Maharashtra Political News राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापू लागलेला असतानाच ओबीसी समाजही आरक्षणाच्या बाबतीत आक्रमक झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. छगन भुजबळ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यात मनोज जरांगेंच्या सभांना मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पेच राज्य सरकारसमोर निर्माण झाल्याचं दिसत आहे.




Maharashtra News Live Updates: आरक्षणाचा मुद्दा तापला, राज्य सरकारसमोर मोठा पेच!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? यासंदर्भातील निवडणूक आयोगासमोरील आजची सुनावणी संपली असून पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी, अर्थात २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
कोण कुठे जाऊन जुगार खेळतंय, कोण कुठे जाऊन काय करतंय याच्याशी महाराष्ट्राला काही घेणं देणं नाही, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. परंतु आज शासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यातल्या युवांचा, सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या आयुष्याचा, राज्याच्या अस्मितेचा पूर्ण जुगार झाला आहे, त्यामुळे उगाच बिनकामाच्या गप्पा न मारता मुद्द्याचं_बोला हीच आज राज्याची मागणी आहे.
चंद्रपूर: जुनोनाच्या जंगलात काड्या आणण्यासाठी गेलेल्या स्कूल बसचा चालक मनोहर वाणी (५२) यांच्यावर वाघाने हल्ला केला.
मालेगाव: येथील रेणुकादेवी औद्योगिक यंत्रमाग सहकारी संस्थेसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेत घोटाळा केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे.
पुणे: सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे पक्षचिन्ह कुणाचं? यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. अजित पवार गटाने आपणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला आहे. या सुनावणीसाठी खुद्द शरद पवार निवडणूक आयोगासमोर उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे.
टोळीने शुक्रवारी झालेल्या जरांगे पाटील यांच्या सांगली दौर्यावेळी मोठी हातसफाई केल्याचे दिसून आले होते.
भंडारा : शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी भंडारा जिल्ह्यात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विविध संघटना आणि लाभार्थ्यांनी निवेदन देण्यासाठी वेळ मागितली होती. त्यांना वेळ देण्यातही आली होती. त्यासाठी सकाळपासून अनेक संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लाभार्थी मुख्यमंत्र्यांच्या भेटीस्थळी पोहोचले होते. मात्र कार्यक्रम संपताच मुख्यमंत्र्यांचा ताफा कुणालाही न भेटता निघून गेल्याने नागरिक संतापले आणि त्यांनी राष्ट्रीय महामार्ग सहावर रास्ता रोको सुरू केले.
नाशिक: नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आमच्या हक्काचे पाणी जायकवाडीला सोडावे, या मागणीसाठी मराठवाड्यातील काही राजकीय पक्षांच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी अकस्मात गंगापूर धरणावर धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले.
नाशिक: नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आमच्या हक्काचे पाणी जायकवाडीला सोडावे, या मागणीसाठी मराठवाड्यातील काही राजकीय पक्षांच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी अकस्मात गंगापूर धरणावर धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले. धरण परिसरात परवानगीशिवाय प्रवेशास प्रतिबंध आहे.
जळगाव: तालुक्यातील शेळगाव येथील धरणात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा तोल गेल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघड झाली. याप्रकरणी नशिराबाद येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
अकोला : काँग्रेसची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी जाहीर केल्याच्या २४ तासांच्या आत एका उपाध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय बोडखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे दिला. त्यामुळे काँग्रेस पक्षातील नाराजी कायम असल्याचे दिसून येते.
आमच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झालेला असताना १८ दिवस होऊनही काही झालेलं नाही. आधीच दोन महिने गेले आहेत. सरकारपेक्षाही स्वत:ला कोणता अधिकारी वरचढ समजतोय हे समोर आलं पाहिजे – मनोज जरांगे पाटील
डाॅ. इंदूराणी जाखड या २०१६ च्या आयएएस तुकडीतील महाराष्ट्र संवर्गातील अधिकारी आहेत.
ही विकृत मानसिकता संपवायला हवी. इतकं फ्रस्ट्रेशन योग्य नाही. तुम्ही असे फोटो टाकून इतके वाईट आरोप करत आहात. हा राजकीय पातळी खाली नेण्याचाच प्रकार आहे – देवेंद्र फडणवीस
नागपूर : एकदिवसीय विश्वकपच्या अंतिम सामन्यातील भारतीय संघाच्या पराभवावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधीपक्षाने लक्ष्य केले आहे. मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ असतो, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
भंडारा : येथील चैतन्य मैदानावर आज दुपारी सुरू झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच अचानक प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मंचापुढे गोंधळ घातला. शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यास शासन असमर्थ ठरत असल्याने निषेध व्यक्त करीत विनोद वंजारी मंचापुढे आले व ‘खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देण्यास सुरवात केली.
