Maharashtra Political New Live Updates, 12 November 2025 : शिवसेना पक्ष व चिन्हाबाबात आज (१२ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. न्यायालय याप्रकरणी आज निकाल देऊ शकतं किंवा सुनावणी ऐकून निकाल राखून ठेवू शकतं. दुसऱ्या बाजूला पुण्यातील जमीन व्यवहाराप्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ४२ कोटी रुपये न भरल्यास अमेडिया कंपनीवर जप्तीची कारवाई होऊ शकते. दरम्यान, या प्रकरणामुळे आता अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील वाचवू शकत नाहीत, असा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला आहे. बुधवारी सकाळी याप्रकरणी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचंही दमानिया यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. या निवडणुकीत शरद पवार व आशिष शेलार यांच्यात युती झाली असून ग्रुप पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे एमसीएचं उपाध्यक्षपद आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जाणार आहे.

Live Updates

Mumbai Maharashtra Breaking News Live Updates Today : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एकाच क्लिकवर.

18:08 (IST) 12 Nov 2025

VIDEO : महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा; जळगाव, भुसावळ स्थानकांवर तपासणी !

काळ्या खडूच्या सहाय्याने शौचालयात लिहिलेला संदेश प्रवाशांनी वाचला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. …सविस्तर वाचा
18:00 (IST) 12 Nov 2025

Video: मुरबाडमधील आजींचा अशिक्षित ते सुशिक्षिततेचा प्रवास, ९७ व्या वर्षाच्या आजी घेत आहेत शिक्षण

शिक्षण ही मानवाच्या मुलभूत गरजांपैकी एक गरज मानली जाते. शिक्षणाला कोणतीही वयोमर्यादा नसते. …सविस्तर बातमी
17:39 (IST) 12 Nov 2025

ठाण्यातील तलाव, खाड्यांवर मृत्यूचा सापळा

Thane City Lakes Death: ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र या शहरातील तलाव आणि खाडी मृत्यूचा सापळा बनले आहे. …वाचा सविस्तर
17:27 (IST) 12 Nov 2025

पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघा पादचाऱ्यांचा मृत्यू; कात्रज घाट, बाह्यवळण मार्गावर अपघाताच्या घटना

कात्रज घाटात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. …अधिक वाचा
17:23 (IST) 12 Nov 2025

पागोटे पुलाजवळ तेलगळतीमुळे उरण लोकल बंद; गळती थांबविण्याचे काम सुरू

जेएनपीटी ते आय ओ टी एल(धुतुम) या तेल वाहिनीला बुधवारी पहाटे गळती लागल्याने उरण ते नेरुळ बेलापूर या मार्गावरील लोकल सेवा दुपारी १२ वाजल्या पासून बंद करण्यात आली आहे. …सविस्तर बातमी
17:08 (IST) 12 Nov 2025

धुळे पोलिसांकडे आरोपींसाठी आधुनिक मोजमाप संकलन कक्ष; २७० नमुने घेतले, गुन्हे तपासाचा वेग वाढणार

केंद्र सरकारने कैद्यांची ओळख कायदा १९२० रद्द करून २०२२ मध्ये सुधारित फौजदारी प्रक्रिया (ओळख) कायदा लागू केला आहे. …अधिक वाचा
16:01 (IST) 12 Nov 2025

Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर’ एटीएस’कडून कोंढवा भागातील संशयितांची झाडाझडती

Pune ATS Raid : राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील कोंढवा भागातील संशयितांची चौकशी केली. …वाचा सविस्तर
15:54 (IST) 12 Nov 2025

युवा कलावंत जगमित्र लिंगाडेला तबला वादनात एक लाखांचे बक्षीस

अंतिम चरणातील स्पर्धेत जगमित्र रामलिंग लिंगाडे याने प्रथम क्रमांक प्राप्त करत लाखाचे बक्षीस प्राप्त केले. …वाचा सविस्तर
15:42 (IST) 12 Nov 2025

दहा तोळे सोने तारण ठेवून पोलिसांना लाच; लोहाऱ्यात निरीक्षकासह चार कर्मचारी सापळ्यात

पोलीस अंमलदार अर्जुन तिघाडे याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. …अधिक वाचा
15:17 (IST) 12 Nov 2025

