Maharashtra Politics Updates : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माजी आमदार राजन साळवी यांच्याबाबतही आमदार किरण सामंत यांनी मोठा दावा केला आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे काही खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी सूचक भाष्य देखील केलं आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही सुरूच आहेत. तसेच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. याबरोबरच तसेच मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्याबाबत कौटुंबीक न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. तसेच पुण्यासह राज्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यासह राजकीय व इतरही महत्त्वाच्या घडामोडीची अपडेट आपण लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमांतून जाणून घेऊयात…

Live Updates

Marathi News Live Update Today | आजच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

18:20 (IST) 7 Feb 2025

देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ भूमिकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “उद्योजकांबाबत घेतलेली भूमिका…”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत बोलताना मोठा इशारा दिला होता. उद्योजकांना कोणी धमक्या देत असतील तर त्यांच्यावर मकोका लावा अशा सूचनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिल्या. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस यांनी जरी ही भूमिका घेतली असली तरी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, असं राऊतांनी म्हटलं.

17:18 (IST) 7 Feb 2025

शिळफाटा रस्त्यावरील दुभाजक बंद केल्याने विद्यार्थी, पालकांना फेरफटका

शिळफाटा रस्त्यावरील वाहन कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी या रस्त्याच्या काही भागात मोकळे असलेले रस्ता दुभाजक बंद केले आहेत. या बंद दुभाजकामुळे शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या गृहसंकुलातील विद्यार्थी, पालक यांना फेरफटका मारून शालेय बससाठी विद्यार्थ्यांना पोहचवावे लागते.

वाचा सविस्तर…

16:53 (IST) 7 Feb 2025

कल्याण, भांडुप परिमंडलात अभय योजनेतून ७ हजार घरांमध्ये परतला प्रकाश

कल्याण : थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केलेल्या ग्राहकांसाठी महावितरणने आणलेल्या अभय योजनेचा लाभ घेणाऱ्या कल्याण आणि भांडुप परिमंडलातील ७ हजार ८९१ ग्राहकांना पुन्हा वीजजोडणी मिळाली. या दोन्ही परिमंडलातील १३ हजार ८४८ ग्राहकांनी योजनेत सहभाग घेत ३० कोटी ६२ लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला.

सविस्तर वाचा…

16:41 (IST) 7 Feb 2025

Swapneel Joshi news,Swapneel Joshi Maha Kumbh Mela,Swapneel Joshi Triveni Sangam bath,famous Marathi actor Swapneel Joshi in maha kumbh mela,marathi news,latest news,loksatta news,स्वप्नील जोशी बातम्या,स्वप्नील जोशी महा कुंभमेळा,स्वपनील जोशी त्रिवेणी संगम स्नान,महा कुंभमेळ्यातील प्रसिद्ध मराठी अभिनेता स्वप्नील जोशी,मराठी बातम्या,ताज्या बातम्या,लोकसत्ता बातम्या,

मुंबई : सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा विशाल सोहळा असणारा ‘महाकुंभ मेळा’ सुरू आहे. देशातील विविध भागांतून बहुसंख्येने साधू – संत, सर्वसामान्य नागरिकांसोबत राजकीय, मनोरंजन आदी विविध क्षेत्रातील मंडळी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी यानेही महाकुंभमेळ्यात हजेरी लावून त्रिवेणी संगमात स्नान केले आहे.

सविस्तर वाचा…

16:21 (IST) 7 Feb 2025

मुंबईत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या ‘एवढ्या’ बांगलादेशींना वर्षभरात पकडलं, मुंबई पोलिसांची दिली माहिती

महाराष्ट्रात या वर्षात एकूण २०१ बांगलादेशी नागरिक मुंबईत बेकायदेशीरपणे वास्तव्य करताना पकडले गेले असून त्यांच्याविरोधात १३१ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. त्यापैकी २० जणांना हद्दपार करण्यात आले आहे. यापैकी सुमारे ५ ते ७ जणांची कागदपत्रे खरी असल्याचे पोलिसांना आढळून आल्याने त्यांना थेट बांगलादेशात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js
15:13 (IST) 7 Feb 2025

“…म्हणून अशा अफवा पसरवतात”, ‘ऑपरेशन टायगर’बाबत बोलताना अरविंद सावंतांचं मोठं विधान

राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय राठोड यांनी ऑपरेशन टायगर होणार असल्याचं विधान केलं होतं. तसेच मंत्री उदय सामंत हे देखील माध्यमांशी बोलताना ‘ऑपरेशन टायगर’बाबत मोठं भाष्य केलं होतं. ठाकरे गटाचे काही खासदार संपर्कात असल्याचे दावे शिंदे गटाकडून केले जात होते. मात्र, यानंतर यावर आता ठाकरे गटाच्या खसदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. अरविंद सावंत यांनी म्हटलं की, “जाणीवपूर्वक अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. आताही महायुतीचं सरकार व्यवस्थित चालत नाहीये. बीडमध्ये ज्या घटना घडल्या आहेत. बीडच्या बातम्या रोखण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जातात. या बातम्या आल्या की त्या बातम्या थांबतात”, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.

15:06 (IST) 7 Feb 2025

वैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण करुन खुनाचा प्रयत्न, वाघोलीतील घटना; पाच जण अटकेत

पुणे : वैमनस्यातून तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली.

वाचा सविस्तर…

14:56 (IST) 7 Feb 2025

सागरी किनारा मार्गावर स्पोर्ट्स गाड्यांचा धुमाकूळ, कर्णकर्कश आवाजामुळे रहिवाशांची झोपमोड

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास जलद व वेगवान होण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या सागरी किनारा मार्गावर दररोज रात्री स्पोर्ट्स गाड्यांचा धुमाकूळ सुरू आहेत. गाड्यांच्या भरधाव वेग आणि कर्णकर्कश आवाजाने वरळी सी फेस आणि आसपासच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांची झोपमोड होता आहे.

सविस्तर वाचा…

14:53 (IST) 7 Feb 2025

दापोली किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळ सदृश्य परिस्थिती,

दापोली किनारपट्टीवर उत्तरेकडील जोरदार वाऱ्याचा वेगामुळे मासेमारीला ब्रेक लागल्यामुळे किमान ८०% नौका नांगर टाकून उभ्या आहेत.

वाचा सविस्तर…

14:45 (IST) 7 Feb 2025

औक घटकेसाठी एपीएमसी सभापती, उपसभापतींची निवडणूक, दोन आठवड्यात निवडणूक घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

नवी मुंबई</strong> : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड दोन आठवड्यात घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने दिले आहेत. सन २०२२ मध्ये सभापती, उपसभापती यांनी आपत्र ठरल्याने राजीनामा दिला होता, त्यामुळे ही पदे गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असून तोपर्यंत सभापती अशोक डक काळजीवाहू सभापती म्हणून कार्यभार पाहत आहेत. ऑगस्टमध्ये या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात येत असून पुन्हा नव्याने निवडणुका होतील.

सविस्तर वाचा…

14:39 (IST) 7 Feb 2025

शहाड स्थानकाजवळचे बेकायदा वाहनतळ हटवले, दोन दशकांपासून सुरू होते वाहनतळ; पालिका, पोलिसांची कारवाई

गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेली शहाड रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूलाखालील अवैध वाहनतळ हटवण्यात आले आहे.

वाचा सविस्तर…

14:32 (IST) 7 Feb 2025

म्हाडाची अद्याप सेवानिवृत्तांवरच मदार! शासन निर्णय डावलून मुदतवाढ

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) सेवानिवृत्तांची खोगीर भरती केली असून त्यापैकी काही नियुक्त्या करताना शासन निर्णय डावलून मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे २३ म्हाडा अधिकाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

14:22 (IST) 7 Feb 2025

रस्तेबाधित शेतकऱ्यांना लवकर मोबदला द्या, शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

बदलापूर : कल्याण-मुरबाड-माळशेज घाटापर्यंतच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणात कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या गेल्या. मात्र या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी नुकतीच ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेतली.

