Mumbai-Maharashtra Breaking News Updates, 29 May 2026: हे बघा पुणे पोलिसांची कार्यक्षमता..(गुन्हेगारी रोखण्यासाठी नव्हे तर वसुलीसाठी) ज्यांच्याकडून रक्षणाची अपेक्षा आहे तेच आज वसूली करत आहेत, त्यामुळेच आज सुसंस्कृत पुण्याचा पूर्णतः बट्टयाबोळ झाला आहे, अशी X पोस्ट करत, सोबतच दोन व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांनी पुणे पोलिसांवर वसुलीचे आरोप केले आहेत!

दुसरीकडे, राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी उद्यापासून (३० मे) मराठवाड्यातल्या रणरणत्या उन्हात पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारमधील मंत्री हे उपोषण थांबविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. या घडामोडीवर दिवसभर लक्ष असेल.

विधानपरिषदेच्या १७ जागांच्या निवडणुकीचाही मुद्दा सध्या चर्चेत आहे. मित्र पक्षांना अधिक जागा सोडण्यासाठी भाजपाने तयारी दर्शवली असली तरी यावर अंतिम निर्णय झालेला नाही. पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी कुणाकुणाची वर्णी लागणार? हेही पाहावे लागेल.

Live Updates

Today's Marathi News Live Updates, 29 May  2026 | महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स

19:26 (IST) 29 May 2026

जळगावमधील विधान परिषदेची जागा अखेर ठाकरे गटाच्या वाट्याला… शरद पवार गटाची चर्चा हवेतच!

महाविकास आघाडीच्या जागावाटपात जळगावची विधान परिषदेची जागा अखेर शिवसेना ठाकरे गटाला मिळाल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा फोल ठरला आहे. ...सविस्तर वाचा
19:19 (IST) 29 May 2026

सुरळीत इंधन पुरवठ्यासाठी राज्य प्रशासनासमवेत समन्वय; इंडियन ऑइलची माहिती...

महाराष्ट्रात शेतीकामांमुळे डिझेलच्या मागणीत ३१.५ टक्के वाढ झाली असून इंडियन ऑईलने प्रशासनाच्या समन्वयाने राज्यात अखंड इंधन पुरवठा सुरू ठेवल्याचे स्पष्ट केले. ...वाचा सविस्तर
19:12 (IST) 29 May 2026

हसन मुश्रीफ यांच्या विभागाच्या जाहिरातीत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांचेच छायाचित्र वगळले; कोल्हापुरातील महायुतीच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह

कोल्हापूर शासकीय रुग्णालयातील कोट्यवधींच्या विकासकामांच्या जाहिरातीतून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे छायाचित्र वगळल्याने महायुतीमधील अंतर्गत वाद आणि राजकारण चव्हाट्यावर आले आहे. ...वाचा सविस्तर
18:47 (IST) 29 May 2026

बच्चू कडूंनी रवी राणांच्या कार्यकर्त्याला घेतले शिवसेनेत, राजकीय संघर्ष उफाळणार!

शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य बच्चू कडू आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्यातील राजकीय संघर्षाला आता नवे वळण मिळण्याचे संकेत आहेत. ...सविस्तर वाचा
18:40 (IST) 29 May 2026

हडपसर-काळेपडळमधील गावठी दारू धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप; आतापर्यंत चौघांचा संशयास्पद मृत्यू

पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी, तसेच हडपसर भागात विषारी दारू प्याल्यानंतर १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ...सविस्तर वाचा
18:36 (IST) 29 May 2026

शेगांव आणि शिर्डी येथे ‘फुड स्ट्रिट हब’ मंजूर, लाखो भाविकांना मिळणार दर्जेदार अन्न

महाराष्ट्र ही शूरवीरांची भूमी आहे. त्याचप्रमाणे ही संतांची पवित्र भूमीदेखील आहे. जातीभेद निर्मूलनात वारकरी पंथाने ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. ...अधिक वाचा
18:35 (IST) 29 May 2026

'…तर मग लग्नच कशाला करता?' हुंड्यासाठी होणाऱ्या विवाहितांच्या छळावर सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

"मुले लग्न कशासाठी करतात? लग्न करून आणायचं आणि नंतर मुलगी अन् तिच्या कुटुंबीयांचा अपमान करायचा, हे कशासाठी?" असा संतप्त प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. ...अधिक वाचा
18:31 (IST) 29 May 2026

Thane Water Cut : घोडबंदरसह 'या' भागात १२ तास पाणीपुरवठा बंद

ठाणे महापालिकेतर्फे पिसे व टेमघर केंद्रात पावसाळापूर्व देखभाल दुरुस्ती करण्यात येणार असल्याने ३ जून रोजी घोडबंदरसह अनेक भागात १२ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. ...सविस्तर वाचा
18:25 (IST) 29 May 2026

भिंत कोसळली अन् काळाने गाठले; जावई-सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; खामगाव हादरले

