Maharashtra News Live Updates, 08 August 2024 : महाराष्ट्रात जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल यावर आज अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे अजित पवारांनी जनसन्मान यात्रेतून प्रचाराचा नारळही फोडला आहे. नाशिकमधून त्यांची जनसन्मान यात्रा सुरु झाली आहे. महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना महत्त्वाच्या योजना अर्थसंकल्पामध्ये आम्ही सादर केलेल्या आहेत. त्याबद्दलची माहिती आम्हाला शेतकऱ्यांना बहिणींना, मुलींना, युवा वर्गाला द्यायच्या आहेत. काल अल्पसंख्यांकांसाठी मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करण्याची आमची भूमिका आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतून आम्ही पुढे जात आहोत असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. शिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्नही गंभीर आहे. त्यावरुन मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची टोलेबाजीही चर्चेत आहे. या आणि अशा घडामोडींकडे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष असणार आहे. दिल्लीत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींची भेट घेतली आहे. तसंच शरद पवार यांचीही भेट घेतली आहे.