रेल्वे स्थानकावर तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची रांग होती. त्यामुळे मुलीच्या वडिलांना परत येण्यास उशीर झाला.
मकाऊमध्ये त्या व्यक्तीने तीन तासांत साडेतीन कोटी रुपये उडवले. ते म्हणतात कुटुंबाबरोबर मकाऊमध्ये होतो. मग तुमचं कुटुंब चीनी आहे का? तुमच्याकडे इकडे इडी आहे, आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी आहे. तिथून फोटो येत आहेत आमच्याकडे. माझ्याकडे आणखी २७ फोटो आणि पाच व्हिडीओ आहेत – संजय राऊत
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आपण महायुतीकडून निवडणूक लढवणार आहे. यासाठी महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहे, असेही खोत यांनी यावेळी सांगितले.
मुंबई : कंपनीत ३१ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपाखाली कंपनीच्या महिला अधिकाऱ्याविरोधात सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कपड्यांच्या कंपनीच्या मालकाने केलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फसवणुकीची रक्कम बँक खात्यातून काढण्यात आल्याचा आरोप आहे.
नागपूर: आशा गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने (सीआयटीयू) २३ दिवसांचा संप यशस्वी केल्यावर गुरूदेव सेवाश्रम सभागृहात विजय मेळावा घेतला. याप्रसंगी विधानसभा अधिवेशनापूर्वी शासनाने आश्वासनानुसार शासन आदेश न काढल्यास पुन्हा संपाचा इशारा युनियनचे नेते राजेंद्र साठे यांनी दिला.
ते म्हणे.. फॅमिल सह मकाऊ ला गेले आहेत..जाऊ द्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे.. कधीच जुगार खेळले नाहीत.. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय! – संजय राऊत
मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे – चंद्रशेखर बावनकुळे
https://twitter.com/cbawankule/status/1726534157738897821?s=48&t=yN4NDAcqXYHcL_Rp6w09WQ
महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है… – संजय राऊत
अकोला : अकोला-म्हैसांग मार्गावर आपातापानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचारी युवकाचा मृत्यू झाला. योगेश सुभाष गाडे (२४, रा. अनकवाडी) असे मृताचे नाव आहे.
गणेश पेठेतील बुरुड गल्लीमधील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री ही घटना घडली.
अकोला : दिवाळीची सुट्टी असल्याने सहलीला गेलेल्या श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी गौरांग आंबेकर (२०) याचा पातूर घाटात दुचाकी घसरल्याने रविवारी सायंकाळी अपघाती मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्याने हेल्मेट परिधान केले होते. मात्र, छातीला दुखापत झाल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला.
भुरट्या चोरांनी तक्रारदार यांच्या हातामधील सोन्याची अंगठी, लाॅकेट, पाकिटमधील पैसे असा ३८ हजार रूपयांचा ऐवज काढून घेतला.
अकोला : काँग्रेसची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी जाहीर केली. या कार्यकारिणीत वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस कोषाध्यक्ष, चिटणीसांसह तब्बल २६६ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या तोंडावर सर्वांना पदे देऊन खूश करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
रात्री ८ वाजता घरी जाण्यासाठी ती रस्ता ओलांडण्यासाठी आर माॅल येथील पादचारी पूलावर आली. त्याचवेळी एक तरूण तिच्या मागून आला.
भंडारा : विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठीचा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम आज भंडाऱ्यात होत आहे. त्यासाठी गावोगावच्या लोकांना आणण्यासाठी एसटी बस आरक्षित करण्यात आल्याने ग्रामीण व शहरी भागातील नेहमीच्या मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला आहे.
मुंबई : महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांनी दर तीन महिन्यांनी प्रकल्पांबाबतची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांविरोधात महारेराने कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार जानेवारीत नोंदणी झालेल्या प्रकल्पांविरोधात कारवाई सुरू असतानाच आता फेब्रुवारीत नोंदणी झालेल्या ७०० पैकी २४८ प्रकल्पांनी माहिती अद्ययावत न केल्याने त्यांची नोंदणी महारेराने स्थगित केली आहे.
मुंबई : आजपासून मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने क्षयरोग आणि कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जनजागृतीसाठी घरोघरी आरोग्य तपासणी करुन क्षयरोग व कुष्ठरोगाच्या रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. ही मोहीम ६ डिसेंबरपर्यंत राबवली जाणार आहे.
