Maharashtra News Updates, 13 August 2024 : आगामी विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार हे सध्या महाराष्ट्रभर फिरत आहेत. तर अजित पवारांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडला आहे. सध्या सर्वच नेते, राज्यव्यापी दौरे करत आहेत. मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. यासह हे नेते पदाधिकाऱ्यांच्या बैठका, सभा, मेळावे घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यातच महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? यावरही खलबतं चालू आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे देखील राज्यभर दौरे करत आहेत. यासंदर्भात घडणाऱ्या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच इतर राजकीय व सामाजिक बातम्यांवर आपलं लक्ष असेल.