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या भिंतीवर पाणी टाकत असताना अचानक भिंत अंगावर कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ...वाचा सविस्तर
18:14 (IST) 29 May 2026

पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि महागाईविरोधात नागपुरात काँग्रेस रस्त्यावर; सरकारला इशारा

केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे देशात पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे असह्य झाले आहे. ...वाचा सविस्तर
18:11 (IST) 29 May 2026

अनधिकृत बांधकाम कारवाईत महापालिकेच्या निष्काळजीपणा, कारवाईत गाय जखमी, नागरिकांमधून संताप

जेसीबीच्या धडकेमुळे गायीचे शिंग तुटून तीव्र रक्तस्त्राव, पालिका प्रशासनाच्या अमानुष कारभाराविरोधात प्राणीप्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप ...अधिक वाचा
17:58 (IST) 29 May 2026

तिरुपती दर्शनासाठी प्रवाशांना मोठा दिलासा; गोंदिया-वडसा-चंद्रपूर मार्गे नियमित गाडी, जालना व रक्सौल मार्गावरही नवी सेवा १ जूनपासून सुरू

तीर्थक्षेत्र तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला असून महाराष्ट्रातील विविध मार्गांवरून जूनपासून नियमित तसेच विशेष गाड्यांची सेवा सुरू होत आहे. ...सविस्तर वाचा
17:55 (IST) 29 May 2026

‘पुस्तकानचे घर’… ठाणे महापालिकेलाच मराठीचे अज्ञान! बस थांब्यावरील फलकावर चार वर्षांपासून अशुद्ध शब्द

'महापालिका' शब्दही अशुद्ध; दररोज हजारो नागरिक पाहूनही ठाणे महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, फलक दुरुस्त करण्याची मागणी ...अधिक वाचा
17:33 (IST) 29 May 2026

मनोज जरांगे पाटील यांचा उद्यापासून पुन्हा उपोषणाचा इशारा; राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल!

मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून (३० मे) भर उन्हात उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. ...सविस्तर बातमी
17:26 (IST) 29 May 2026

तपास होणार नसेल तर ‘सीआयडी’ कार्यालयाला टाळे लावा - रोहित पवार यांची टीका

दिवंगत मुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती परिसरात विमान अपघात झाला. अपघात प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषींवर कठोर कारवाईची मागणी रोहित पवार यांनी केली होती. विमान अपघात प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडून करण्यात येत आहे. ...अधिक वाचा
17:03 (IST) 29 May 2026

सरकारच्या प्रस्तावित कायद्याला विहिंपसह संघाचाही विरोध, काय आहे कायदा?

पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील देवस्थान इनाम जमिनींसंदर्भातील वाद कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य सरकारने कायदा प्रस्तावित केला आहे. ...सविस्तर बातमी
16:43 (IST) 29 May 2026

IPL 2026: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची तुलना शाहिद आफ्रिदीशी; मोहम्मद युसूफच्या 'त्या' पोस्टवर नेटकरी संतापले

Vaibhav Suryavanshi IPL 2026 Trending News: आयपीएल २०२६ मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचणाऱ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची तुलना पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफ याने शाहिद आफ्रिदीशी केली आहे. ...सविस्तर बातमी
15:23 (IST) 29 May 2026

साधे मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याची नवी युक्ती? मीटर ‘स्लो’ किंवा ‘नादुरुस्त’ ठरवून ग्राहकांवर दबाव…

वीज वितरण कंपनीने गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा लावला आहे. अनेक ग्राहकांना त्यांच्या वीज वापरात कोणताही मोठा बदल नसतानाही जास्त किंवा कमी बिल येत असल्याचे सांगून मीटर तपासणीसाठी पथके पाठवली जात आहेत. ...वाचा सविस्तर
15:12 (IST) 29 May 2026

Maharashtra News Live Updates: टेंडरवरून छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यात वाद? पक्षाने मात्र चर्चा फेटाळल्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ आणि खासदार पार्थ पवार यांच्यात वादावादी झाल्याची बातमी समोर येत आहे. वृत्तवाहिन्यांनी चालवलेल्या बातमीनुसार टेंडरच्या मागणीवरून हा वाद झाल्याचे सांगितले जाते. पार्थ पवार यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे टेंडर विशिष्ट व्यक्तीला देण्यात यावे, यावरून वाद झाल्याचे सांगितले जाते.

