Maharashtra Political New Live Updates, 12 November 2025 : शिवसेना पक्ष व चिन्हाबाबात आज (१२ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. न्यायालय याप्रकरणी आज निकाल देऊ शकतं किंवा सुनावणी ऐकून निकाल राखून ठेवू शकतं. दुसऱ्या बाजूला पुण्यातील जमीन व्यवहाराप्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ४२ कोटी रुपये न भरल्यास अमेडिया कंपनीवर जप्तीची कारवाई होऊ शकते. दरम्यान, या प्रकरणामुळे आता अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील वाचवू शकत नाहीत, असा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला आहे. बुधवारी सकाळी याप्रकरणी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचंही दमानिया यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. या निवडणुकीत शरद पवार व आशिष शेलार यांच्यात युती झाली असून ग्रुप पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे एमसीएचं उपाध्यक्षपद आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जाणार आहे.

Live Updates

Mumbai Maharashtra Breaking News Updates Today : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एकाच क्लिकवर.

10:09 (IST) 12 Nov 2025

“अजित पवारांना आता मोदीही वाचवू शकणार नाहीत”, बावनकुळेंच्या भेटीनंतर अंजली दमानियांचा दावा

Anjali Damania vs Ajit Pawar : पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन व्यवहाराप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मेघदूत बंगल्यावर दमानिया व बावनकुळे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. …सविस्तर वाचा
09:59 (IST) 12 Nov 2025

Nagpur Winter Session 2025 : नागपूरचे हिवाळी अधिवेशन, कोणत्या मंत्र्यांना कोणते बंगले? असे ठरणार निकष…

नागपूरमध्ये ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांच्या निवास व्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. …वाचा सविस्तर
09:41 (IST) 12 Nov 2025

Mira Bhayandar Stamp Duty Scam : मीरा भाईंदरमधील ४९२ प्रकरणांत ११४ कोटींची मुद्रांक चोरी!

या प्रकरणांत ११४ कोटींची मुद्रांक चोरी झाल्याचा अंदाज असून दंडासह ही रक्कम ५५९ कोटींच्या घरात गेली आहे. …सविस्तर बातमी
09:39 (IST) 12 Nov 2025

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला, तरी…

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचातर्फे आयोजित ‘बहुरंगी, बहुढंगी भाई’ या विशेष कार्यक्रमात रसिकांनी पुलंच्या व्यक्तिमत्त्वाचे नानाविध पैलू अनुभवले. …सविस्तर बातमी
09:23 (IST) 12 Nov 2025

आमच्याकडे थकबाकी आहे का? कर भरण्यासाठी नगरपालिकांमध्ये का होतेय गर्दी?

आमच्याकडे काही थकबाकी नाही ना ? असेल, तर कृपया एकदा बघून घ्या, अशा प्रकारचे विनम्र शब्द सध्या नगरपालिका कार्यालयांमध्ये ऐकायला येत आहेत. …अधिक वाचा
09:13 (IST) 12 Nov 2025

Diabetes : सडपातळ अन् शारीरिक श्रम करणाऱ्यांनाही मधुमेहाचा धोका! नवीन ‘टाईप ५’ मधुमेहाविषयी जाणून घ्या…

मधुमेह हा सहसा लठ्ठपणाशी जोडला जातो. परंतु, अनेक मधुमेही हे लठ्ठ नसतात, हे निरीक्षण गेल्या ७५ वर्षांत वारंवार नोंदविले गेले आहे. …अधिक वाचा
09:02 (IST) 12 Nov 2025

सह्याद्री रुग्णालयाच्या चौकशीत ‘ससून’ने केले हात वर! अखेर पोलिसांची मुंबईतील ‘जेजे’कडे धाव

याच प्रकरणात वैद्यकीय हलगर्जीपणाची चौकशी करण्यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयाने नकार दिल्याने आता डेक्कन पोलिसांनी मुंबईतील जे. जे. रुग्णालयाला चौकशीसाठी पत्र दिले आहे. …सविस्तर वाचा
08:23 (IST) 12 Nov 2025

राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी आज अंतिम सुनावणी

शिवसेना पक्ष चिन्ह व आमदार अपात्रतेप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह व आमदार अपात्रतेप्रकरणी देखील सुनावणी होणार आहे.