Maharashtra Political New Live Updates, 13 November 2025: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे, यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याचा आज चौथा दिवस आहे, तरीही राज्यातील अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यांवर मतभेद दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, राज्यातील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.

Live Updates

Mumbai Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा लाईव्ह आढावा

11:50 (IST) 13 Nov 2025

घारापुरी बेटाच्या पोटातील रहस्ये उलगडणार! पुरातत्त्व विभागाकडून उत्खनन

या पुरातन बेटावर विविध ठिकाणी करण्यात आलेल्या खोदकामात दळणकांड करण्यासाठी वापरात येणारी पुरातन काळातील जाते, मडकी, भव्य शिवलिंग, विविध पुरातन वस्तूंचे भग्न अवशेष अनेकदा सापडले आहेत. …अधिक वाचा
11:46 (IST) 13 Nov 2025

“माझा घातपात करण्याचा कट चेष्टेचा विषय नाही, मुख्यमंत्र्यांनी यात गांभीर्याने लक्ष घालावे”: मनोज जरांगे पाटील

माझा घातपात करण्याचा रचलेला कट चेष्टेचा विषय नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीत ते पत्रकारांशी बोलत होते. माझ्या घातपात कटप्रकरणात बीडचा कांचन साळवी आरोपी नसल्यास तो ४-५ दिवस फरार का होता? असा सवाल जरांगेंनी केला आहे.

या कटप्रकरणी धनंजय मुंडेची चौकशी झाली पाहिजे, कारण हा कट त्यांनीच रचला आहे, असा दावाही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अजित पवार, तुम्ही धनंजय मुंडेवर पांघरूण घालणे थांबवा; अन्यथा २०२९ ला मी तुम्हाला महागात पडेन, असा इशाराही दिला आहे. तसेच, अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना चौकशीला पाठवावं, असं म्हणत धनंजय मुंडे, तुम्ही लपू नका; नार्को टेस्टसाठी अर्ज करा आणि टेस्टला हजर राहा, असेही मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

11:26 (IST) 13 Nov 2025

बसमध्ये ‘हाथ सफाई’ करणारा गजाआड; १० पेक्षा अधिक गुन्ह्यांची उकल

आरोपी सराईत गुन्हेगार असून बसमधील गर्दीचा फायदा घेऊन तो प्रवाशांचे सामान लंपास करीत होता. अशाप्रकारे त्याने केलेल्या १० गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. …सविस्तर वाचा
11:25 (IST) 13 Nov 2025

‘डिजिटल अरेस्ट’ गुन्ह्यात बॅंक व्यवस्थापकाचा सहभाग… केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अटक

पोलीस असल्याचे भासवून नागरिकांना आभासी कैदेत (डिजिटल अरेस्ट) ठेवून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे गुन्हे वाढले आहे. …अधिक वाचा
11:25 (IST) 13 Nov 2025

अतिरिक्त सत्र न्यायाधीशाविरोधात लाचप्रकरणी गुन्हा…, न्यायालयातील लिपिकाला १५ लाखांची लाच घेताना अटक

आरोपी चंद्रकात वासुदेव याला १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अद्याप अतिरिक्त सत्र न्यायाधील एजाजुद्दीन काझी यांना अटक करण्यात आलेली नाही. …अधिक वाचा
11:24 (IST) 13 Nov 2025

इमारतीवरून सळई पडून तरूणाचा मृत्यू; मरोळ येथील घटना

घटनास्थळी असलेल्या मजुरांनी त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. …सविस्तर वाचा
11:24 (IST) 13 Nov 2025

२००५ सालच्या दादरमधील जमावाने केलेल्या हिंसेचे प्रकरण : खासदार रवींद्र वायकरांसह इतर निर्दोष

आरोपी दंगल करणाऱ्या बेकायदेशीर जमावाचा भाग होते की नाही हे निश्चितपणे सांगता नाही, असे न्यायालयाने आरोपींची सुटका करताना निकालात म्हटले. …अधिक वाचा
11:23 (IST) 13 Nov 2025

अतिक्रमणकर्त्यांचे राष्ट्रीय उद्यानानजीकही पुनर्वसन नको; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावले

अतिक्रमणकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येकी ९० एकरच्या तीन नव्या जागां दोन आठवड्यांत शोधण्याचे आदेश दिले. तथापि, या जागा राष्ट्रीय उद्यानानजीक असू नयेत, असेही न्यायालयाने यावेळी सरकारला बजावले. …वाचा सविस्तर
11:22 (IST) 13 Nov 2025

आता ‘धर्मवीर’ नाही, तर ‘गुवाहाटी फाईल्स’… निर्माते मंगेश देसाई काय म्हणाले..

धर्मवीर दोन नंतर धर्मवीर तीन हा चित्रपट प्रदर्शित होईल असे सर्वांना वाटत होते. परंतु त्याऐवजी ‘गुवाहाटी फाइल्स’ हा चित्रपटाची निर्मिती करु शकतो अशी शक्यता मंगेश देसाई यांनी एका माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले. …अधिक वाचा
11:21 (IST) 13 Nov 2025

अवजड वाहतुकीमुळे घोडबंदर कोंडले, वाहनांच्या रांगा

या मार्गावरील घोडबंदर गायमुख घाट परिसराची मोठ्याप्रमाणात दुरावस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना प्रचंड वाहतुक कोंडीचा मन:स्ताप सहन करावा लागतो. …सविस्तर वाचा
11:20 (IST) 13 Nov 2025

ठाणे, घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवा प्रयोग, अवजड वाहतुकीसाठी असणार स्वतंत्र पिवळी मार्गिका

पिवळ्या मार्गिकेतून केवळ अवजड तर, त्या शेजारील मार्गिकेतून इतर वाहनांची वाहतूक सुरू ठेवली जाणार असून यामुळे इतर वाहनांचा प्रवास कोंडीमुक्त आणि वेगवान होण्याची चिन्हे आहेत. …सविस्तर बातमी
11:19 (IST) 13 Nov 2025

अमली पदार्थांच्या टोळीला दणका… दोघांना १५ वर्षांच्या कारवासाची शिक्षा

अमली पदार्थ शाखेच्या कांदिवली कक्षाने २०२२ मध्ये कारवाई करून ४ आरोपींना अटक केली होती. …वाचा सविस्तर
11:16 (IST) 13 Nov 2025

Mango Season : यावर्षी आंबा हंगाम एक ते दोन महिने लांबणीवर पडणार? बदलत्या हवामानाचा आंबा बागायतदारांना मोठा आर्थिक फटका

Konkan Mango Season : मागील दोन ते तीन दिवसापासुन थंडीला सुरुवात झाल्याने आंबा कलमांना येणारा मोहोर अद्यापही दिसून येत नाही. …वाचा सविस्तर
10:43 (IST) 13 Nov 2025

“मला योग्य वाटेल ते करेन”, अंजली दमानिया यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया

पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव समोर आल्यानंतर अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, “माझ्या सदसद्विवेकबुद्धीला अनुसरून मला जे योग्य वाटेल ते मी करेन.”