News Update Today : राज्यातील राजकीय आणि हवामानाचं तापमान दिवसेंदिवस वाढत जातंय. सूर्य डोक्यावर आग ओकतोय तर, दुसरीकडे ४ जून रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी रोज नवनवे खुलासे समोर येत असल्याने याप्रकरणी अंतिम निकाल काय लागले याकडे सर्वांचं लक्ष आहे. या अपघातामुळे पुण्यातील ससून रुग्णालयातील गैरकारभारही चव्हाट्यावर आला आहे. तर दुसरीकडे पावसाअभावी अनेक तलाव, धरणे कोरडे पडले असून मुंबईसह अनेक भागात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. या जिल्ह्यांमध्ये सरकारकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असला तरीही तो अपुरा आहे. त्यामुळे बळीराजासकट सर्वचजण आता पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

Live Updates

Marathi News Live Updates 29 May 2024 :  राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा

19:57 (IST) 29 May 2024
पालघर: रेल्वे दुरुस्तीचे काम पूर्ण, रेल्वे सेवा पूर्ववत

मंगळवारी सायंकाळी ५.०८ वाजता पालघरच्या रेल्वे यार्डात मालगाडी घसरल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या अप मार्गीकेवरील रेल्वे सेवा खंडित राहिली होती.

सविस्तर वाचा...

19:55 (IST) 29 May 2024
नाशिक: खोदकामामुळे अंबडमध्ये गॅस वाहिनीला गळती

परिसरातील नागरिक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडू लागले. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस आणि गॅस वाहिनीचे पथकही घटनास्थळी दाखल झाले.

सविस्तर वाचा...

19:33 (IST) 29 May 2024
….अन् राजवीचा तिसरा वाढदिवस अखेरचा ठरला

मध्यरात्री अल्टो कार कालव्यात कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन मुलींसह सहा जण ठार झाले.

सविस्तर वाचा...

19:21 (IST) 29 May 2024
एमएसआरडीसीच्या सहा प्रकल्पांसाठी २७ ते ४३ टक्के अधिक दराने निविदा, नाईट फ्रँक आणि व्हिजेटीआयमार्फत निविदांचे मूल्यांकन

नागपूर - चंद्रपूर द्रुतगती महामार्गासाठी ९५०० कोटींच्या निविदेसाठी २७ टक्के अधिक दराने १२००० कोटी रुपयांची निविदा सादर झाली आहे.

सविस्तर वाचा...

19:10 (IST) 29 May 2024
डोंबिवली: तिकिट कार्यालयाच्या दिशादर्शक फलकाची धोकादायक अवस्था

ही साखळी निखळली, तुटली तर हा जड फलक जाणा-या येणाऱ्या किंवा तिथे उभ्या असलेल्या प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतो किंवा कोणी गंभीर जखमी होऊ शकतो.

सविस्तर वाचा...

18:56 (IST) 29 May 2024
नागपूर: प्रेमीयुगुलांना पोलिसांनीच लुटले…गुन्हाही दाखल, पण आता न्यायालयात…

रस्त्यावर अंधारात कार उभी करून गप्पा करणाऱ्या एका प्रेमीयुगुलाला कळमना पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी पंकज यादव आणि संदीप यादव यांनी लुटले होते.

सविस्तर वाचा...

18:44 (IST) 29 May 2024
अभय बंग, घनश्याम बोरकर, अरविंद गोखले, अतुल देऊळगावकर आपटे वाचन मंदिराच्या साहित्य पुरस्काराचे मानकरी

कोल्हापूर : इचलकरंजी येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदिराच्या वतीने देण्यात येणारा इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार डॉ. घनश्याम बोरकर यांच्या कालजयी काव्यसंग्रहासाठी तर उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार डॉ. अभय बंग यांच्या या जीवनाचे काय करू आणि निवडक या साहित्यकृतीसाठी देण्यात येत असल्याचे संयोजकांनी बुधवारी सांगितले. लक्षणीय गद्य साहित्य कृतीसाठी अतुल देऊळगावकर यांच्या निसर्ग कल्लोळ तर अरविंद गोखले यांच्या वज्रपुरुषसाठी पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ २२ जून रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या हस्ते वाचनालयात आयोजित केला आहे.

