Top Marathi News Updates, 03 September 2026: ‘गणेशोत्सव ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. याला कुठेही गालबोट न लागता आपण ती जोपासण्याचे काम आपण केले पाहिजे. नागरिकांना यातून त्रास होईल, त्यांची गैरसोय होईल, असे काम कुणीही करू नये. सरकारचीही अशीच भूमिका आहे’, विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून, त्यांच्यामागे नेमकी कोणती यंत्रणा किंवा सूत्रधार कार्यरत आहे, याचा सखोल शोध घेण्याची ठाम मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.

पुण्यातील दिवसेंदिवस वाढत्या गुंडगिरीवर आणि ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेवर सुप्रिया सुळे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. राज्यातील पोलीस यंत्रणा कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरत असल्याचे सांगत, ही परिस्थिती अशीच राहिली तर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क साधून तक्रार करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दुसरीकडे, नागरी समस्यांवर भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले युट्यूबर संतोष पंडित यांना गुरुवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त विधान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या संदर्भातील वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

“माझ्या घराचा दरवाजा मध्यरात्री १ वाजता ठोठावून पोलीस मला ताब्यात घेऊ शकतात, तर सामान्य नागरिकाने काय अपेक्षा ठेवावी? सरकार आणि प्रशासन प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांशी असेच वागणार का?”
संतोष पंडित (सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर)

कारवाईमागचे कारण काय?

भाजपा नेते सुनील पांडे यांनी ३० ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संतोष पंडित यांनी ‘राजकारण एक्सप्रेस’ या सोशल मीडिया अकाउंटवर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, शिवीगाळयुक्त आणि मानहानीकारक वक्तव्ये केल्याचा आरोप आहे.

तर दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. दरम्यान अंतरवाली सराटीत एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. दशरथ रायकर असे या मराठा आंदोलकाचे नाव असून ते बीडच्या धारूर तालुक्यातील संगम येथील रहिवासी आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

यासह राज्यातील इतर घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया…

Live Updates

Latest Maharashtra News Live Updates | महाराष्ट्र न्यूज लाईव्ह

18:26 (IST) 3 Sep 2026

१०० कोटींच्या रस्त्याला लोकार्पणाआधीच तडे… ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर जळगाव–किनगाव दरम्यान दुरुस्तीला सुरुवात

दोन राष्ट्रीय महामार्ग जोडणाऱ्या जळगाव ते किनगाव या राज्य मार्गावरील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात येत असून त्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जात आहे. ...अधिक वाचा
18:20 (IST) 3 Sep 2026

कोठी–कोरणार पूल प्रकरण : अधिकाऱ्यांना कोणाचे अभय? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई नसल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेला कोठी–कोरणार पूल अवघ्या तीन वर्षांत कोसळल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. ...सविस्तर वाचा
18:20 (IST) 3 Sep 2026

कोठी–कोरणार पूल प्रकरण : अधिकाऱ्यांना कोणाचे अभय? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई नसल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेला कोठी–कोरणार पूल अवघ्या तीन वर्षांत कोसळल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. ...सविस्तर वाचा
17:54 (IST) 3 Sep 2026

ठाण्यात ‘नांदी संमेलन’; कवी, लेखक, पत्रकारांचा सहभाग

महाराष्ट्र साहित्य परिषद, ठाणे जिल्हा शाखा आयोजित ‘नांदी संमेलन’चे उद्घाटन गझलकार आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्या हस्ते होणार आहे. ...सविस्तर बातमी
17:51 (IST) 3 Sep 2026

'मी देव नाही; तुकाराम मुंढे आहे, माझ्या मनात…', अन्न व औषध प्रशासन आयुक्त असं का म्हणाले?

मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईवर ताशेरे ओढल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...सविस्तर बातमी
17:43 (IST) 3 Sep 2026

Video : शाळांच्या स्वयंपाकघरात उंदरांची विष्टा, राज्य अन्न आयोगाच्या तपासणीत धक्कादायक वास्तव; संबंधितांवर कारवाईचे आदेश

चार शाळांच्या शालेय पोषण आहाराची तपासणी करताना दोन शाळांच्या स्वयंपाकघरांमध्ये अस्वच्छतेसह चक्क उंदरांची विष्टा आढळली. ...अधिक वाचा
17:14 (IST) 3 Sep 2026

नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन; दोन दिवसांपासून जेवण-पाण्याविना हाल, आदित्य ठाकरेंची भेट

आंदोलनस्थळी १०० हून अधिक विद्यार्थी असून तीन विद्यार्थी उपोषणास बसले आहेत. गुरूवारी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला. ...अधिक वाचा
17:04 (IST) 3 Sep 2026

कोपरच्या प्रवीण म्हात्रेंचे नाव ‘एमआरटीपी’ गुन्ह्यात समाविष्ट करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव

बेकायदा इमारत, बनावट कागदपत्र प्रकरणी कल्पेश जोशी यांनी गेल्या चार ते पाच वर्षात पालिका, महसूल विभागाकडे तक्रारी केल्या. परंतु, राजकीय दबावांमुळे कल्पेश यांच्या तक्रारीची कोणत्याच शासन यंत्रणेने दखल घेतली नाही. ...वाचा सविस्तर
16:50 (IST) 3 Sep 2026

ठाणेकरांसाठी केवळ ६ टँकर, घोडबंदर परीसरात खासगी टँकरवाल्यांना लूट करण्याची सूट; आमदार संजय केळकर यांचा आरोप

ठाणे महापालिका क्षेत्रातील २९ लाख नागरिकांना टंचाईच्या काळात पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेच्या ताफ्यात अवघे सहा टँकर उपलब्ध आहेत. ...अधिक वाचा
16:39 (IST) 3 Sep 2026

अभिजीत दिपकेंकडून PM मोदींच्या पदवीवर प्रश्नचिन्ह! गुणपत्रिकेचा फोटो पोस्ट करत मांडले ४ मुद्दे; म्हणाले, ‘चला, दोघेही विषय संपवूया’

"मी माझी डिग्री दाखवतो, पंतप्रधान मोदींनीही त्यांची डिग्री दाखवावी," असे म्हणत त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या १९७६ मधील गुणपत्रिके ...सविस्तर बातमी
16:26 (IST) 3 Sep 2026

Video: विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आपला गणेशोत्सव...'

गुन्हे शाखेने आरोपी संतोष चव्हाणला ताब्यात घेतले असून, गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. ...सविस्तर बातमी
16:06 (IST) 3 Sep 2026

आम्ही विद्यानंदच्या पाठिशी आहोत, विद्यानंद बापट यांचे आई वडील काय म्हणाले?

"डीजे मुक्त गणेशोत्सव ही जी मागणी विद्यानंदने केली आहे ती योग्यच आहे. पण आज जी मारहाण झाली त्याचा मी निषेध करतो. विद्यानंदची भूमिका योग्यच आहे. कारण कुठल्याही एका समाजाबाबत तो बोलला नाही. त्याची भूमिका योग्य आहे. आत्ता संपर्क झालेला नाही. मी टीव्हीवर पाहिलं की ससून हॉस्पिटलमध्ये विद्यानंदला नेलं आहे. त्यांचा आवाज डी. जे. मुक्त गणपतीसाठीच आहे. पण मुद्दे चर्चेने सोडवता येतात." जी घटना घडली ते आम्हाला टीव्हीवरच कळली. आमचे नातेवाईक पुण्यात आहेत. आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. विद्यानंदला ससूनमध्ये नेलं आहे. चर्चा करता आली असती, मारहाण करणं चुकीचं आहे. ती योग्य नाही. डी.जे. विरोधात भूमिका घेतली आहे त्याबाबत आम्ही त्याच्या पाठिशी आहोत असं कल्पना बापट यांनी म्हटलं आहे. ध्वनी प्रदूषणाचा आम्हालाही त्रास झाला आहे. आम्हीही तिथे राहात होतो. आता विद्यानंदवर भ्याड हल्ला करण्यात आला, त्याला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी विद्यानंद बापट यांच्या आईने केली आहे. डीजेमुक्त गणेश उत्सव या विद्यानंदच्या भूमिकेच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत अशी भूमिका विद्यानंद बापट यांच्या आई वडिलांनी घेतली आहे

15:49 (IST) 3 Sep 2026

'विद्यानंद बापट मानसिक रोगी, गणेशोत्सवाविरुद्ध बोलणार त्याला असंच मारणार'; आरोपी संतोष चव्हाण पोलिसांच्या ताब्यात

Vidyanand Bapat Attack: गणेशोत्सवावर बोलणाऱ्यांविरोधात भूमिकेतून हा हल्ला केल्याचे त्याने म्हटले असून पोलीस सध्या त्याची सखोल चौकशी करत आहेत. ...वाचा सविस्तर
15:48 (IST) 3 Sep 2026

दिवा, डोंबिवली जलद लोकलच्या थांब्यांवरून प्रवासी संघटनांमध्ये जुंपली

संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने या मागणीला तीव्र विरोध केला आहे. तसेच दिव्याचा प्रवासी जितका संयमी आहे, तितकाच तो आपल्या प्रश्नांबाबत जागरूक व आक्रमकही आहे. ...सविस्तर बातमी
15:41 (IST) 3 Sep 2026

