Maharashtra Political New Live Updates, 12 November 2025 : शिवसेना पक्ष व चिन्हाबाबात आज (१२ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. न्यायालय याप्रकरणी आज निकाल देऊ शकतं किंवा सुनावणी ऐकून निकाल राखून ठेवू शकतं. दुसऱ्या बाजूला पुण्यातील जमीन व्यवहाराप्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ४२ कोटी रुपये न भरल्यास अमेडिया कंपनीवर जप्तीची कारवाई होऊ शकते. दरम्यान, या प्रकरणामुळे आता अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील वाचवू शकत नाहीत, असा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला आहे. बुधवारी सकाळी याप्रकरणी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचंही दमानिया यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. या निवडणुकीत शरद पवार व आशिष शेलार यांच्यात युती झाली असून ग्रुप पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे एमसीएचं उपाध्यक्षपद आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जाणार आहे.
Mumbai Maharashtra Breaking News Updates Today : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एकाच क्लिकवर.
रोहित आर्याची चकमक बनावट असल्याचा आरोप, याचिकेवर सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार
निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे आदेश रद्दबातल करण्याची कार्यवाही सुरू
Pune Municipal Elections 2025 : पुण्यात माजी उपमहापौर, माजी सभागृह नेत्यांच्या अडचणीत वाढ !
घाटकोपर, कुर्ला, माटुंगा, चुनाभट्टीमध्ये २२ तास पाणीपुरवठा बंद
“अजित पवारांना आता मोदीही वाचवू शकणार नाहीत”, बावनकुळेंच्या भेटीनंतर अंजली दमानियांचा दावा
Nagpur Winter Session 2025 : नागपूरचे हिवाळी अधिवेशन, कोणत्या मंत्र्यांना कोणते बंगले? असे ठरणार निकष…
Mira Bhayandar Stamp Duty Scam : मीरा भाईंदरमधील ४९२ प्रकरणांत ११४ कोटींची मुद्रांक चोरी!
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला, तरी…
आमच्याकडे थकबाकी आहे का? कर भरण्यासाठी नगरपालिकांमध्ये का होतेय गर्दी?
Diabetes : सडपातळ अन् शारीरिक श्रम करणाऱ्यांनाही मधुमेहाचा धोका! नवीन ‘टाईप ५’ मधुमेहाविषयी जाणून घ्या…
सह्याद्री रुग्णालयाच्या चौकशीत ‘ससून’ने केले हात वर! अखेर पोलिसांची मुंबईतील ‘जेजे’कडे धाव
राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी आज अंतिम सुनावणी
शिवसेना पक्ष चिन्ह व आमदार अपात्रतेप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह व आमदार अपात्रतेप्रकरणी देखील सुनावणी होणार आहे.