18:44 (IST) 29 May 2024
अकोला जिल्ह्यात बियाण्यांचा काळाबाजार, दुप्पट दराने विक्री; कृषी विभागाकडून…

जिल्ह्यात कपाशीच्या विशिष्ट वाणासाठी शेतकरी आक्रमक झाल्यानंतर बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा...

18:43 (IST) 29 May 2024
नवी मुंबई: एकाच आठवडयात दुसर्‍यांदा पाणी पुरवठा बंद, एमआयडीसीकडून शुक्रवारी शटडाऊन

महापालिकेने मंगळवार २८ मे रोजी मान्सूनपूर्व कामासाठी एक दिवसाकरीता शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवला होता.

सविस्तर वाचा...

18:16 (IST) 29 May 2024
कल्याणीनगर अपघात प्रकरणाच्या तपासात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर, पोलिसांकडून तांत्रिक पुरावे संकलित

कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत असून, पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून अपघाताचा घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याबरोबरच पोलिसांकडून तांत्रिक पुरावे (डिजिटल इव्हीडन्स) गोळा करण्यात येणार आहेत.

सविस्तर वृत्त वाचा

18:15 (IST) 29 May 2024
कल्याणीनगर अपघात प्रकरणाच्या तपासात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर, पोलिसांकडून तांत्रिक पुरावे संकलित

या तंत्रज्ञानाचा वापर करून अपघाताचा घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याबरोबरच पोलिसांकडून तांत्रिक पुरावे (डिजिटल इव्हीडन्स) गोळा करण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा...

17:33 (IST) 29 May 2024
धक्कादायक : संगणक अभियंता मुलाकडून वृद्ध आईचा खून

पुणे : संगणक अभियंता मुलाने वृद्ध आईचा खून केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यातील एका सोसायटीत घडली. आईचा खून करून संगणक अभियंता मुलगा पसार झाला असून, त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

सविस्तर वाचा...

17:24 (IST) 29 May 2024
कल्याणी नगर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात खबरदारी घेण्याची पोलिसांकडे मागणी

कोल्हापूर : कल्याणी नगर परिसरात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात खबरदारी घेण्यात यावी, या मागणीचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक किरण कागलकर यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी मध्यरात्री कल्याणी नगर परिसरात पोर्शे कार अपघातात अभियंता तरुण, तरुणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा दुर्घटना घडण्याची शक्यता कोल्हापुरातही आहे. संभाव्य धोका लक्षात घेता रात्री उशिराही पोलिसांचे शहरात आणि उपनगरांत प्रत्येक सिग्नलवर असणे गरजेचे आहे.

17:11 (IST) 29 May 2024
नाशिक: वाहन तोडफोड करणाऱ्यांची पोलिसांकडून वरात

दिंडोरी रस्त्यावरील पाटालगतच्या वज्रेश्वरी परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत पसरविणाऱ्या फरार संशयितांना ताब्यात घेण्यात पंचवटी पोलिसांना यश आले.

सविस्तर वाचा...

17:03 (IST) 29 May 2024
नाशिक: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना २० वर्ष कारावास

अल्पवयीन मुलगी प्रसाधनगृहात जात असताना बळजबरीने पाठोपाठ शिरून वसंत गांगोडेने दरवाजाची कडी आतून बंद करीत अत्याचार केले.

सविस्तर वाचा...

17:01 (IST) 29 May 2024
पायी चालणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना वाशी सेक्टर २६ मधील परिवहन डेपोच्या जागेवर तयार होणाऱ्या ट्रक टर्मिनल प्रस्तावाला २०२१ मध्ये स्थगिती दिली होती.

सविस्तर वाचा...