एमसीएच्या अध्यक्ष निवडीसाठी सचिन तेंडुलकरचं मतदान

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

सचिन तेंडुलकरने केलं मतदान

सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालणार

सात वाजता मतमोजणी

15:01 (IST) 12 Nov 2025
राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेप्रकरणी २१ जानेवारीला सुनावणी, शरद पवारांचे वकील म्हणाले, “मला युक्तिवादासाठी…”

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार अपात्रतेप्रकरणी आता २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे. आज याप्रकरणी सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर शरद पवारांचे वकील कपिल सिब्बल म्हणाले, मला युक्तिवादासाठी दोन तास लागतील. यावर न्यायमूर्तींनी सिब्बल यांना विचारलं की तुम्ही सुरुवातीला कोणता युक्तिवाद करणार? त्यानंतर सिब्बल यांनी त्यांचे काही मुद्दे मांडले. दरम्यान, न्यायालयाने २१ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता पुढील सुनावणी घेऊ असं म्हटलं आहे.

14:45 (IST) 12 Nov 2025

बीडमध्ये नेत्यांचे पक्षांतराचे सोहळे; धोंडे, खांडे, देशमुख यांचे पक्षांतर, हेमंत क्षीरसागरही वाटेवर

बीड जिल्ह्यात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला असून, भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंगळवारी मुंबईत प्रवेश केला. …सविस्तर वाचा
14:31 (IST) 12 Nov 2025

Leopard Attack : जुन्नरमधील डुंबरवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

Junnar leopard attack : बिबट्या शेळीवर हल्ला करत असताना परिसरात काही लहान मुले खेळत होती. …वाचा सविस्तर
12:57 (IST) 12 Nov 2025

आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे केंद्र ठरणाऱ्या एज्युसिटी प्रकल्पाला सिडकोकडून गती, ११६ कोटींच्या रस्त्याची निविदा जाहीर

पहिल्या टप्प्यात सिडको मंडळ एज्युसिटी प्रकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता बांधण्याचे काम हाती घेणार आहे. …वाचा सविस्तर
12:56 (IST) 12 Nov 2025

पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण; तहसीलदारांबाबत RTI कार्यकर्ते म्हणाले, “भ्रष्टाचाराचे सात आरोप, राजकारण्यांचा लाडका अन्…”

पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहाराप्रकरणी निलंबित करण्यात आलेले पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवलेयांचे आदेश रद्दबातल करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. दुसऱ्या बाजूला माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सूर्यकांत येवले यांच्या कथित भ्रष्ट कारभारावरून सरकार व राजकारण्यांवर टीका केली आहे. कुंभार म्हणाले, येवलेंमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं की प्रशासकीय अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका. या अधिकाऱ्याला नगरहून पुण्याला कोणी आणलं. येवले यांच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर सात वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. मात्र प्रत्येक वेळी ते राजकीय सेटिंग लावून सुखरूप निसटले.

12:40 (IST) 12 Nov 2025

उद्धव ठाकरेंनी माझा बळी दिला…सुहास सामंत यांचा शिवसेनेला (ठाकरे) अखेरचा ‘जय महाराष्ट्र’

Suhas Samant joins Shinde Sena : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ठाकरे यांची साथ सोडल्यामुळे शिवसेनेला (ठाकरे) धक्का मानला जात आहे. …सविस्तर बातमी
12:31 (IST) 12 Nov 2025

चार दशकानंतर कोकणातील महत्वाच्या धरणाच्या कामातील अडसर दूर; २६३ हेक्टर वनजमिनीचे जलसंपदा विभागकडे हस्तांतरण

अलिबाग तालुक्यातील शेतजमिन सिंचनाखाली यावी तसेच तालुक्यातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी १९८२ साली या धरणाच्या कामाला मंजूरी देण्यात आली होती. …वाचा सविस्तर
12:21 (IST) 12 Nov 2025

Cornea Transplant : कॉर्निया प्रत्यारोपण सेवांना नवा वेग! आरोग्य मंत्रालयाने नियम केले सोपे…

देशातील कॉर्निया प्रत्यारोपण सेवा आणि नेत्रदानाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. …सविस्तर वाचा
11:59 (IST) 12 Nov 2025

Fake Call Center : मुलुंडमध्ये अनधिकृत कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, पाच जणांना अटक

Mumbai Police : पोलिसांनी कॉल सेंटर चालवणाऱ्या पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाइल आणि इतर साहित्य जप्त केले. …वाचा सविस्तर
11:31 (IST) 12 Nov 2025