सविस्तर वाचा…

14:02 (IST) 7 Feb 2025

“तोच विनोद पुन्हा-पुन्हा सांगितला जातो तेव्हा…”, देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर खोचक टीका

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्याचं पाहायला मिळालं. पण या निकालांवर शंका व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावेही केले गेले. या निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत होते. आज लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबाबत सविस्तर आकडेवारी देऊन तीन महत्त्वाचे प्रश्न निवडणूक आयोगाला केले आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करत खोचक टीका केली आहे. “तोच विनोद पुन्हा-पुन्हा सांगितला जातो तेव्हा आपण हसत नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

14:01 (IST) 7 Feb 2025

शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याची शासनाला शिफारस, रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठविल्याने शेतकऱ्यांचा मोर्चा रद्द

उरण : विरार अलिबाग कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात रायगड जिल्हाधिकारी यांनी शासनाला येथील गावनिहाय दरवाढ करण्याची शिफारस करणारे पत्र पाठविले आहे

सविस्तर वाचा…

13:42 (IST) 7 Feb 2025

जिल्हा प्रशासन ढिम्म .. महारेरा हतबल ! ठाणे, रायगड, पालघर मधील घरखरेदीदारांचे २०२.७८ कोटींचा परतावा थकीत

गेल्या सहा ते सात वर्षाच्या कालावधीत ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्यांने पहिले नसल्याने ३३९ घरखरेदीदारांचे तब्बल २०२.७८ कोटी रुपयांचा परतावा विकासकांकडून वसूल करण्यात आलेला नाही. यामुळे सामान्य घरखरेदीदार मेटाकुटीस आले आहेत.

वाचा सविस्तर…

13:12 (IST) 7 Feb 2025

शाळेच्या पाचव्या माळ्यावरून उडी मारून विद्यार्थाने केली आत्महत्या …

नवी मुंबई : नवी मुंबईतील सी वुड्स येथील एका इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थाने पाचव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सविस्तर वाचा…

12:43 (IST) 7 Feb 2025

“१०० टक्के आम्ही नऊ खासदार…”, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर ठाकरे गटाच्या खासदारांचं स्पष्टीकरण

राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय राठोड यांनी ऑपरेशन टायगर होणार असल्याचं विधान केलं होतं. तसेच मंत्री उदय सामंत हे देखील माध्यमांशी बोलताना ‘ऑपरेशन टायगर’बाबत मोठं भाष्य केलं होतं. ठाकरे गटाचे काही खासदार संपर्कात असल्याचे दावे शिंदे गटाकडून केले जात होते. मात्र, यानंतर यावर आता ठाकरे गटाच्या खसदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसेच “१०० टक्के आम्ही नऊ खासदार कुठेही जाणार नाहीत”, असं स्पष्टीकरण अरविंद सावंत यांनी दिलं आहे.

12:22 (IST) 7 Feb 2025

दीदी आपल्यातून गेलेली नाही… पं. हृदयनाथ मंगेशकर यांची भावना

पुणे : गायक आपले अस्तित्व जेव्हा कलेच्या क्षेत्रात विसर्जित करतो तेव्हा त्याची अभिवृत्ती जन्म घेत असते. गाणं हेच लता दीदीचं जगणं होतं. आजही ती गाण्याच्या रुपात जीवंत आहे. दीदी आपल्यातून गेलेली नाही. ती इथेच आहे.

वाचा सविस्तर…

12:21 (IST) 7 Feb 2025

विम्याच्या नावाखाली ९१ हजारांची ऑनलाइन फसवणूक

पिंपरी : क्रेडीट कार्डवरील विमा नको असल्यास प्रोसेस करून ओटीपी नंबर सांगण्यास भाग पाडून त्याद्वारे एका तरुणाची ९० हजार ७८० रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपरीतील संत तुकारामनगर, येथे १० ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याबाबत तब्बल दीड वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

12:21 (IST) 7 Feb 2025

पुणे : सात नव्या पोलीस ठाण्याची हद्द निश्चिती

पुणे : शहराचा वाढता विस्तार, गुन्हेगारी आणि त्यामुळे निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन शहरात नव्या सात पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आल्यानंतर आता या पोलीस ठाण्यांची हद्द निश्चिती करण्यात आली आहे. गृह विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

वाचा सविस्तर…

12:20 (IST) 7 Feb 2025

गुन्हेगारांना ‘अपवित्र’ करण्यासाठी कटिबद्ध, अमितेश कुमार यांची भूमिका

पुणे : शहरात वाढत चाललेले वाहनांचे तोडफोडीचे प्रकार तसेच अन्य गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कायदेशीर मार्गाने गुन्हेगारांना ‘अपवित्र’ केले जाईल असे भूमिका पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी स्पष्ट केली.

