Latest Marathi News Live Updates, 15 June 2026: कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी खासदार शाहू महाराजांसोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी लावून धरली. तसेच, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक करत, त्यांची बदली न करण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली. तर दुसरीकडं, आजपासून राज्यात शाळा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. या बातम्यांसहच दिवसभरातील ताज्या घडामोडी आणि ब्रेकिंग न्यूज वाचा एका क्लिकवर…

Live Updates

Mumbai Maharashtra Latest News Updates, 15 June 2026

19:32 (IST) 15 Jun 2026

ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारल्यावर एससी आरक्षण रद्द करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली…

ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांचे आरक्षण रद्द करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. ...वाचा सविस्तर
18:23 (IST) 15 Jun 2026

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वहाळ शाळेत प्रवेशोत्सव

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाळेतील अत्याधुनिक ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब’चे उद्घाटन करण्यात आले ...सविस्तर वाचा
18:22 (IST) 15 Jun 2026

विधान परिषद निकालानंतरच खासदार जाधव यांच्या पक्षांतराचा मुहूर्त ! जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचेही काही पदाधिकारी संपर्कात

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर नाव न घेता कडक शब्दांत टीका केली आहे. ...सविस्तर बातमी
18:06 (IST) 15 Jun 2026

डोंबिवली मानपाडा रस्त्यावर रिक्षेवर झाड कोसळले

या दुर्घटनेत रस्त्यावरून जाणारी एक रिक्षा झाडाखाली दबली गेली. स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तातडीने धाव घेत रिक्षाचालक आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. ...सविस्तर वाचा
17:54 (IST) 15 Jun 2026

नवीन विकास आराखड्यानंतर वनजमीनीचा टिडीआर द्या, मंत्री प्रताप सरनाईकांची भुमीका

त्यामुळे नवीन विकास आराखड्याचा अभ्यास करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. ...सविस्तर बातमी
17:53 (IST) 15 Jun 2026

‘राष्ट्रवादी’चे सर्व नगरसेवक भाजपाच्या उमेदवारासोबत! आ.प्रताप पाटील चिखलीकरांची ग्वाही

चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील यांनी माघार घेतल्यामुळे आता ही निवडणूक भाजपासाठी एकतर्फी मानली जात आहे. ...अधिक वाचा
17:14 (IST) 15 Jun 2026

एसटी महामंडळाचा प्रवाशांना मोठा झटका; १० टक्के भाडेवाढ आता 'या' तारखेपर्यंत लागू राहणार, जाणून घ्या नवे दर

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने प्रवाशांना मोठा झटका देत १० टक्के हंगामी भाडेवाढीला आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. ...अधिक वाचा
16:56 (IST) 15 Jun 2026

स्मार्ट मीटरच्या भीतीने डोंबिवली, कल्याणमधील रहिवाशांनी मीटर पेटीला ठोकली टाळी

४८ तासांत जुना मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा संदेश आल्यानंतर, वाढीव वीज बिलाच्या भीतीने अनेक सोसायट्या आणि चाळींमधील रहिवाशांनी मीटर पेटीला कुलूप लावले आहे. ...सविस्तर बातमी
16:45 (IST) 15 Jun 2026

ठाण्यात पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम शाळा सुरू होणार; ठाणे पालिकेचा सर्वसाधारण सभेपुढे प्रस्ताव

या निर्णयामुळे मध्यमवर्गीय आणि श्रमिक कुटुंबांतील विद्यार्थ्यांना घराजवळच दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळणार असून, यामुळे कोणतीही मराठी शाळा बंद होणार नसल्याची ग्वाही प्रशासनाने दिली आहे. ...वाचा सविस्तर
16:25 (IST) 15 Jun 2026

WhatsApp Web युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता कॉम्प्युटर, लॅपटॉपवरही करता येणार 'ग्रुप कॉलिंग'; एकाच वेळी ३२ जण जोडले जाणार!

आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप वेबवर फक्त दोन व्यक्तींमध्येच व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल करण्याची सोय होती. मात्र, या नव्या अपडेटमुळे आता मोबाईल आणि डेस्कटॉप अ‍ॅपप्रमाणेच ब्राउझरवरही ग्रुप कॉलिंगचा आनंद घेता येईल. ...सविस्तर बातमी
16:08 (IST) 15 Jun 2026

पोलीस मारहाणीतील शिक्षक मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; शिवसेना नेते अंबादास दानवे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मराठी न बोलणाऱ्या चालकांवर आरटीओकडून परवाना निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याने हा उपक्रम राबवला जात आहे. ...वाचा सविस्तर
16:08 (IST) 15 Jun 2026

परप्रांतीय रिक्षा चालकांना मराठीचे धडे देण्यासाठी डोंबिवलीत भाजपकडून कार्यशाळा

मराठी न बोलणाऱ्या चालकांवर आरटीओकडून परवाना निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याने हा उपक्रम राबवला जात आहे. ...वाचा सविस्तर
15:33 (IST) 15 Jun 2026

कल्याण मध्ये तुकाराम मुंढेंचा दणका…. प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या तीन टपरी चालकांविरुद्ध गुन्हे

Kalyan Gutkha Raid: अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पान टपरी चालकांकडून एकूण ११ हजार रूपयांचा प्रतिबंधित विविध प्रकारच्या सुगंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
15:26 (IST) 15 Jun 2026

मुलुंडमध्ये ‘गुप्ता चणा भंडार’वर तुकाराम मुंढेची कारवाई, पण ठाण्यात कधी….

Tukaram Mundhe FDA Raid: ठाणे शहरातील उघड्यावरील पाणी पुरी केंद्र, फरसाण बनविणारे कर्मचारी अत्यंत गलिच्छ पद्धतीने सर्व हाताळत असतात. त्यामुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा अस्वच्छ राहणाऱया विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. ...वाचा सविस्तर
15:18 (IST) 15 Jun 2026

दाम्पत्याचे देहदानाचे दातृत्व ! असेही एक उदाहरण जिथे कर्ण पण मागे पडेल

वर्ध्यातील श्वेता आणि संदीप बंडावार या दाम्पत्याने आपल्या २२ व्या लग्न वाढदिवसाचे औचित्य साधून देहदानाचा स्तुत्य संकल्प केला आहे ...वाचा सविस्तर
15:17 (IST) 15 Jun 2026

असा बेभान हा वारा… जागतिक वारा दिन! स्वच्छ आणि समृद्ध भविष्यासाठी वाऱ्याची ऊर्जा…

दरवर्षी १५ जून रोजी जगभरात 'जागतिक वारा दिन' साजरा केला जातो. मानवी जीवनात वाऱ्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि पर्यावरणपूरक पवन ऊर्जेचा प्रसार करणे हा यामागचा मुख्य उद्देश असून पवन ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र व भारताचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. ...अधिक वाचा
15:17 (IST) 15 Jun 2026

हिरानंदानी इस्टेट परिसरात मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद; आठ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड, सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी १२० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ९ लाख रुपये किमतीच्या ८ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ...सविस्तर वाचा
15:09 (IST) 15 Jun 2026

तुकाराम मुंढेंची बदली करू नका, त्यांनी चांगला दणका दिलायं: मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक करत, त्यांची बदली न करण्याची मागणी शासनाकडे केली.

15:08 (IST) 15 Jun 2026

टिटवाळ्यात विजेच्या वाढत्या लपंडावामुळे महावितरण विरूध्द स्वाक्षरी मोहीम

या समस्येविरोधात जनहित फाउंडेशनचे संस्थापक रितेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली ...सविस्तर बातमी
15:07 (IST) 15 Jun 2026

खत वितरणाच्या नव्या प्रणालीमुळे शेतकरी हैराण; कॉग्रेसच्या वतीने रस्ता रोको

सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी हैराण झाले असून, ही प्रणाली तात्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
14:57 (IST) 15 Jun 2026

तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता सौंदर्य प्रसाधनातील भेसळ थांबवण्याकडे

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, कांदिवली आणि सातारा जिल्ह्यातील कराड येथे टाकलेल्या छाप्यात तब्बल ३४ लाख ६१ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. ...अधिक वाचा
14:16 (IST) 15 Jun 2026

काँग्रेस नेते रामदास सुमठाणकरही नगरसेवकांसह सहलीवर!मुदखेडचे नगरसेवक गोव्याच्या बीचवर; देगलूरचे नगरसेवक विजापूर-बंगळुरू दौऱ्यावर

