराबाबत आरोप करणारी महिला पोलीस शिपाई निर्दोष

पोलीस दलातील कथित गैरव्यवहाराबाबत व्हॉट्सॲपवर संदेश प्रसारित केल्याच्या आरोपातून महिला पोलीस शिपाई कविता पतंगे यांना ठाणे सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ...सविस्तर बातमी
14:35 (IST) 25 Jun 2026

कल्याण मलंग रोड, कोळेगावांमधील खड्ड्यांमुळे वाहतूक संथगतीने

कल्याण पूर्वेतील मलंग रोड १०० फुटी चौक आणि काटई-बदलापूर रस्त्यावरील कोळेगाव हद्दीत खोदकामानंतर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. ...अधिक वाचा
14:11 (IST) 25 Jun 2026

अशी ही बनवाबनवी… बनावट ‘प्रमा’ प्रकरणाला राजकीय वळण; सत्ताधारी पक्षातील ‘जोडगोळी’ संशयाच्या भोवऱ्यात?

सूत्रांच्या माहितीनुसार, ही जोडगोळी गेल्या काही वर्षांपासून विविध शासकीय कार्यालये, राजकीय कार्यक्रम आणि विकासकामांच्या संदर्भात एकत्र वावरताना दिसत होती. ...अधिक वाचा
14:03 (IST) 25 Jun 2026

तीन टप्पे, आठ वर्षे आणि मोठी झेप; जीएमआर घडविणार नागपूर विमानतळाचे नवे रूप

नागपूर विमानतळाच्या विकासासाठी जीएमआर एअरपोर्ट्स कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलच्या आधारे हा संकरित विकास आराखडा राबविण्यात येणार आहे. ...वाचा सविस्तर
13:56 (IST) 25 Jun 2026

लाच लुचपत विभागाकडून सुरू असलेल्या शिक्षणाच्या चौकशीचा आढावा - मंत्री भोयर यांची ग्वाही

राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार हा शिक्षण विभागात सुरू आहे असा थेट आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अनेक शिक्षकांची चौकशी सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला. ...अधिक वाचा
13:47 (IST) 25 Jun 2026

सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरीची मोठी संधी! 'पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा'; वाचा सविस्तर

नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुण-तरुणींना नामवंत खासगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमूहांच्या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ...सविस्तर बातमी

Maharashtra News Live Updates | Maharashtra Konkan Monsoon Live Updates

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स