वाचा सविस्तर…

12:20 (IST) 7 Feb 2025

सोलापूरकर यांच्याविरोधातील तक्रार अर्जाबाबत कायदेशीर पडताळणी करूनच निर्णय

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात प्राप्त झालेल्या तक्रार अर्जांबाबत कायदेशीर पडताळणी करण्यात येत असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी दिली.

वाचा सविस्तर…

12:19 (IST) 7 Feb 2025

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी बांधावर, नाशिक कृषी महोत्सवात ॲड. माणिक कोकाटे यांचे आश्वासन

नाशिक : सेवेकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अण्णासाहेब मोरे हे हितगुज साधतात, त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहे, अशी ग्वाही कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी दिली.

वाचा सविस्तर…

12:18 (IST) 7 Feb 2025

लोखंड व त्यावरील लेपनाची झीज मोजणे होणार शक्य, आयआयटी मुंबईच्या संशोधकांचे संशोधन

मुंबई : कोणताही धातू गंजू नये यासाठ त्यावर संरक्षणात्मक लेपन (कोटिंग) लावण्यात येते. काही कालावधीनंतर हे लेपन नष्ट होऊन धातू गंजण्यास सुरुवात होते. मात्र ही बाब लगेच लक्षात येत नाही. त्यामुळे धातूवरील संरक्षणात्मक लेपनाच्या झिजण्याचे प्रमाण मोजण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थान मुंबईच्या (आयआयटी मुंबई) संशोधकांनी नवीन तंत्र विकसित केले आहे.

वाचा सविस्तर…

12:17 (IST) 7 Feb 2025

नवीन तानसा जलवाहिनी कार्यान्वित, बाधित परिसरातील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने

मुंबई : पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा (टनेल शाफ्ट) दरम्यान नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी कार्यान्वित करण्याची कार्यवाही गुरुवारी पूर्ण झाली.

वाचा सविस्तर…

12:17 (IST) 7 Feb 2025

कर आकारणीनंतरही बांधकाम अवैधच; अनधिकृत व्यावसायिक आस्थापनांबाबत महापालिकेचे स्पष्टीकरण

मुंबई : झोपडपट्टी भागातील सर्व व्यावसायिक आस्थापनांना मालमत्ता कर लागू करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच, करनिर्धारण व संकलन खात्याच्या वतीने अशा आस्थापनांवर कर आकारणी करण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षणाची कार्यवाहीसुद्धा सुरू केली आहे.

वाचा सविस्तर…

12:16 (IST) 7 Feb 2025

मालमत्ता हस्तांतरण ‘डीआरपी’कडून धारावीतील पालिकेच्या जागेवरील इमारतींसाठी नियम, जी उत्तर विभागाकडून परिपत्रक

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत अधिसूचित क्षेत्रातील मुंबई महानगरपालिकेच्या जागेवरील मक्ता, भाडेतत्त्वावरील मालमत्ता, रिक्त भूभाग (व्हीएलटी) आणि इतर सर्व मालमत्तेचे हस्तांतरण आता पालिकेऐवजी धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडून (डीआरपी) केले जाणार आहे.

वाचा सविस्तर…

12:16 (IST) 7 Feb 2025

मुंबई-बदलापूर अंतर ६० मिनिटांत, तीन किमीच्या बोगद्यासह चार अंतरबदल मार्गिकांच्या प्रवेश नियंत्रण मार्गाचा लवकरच आराखडा

मुंबई : मुंबई-बदलापूर अंतर केवळ ६० मिनिटांत, तर बदलापूर-नवी मुंबई अंतर अवघ्या ३० मिनिटांत पार करणे येत्या काही वर्षांत सहज शक्य होईल. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बदलापूर- हेदुटणे, विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका असा प्रवेश नियंत्रण मार्ग (अॅक्सेस कंट्रोल रोड) बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा सविस्तर…

11:42 (IST) 7 Feb 2025

राहुल गांधी आज दुपारी पत्रकार परिषद घेणार; कोणत्या विषयांवर भाष्य करणार?

काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज दुपारी १२:३० वाजता महत्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह आदी महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी नेमकी कोणते मुद्दे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

'काही गोष्टी राखून ठेवल्यात योग्य वेळी सर्व सांगणार', उदय सामंत यांचं सूचक विधान, (फोटो-संग्रहित छायाचित्र)