Maharashtra News Live Updates, 08 August 2024 : महाराष्ट्रात जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल यावर आज अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे अजित पवारांनी जनसन्मान यात्रेतून प्रचाराचा नारळही फोडला आहे. नाशिकमधून त्यांची जनसन्मान यात्रा सुरु झाली आहे. महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना महत्त्वाच्या योजना अर्थसंकल्पामध्ये आम्ही सादर केलेल्या आहेत. त्याबद्दलची माहिती आम्हाला शेतकऱ्यांना बहि‍णींना, मुलींना, युवा वर्गाला द्यायच्या आहेत. काल अल्पसंख्यांकांसाठी मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करण्याची आमची भूमिका आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतून आम्ही पुढे जात आहोत असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. शिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्नही गंभीर आहे. त्यावरुन मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची टोलेबाजीही चर्चेत आहे. या आणि अशा घडामोडींकडे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष असणार आहे. दिल्लीत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींची भेट घेतली आहे. तसंच शरद पवार यांचीही भेट घेतली आहे.

Live Updates

Marathi News Live Today, 08 August 2024 | अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात, यासह महत्त्वाच्या घडामोडी

19:40 (IST) 8 Aug 2024
रुईया महाविद्यालयात वर्ग सुरू असताना पंखा पडला; सुदैवाने विद्यार्थी बचावले

मुंबई: शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेच्या माटुंग्यातील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयात बुधवारी वर्ग सुरू असताना पंखा पडल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही.सध्या माटुंग्यातील रुईया महाविद्यालयात इमारतीच्या डागडुजी व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.

सविस्तर वाचा

19:39 (IST) 8 Aug 2024
Mumbai crime news: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून ॲसिड फेकण्याची धमकी

मुंबई : अंधेरी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली २२ वर्षीय तरूणाविरोधात डी. एन. नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अंधेरी येथील गिल्बर्ट हिल बीट चौकी मागे असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ बुधवारी हा प्रकार घडला.

सविस्तर वाचा

18:45 (IST) 8 Aug 2024
नाशिक : राका कॉलनीतील घरफोडी प्रकरणी तीन संशयित ताब्यात

नाशिक : शहरातील उच्चभ्रु आणि मध्यवस्तीत माजी नगरसेविकेच्या घरी झालेल्या चोरीचा तपास करण्यात पोलिसांना यश आले असून तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५७ लाख, ६६ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तपासी पथकाला ७५ हजार रुपयांचे पारितोषिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जाहीर केले.

सविस्तर वाचा…

18:41 (IST) 8 Aug 2024
“काँग्रेस प्रवेश ही वैचारिक निष्ठा”, उदय मेघेंची स्पष्टोक्ती…

दत्ता मेघे यांचे विश्वासू पुतणे डॉ. उदय मेघे यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने राजकीय भूकंप झाला आहे.

सविस्तर वाचा…

18:30 (IST) 8 Aug 2024
महाड येथे १६ वर्षीय मुलाचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू, आत्महत्या की घातपात कारण अस्पष्ट

सुयशच्या वडिलांकडे परवाना असलेली रायफल बंदूक होती. लोकसभा निवडणुकीसाठी जी शासनजमा करण्यात आली होती.

सविस्तर वाचा…

18:23 (IST) 8 Aug 2024
ठाणे जिल्ह्यातील पाच जागांवर काँग्रेसचा दावा, काँग्रेसच्या यादीत उबाठाच्या दोन जागांचाही समावेश

ठाणे : येत्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यातील काही मतदार संघांची यादी सादर केली असून यामध्ये ठाणे जिल्ह्यातील पाच मतदार संघांचा समावेश आहे.

सविस्तर वाचा…

18:20 (IST) 8 Aug 2024
बारवी धरण काठोकाठ, बारवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाणारे बारवी धरण गुरूवारी काठोकाठ भरले. धरण ओसांडून वाहण्यासाठी अवघे काही सेंटीमीटर अंतर शिल्लक आहे. त्यामुळे बारवी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

18:19 (IST) 8 Aug 2024
‘‘हिंदूंनो, किमान दोन मुले जन्माला घाला नाही तर बांगलादेशसारखी…’’, विश्व हिंदू परिषदेचे आवाहन

बिकट परिस्थितीचा फायदा घेत जिहादी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतात. याबाबत सावध राहणे गरजेचे आहे, असेही शेंडे म्हणाले.