16:26 (IST) 29 May 2024
.. ‘तर’ गॅस सिलेंडरवरील अनुदान बंद... केंद्र सरकारचा निर्णय

नागपूर: केंद्रातील भारतीय पेट्रोलियम मंत्रालयाने उज्ज्वला योजनेसह घरगुती एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांना ‘ई- केवायसी’ अनिवार्य केली आहे. त्यानुसार ग्राहकांना जोडणी असलेल्या गॅस एजेंसीत जाऊन बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

सविस्तर वाचा

16:13 (IST) 29 May 2024

पनवेल : कामोठे वसाहतीमध्ये रस्त्यावर पहाटे पायी चालणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली आहे. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात मंगळवारी दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कामोठे वसाहतीमधील सेक्टर १० येथील विक्रम कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये राहणाऱ्या ५० वर्षीय सीमा थोरात या चार दिवसांपूर्वी सकाळी साडेसहा वाजता पायी चालत असताना त्या सेक्टर १२ येथील ग्रेस्टोन इमारतीसमोरील प्रवेशव्दारासमोरील रस्त्यापर्यंत आल्या.

थोरात यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने थोरात यांच्या गळ्यातील ९१ हजार रुपयांचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला. नवी मुंबईत काही दिवसांपासून घरफोडी व पायी चालणाऱ्या महिलेंची सोनसाखळी खेचण्याचे गुन्हे कमी घडत होते. परंतू पुन्हा एकदा चोरट्यांची टोळी नवी मुंबईत सक्रीय झाल्याचे दिसत आहे.

15:45 (IST) 29 May 2024
पुणे : भांडारकर रस्त्यावर इमारतीच्या गच्चीवर आग

पुणे : भांडारकर रस्ता परिसरात असलेल्या ‘करण सोहेल’ या सात मजली इमारतीच्या गच्चीवर आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वीस मिनिटांत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

सविस्तर वाचा...

15:31 (IST) 29 May 2024
भुयारी मार्ग तरीही सुरक्षा धोक्यात, जीव धोक्यात घालून पामबीच मार्ग ओलांडण्याचे प्रकार सुरूच

नवी मुंबई : नवी मुंबईचा राणीचा रत्नहार समजल्या जाणाऱ्या पामबीच मार्ग ओलांडताना आतापर्यंत ११ ग्रामस्थांचा जीव गेला आहे. मासेमारीकरिता समुद्रात जाण्यासाठी भल्या पहाटेच पामबीच मार्ग ओलांडताना या ग्रामस्थांचा जीव गेला आहे.

सविस्तर वाचा...

15:30 (IST) 29 May 2024
कीर्ती व्यास हत्या प्रकरण : सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानीला जन्मठेप

मुंबई : अभिनेता फरहान अख्तरची विभक्त पत्नी अधुना हिच्या बी ब्लंट सलूनच्या अंधेरी येथील कार्यालयातील वित्त व्यवस्थापक कीर्ती व्यास हिच्या हत्येप्रकरणी सिद्धेश ताम्हणकर आणि त्याची मैत्रीण या दोघांना सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सविस्तर वाचा...

15:29 (IST) 29 May 2024
मिरा-भाईंदर पालिकेकडून म्हाडाला अकरा वर्षांत एकही घर नाही, दहा लाख लोकसंख्या नसल्याने नियम लागू होत नसल्याचा पालिकेचा दावा

मुंबई : राज्य सरकारच्या २० टक्के सर्वसामावेश योजनेअंतर्गत म्हाडाला मिरा-भाईंदर पालिकेकडून मागील अकरा वर्षांत एकही घर सोडतीसाठी उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे या योजनेतील घरे मिळावीत यासाठी म्हाडाचा पालिकेकडे पाठपुरावा सुरु असताना आता मिरा-भाईंदर पालिकेची लोकसंख्या दहा लाखांच्या वर नाही. त्यामुळे अशी घरे आम्ही देऊच शकत नाही, असे लेखी उत्तर पालिकेने म्हाडाला पाठविले आहे.