पुणे: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ तरुण मृतावस्थेत सापडला. तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, खुनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही.
अकोला येथील एका गुंडाने एका चौदा वर्षांच्या मुलीचे मुंडन करुन तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खदान पोलीसांनी त्या नराधमास अटक करुन त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.एका गावगुंडाची मुलीची विटंबना करुन तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंत मजल जाते हे अतिशय संतापजनक आहे.कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे. या गुंडावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.शासनाने त्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून त्या दृष्टीने उचित कार्यवाही करावी – वन लायनर
समाजाची बाजू मांडताना कोणीही टोकाची भूमिका मांडू नये. गावा-गावात वाद झाले भांडण झाले तर कोण जबाबदार असेल? शाहू फुले आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र आहे, मी आणि माझा पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी सभेत ज्या पद्धतीने टोकाचे विधान केले त्याला माझे समर्थन नाही. सरकारकडून अनेकांना प्रमाणपत्र देऊन झाले आहेत. सत्तेत असताना समस्या सोडवल्या पाहिजे. सत्तेत असून ओबीसी समाजाच्या समस्या सोडवता येत नसतील तर त्यांनी सत्ता सोडली पाहिजे – विजय वडेट्टीवार
https://twitter.com/VijayWadettiwar/status/1726465060011192577
जळगाव: सुरुवातीला शिक्षकांची ५० टक्के रिक्त पदे भरली जातील. आधार पडताळणीसंदर्भात असलेल्या अडचणी दूर झाल्यानंतर ८० टक्के रिक्त पदांची भरती करण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
पुणे: राज्यातील १४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सुमारे २,०६८ महसूल मंडलात दुष्काळी परिस्थिती आहे.
गुरुवारी, २३ नोव्हेंबरपासून राज्यात आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढेल. या वाऱ्यांसोबत बाष्पयुक्त वारे राज्यात येतील.
लाचखोरीच्या ७५ गुन्ह्यांमध्ये लाच घेताना विविध सरकारी विभागातील अधिकाऱ्यांसह खासगी व्यक्तीदेखील एसीबीच्या जाळ्यात अडकल्या असून एकूण आरोपींची संख्या १०४ इतकी आहे.
अमरावती : शहरातील ‘मिलन मिठाई’ या प्रतिष्ठानाचे संचालक अशोक होशियारसिंह शर्मा (६२, रा. महेश नगर, बडनेरा रोड) यांनी स्वत:च्या छातीत बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली. सविस्तर वाचा…
या प्रकरणी पोलिसांनी अदित्य दिपक रणावरे आणि सागर लक्ष्मण बनसोडे यांना अटक केली आहे.
प्रवासी गाड्या या इगतपुरी ते बडनेरापर्यंतचे ५२६ किलोमीटरचे अंतर प्रतितास १३० किलोमीटरच्या वेगाने धावत आहेत.
नागपूर : राज्यातील शासकीय अकृषी विद्यापीठांच्या प्र-कुलगुरूंच्या निवडीच्या पद्धतीवर आधीच आक्षेप असताना विद्यापीठाच्या महत्त्वाच्या संविधानिक पदावर असलेल्या प्र-कुलगुरू निवडीचे अधिकार कुलगुरू आणि व्यवस्थापन परिषदेच्या हाती देण्यात आल्याने यावर आक्षेप घेतला जात आहे.
मुंबई : वरळी पोलीस वसाहतीतील अभ्यासिकेत गफळास घेऊन २७ वर्षीय पोलीस शिपायाने रविवारी रात्री आत्महत्या केली. सविस्तर वाचा…
एका व्यक्तीमुळे राज्यात जातीय तणाव निर्माण झालेला आहे, असे म्हणत जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील तोडगट्टा येथे गेल्या २५० दिवसांपासून सुरू असलेल्या खाणविरोधी आंदोलनातील महत्त्वाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आज सकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वां
यवतमाळ : सायबर भामट्यांनी व्हिडीओ लाईक्स केल्यास रिवार्डसह बोनस देण्याचे आमिष एका तरुणाला दाखविले. आमिषाच्या लालसेपोटी तरुणाने दहा लाख ९५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, भामट्यांनी त्याची फसवणूक केली. याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
नागपूर : जानेवारी २०२४ मध्ये नागपूर शहरात राष्ट्रीय पर्यावरण युवा संसदेचे आयोजन करण्यात आले असून १३० विद्यापीठांचे विद्यार्थी प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह
Maharashtra News Live Updates: मरोज जरांगेंच्या सभांना मराठा समाजाची मोठी गर्दी!