Maharashtra Politics Updates, 11 September 2026 : राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच सध्या एमपीएससीच्या ‘एफडीए’ पेपरफुटीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. यावरून एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. ‘एमपीएससी’तील गोंधळाबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला असून परीक्षांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षण अंमलबजावणीच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Today Marathi News Live Updates : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

16:33 (IST) 11 Sep 2026

पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; भाजे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह ६ सदस्य अपात्र

पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सहा सदस्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. अपात्र ठरलेल्यांमध्ये सरपंच प्रिया ओव्हाळ, उपसरपंच कोमल केदारी, सदस्य विकास वाल्हेकर, प्रमोद ढगे, सारिका पदमुले आणि कविता चौरे यांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीचा कर थकल्यामुळे अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी ही कारवाई केल्याचं समोर आलं आहे. मात्र, ही कारवाई राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप अपात्र सदस्यांनी केला आहे.

16:08 (IST) 11 Sep 2026

माहेरच्या वाटेवरच तीन पिढ्यांचा अंत! नियतीने आई, लेकीसह नातीलाही हिरावले...

छत्तीसगढहून नागपूरकडे तीज सणासाठी माहेरी जाणाऱ्या कुटुंबाच्या बोलेरो गाडीला पिंपळगावजवळ भीषण अपघात झाला. ...सविस्तर वाचा
15:28 (IST) 11 Sep 2026

विद्यापीठातील श्वानांची अन्नबंदी करू नये; मुंबई पालिकेचे विद्यापीठाला पत्र

प्राणी कल्याण कायदा आणि एबीसी नियम २०२३ अंतर्गत श्वानप्रेमींना खाद्य पुरवण्यापासून न रोखण्याच्या पालिकेच्या सूचना ...सविस्तर बातमी
15:23 (IST) 11 Sep 2026

नशामुक्त एसटी अभियानाची घोषणा; चालक-वाहकांच्या ड्रग चाचणीसाठी तपासणी यंत्रे खरेदी करणार

परिवहन मंत्र्यांकडून एक लाखांची देणगी; २०२६-२०२९ दरम्यान राज्यभर टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी ...अधिक वाचा
15:21 (IST) 11 Sep 2026

विदर्भात ५ लाख कोटींची गुंतवणूक, ३ कोटी रोजगार; फडणवीसांनी सांगितला खनिज विकासाचा ‘महामार्ग’

रिपोर्टिंग ऑन देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील खाण परिषदेतील वक्तव्यावर, जिथे त्यांनी विदर्भात ५ लाख कोटींच्या गुंतवणुकीचा आणि ३ कोटी रोजगाराचा रोडमॅप मांडला. ...वाचा सविस्तर
15:02 (IST) 11 Sep 2026

“आता अटीतटीचा सामना, घरी बसू नका”; मनोज जरांगेंची समाजाला विनंती; उद्या मोठी घोषणा करणार

मराठा आरक्षण अंमलबजावणीच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी मागील काही दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलं आहे. मराठा आरक्षण अंमलबजावणीच्या विविध मागण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता मनोज जरांगे हे आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे यांनी आज मराठा समाजाला महत्वाचं आवाहन केलं आहे.

“मराठ्यांची हार होऊ देऊ नका. सर्वांनी उद्याच्या बैठकीला या. आता अटीतटीचा सामना असून मराठा बाधवांनी कोणीही घरी राहू नका. आपण उद्या मुंबईला जाण्याचा मार्ग सांगणार आहोत. आता मुंबईला जायचं की नाही? उद्या ठरवणार आहोत. सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे.

15:00 (IST) 11 Sep 2026

गणेशोत्सवापूर्वी पुण्यात FDAची धडक कारवाई; बुधवार पेठेत ३८ लाखांचा खवा-पनीर जप्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शुक्रवारी भेसळयुक्त खवा आणि पनीरविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. बुधवार पेठेत सकाळपासून सुरू असलेल्या या धडक मोहिमेत बार्शीहून आलेला तब्बल ४ हजार ६०० किलो खवा नष्ट करण्यात येत असून, कर्नाटकातून आलेल्या १२ हजार ५०० किलो पनीरचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे ३८ लाख रुपयांचा माल कारवाईच्या कक्षेत आला असून, प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे.

सविस्तर वाचा

14:16 (IST) 11 Sep 2026

MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलं; संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक

एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी काळं फासलं असल्याची घटना घडली आहे. ...सविस्तर वाचा
13:31 (IST) 11 Sep 2026
"मराठ्यांची हार होऊ देऊ नका", मनोज जरांगेंचं समजाला आवाहन; उद्या करणार मोठी घोषणा

मराठा आरक्षण अंमलबजावणीच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी मागील काही दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलं आहे. मराठा आरक्षण अंमलबजावणीच्या विविध मागण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता मनोज जरांगे हे आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे यांनी आज मराठा समाजाला महत्वाचं आवाहन केलं आहे.