सविस्तर वाचा...

15:29 (IST) 29 May 2024
वसई : एका कीचेनमुळे फुटले नकली पोलिसाचे बिंग

वसई- फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीकडे असलेल्या बेडीच्या चावीने नकली पोलिसाचे बिंग फुटले. आरोपी नकली पोलीस बनून वावरत होता. त्याच्याकडे पोलिसांचे गणवेश, बनावट ओळखपत्र आणि इतर वस्तू आढळून आल्या.

सविस्तर वाचा...

15:27 (IST) 29 May 2024
पिस्तुल काढून कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावत वाहनातून नेले, खंडणी मागितली; केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर – बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग, विडा भागात पवन ऊर्जा प्रकल्प व रस्ते आदी इतर कामे होऊ द्यायची असतील तर दोन (२ कोटी) कोटी रुपये द्यावे लागतील, असे म्हणत पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात एक तक्रार नोंदवण्यात आली.

सविस्तर वाचा...

15:26 (IST) 29 May 2024
अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार – राजू शेट्टी

कोल्हापूर: राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टीत दहापटीने दरवाढ केली असून कृषीपंपाना जलमापक यंत्र ( पाणी मीटर ) बसविले जाणार आहेत. हे निर्णय तातडीने मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी बुधवारी शिरोली ता. हातकंणगले येथे पुणे बंगळुरू महामार्गावरील आंदोलनादरम्यान दिला.

सविस्तर वाचा...

15:17 (IST) 29 May 2024
नाशिक: शेततळ्यात बुडून भावंडांचा मृत्यू

परिसरात बिबट्या फिरत असल्यामुळे त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला की काय, अशी शंका आल्याने जवळपास शोध घेतला असता शेजारील शेतकऱ्याच्या शेततळ्याजवळ एका मुलाचे कपडे त्यांना आढळून आले.

सविस्तर वाचा...

15:07 (IST) 29 May 2024
नाशिक: बँक अधिकाऱ्यांनी गुन्हे तपासात सहकार्य करणे गरजेचे, पोलिसांचे आवाहन

आभासी पध्दतीने व्यवहार करतांना बँक खातेदारांनी जागरूक असणे गरजेचे आहे. ओटीपी, सीव्हीव्ही, क्रेडिट, डेबिट कार्ड क्रमांक, वैयक्तीक माहिती ग्राहकांनी कोणालाही देऊ नये.

सविस्तर वाचा...

14:14 (IST) 29 May 2024
ताडोबात आता नो रिव्हर्स, नो यू-टर्न; नियम मोडल्यास…

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात (कोर झोन) ‘टी ११४’ ही वाघीण रस्त्यावर आली असता जिप्सी वाहनचालकांनी तिची वाट रोखून धरली.

सविस्तर वाचा...

13:31 (IST) 29 May 2024
बीड : दहावीची परिक्षा अकराव्या प्रयत्नात उत्तीर्ण; ग्रामस्थांकडून दणदणीत मिरवणूक

बीड : परळी तालुक्यातील डाबी गावात कृष्णा मुंडे याने अकराव्या प्रयत्नात दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. कृष्णा उत्तीर्ण झाला म्हणून ग्रामस्थांनी पेढे वाटून, हलगी लावून त्याची मिरवणूक काढली.

वाचा सविस्तर...

13:23 (IST) 29 May 2024
काँग्रेस नेते करणार दुष्काळी भागांची पाहणी; पश्चिम विदर्भासाठी यशोमती ठाकूर...

अमरावती : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची भीषणता पाहता राज्यातील वेगवेगळ्या भागात जाऊन दुष्काळाची पाहणी करून सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहे, यावर नजर ठेवण्यासाठी काँग्रेसने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन केली आहे. काँग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर या अमरावती विभागातील दुष्काळ पाहणी समितीच्‍या अध्यक्ष आहेत.

सविस्तर वाचा

Marathi News Live Updates 29 May 2024 :  राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा