Maharashtra Breaking News Political Updates, 08 September 2026 : मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून आजचा त्यांचा ११ वा दिवस आहे. मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, मध्यरात्री मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली असल्याने मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांनी त्यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचंही सूत्रांकडून समजत आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख सुरू असून धनुष्यबाण गोठवण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसंच, संभाजी नगरमध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
Marathi News Live Updates Today : महाराष्ट्रातील ताजे अपडेट्स वाचा
पंतप्रधानाच्या कार्यक्रमात घुसखोरीचा डाव? बंदूकधारी तरुणासह दोघांना अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वांद्रे कुर्ला संकुलातील नीता अंबानी कल्चरल सेंटरमधील ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ या कार्यक्रमात पंतप्रधान कार्यालयाची बनावट ओळख दाखवून घुसू पाहणाऱ्या दोन तरुणांना काल ताब्यात घेण्यात आले होते. आज त्यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एकाचे नाव रोहन पारिख असून तो २४ वर्षांचा असल्याचे कळते. त्यांच्यासोबत अंगरक्षक म्हणून वावरणाऱ्या तरुणाकडे बंदूक आढळल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी रद्द करण्यावरून शिरोळमध्ये भडका; आंदोलक - पोलिसांमध्ये जोरदार झटापट; प्रवेशद्वार तोडले, काचा फोडल्या
पंतप्रधानाच्या कार्यक्रमात घुसखोरीचा डाव? बंदूकधारी तरुणासह दोघांना अटक
'विश्वास नांगरे पाटील बोलतोय...' सांगत पुण्यातील निवृत्त शिक्षक दाम्पत्याला 'डिजिटल अरेस्ट'; महिनाभर घरातच ओलीस ठेवत ६८ लाखांचा गंडा!
Maharashtra Rainfall Update : राज्यात गणेशोत्सवाच्या काळात पावसाच्या सरी? काय आहे हवामानतज्ज्ञांचा अंदाज?
कल्याणच्या नमस्कार मंडळाच्या श्रावणातील लक्ष सूर्यनमस्कार अनुष्ठानात एक लाख विद्यार्थ्यांचा सहभाग
भरती परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारची लगबग, कोकण विभागातून सूचना मागविल्या
"कियानची लहान बहीण आलीय", अमित ठाकरेंना कन्यारत्न; पत्नी मिताली ठाकरेंची खास पोस्ट व्हायरल!
नवी मुंबईत मीटरने जाण्यास नकार देत परिवहन अधिकाऱ्यावर रिक्षाचालकांचा हल्ला; नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रविकांत तुपकर यांचे अमरावतीत अर्धनग्न आंदोलन; राज्यभर आंदोलनाचा इशारा
पेपरफुटीच्या सर्व रॅकेटमध्ये भाजपचे कार्यकर्ते, संजय राऊत यांचा घणाघात, फडणवीसांनाही टोला
पुणे: झाडकामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना महापालिकेने बजाविली नोटीस ! काय म्हणाले, अतिरिक्त आयुक्त
Video: "दणदणाटापेक्षा आरतीचा आवाज चांगला", उद्धव ठाकरेंची DJ बंदीवर भूमिका काय? विद्यानंद बापट, संतोष पंडितांबद्दल म्हणाले…
शाळा व्यवस्थापन समितीच्या सक्षमीकरणावर भर; सदस्यांना प्रशिक्षण, जबाबदाऱ्यांची माहिती देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न
"कोणाच्या ताटातलं काढून कोणाला काही देणार नाही", मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांनी मांडली भूमिका
आजपर्यंत मराठा समाजाला जे काही दिलंय ते आम्हीच दिलंय. केवळ कागदावरचे निर्णय नाही, प्रत्यक्ष फायदा मराठा समाजाला झालेला पाहायला मिळाला. संविधानात जे असेल ते निश्चित मिळेल. कोणाच्या ताटातलं काढून कोणाला देणार नाही. मराठा समाज, किंवा इतर समाज असो सर्व समाजांना आम्हीच न्याय देणार आहोत - देवेंद्र फडणवीस</p>
अनधिकृत ॲपआधारित प्रवासी वाहनांची मनमानी यापुढे मोडीत; कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आठ कंपन्यांचे परवान्यासाठी अर्ज
रिक्षासाठीच्या अधिकृत रांगेत उभे राहूनही अंधेरी, विलेपार्ले, खारवासियांना रिक्षाचालकांचे, नाही येणार जा…
म्हाळुंगे एमआयडीसीत 'रील'साठी वाहतूक कोंडी, अलिशान मोटारी जप्त, तिघे ताब्यात
तीन महिन्यांत ८८० औषध उत्पादन, विक्री आस्थापनांवर कारवाई अन्न व औषध प्रशासनाचा कारवाईचा धडाका
धुळे : शेतकऱ्यांच्या वाटेतील अडथळे दूर होणार; वर्षानुवर्षांच्या वादांना मिळणार कायमचा विराम…
कल्याणमध्ये डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या मागणीला जोर
सणांमध्ये जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न? उद्धव ठाकरे म्हणाले, "मुंबईतील दोन घटना..."