"मराठ्यांची हार होऊ देऊ नका. सर्वांनी उद्याच्या बैठकीला या. आता अटीतटीचा सामना असून मराठा बाधवांनी कोणीही घरी राहू नका. आपण उद्या मुंबईला जाण्याचा मार्ग सांगणार आहोत. आता मुंबईला जायचं की नाही? उद्या ठरवणार आहोत. सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे.

13:27 (IST) 11 Sep 2026

विद्यानंद बापट इफेक्ट! अंबरनाथ, बदलापुरात डीजेचा दणदणाट केल्यास सोसायटी पदाधिकारी थेट जबाबदार

सहाय्यक निबंधक कार्यालयाने ८ सप्टेंबर २०२६ रोजी अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील सर्व गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीसाठी एक अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. ...वाचा सविस्तर
13:02 (IST) 11 Sep 2026

रिंग मेट्रोच्या मार्गावरून शिंदेसेनेतच संघर्ष; सरनाईकांच्या पर्यायी मार्गाला नगरसेवकांचा विरोध, ठाण्यात आंदोलन

लोकमान्य टीएमटी डेपो, आई माता मंदिर, कोरस रोड, वर्तकनगर नाका आणि शास्त्रीनगरमार्गे पर्यायी मार्ग प्रस्तावित करण्यात आल्याने त्याविरोधात गुरुवारी सायंकाळी आई माताजी चौक येथे मानवी साखळी करून निदर्शने करण्यात आली. ...सविस्तर बातमी
13:01 (IST) 11 Sep 2026
‘एमपीएससी’तील गोंधळावरून राजकारण तापलं; MPSC च्या सचिवांच्या तोंडाला काळ फासलं

राज्याच्या सध्या एमपीएससीच्या ‘एफडीए’ पेपरफुटीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. यावरून एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. ‘एमपीएससी’तील गोंधळाबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला असून काही परीक्षांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घडामोडी दरम्यानच आता संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत MPSCच्या सचिवांच्या तोंडाला काळ फासलं असल्याची घटना समोर आली आहे.

12:42 (IST) 11 Sep 2026

‘गैर-हिंदू ठेकेदार नको’ भाजप नेत्याची मागणी भोवणार? काँग्रेस, शिवसेना व बविआचा तीव्र निषेध

धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करा; काँग्रेसची पोलिसांकडे धाव ...वाचा सविस्तर
12:22 (IST) 11 Sep 2026

नवी मुंबई विमानतळालगत लालपरीचा थांबा

एसटी बससाठी स्वतंत्र वाहनतळ नसल्याने उलवे ते करंजाडे मार्गावर बस उभ्या; चालकांना बसमध्येच करावा लागला मुक्काम ...सविस्तर बातमी
12:11 (IST) 11 Sep 2026

मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी अभिजीत दीपकेंची भेट; अंतरवाली सराटीत हालचालींना वेग

मराठा आरक्षण अंमलबजावणीच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपक हे अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी दाखल झाले आहेत.

12:01 (IST) 11 Sep 2026

डोंबिवली पश्चिमेतील अनमोलनगरी रिंगरूटवरील बेकायदा बाजारावर कारवाई

काही स्थानिक दादा-भाई या बेकायदा बाजाराचे नियोजन करत होते. या बेकायदा बाजाराची माहिती गुरूवारी संध्याकाळी पालिका ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त अभिमान पवार यांना मिळताच, त्यांनी फेरीवाला हटाव पथकाच्या माध्यमातून या बेकायदा बाजारातील दोन हजार फेरीवाल्यांवर कारवाई केली. ...वाचा सविस्तर
11:52 (IST) 11 Sep 2026

ठाण्यातील शिवसेनेत आता ‘झोपू’ प्रकल्पांचा वाद, परिवहन मंत्र्यांकडून स्वपक्षीय नेत्यांची कोंडी

सरनाईक यांच्या निशाण्यावर ठाणे महापालिकेतील सभागृह नेते हणमंत जगदाळे आणि माजी नगरसेवक संजय पांडे हे दोन नेते असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...सविस्तर बातमी
11:38 (IST) 11 Sep 2026

By-Elections Legal Issues: सविस्तर: पोटनिवडणुकांचा कायदेशीर पेच

By-Elections Legal Row : लोकसभेच्या तीन तर विधानसभेच्या नऊ जागा रिक्त असताना सर्व मतदारसंघांत पोटनिवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. निवडणूक आयोगाने देशातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताना आसाममधील लोकसभेची एक जागा तसेच तमिळनाडूतील दोनसह एकूण पाच मतदारसंघांत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. ...सविस्तर वाचा
11:13 (IST) 11 Sep 2026

मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसने कोकणात जाताय… कसे आहे वेळापत्रक जाणून घ्या…..