सविस्तर वाचा…

18:11 (IST) 8 Aug 2024
आरटीई प्रवेशांची मुदत संपली…जागा राहिल्या रिक्त… आता पुढे काय होणार?

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही जागा रिक्त राहिल्या आहेत. आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार असून, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.

सविस्तर वाचा

17:55 (IST) 8 Aug 2024
Pune crime news: सायबर चोरट्यांकडून सहा जणांची ८० लाखांची फसवणूक

पुणे : सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र कायम आहे. चोरट्यांनी वेगवेगळी आमिषे दाखवून सहा जणांची ७९ लाख १८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ, कोंढवा, कोथरुड पोलीस ठाण्यात फसवणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वाचा

17:54 (IST) 8 Aug 2024
गडचिरोली : अधिकारी, कंत्राटदार मालामाल; लोकप्रतिनिधी हैराण? निकृष्ट रस्त्यांमुळे…

दरवर्षी पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह, राज्य महामार्ग व अंतर्गत रस्त्यांची होणारी चाळण सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

सविस्तर वाचा…

17:54 (IST) 8 Aug 2024
स्वप्नील कुसळेचे पुण्यात जंगी स्वागत, बाप्पाची आरती आणि ढोल ताशाच्या गजरात काढली मिरवणूक

ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून नेमबाज स्वप्नील कुसळे आज मायदेशी परतला. आज सकाळी पुण्यात आगमन झाल्यावर पुणेकरानी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. शहरातील दगडूशेठ गणपती मंदीरात आरती केल्यानंतर क्रीडा संकुलात प्रवेश करण्यापूर्वी त्याची उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली होती.

वाचा सविस्तर…

17:39 (IST) 8 Aug 2024
मुंबई: खासदाराचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून पैसे उकळणारा गजाआड

मुंबई : खासदाराचा स्वीय सहायक असल्याची बतावणी करून कुलाब्यातील प्रसिद्ध बडे मियाँ हॉटेलच्या मालकाची ११ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपी सुरज कलव (३०) याला काळाचौकी पोलिसांनी अटक केली. कलव याच्या विरोधात काळाचौकी, शिवाजी पार्क आणि विक्रोळी पोलीस ठाण्यात एकूण चार फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत.

सविस्तर वाचा

17:30 (IST) 8 Aug 2024
World Tribal Day: आरेमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यास मनाई ?

World Tribal Day 2024मुंबई : आरे वसाहतीत शुक्रवारी, ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास आरे पोलीस ठाण्याने मनाई केली आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी गेल्या वर्षी पोलिसांकडून देण्यात आलेले परवानगीचे पत्र दाखवण्याची मागणी पोलिसांनी केली होती.

सविस्तर वाचा

17:12 (IST) 8 Aug 2024
पनवेलच्या ग्रामीण भागात बेकायदा बांधकाम करणाऱ्या ग्रामस्थावर महापालिकेची फौजदारी कारवाई

पनवेल: मागील आठवड्यात एका प्रभाग अधिकारी व ग्रामस्थामध्ये बेकायदा बांधकामाच्या कारवाईवरुन वाद झाल्यानंतर शिविगाळीची ध्वनीफीत समाजमाध्यमावर पसरली होती. यानंतर पनवेल पालिका अॅक्शन मोडवर आली असून यापूढे ग्रामीण भागात बेकायदा बांधकाम करणा-यांवर पालिकेने थेट फौजदारी गुन्हे नोंद करण्याचा पवित्रा घेतला आहे.

सविस्तर वाचा

17:12 (IST) 8 Aug 2024
बाॅलीवूडमधील फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांच्या वस्त्रदालनात चोरी; कल्याणीनगरमधील वस्त्रदालनातून रोकड, महागडे शर्ट लंपास

पुणे : आघाडीच्या फॅशन डिझायनर निवेदिता साबूत यांच्या कल्याणीनगर भागातील वस्त्रदालनातून चोरट्यांनी रोकड, तसेच कपडे असा एक लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.याबाबत विक्रांत सुभाष इंदुलकर (वय २६, रा. वृंदावन सोसायटी, पंचवटी, पाषाण) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर वाचा

17:12 (IST) 8 Aug 2024
घाटकोपर फलक दुर्घटना: आरोपी भावेश भिंडेच्या याचिकेवर शुक्रवारी निर्णय

मुंबई : घाटकोपर येथील महाकाय फलक दुर्घटनेप्रकरणी इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे याने जामिनासाठी आणि गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. तसेच, त्याच्या याचिकेवर शुक्रवारी निर्णय देण्याचे स्पष्ट केले.

सविस्तर वाचा

16:53 (IST) 8 Aug 2024
विमानवारी… गावखेड्यातील ४१ विद्यार्थ्यांचे टेकऑफ…

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या ४१ विद्यार्थ्यांना विमानात बसण्याचा योग आला.

सविस्तर वाचा…

16:46 (IST) 8 Aug 2024
भाईंदर मधील मीठ विभागाच्या जागेवरील शौचालय ताब्यात घेण्यासाठी ४ कोटीचा खर्च

भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील मीठ विभागाच्या जागेवर असलेल्या जुन्या शौचालयच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ते ताब्यात घेण्याचा निर्णय महालिकेने घेतला आहे. यासाठी जवळपास ४ हजार ७१२ चौरस मीटर इतके क्षेत्र खरेदी करण्यासाठी ४ कोटी १६ लाख इतका खर्च अपेक्षित करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

16:44 (IST) 8 Aug 2024
मिरा भाईंदर महापालिकेचा आयआयटीसोबत ५ वर्षाचा करार

भाईंदर : नव्याने विकसित होणाऱ्या प्रकल्पाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेने मिरा भाईंदर महापालिकेने आयआयटी मुंबईसोबत पाच वर्षाचा करार केला आहे. यामुळे पैश्याची बचत होऊन कामाचा गुणात्मक दर्जा उंचावणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

मिरा भाईंदर हे झपाट्याने विकसित होणारे शहर आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील विकास कामात देखील मोठी भर पडत आहे.यातील बहुतांश प्रकल्प हे तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यामुळे एखाद्या प्रकल्पाला नेमके कोणते तंत्रज्ञान योग्य आहे,याची माहिती घेण्यासाठी महापालिकेकडून सल्लागाराची नियुक्ती केली जाते.संबंधित सल्लागार महापालिकेला सल्ला देण्यासोबतच प्रकल्प अहवालदेखील तयार करत असतो. यात महापालिका कोट्यवधीं रुपयांचा खर्च येतो.

16:35 (IST) 8 Aug 2024
पुरग्रस्तांचा पुणे महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा

शहरात नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक भागाला पुराचा मोठा फटका बसला.

सविस्तर वाचा…

16:28 (IST) 8 Aug 2024
कल्याण डोंबिवली पालिकेतील खंडणीखोर कर्मचाऱ्याची लवकरच विभागीय चौकशी, खंडणी विरोधी पथक पालिकेत

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागातील घनकचरा विभागातील वाहन चालक कामगार विनोद मनोहर लकेश्री यांच्या विरुध्द विकासक प्रफुल्ल गोरे यांच्या तक्रारीवरून खंडणी विरोधी पथकाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा…

16:20 (IST) 8 Aug 2024
Wardha Leopard: सावधान! वर्ध्यात बिबट, हिंगणघाटात वाघाचा वावर

उमरेड येथून आलेला पाहुणा वाघ शिकारीवर शिकार करीत आहे. हिंगणघाट शहरालगत त्याचा हल्ली मुक्काम आहे.

सविस्तर वाचा…

16:09 (IST) 8 Aug 2024
तुरूंगातील ई-मुलाखत, दूरचित्रसंवाद प्रणालीच्या सुविधांची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई : राज्यभरातील तुरूंगातील ई-मुलाखत आणि दूरचित्रसंवाद प्रणालीच्या (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) सुविधेच्या स्थितीचा तपशील सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.ठाणे, मुंबईतील आर्थर रोड आणि भायखळा महिला कारागृह, नवी मुंबईतील तळोजा, कल्याण येथील आधारवाडी, पुणे येथील येरवडा आणि कोल्हापूर, नाशिक येथील कारागृहातील किती आरोपींना दूरसिचत्रसंवाद प्रणाली आणि प्रत्यक्षरीत्या न्यायालयात उपस्थित करण्यात आले, याची आकडेवारी सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठाने सरकारला दिले आहेत.