एसआयआरचा दावा फोल? प्रारूप मतदार यादीत एकाच मतदाराचे नाव दोनदा

नाव, वय, पत्ता अन् संगणकीकृत छायाचित्र तपासणी सुरू असतानाही दुबार नावे कायम राहिल्याने नागरिकांमधून आश्चर्य ...वाचा सविस्तर
15:36 (IST) 3 Sep 2026

उपराजधानीतही डीजे बाबत मोठा निर्णय….आजपासून डॉल्बी, प्लाझ्मा अन् प्रेशरमिड साऊंडवर बंदी

ध्वनी प्रदूषण अन् डोळ्यांना इजा करणाऱ्या लेझर लाईट्सवरही बंदी; साऊंड सिस्टिम सिलबंद ठेवण्याचे डीजे चालकांना निर्देश ...सविस्तर वाचा
15:35 (IST) 3 Sep 2026

कल्याणमधील मुथा कॉलेजमध्ये सांस्कृतिक, क्रीडा उत्सव; विद्यार्थ्यांकडून विविध कलांचे सादरीकरण

महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या सांस्कृतिक, क्रीडा उत्सवाचे उद्घाटन मुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांच्या हस्ते करण्यात आले. ...सविस्तर बातमी
15:27 (IST) 3 Sep 2026

बापट यांना मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई; पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती

पुण्यात डीजेविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात मारहाण करण्यात आली. ...सविस्तर बातमी
15:25 (IST) 3 Sep 2026

VIDEO: डोंबिवलीत निकृष्ट रस्ते डांबरीकरणाचे उपमहापौरांकडून पितळ उघड

डोंबिवली शहराच्या विविध भागांत ठेकेदारांनी नादुरुस्त, खड्डे पडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण सुरू केले आहे. ...वाचा सविस्तर
15:20 (IST) 3 Sep 2026

महाराष्ट्रात वीज आणखी महागणार? नाना पटोलेंचा कोळसा खरेदी निविदेवर गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला

'दिल्लीतील मालकांच्या' सांगण्यावरून विशिष्ट लोकांसाठी निविदा; ऊर्जा विभाग सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पटोलेंचे पत्र ...वाचा सविस्तर
15:12 (IST) 3 Sep 2026

अमरावतीत भरदिवसा महाविद्यालयीन विद्यार्थिनीची चाकूने वार करून हत्या; आरोपी फरार

गेल्या काही महिन्यांपासून पाठलाग करणाऱ्या अज्ञात युवकाचे कृत्य; हत्येनंतर आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू ...सविस्तर बातमी
15:09 (IST) 3 Sep 2026

निवृत्तिवेतनाची प्रक्रिया होणार अधिक सुलभ, महिन्याच्या १,२ तारखेलाच खात्यात जमा होणार रक्कम

प्रशासकीय फाईल प्रवासातील एक टप्पा कमी; सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाच्या समन्वयाने निवृत्तीधारकांना मोठा दिलासा ...सविस्तर बातमी
15:05 (IST) 3 Sep 2026

२०० कोटींची देणी प्रशासनाने थकवल्याने कल्याण-डोंबिवली पालिका ठेकेदारांचे आंदोलन

शासनाच्या मूलभूत सेवासुविधा अंतर्गत निधीतून कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत ठेकेदारांनी मागील तीन वर्षांच्या कालावधीत अनेक विकास कामे केली आहेत. ...अधिक वाचा
14:13 (IST) 3 Sep 2026

ठाणे, कल्याणच्या धर्तीवर उल्हासनगरातही समूह विकास योजना, महिनाभरात सर्वेक्षण करून अटी शिथिल करण्याचे संकेत

उल्हासनगर शहरात सध्या शेकडो इमारती धोकादायक स्थितीत आहेत. काही इमारती पडल्या आहेत, तर अनेक नागरिक बेघर झाले आहेत. ...अधिक वाचा
14:02 (IST) 3 Sep 2026

मारहाणीनंतर विद्यानंद बापटांची पोलिसांकडून सुरक्षित जागी रवानगी; संरक्षण पुरवण्याची रोहित पवारांची मागणी

पुण्यात गणेशोत्सवात ध्वनिवर्धकांचा वापर थांबवण्यासाठी आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना गुरुवारी सकाळी मारहाण करण्यात आली. ...अधिक वाचा
13:27 (IST) 3 Sep 2026

पेपरफुटीनंतर MPSC परीक्षा प्रक्रियेत मोठ्या सुधारणा; स्पर्धा परीक्षा शिक्षक, विद्यार्थ्यांच्या १८ कलमी मागण्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, गोपनीयता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शासनाकडे १८ कलमी मागण्यांचे निवेदन दिले आहे. ...अधिक वाचा
13:24 (IST) 3 Sep 2026

माळशेजाच्या वीज प्रकल्पाविरुद्ध संयुक्त लढा देणार, मुरबाड आणि जुन्नरच्या आंदोलकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न