२१ ऑक्टोबरपासून वेळापत्रकात बदल मध्य रेल्वेने पावसाळी आणि इतर कालावधीसाठी स्वतंत्र वेळापत्रक आखले आहे. २१ ऑक्टोबर २०२६ पासून बिगरपावसाळी वेळापत्रक लागू होईल. ...सविस्तर बातमी
10:42 (IST) 11 Sep 2026

गणेशोत्सव कसा साजरा करायचा? मंडप उभे, पण परवानग्या रखडल्या; मंडळांचे कल्याण-डोंबिवली पालिकेत हेलपाटे

पालिका, अग्निशमन विभाग वगळून पोलीस, वाहतूक आणि महावितरणकडून ना हरकत दाखले देण्यास विलंब होत असल्याने मंडळांचे अर्ज मंजूर होण्यास विलंब होत आहे. त्यातही महावितरणकडून मिळणारा प्रतिसाद एकदम थंड आहे. ...अधिक वाचा
10:41 (IST) 11 Sep 2026

ठाण्यात ९० टक्के जाहिरात फलक नियमबाह्य? ४० फुटांची मर्यादा असताना उंचच उंच होर्डिंग्ज; काँग्रेसची कारवाईची मागणी

पोखरण रस्त्यावर तब्बल १५० बाय १५ फुटांचा जाहिरात फलक उभारण्यात आला आहे. हे सर्व फलक नियमबाह्य आहेत, असा दावा करत काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी यासंबंधीचे पुरावे सादर केले. ...सविस्तर बातमी
10:38 (IST) 11 Sep 2026

जेट्टी, पोचरस्त्यांसाठी १७० कोटी, मुंबईसह कोकणातील १०४ कामांना गती; रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील प्रकल्पांचा समावेश

मार्च २०२६ अखेर या कामांसाठी १३३ कोटी ९२ लाख रुपये वितरित झाले असून, २०२६-२७ मध्ये आणखी १२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ही कामे होतील. ...सविस्तर वाचा
10:21 (IST) 11 Sep 2026

"MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत बैठकीत काय ठरलं?", मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या SIT चौकशीच्या आदेशानंतर आमदार रोहित पवारांचा सवाल

सध्या एमपीएससीच्या ‘एफडीए’ पेपरफुटीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. यावरून एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. ‘एमपीएससी’तील गोंधळाबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला असून परीक्षांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यावर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांनी म्हटलं की, "काही ठराविक विद्यार्थी आणि क्लासचालक यांची काल मुख्यमंत्री महोदयांबरोबर बैठक होऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा झाल्याचं आणि यावेळी काही आश्वासनं दिल्याचं मीडियातून कळतंय. MPSC च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत असेल, तर त्याचं स्वागतच करायला हवं. हा लढा विद्यार्थ्यांनी उभा केला असून यात प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग आहे, म्हणूनच या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? कोणती आश्वासनं दिली गेली? आणि ती किती दिवसांत पूर्ण होतील? याबाबत पुण्यात आज-उद्या या दोन दिवसांत एक खुली चर्चा ठेवून या चर्चेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना जाहीर आवाहन करावं. तसंच भ्रष्ट अध्यक्षांच्या राजीनाम्याची आंदोलक विद्यार्थ्यांची जी प्रमुख मागणी होती, त्याबाबत बैठकीमध्ये काय निर्णय झाला? याचाही खुलासा करावा. यामध्ये विद्यार्थ्यांचं समाधान झालं, तर आनंदच आहे, पण नाही झालं, तर पुढे काय निर्णय घ्यायचा हे विद्यार्थीच ठरवतील आणि आम्हीही त्यांच्या या निर्णयासोबत ठामपणे राहू", असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/2098263433900876072

10:21 (IST) 11 Sep 2026

परीक्षांची एसआयटी चौकशी; ‘एमपीएससी’तील गोंधळाबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई: राज्य लोकसेवा आयोगाच्या गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा २०२५ ची विशेष तपास पथकाच्या( एसआयटी) माध्यमातून चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. त्याचप्रमाणे सन२०२५च्या मुख्य परिक्षेतील प्रश्नपत्रिकांची फेरतपासणी करण्याची आणि तोवर मुलाखतींचा कार्यक्रम स्थगित करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आपल्या मागण्या मान्य झाल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केले.

सविस्तर वाचा

Maharashtra Politics Live Updates:

परीक्षांची एसआयटी चौकशी; ‘एमपीएससी’तील गोंधळाबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय, (फोटो-संग्रहित छायाचित्र)