Maharashtra Politics News Updates, 14 May 2026: अशोक खरात प्रकरणात आज रुपाली चाकणकर यांची ईडीसमोर चौकशी होणार असून त्यांच्या आर्थिक हितसंबंधांची चौकशी केली जाणार आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधनवापर कमी करण्याचं केलेलं आवाहन सध्या चर्चेत असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आज चक्क कार्सचा ताफा टाळून बुलेटवर विधानभवन गाठलं. त्यांच्यामागे डबलसीट आशीष शेलार हेदेखील बसले होते. याशिवाय महाराष्ट्रात NEET पेपरफुटीप्रकरणी नाशिक व पुण्यातील संशयित आरोपींची सध्या चौकशी केली जात आहे.
Today’s Latest Marathi News Live , 14 May 2026: NEET पेपरफुटीप्रकरणी नाशिक व पुण्यातील संशयितांच्या चौकशीत काय पुढे येणार?
वादळी पावसाने अहिल्यानगर जिल्ह्यात महिलेसह वृद्धाचा मृत्यू
औषध पुरवठा सुरळीत राहणार का?; औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी देशव्यापी बंद, प्रशासनाची धावपळ…
बोरगाव आणि दुधनवाडी येथे शंभर टक्के स्व-गणना पूर्ण! मुदखेडचे नायब तहसीलदार मारोती जगताप यांची माहिती
इस्रायलमध्ये ३५०० जागांवर नोकरीची संधी… दरमहा दोन लाख रुपये पगार, महिलांना विशेष प्राधान्य!
केंद्र सरकारच्या निर्यातबंदीने कारखान्यांच्या गळ्याला फास; शेतकरी विरोधी निर्णय - राजू शेट्टी
राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे लवकरच शिंदेच्या शिवसेनेत
“आंतरराष्ट्रीय अपयश झाकण्यासाठी ही नवीन उठाठेव तर नाही ना?”, पंतप्रधान मोदींच्या आवाहनांवर मनसेचा सवाल
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग पूर्णत्वाच्या जवळ :नितीन गडकरी
मिरा-भाईंदरच्या घनकचरा प्रकल्पाला आग
भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या उत्तन धावगी येथील घनकचरा प्रकल्पात साठलेल्या कचऱ्याच्या डोंगराला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात घातक धुराचे लोट पसरले असून, वारंवार लागणाऱ्या आगींमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
उत्तनच्या धावगी येथे शासनाकडून घनकचरा प्रकल्पासाठी मिरा-भाईंदर महापालिकेला मोफत जागा देण्यात आली आहे. या ठिकाणी शहरातील कचरा आणून त्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, मधल्या काळात स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केल्यामुळे प्रक्रिया बंद करण्यात आली होती. परिणामी, कोणतीही प्रक्रिया न करता येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने कचऱ्याचे प्रचंड डोंगर उभे राहिले आहेत.
दरम्यान, अशाच साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. आग मोठ्या प्रमाणात भडकली असल्याने धुराचे प्रचंड लोट उसळले. घटनास्थळी अग्निशमन दलाची एक गाडी आधीपासूनच तैनात होती. मात्र, आगीची तीव्रता वाढल्याने प्रशासनाने तातडीने आणखी गाड्या घटनास्थळी रवाना केल्या. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र उष्णतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे आग पुन्हा भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन दलाकडून सतत पाण्याचा मारा केला जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
आरटीईची प्रतिक्षा यादी जाहीर होईना, पालक वर्ग संभ्रमात
दौऱ्यावर जाण्याचा उत्साह अन् इच्छा, महापौरांकडून धार्मिक स्थळांवरील कारवाईबाबत भूमिका स्पष्ट
छत्रपती संभाजी महाराजांना रत्नागिरी पोलिसांची इतिहासात पहिलीच शासकीय सलामी
ब्युटी पार्लरमध्ये नसरापूरच्या घटनेचा संदर्भ, जातीवाचक शिवीगाळ अन् महिला अटकेत
अन….पोलीस अधीक्षक आँचल दलाल सायकलवरून कार्यालयात पोहोचल्या
जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच हजर… कुठे आणि कशासाठी?