सविस्तर वाचा

16:02 (IST) 8 Aug 2024
डोंबिवलीजवळ हेदुटणे, उत्तरशिव येथे गिरणी कामगारांच्या घरांना जमिनी देण्यास मनसेचा विरोध

डोंबिवली जवळील हेदुटणे, उत्तरशिव गावांच्या हद्दीत मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठी जमिनी देण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

वाचा सविस्तर…

15:54 (IST) 8 Aug 2024
पिंपरी: धक्कादायक! शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी बनावट कागदपत्रे शासनाकडे सादर, प्रशिक्षकावर गुन्हा

पिंपरी : प्रशिक्षकाने त्याच्याकडे सरावासाठी असलेल्या खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे शासनाला सादर केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या कालावधीत प्रभात रोड, एरंडवणे, पुणे येथे घडली.

सविस्तर वाचा

15:54 (IST) 8 Aug 2024
वडगाव शेरीत टोळक्याची दहशत; दोघांवर कोयत्याने वार

पुणे : वडगाव शेरी भागात टोळक्याने दहशत माजवून वैमनस्यातून दोन तरुणांवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या घटनेत दोघे जण जखमी झाले असून, टोळक्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.उद्देश विलास शिंगारे (वय २७, रा. माळवाडी, वडगाव शेरी), यश टारगे (वय १९, रा. करण रिहा सोसायटी, वडगाव शेरी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

सविस्तर वाचा

15:53 (IST) 8 Aug 2024
पुणे: दुचाकी ५० हजारांची; दंड सव्वा लाखाचा !

पुणे : वाहतूक नियमभंग हाच ‘नियम’ असल्यासारखे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांच्या शहरात एखाद्याने किती वेळा नियमभंग करावा?… पोलिसांकडे असलेल्या नोंदीनुसार तब्बल १५० वेळा! या दुचाकीस्वारावर थकीत असलेल्या दंडाची रक्कम आहे जवळपास सव्वा लाख रुपये. विशेष म्हणजे, दंडाची ही रक्कम ज्या दुचाकीवरून नियमभंग केले, त्या दुचाकीच्या किमतीच्या अडीचपट आहे!

सविस्तर वाचा

15:51 (IST) 8 Aug 2024
Bachchu Kadu: “मोर्चा अडवू नका, अन्‍यथा…”, बच्‍चू कडू यांचा इशारा

बच्‍चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होण्‍यापूर्वी प्रसार माध्‍यमांशी बोलताना सत्‍तेत राहायचे की नाही, याचा निर्णय आपण उद्या घेणार असल्‍याचे सांगितले.

सविस्तर वाचा…

15:44 (IST) 8 Aug 2024
महारेरा संकेतस्थळावर कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे लवकरच चॅटबॉटही! तांत्रिक कार्यवाहीसाठी संकेतस्थळ १३ ते ३१ ऑगस्ट या काळात स्थगित

महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाचे (महारेरा) संकेतस्थळ कालसुसंगत, वापरकर्ता स्नेही आणि अनेक उपयुक्त वैशिष्ट्यांनी सुसज्ज करण्यात येणार आहे. कम्प्लेंट ॲंड रेग्युलटरी इंटिग्रेटेड टेक्नॅालॅाजी इम्प्लिमेंटेशन म्हणजेच ‘महाक्रिटी’ या नावाने हे संकेतस्थळ ओळखले जाणार आहे. १ सप्टेंबरपासून कार्यान्वित होणाऱ्या या संकेतस्थळावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चॅटबॉट ही प्रणालीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्पांची नोंदणी, नूतनीकरण आणि दुरुस्त्या, एजंट्सची नोंदणी आणि नूतनीकरण आणि घर खरेदीकरार आणि तत्समांच्या तक्रारी आदी कामे नियमितपणे होतात. ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यापूर्वी १३ ते ३१ ऑगस्ट या काळात महारेराचे संकेतस्थळ प्रवर्तक आणि एजंट्स यांच्यासाठी स्थगित राहणार आहे. घरखरेदीदारांना नेहमीप्रमाणे सुविधा सुरू राहतील. मात्र २० ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ३१ ऑगस्टपर्यंत खरेदादारांना ऑनलाईनऐवजी स्वहस्ते अर्ज करावे लागतील. तक्रारींच्या सुनावण्या मात्र सुरूच राहणार असल्याचे महारेराने स्पष्ट केले आहे.

शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतून आम्ही पुढे जात आहोत असं अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं. त्यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

शिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्नही गंभीर आहे. त्यावरुन मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची टोलेबाजीही चर्चेत आहे. या आणि अशा घडामोडींकडे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष असणार आहे. दिल्लीत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींची भेट घेतली आहे. तसंच शरद पवार यांचीही भेट घेतली आहे.