Top Marathi News Updates, 07 September 2026: पुण्यात डीजे आणि लाऊडस्पीकरविरोधात रविवारी नागरिक रस्त्यावर उतरले, हजारो संख्येने नागरिकांनी पुणे महानगरपालिकेवर धडक दिली. दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडीत आयटी क्षेत्रातील कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. कर्माचाऱ्यांनी हिंजवडीतील पायभूत सुविधांसंबधित मागण्या मांडल्या. पुण्यात आज विद्यार्थी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी यांनी रविवारी एमपीएससीमधील गैरव्यवहार, पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावरुन राज्य सरकारवर टीका केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेपरफुटीविरोधात लवकरच कठोर कायदा करण्याचे आश्वासन दिले आहे. यासह राज्यातील राजकारण, गुन्हे, कला, क्रीडा, संस्कृती यास विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Latest Maharashtra News Live Updates: महाराष्ट्र बातम्या लाईव्ह.
माजी नक्षल नेता भूपतीच्या नियुक्तीवर ग्रामसभेचा आक्षेप; नियुक्ती प्रक्रिया पारदर्शक करण्याची संयुक्त ग्रामसभा, पारंपरिक गोटूल समितीची मागणी
कारवाईच्या भीतीने विरेन भूमिगत होण्याच्या तयारीत? दोन ट्रक तांदूळ रवाना; साहित्य, पैसे आणि कागदपत्रे आवरल्याची माहिती; प्रशासनातील ‘हात’ मदतीला असल्याची चर्चा
उल्हासनगरात स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीला स्थगिती; महापौरांकडून विशेष महासभा अनिश्चित काळासाठी स्थगित
डोंबिवलीच्या जावयाची भिशीच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक
आतकोलीतील दगडखाणप्रकरणी गुन्हे दाखल करा; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
वाळू तस्करीतून दोघांवर हल्ला, एकाची प्रकृती गंभीर; यवतमाळच्या महागाव तालुक्यातील घटना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीच्या उपस्थितीत होणाऱ्या महारुद्राभिषेकाच्या मुहूर्तावरच पुरातत्त्व विभागाचा दणका! महाशिवलिंग मंदिराला ‘अनधिकृत बांधकाम’ची नोटीस; काम बंद करून…
३,२४९ गोविंदा विनाहेल्मेट; वाहतूक पोलिसांची १८,८१८ जणांवर कारवाई; १.९२ कोटींचा दंड
पावसाळ्यात पार नदी बनतेय 'मृत्यूचा सापळा'; सुरगाण्यात ६ गावांचा 'जीवन-संघर्ष'
मराठा आरक्षण! न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख नोंदी ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध होणार; १० सप्टेंबरपासून राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. मोदी विविध विकासकामांचे उद्घाटन करतील.
वाढीव नफ्याच्या आमिषाने डोंबिवली, मुंबईतील ६८ जणांची ७ कोटींची फसवणूक
"तुम्ही उपोषण करुन मरा, तुम्ही धरतीला भार आहात", संजय राऊतांची सदावर्तेंवर टीका
"शिवसेना भवनावरील शिवरायांच्या पुतळ्यावरील बाळासाहेबांचा फोटो काढावा", १५ दिवसांत फोटो काढला नाही तर उपोषण करण्याचा इशारा सदावर्तेंनी राज आणि उद्धव ठाकरेंना दिला आहे. यावर बोलताना, "तुम्ही उपोषण करुन मरा, तुम्ही धरतीला भार आहात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या इच्छामरणाचा अर्ज मान्य करावा", अशा शब्दात संजय राऊतांनी गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर टीका केली.
ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात एकाची हत्या
रेल्वे, विमान प्रवासात दारू बाळगता येते का? मद्याची कथित तस्करी केल्याप्रकरणी पदवीधर महिलेला अटक
तीन बळी घेणाऱ्या वाघिणीला अखेर वन विभागाने केले जेरबंद; आधी बेशुद्ध केले , मग…!
मोठी बातमी: ‘एमपीएससी’च्या आणखी एका परीक्षेत गैरप्रकार! सहसचिवांसह इतर अधिकारीही दोषी; पोलिसांनीच दिला एमपीएसीला अहवाल
लावणी नृत्यांगना राधा पाटील हिच्यासह मंडळाच्या अध्यक्षांविरुद्ध गुन्हा, दहीहंडी उत्सवात विनापरवाना कार्यक्रमाचे आयोजन
"१४ आमदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार", 'पुन्हा ऑपरेशन' टायगरचा मुरजी पटेलांचा दावा
"१४ आमदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार", असल्याचा दावा शिवसेना नेते मुरजी पटेल यांनी केला आहे. अनेक आमदार, नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा पटेलांनी केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी, "हे मुरजी पटेल कोण आहेत?", असा सवाल उपस्थित करत, "या मुरजीची महाराष्ट्र भुर्जी करणार आहे", असेही राऊत म्हणाले.
बापरे, डीजे ऑपरेटरचा दर ५० हजारांपर्यंत, बघा वर्षभरात किती होतो व्यवसाय?
ठाण्यात अनधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी तक्रारदाराचे पालिका मुख्यालयासमोर उपोषण
Video: मध्य भारतातील सर्वात मोठा कावड व पालखी महोत्सव; शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण, हजारो भरण्यांचा जलाभिषेक, वैशिष्ट्ये काय?
अडीच वर्षांनी पुन्हा आमदार होणार, मनसे माजी आमदार राजू पाटील यांचा विश्वास; बाेगस मतदार पकडता आले नसल्याची खंत
"तुझं तू बघ ना, तो...", सेनाभवनावरील फोटोच्या इशाऱ्यावरुन अंबादास दानवेंचे सदावर्तेंना प्रत्युत्तर
सेनाभवनावर शिवरायांच्या पुतळ्यावरील बाळासाहेबांचा फोटो १५ दिवसांत हटवला नाही तर उपोषण करण्याचा इशारा गुणरत्ने सदावर्ते यांनी दिला आहे. यावर आता उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना, "तुझं तू बघ ना, तो आमच्या सेनाभवनावरील फोटो आहे", असे प्रत्युत्तर दिले आहे.
पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकार म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या पाठीत सरकारने चाकू खुपसण्यासारखे; विश्वजीत कदम
मोठी बातमी; कारवाई टाळण्यासाठी राजीनामा देणाऱ्या न्यायाधीशांना लाभ का द्यायचे? सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा…
सब ज्युनिअर आट्या पाट्या जिल्हा स्पर्धेत शहापूर आसनगावचे जाधव विद्यालय प्रथम
"कोणाच्या डोक्यातून रक्त निघालं तर महाराष्ट्र बंद पाडा"; मनोज जरांगे पाटील
"सरकारला १२ तारखेपर्यंत वेळ दिला आहे. १२ तारखेला मराठा समाजातील नागरिकांनी अंतरवाली सराटीत बैठकीत यायचं. पोलिसांना दोष नाही, सगळा दोष शिंदे आणि फडणवीसांना आहे. १२ तारखेनंतर जी तारीख ठरेल तेव्हा मुंबईला निघायचं", असं मनोज जरांगे पाटील उपोषणाच्या दहाव्या दिवशी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
निळजे लोढा हेवनमधील बेकायदा आठवडी बाजाराच्या जागा मालक, फेरीवाले पुढाऱ्यांवर गुन्हा दाखल
अनधिकृत बांधकामाचे पत्रे काढले, सांगाडा कायम; आमदार संजय केळकर संतापले

रोहित पवारांनी एमपीएससी पेपरफुटीबाबत पोस्ट केली आहे. (फोटो - X/ Rohit Pawar)