जातीय दंगील घडवण्याचा प्रयत्न होत आहे का असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला? त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत दोन घटना घडल्या. कोणी घडवल्या? कशा केल्या? कोणाला अटक झाली हे कोणालाच माहित नाही. यांचे पाठीराखे शोधावे लागतील. जे कोणी असेल त्यांना जनतेसमोर आणून शिक्षा करावी लागेल. हे पहलगाम नाहीय. हे मुंबई आहे. बाहेरून कोणी आलं आणि तुम्हाला काही माहीत नाही असं कसं होऊ शकतं. तुम्ही काय फक्त आमदार-खासदार फोडताय का?
मुंबई महापालिकेकडून कांजूरमार्ग कचराभूमीतील दुर्गंधीचा अभ्यास; ‘नीरी’मार्फत मिथेन, दुर्गंधी आणि वायुप्रदूषणाचे मोजमाप
गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात रक्ताची टंचाई ; डेंगी , चिकनगुनिया आजारांमुळे रक्ताची मागणी वाढली !
मंत्री सामंत यांच्या दूरध्वनीनंतर मनोज जरांगे यांच्यावर उपचार; सात किलो वजन घटले, रक्तातील साखरही घसरली
ट्रॉमा केअर रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठीचे २५ कोटींचे यंत्र बंद अवस्थेत
महापालिका शाळांमधील विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित; विरोधकांच्या आरोपांवरून महापालिका बैठकीत सत्ताधारी आक्रमक
एमपीएससी अध्यक्षांच्या भ्रष्टाचाराच्या पुरावा मी देणार - रोहित पवार
छत्रपती संभाजीनगर मध्ये एमपीएससी विद्यार्थी आंदोलन करीत आहेत यावर बोलताना राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की.. काल पुण्यामध्ये आम्ही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत आंदोलन केलं त्यावेळेस आम्ही भूमिका घेतली होती की ही तर एक सुरुवात आहे. यानंतर ज्या ज्या ठिकाणी एमपीएससीचे विद्यार्थी आहेत त्या त्या ठिकाणी एमपीएससीचे विद्यार्थी आणि क्लासेस हे जिल्ह्यामध्ये आंदोलन करतील अशी भूमिका घेतली होती.आज छत्रपती संभाजी नगर मध्ये जवळपास १५ एक विद्यार्थी हजार विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. एका व्हाट्सअप संदेश वर एवढे विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. आज हे विद्यार्थी दोन ठिकाणी बसले आहेत मात्र पुढील काळात हे एकत्रित आंदोलन करतील. अशाच प्रकारचे आंदोलन उद्या नागपूरला आहे १२ तारखेला लातूरमध्ये आंदोलन होणार आहे. माझी सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्याव्या.. या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढे आक्रमक होऊ शकतात... एवढेच नाही तर एमपीएससी या अध्यक्ष भीमनवार यांनी कशाप्रकारे भ्रष्टाचार केला याचा पुरावा मी देणार आहे. तेव्हा जे आरटीओचे कमिशनर असताना त्यांच्या कर्मचाऱ्यावर कशी केस केली याच्या पुरावा मी देणार असल्याच्या गौप्यस्फोट रोहित पवार यांनी गोंदिया येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
स्पाइसजेटची विमान सेवा कोलमडली
पालघरमधील रुग्णालयातील धुडगूस प्रकरणी शिवसेनेच्या सात पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Marathi News Live Updates Today : महाराष्ट्रातील ताजे अपडेट्स वाचा
