Maharashtra Political New Live Updates, 12 November 2025 : शिवसेना पक्ष व चिन्हाबाबात आज (१२ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. न्यायालय याप्रकरणी आज निकाल देऊ शकतं किंवा सुनावणी ऐकून निकाल राखून ठेवू शकतं. दुसऱ्या बाजूला पुण्यातील जमीन व्यवहाराप्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ४२ कोटी रुपये न भरल्यास अमेडिया कंपनीवर जप्तीची कारवाई होऊ शकते. दरम्यान, या प्रकरणामुळे आता अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील वाचवू शकत नाहीत, असा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला आहे. बुधवारी सकाळी याप्रकरणी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचंही दमानिया यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. या निवडणुकीत शरद पवार व आशिष शेलार यांच्यात युती झाली असून ग्रुप पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे एमसीएचं उपाध्यक्षपद आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जाणार आहे.
Mumbai Maharashtra Breaking News Updates Today : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एकाच क्लिकवर.
दिल्ली बॉम्ब स्फोटाचे मुंब्रा कनेक्शन ?
आठवड्याची मुलाखत : बालपण कुठंय?… ‘स्क्रीन टाइम’मध्ये हरवलंय!
ठाण्यात खासगी शाळांची दुरावस्था, शिक्षण विभागाचे अधिकारी जबाबदारी घेणार का ? काँग्रेसचा इशारा…
शहरबात उद्योगाची : चाकणचे ग्रहण सुटणार कधी?
VIDEO : महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा; जळगाव, भुसावळ स्थानकांवर तपासणी !
Video: मुरबाडमधील आजींचा अशिक्षित ते सुशिक्षिततेचा प्रवास, ९७ व्या वर्षाच्या आजी घेत आहेत शिक्षण
ठाण्यातील तलाव, खाड्यांवर मृत्यूचा सापळा
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघा पादचाऱ्यांचा मृत्यू; कात्रज घाट, बाह्यवळण मार्गावर अपघाताच्या घटना
पागोटे पुलाजवळ तेलगळतीमुळे उरण लोकल बंद; गळती थांबविण्याचे काम सुरू
धुळे पोलिसांकडे आरोपींसाठी आधुनिक मोजमाप संकलन कक्ष; २७० नमुने घेतले, गुन्हे तपासाचा वेग वाढणार
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर’ एटीएस’कडून कोंढवा भागातील संशयितांची झाडाझडती
युवा कलावंत जगमित्र लिंगाडेला तबला वादनात एक लाखांचे बक्षीस
दहा तोळे सोने तारण ठेवून पोलिसांना लाच; लोहाऱ्यात निरीक्षकासह चार कर्मचारी सापळ्यात
एमसीएच्या अध्यक्ष निवडीसाठी सचिन तेंडुलकरचं मतदान
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
सचिन तेंडुलकरने केलं मतदान
सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालणार
सात वाजता मतमोजणी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार अपात्रतेप्रकरणी आता २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे. आज याप्रकरणी सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर शरद पवारांचे वकील कपिल सिब्बल म्हणाले, मला युक्तिवादासाठी दोन तास लागतील. यावर न्यायमूर्तींनी सिब्बल यांना विचारलं की तुम्ही सुरुवातीला कोणता युक्तिवाद करणार? त्यानंतर सिब्बल यांनी त्यांचे काही मुद्दे मांडले. दरम्यान, न्यायालयाने २१ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता पुढील सुनावणी घेऊ असं म्हटलं आहे.
Order: There might be some overlapping issues. Firstly, arguments will commence in Shiv Sena matter, followed by NCP cases. Petitioners' side is allocated 3 hrs time. Respondents shall be given 2 hrs time. Both sides may appoint 1 nodal counsel for completing pleadings and filing…
— Live Law (@LiveLawIndia) November 12, 2025
बीडमध्ये नेत्यांचे पक्षांतराचे सोहळे; धोंडे, खांडे, देशमुख यांचे पक्षांतर, हेमंत क्षीरसागरही वाटेवर
Leopard Attack : जुन्नरमधील डुंबरवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे केंद्र ठरणाऱ्या एज्युसिटी प्रकल्पाला सिडकोकडून गती, ११६ कोटींच्या रस्त्याची निविदा जाहीर
पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण; तहसीलदारांबाबत RTI कार्यकर्ते म्हणाले, “भ्रष्टाचाराचे सात आरोप, राजकारण्यांचा लाडका अन्…”
पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहाराप्रकरणी निलंबित करण्यात आलेले पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवलेयांचे आदेश रद्दबातल करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. दुसऱ्या बाजूला माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सूर्यकांत येवले यांच्या कथित भ्रष्ट कारभारावरून सरकार व राजकारण्यांवर टीका केली आहे. कुंभार म्हणाले, येवलेंमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं की प्रशासकीय अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका. या अधिकाऱ्याला नगरहून पुण्याला कोणी आणलं. येवले यांच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर सात वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. मात्र प्रत्येक वेळी ते राजकीय सेटिंग लावून सुखरूप निसटले.
उद्धव ठाकरेंनी माझा बळी दिला…सुहास सामंत यांचा शिवसेनेला (ठाकरे) अखेरचा ‘जय महाराष्ट्र’
चार दशकानंतर कोकणातील महत्वाच्या धरणाच्या कामातील अडसर दूर; २६३ हेक्टर वनजमिनीचे जलसंपदा विभागकडे हस्तांतरण
Cornea Transplant : कॉर्निया प्रत्यारोपण सेवांना नवा वेग! आरोग्य मंत्रालयाने नियम केले सोपे…
Fake Call Center : मुलुंडमध्ये अनधिकृत कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, पाच जणांना अटक
जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला ‘परवडणाऱ्या गृहप्रकल्पा’चा दर्जा? म्हाडाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित
Pune Rape Case : विवाहाचे आमिष दाखवून पुण्यात दोन युवतींवर बलात्कार
नीलेश घायवळविरुद्ध ‘मकोका’ कायद्यान्वये तिसरी कारवाई; महिला व्यावसायिकाला धमकावून ४५ लाखांची खंडणी प्रकरण
बोपोडी जमीन व्यवहारप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करा, शीतल तेजवानीची उच्च न्यायालयात धाव, तातडीच्या सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार
तुळजापुरात ड्रग्ज तस्करीला राजाश्रय! तस्करांसाठी भाजपाच्या पायघड्या, दिमाखदार सोहळ्याद्वारे पक्षप्रवेश; सुप्रिया सुळेंचं थेट फडणवीसांना पत्र
प्रति
— Supriya Sule (@supriya_sule) November 12, 2025
मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मंत्रालय, मुंबई
विषय : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस भारतीय जनता पक्षात दिलेल्या प्रवेशासंबंधी तातडीने कारवाई करणेबाबत..
मा. महोदय,
सप्रेम नमस्कार,
तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये…
शिवसेना पक्ष, चिन्ह व आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
शिवसेना पक्ष, चिन्ह व आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून या सुनावणीसाठी खासदार अनिल देसाई व विधान परिषद सदस्य अनिल परब न्यायालयात दाखल झाले आहेत. यावेळी अनिल देसाई म्हणाले, या खटल्यामधील सर्व वाद-प्रतिवाद झाले आहेत. त्यामुळे न्याय मूर्ती सूर्य कांत म्हणाले आहे आहेत की हे प्रकरण आता पहिल्यापासून ऐकण्याची आवश्यकता नाही. आम्हाला आशा आहे की लोकशाही वाचवणारा निर्णय आपल्यासमोर येईल.