निसर्गरम्य माळशेज घाट परिसरात प्रस्तावित असलेल्या अदानी समूहाच्या १५०० मेगावॅट क्षमतेच्या माळशेज घाट भोरांडे उदंचन प्रकल्पाला दोन्ही जिल्ह्यांमधून मोठा विरोध होत आहे. ...सविस्तर बातमी
13:16 (IST) 3 Sep 2026

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नाहीच, उल्हासनगरात मनसे करणार 'भीक मागो' आंदोलन

मनसेच्या वतीने गुरुवारी, ७ सप्टेंबर रोजी उल्हासनगरमध्ये ''भीक मागो'' आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिला आहे. ...अधिक वाचा
12:51 (IST) 3 Sep 2026

विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण; असीम सरोदे म्हणाले, "कट्टरतावादी भामट्यानेच हल्ला केला"

गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाला विरोध दर्शवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण झाली आहे, याबाबत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे म्हणाले, पुणे ही चांगुलपणाची प्रयोगशाळा आहे. तशीच वाईटपणाचीही प्रयोगशाळा झाली आहे हे दुर्दैवाने मान्य करावं लागतं आहे. कट्टरतावादी शक्ती पुण्यात वाढू लागल्या आहेत, पुण्यातून वाढून सगळीकडे जात आहेत. त्यापैकीच कुणीतरी भामटा आहे त्याने बापट यांच्यावर हल्ला केला आहे. विद्यानंद बापट यांच्याशी बोललो, ते सुखरुप आहेत ही चांगली गोष्ट आहे. आपल्यापेक्षा वेगळं मत मान्यच करायचं नाही ही गोष्ट वाढीला लागली आहे, ही चुकीची प्रवृत्ती आहे.

विद्यानंद बापट हे जागल्याचं काम करत आहेत. ते जनजागृतीचं काम करत आहेत. समाजाला जाग आणणाऱ्यांना महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्यावर शेणमार झाली होती. आता ट्रोलिंगच्या स्वरुपात शिव्या खाव्या लागतात आणि कधी कधी मारही खावा लागतो. विद्यानंद बापट यांची ही सुरुवात आहे. त्यांनी मोठा विषय हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील, देशातील ध्वनी प्रदूषण कमी झालं पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. संवेदनशीलपणे सण आणि उत्सव साजरे केले पाहिजेत यासाठी ते लढा देत आहेत. आम्ही त्याच्यासोबत आहोत. असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

12:50 (IST) 3 Sep 2026

विद्यानंद बापट मशिदींच्या भोंग्याबाबत नेमकं काय म्हणाले?

विद्यानंद बापट यांना विचारण्यात आलं की डी.जे. किंवा स्पीकर्सचा जसा त्रास होतो मग मशिदींच्या भोंग्याबाबत तुमची भूमिका काय विचारलं गेलं. त्यावर विद्यानंद बापट म्हणाले, ही मुळात एक लॉजिकल फॅलसी आहे. मराठीत एक म्हण आहे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारणं योग्य नाही. याचाच अर्थ टीकेला टीकेने उत्तर देणं. तुम्ही एखादी कृती करता आहात तर ती चुकीची आहे हे सांगण्यासाठी दुसरी चूक करणं. त्यामुळे तुम्ही जे करत आहात ते योग्य कसं ठरतं. एखाद्याने खून केला आहे आणि तो जर दुसऱ्याला म्हणत असेल की तू खून केला तर त्याने केलेला खून कसा काय योग्य ठरतो. हे सगळे भिन्न मुद्दे आहेत. एक चूक दाखवून दुसरी चूक जस्टिफाय होत नाही. मशिदींच्या भोंग्यावर आक्षेप नाही असं नाहीच. त्या मुद्द्यावर बऱ्याचश्या याचिका दाखल झाल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्याबाबत निर्णय दिला आहे. मशिदींवरच नाही तर सगळ्याच धार्मिक स्थळांवर ही बंदी आहे. तसंच मुस्लिम समाजाने मस्जिद अजान नावाचं अॅप तयार केलंय. त्यावर त्याचे अपडेट्स दिसतात त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत नाही. मी सर्वांगिणच खंडन केलं आहे. त्यामुळे माझ्यावर जो आरोप केला जातो की मशिदीवरचे भोंगे आणि त्यावरुन होणाऱ्या आरोपांचं मी पुरेसं खंडन केलं आहे असं उत्तर विद्यानंद बापट यांनी दिलं आहे. लगाव बत्ती या पॉडकास्टला विद्यानंद बापट यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत विद्यानंद बापट यांनी ही भूमिका घेतली आहे.

Maharashtra News Live Updates in Marathi | Maharashtra Politics, Crime Weather Live Updates

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स| महाराष्ट्र मान्सून अपडेट्स