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला ‘परवडणाऱ्या गृहप्रकल्पा’चा दर्जा? म्हाडाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित

MHADA : हा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. तसे झाल्यास जुन्या इमारतींचे प्रकल्प व्यवहार्य होतील, असा दावा करण्यात आला आहे. …अधिक वाचा
11:20 (IST) 12 Nov 2025

Pune Rape Case : विवाहाचे आमिष दाखवून पुण्यात दोन युवतींवर बलात्कार

Pune Crime News : विवाहाच्या आमिषाने वेगवेगळ्या घटनेत दोन युवतींवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. …सविस्तर वाचा
11:09 (IST) 12 Nov 2025

नीलेश घायवळविरुद्ध ‘मकोका’ कायद्यान्वये तिसरी कारवाई; महिला व्यावसायिकाला धमकावून ४५ लाखांची खंडणी प्रकरण

Pune Police : आतापर्यंत घायवळविरुद्ध मकोका कायद्यान्वये तीन गुन्हे दाखल झाले आहेत’, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. …सविस्तर बातमी
11:08 (IST) 12 Nov 2025

बोपोडी जमीन व्यवहारप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करा, शीतल तेजवानीची उच्च न्यायालयात धाव, तातडीच्या सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार

प्रसारमाध्यमांच्या वृत्तांच्या आधारे त्यांना बोपोडी जमीन प्रकरणात गोवले जात असल्याचा आरोप करून आपल्याविरुद्धचा हा गुन्हा रद्द करण्याची मागणी तेजवानी यांनी केली आहे. . …वाचा सविस्तर
11:01 (IST) 12 Nov 2025

तुळजापुरात ड्रग्ज तस्करीला राजाश्रय! तस्करांसाठी भाजपाच्या पायघड्या, दिमाखदार सोहळ्याद्वारे पक्षप्रवेश; सुप्रिया सुळेंचं थेट फडणवीसांना पत्र

10:53 (IST) 12 Nov 2025

शिवसेना पक्ष, चिन्ह व आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेना पक्ष, चिन्ह व आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून या सुनावणीसाठी खासदार अनिल देसाई व विधान परिषद सदस्य अनिल परब न्यायालयात दाखल झाले आहेत. यावेळी अनिल देसाई म्हणाले, या खटल्यामधील सर्व वाद-प्रतिवाद झाले आहेत. त्यामुळे न्याय मूर्ती सूर्य कांत म्हणाले आहे आहेत की हे प्रकरण आता पहिल्यापासून ऐकण्याची आवश्यकता नाही. आम्हाला आशा आहे की लोकशाही वाचवणारा निर्णय आपल्यासमोर येईल.

10:49 (IST) 12 Nov 2025

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, शहझीन सिद्दीकींच्या स्वतंत्र तपासाच्या मागणीवर भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश

बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) करण्याच्या मागणीसाठी पत्नी शहझीन यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाने मंगळवारी दखल घेतली. …सविस्तर वाचा
10:32 (IST) 12 Nov 2025

रोहित आर्याची चकमक बनावट असल्याचा आरोप, याचिकेवर सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार

याचिका मागे घेत असल्याचे याचिकाकर्त्यांकडून न्यायालयाला सांगण्यात आले. त्याला न्यायालयाने मान्यता दिली. …अधिक वाचा
10:31 (IST) 12 Nov 2025

निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे आदेश रद्दबातल करण्याची कार्यवाही सुरू

Pune News : बोपोडी येथील सरकारी दूध डेअरी जागा घोटाळ्या प्रकरणी पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांना सरकारने निलंबित केले आहे. …वाचा सविस्तर
10:28 (IST) 12 Nov 2025

Pune Municipal Elections 2025 : पुण्यात माजी उपमहापौर, माजी सभागृह नेत्यांच्या अडचणीत वाढ !

माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह अविनाश बागवे आणि इतर माजी नगरसेवकांना याचा फटका बसणार आहे. …वाचा सविस्तर
10:19 (IST) 12 Nov 2025

घाटकोपर, कुर्ला, माटुंगा, चुनाभट्टीमध्ये २२ तास पाणीपुरवठा बंद

शुक्रवार, दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून शनिवार, दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत (एकूण २२ तास) सुरू राहणार आहे. …सविस्तर वाचा