14:28 (IST) 29 May 2026

सर्वोच्च न्यायालय अक्शन मोडवर ! विशेषाधिकाराचा वापर करून देशातील सर्व उच्च न्यायालयांना महत्त्वाचे आदेश

सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने संविधानाच्या अनुच्छेद १४२ अंतर्गत प्राप्त विशेष अधिकारांचा वापर करत ही कठोर कालमर्यादा निश्चित केली आहे. ...सविस्तर वाचा
14:22 (IST) 29 May 2026

मोफत गणवेश योजनेत मोठे बदल; कापडाचा दर्जा तपासणार, महिला बचत गटांना मिळणार शिलाईचे काम

नव्या सुधारणेनुसार, पात्र विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी गणवेश वाटप करणे बंधनकारक असेल. हे गणवेश स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिवून घेतले जावेत, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
14:09 (IST) 29 May 2026

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; ९ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपली

दोन वेळा मुदतवाढ मिळाल्यानंतर अखेर शिक्षण संचालनालयाने सकाळी ११ वाजता ही यादी प्रसिद्ध केली. पहिल्या फेरीसाठी ९ लाख ४ हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग २ 'लॉक' केला होता. ...अधिक वाचा
13:53 (IST) 29 May 2026

धक्कादायक! 'मिल्क एस्पिरेशन'मुळे ५३ बालकांचा मृत्यू; काय आहे हा प्रकार आणि कसे टाळावे बालमृत्यू? हे समजून घ्या…

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आरोग्य विभागाने बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आता कंबर कसली असून, एका विशेष मोहिमेचे नियोजन केले आहे. ...सविस्तर बातमी
13:40 (IST) 29 May 2026

Maharashtra News Live Updates: रोहित पवारांकडून हडपसरमध्ये दारूच्या अड्ड्याची तोडफोड; मरणारे हिंदू असल्याचा आरोप करत भाजपावर टीका

विषारी मद्य प्यायल्यामुळे पुण्यात विविध ठिकाणी अनेकांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हडपसर येथील दारूच्या अडड्याची तोडफोड केली. यानंतर त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. भाजपाच्या काळात हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होतात. धर्म पाहून बुलडोझर चालवला जातो, मात्र अशा अड़्ड्यावर बुलडोझर का चालवला जात नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

13:33 (IST) 29 May 2026

पाण्याच्या शोधात आले, अन् मृत्यूला सामोरे गेले! जुनोनाच्या जंगलातील घटना...

ही घटना कक्ष क्रमांक ४६७ मध्ये वनविकास महामंडळाच्या जंगलात घडली आहे. बचाव कार्य सुरु असतांनाच सांबराचा गंभीर जखमानमुळे वाटेतच मृत्यू झाला. ...सविस्तर बातमी
13:22 (IST) 29 May 2026

‘सुसाईड इन इंडिया’ अहवालातील धक्कादायक माहिती : कौटुंबिक समस्या व आजारपण आत्महत्यांचे प्रमुख कारण…

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्यावतीने अलीकडेच सुसाईड इन इंडिया-२०२४ हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यात देशभरातील आत्महत्यांची आकडेवारी तसेच त्यामागील कारणांची माहिती दिली. ...सविस्तर वाचा
13:18 (IST) 29 May 2026

Maharashtra News Live Updates: पुण्यातील संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची महत्त्वाची माहिती

पुण्यात संशयास्पदरितीने काही जणांचे मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. विषारी मद्य प्यायल्यामुळे हे मृत्यू झाल्याचे बोलले गेले. यानंतर आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याप्रकरणी भाष्य केले असून चार जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी मान्य केले. मृतांचे शवविच्छेदन झाले असून व्हिसेरा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. आज सायंकाळी त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे ते म्हणाले.

13:12 (IST) 29 May 2026

शाळा आणि विद्यार्थ्यांमध्ये अंतर; शाळा नसलेली वसतिस्थाने वाढली

शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) विद्यार्थ्यांना १ किलोमीटरच्या परिसरात प्राथमिक शाळा मिळणे बंधनकारक असताना, राज्यातील जवळपास २४ हजार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दुसऱ्या गावात किंवा वाडी-वस्तीवर पायपीट करावी लागणार आहे. ...अधिक वाचा
13:11 (IST) 29 May 2026

VIDEO: भिवंडीत कुर्बानीसाठी आणलेला रेडा मध्यरात्री दोर तोडून रस्त्यावर भरधाव पळत सुटला…व्हिडिओ व्हायरल

Bhiwandi Bakra Eid Buffalo Escape Viral Video: नियंत्रण सुटलेल्या रेड्याने आपल्या मालकालाच पायदळी तुडवले, ज्यात मालक किरकोळ जखमी झाला. ...सविस्तर बातमी
13:09 (IST) 29 May 2026

पत्नीला बाहेर काढण्यासाठी आईला ‘गिफ्ट’ केले घर; आठ वर्षांच्या मुलीसह बेघर केल्याचा पतीवर आरोप

संबंधित अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि पतीच्या संगनमतातून कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता घराचे कुलूप तोडून कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...सविस्तर वाचा

Mahayuti Vidhan Parishad seat sharing formula meet | BJP Shiv Sena NCP alliance MLC election | महायुती विधान परिषद जागावाटप तोडगा | भाजप शिवसेना राष्ट्रवादी फॉर्म्युला निवडणूक

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला निश्चित (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)