मतदार फुटू नयेत म्हणून काँग्रेस नेते रामदास सुमठाणकर यांच्यासह देगलूरचे नगरसेवक विजापूर-बंगळुरू दौऱ्यावर गेले आहेत ...वाचा सविस्तर
14:12 (IST) 15 Jun 2026

साकेत-आनंदनगर उन्नत मार्गाच्या निर्माण कामामुळे महामार्गावर आठवडाभर वाहतूक कोंडीची शक्यता

आनंदनगर रेल्वे पुलाजवळ सिमेंटचे खांब उभारण्याचे काम सुरू असल्याने अवघ्या १० मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना २५ ते ३० मिनिटे लागत होती. ...सविस्तर बातमी
13:56 (IST) 15 Jun 2026

VIDEO: अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताला वर्ष उलटलं, तरी तपास अहवाल येईना; नागरी उड्डाणमंत्री म्हणतात…

Ahmedabad Plane Crash: या दुर्दैवी आणि भीषण अपघातात २२९ प्रवासी, १२ क्रू मेंबर्स (विमान कर्मचारी) आणि जमिनीवरील १९ नागरिक अशा एकूण २६० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ...सविस्तर बातमी
13:54 (IST) 15 Jun 2026

सत्ताधारी भाजपकडून पिंपरी महापालिका सभेचे लाईव्ह प्रेक्षपण बंद! 'राष्ट्रवादी'कडून नोटीस; ॲड. असीम सरोदे म्हणाले, "१५ दिवसांत…"

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे ऑनलाईन लाईव्ह प्रेक्षपण सत्ताधारी भाजपने बंद केल्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. ...वाचा सविस्तर
13:13 (IST) 15 Jun 2026

मराठवाड्यावर दुष्काळसावट ! पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याचे निर्देश,राज्याचे मुख्य सचिवांकडून आढावा

शेतीसाठी पाणी सोडण्यास पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली असून, जायकवाडीतील उर्वरित २८ टक्के पाणीसाठा राखून ठेवणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. ...वाचा सविस्तर
13:07 (IST) 15 Jun 2026

अंबरनाथमध्ये अवैध हायड्रोकार्बन पेट्रोलियम साठ्यावर राज्य दक्षता पथकाची धडक कारवाई - १.२० कोटींचा मुद्देमाल जप्त

एका अवैध साठवणूक केंद्रावर छापा टाकून तब्बल १ कोटी २० लाख रुपये किमतीचा हायड्रोकार्बन पेट्रोलियम पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
12:54 (IST) 15 Jun 2026

क्रूरतेचा कळस! पतीकडून घरात बांधून ठेवत गरम गजाचे चटके; गळ्यातील साखळदंडासह ६ किमी चालत पीडित महिला पोहोचली पोलिसांत

Crime News: पतीने ज्या साखळदंडाचा वापर मांगीबाईंचा आवाज दाबण्यासाठी आणि त्यांना कैदेत ठेवण्यासाठी केला होता, अखेर मांगीबाईंनी त्याच साखळदंडाला आपल्यावरील अत्याचाराचा सर्वात मोठा जिवंत पुरावा बनवून पतीला तुरुंगाची हवा खायला लावली. ...सविस्तर वाचा
12:42 (IST) 15 Jun 2026

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील डाॅ. राॅथ रस्ता, उर्सेकरवाडीत फेरीवाल्यांची घुसखोरी

तडफदार अधिकारी भारत पवार रजेवर गेल्याने आणि नवीन बदली कामगारांच्या कथित पाठराखणीमुळे 'ग' प्रभागात फेरीवाल्यांची दादागिरी वाढली आहे. ...सविस्तर बातमी
12:42 (IST) 15 Jun 2026

सेंचुरी रेयॉन हायस्कूल आता सरला बिर्ला हायस्कूल

शिक्षण व समाजसेवा क्षेत्रातील आदरणीय डॉ. सरला बिर्ला यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी सेंचुरी रेयॉन एज्युकेशन सोसायटीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला ...सविस्तर बातमी

 Maharashtra News Live Updates in Marathi | Maharashtra Monsoon Latest Update

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स