Maharashtra Breaking News Updates, 14 August 2024: राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा करून आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे अजित पवार गटाच्या यात्रेतून छगन भुजबळांनीही जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा तापण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.