पिंपरी-चिंचवड क्राइम! पुणे महापालिका आयुक्तांचा सचिव असल्याची बतावणी, सात जणांना नोकरीचे आमिष आणि…
Aaditya Thackeray on devendra fadnavis bullet ride: देवेंद्र फडणवीसांच्या बुलेट राईडवर आदित्य ठाकरेंची टीका
कॅमेरे व्यवस्थित लावून साधेपणा आणि त्यागाचा दिखावा करणाऱ्या सरकारमधील लोकांना पाहून आश्चर्य वाटतं. त्यांच्याच अपयशी धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचली आहे, ह्याची पूर्ण जाणीव असतानाही निवडणुकांच्या प्रचारासाठी आणि दौऱ्यांसाठी हजारो कोटी रुपये खर्च करायचे आणि दुसऱ्या बाजूला जनतेसमोर त्यागाचं नाटक करायचं, हीच खरी दुटप्पी भूमिका आहे. आज भारतासमोर उभं असलेलं आर्थिक संकट केवळ मध्यपूर्वेतील युद्धामुळे नाही, तर गेल्या १२ वर्षांतील अपयशी आर्थिक धोरणांचा परिणाम आहे. देशातील लाखो तरुण बेरोजगार आहेत, नोकऱ्यांसाठी भटकत आहेत, दारिद्र्य रेषेखालील आकडे कमी झाल्याचं खोटं चित्र दाखवलं जात आहे. अशा परिस्थितीत जनतेला त्यागाचे उपदेश देण्यापेक्षा सरकारने स्वतःची जबाबदारी स्वीकारून पारदर्शकपणे सांगावं की भारतीयांसाठी नेमकं काय केलं जात आहे! - आदित्य ठाकरे</p>
एचएसआरपी नसेल, तर एक हजार रुपयांचा दंड; जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसविणे अनिवार्य
नीटची परीक्षाच रद्दच करा, राज ठाकरे यांची मागणी
कल्याण डोंबिवलीतील रस्ते, मैदाने अडवून भरणारे आठवडी बाजार हटवा; खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा कडोंमपा प्रशासनाला आदेश
सहा धावपट्ट्या, सात कोटी प्रवासी; नोएडा देशातील नविन मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ
‘व्हीआयपीं’च्या शहरातील दौऱ्याचा ताफा आता निम्म्यावर!, पुणे पोलिसांचा निर्णय
मोदींच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काटकसर सुरु, म्हणाले "मी स्वत: …"
टिटवाळ्यात बेकायदा चाळींच्या पालिकेच्या पाठीराखा कामगाराने खरेदी केला ‘जेसीबी’
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट : ४९ दिवसांची कोठडी आणि १०५ साक्षीदार; २ गुन्ह्यांत चार्जशीट दाखल
कल्याण डोंबिवलीतील नगरसेवक वाहनांचे ताफे कमी करून रेल्वेने प्रवास करतील का? शहरातील नागरिकांनी उपस्थित केले प्रश्न
Ashish Shelar Viral Video: आशीष शेलार यांनी मोदींच्या आवाहनाची टिंगल केली?
सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्याकडूनच मोदींच्या आवाहनाची टिंगल? सुषमा अंधारेंनी शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा, विधानभवनाच्या आवारात नेमकं काय घडलं/
https://twitter.com/andharesushama/status/2054832833890587056
उल्हास खाडीतील कल्याण-बदलापूर वाॅटर मेट्रोला तत्वता मान्यता देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी तयार केला सविस्तर प्रकल्प आराखडा
Video: सोशल मीडियावरील आक्षेपांवर देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले, "पंतप्रधानांवर अशी टीका करणारे बिनडोक"!
अशोक खरातला 'सिद्धपुरुष' म्हणणारा सिन्नरचा नामकर्ण आवारे आहे तरी कोण ?

नाशिकमध्ये एसआयटी चौकशीसाठी दाखल झालेल्या रुपाली चाकणकर यांनी दिवंगत रवींद्र पगार यांच्या निवासस्थानी भेट दिली.
Today’s Latest Marathi News Live , 14 May 2026: अशोक खरात प्रकरणात आज रुपाली चाकणकर यांची ईडीसमोर चौकशी
